नि. 23
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 592/2010
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 15/12/2010
तक्रार दाखल तारीख : 23/02/2011
निकाल तारीख : 28/06/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री अनिल एकनाथ जाधव-पाटील
2. श्री जयदिप अनिल जाधव-पाटील
3. श्री संदिप अनिल जाधव-पाटील
4. श्री एकनाथ हरी जाधव-पाटील
5. सौ मालती एकनाथ जाधव-पाटील
नं.1 हा नं.3 तर्फे अ.पा.क.म्हणून व
नं.2, 4, 5 तर्फे कुलमुखत्यार
सर्वजण रा.हिंगणगांव खुर्द, ता.कडेगांव
जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. सुरेशबाबा देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव ता.कडेगांव जि.सांगली
2. श्री चंद्रसेन आनंदराव देशमुख, चेअरमन
3. श्री रविंद्र काशिनाथ पालकर, व्हा.चेअरमन
4. श्री सुनिल शंकर भस्मे, चेअरमन
5. श्री श्रीकांत चंद्रकांत कराडकर, संचालक
6. श्री हनीफ मुबारक आतार, संचालक
7. श्री सुभाष जुगराज भंडारी, संचालक
8. श्री बबन आप्पा रास्कर, संचालक
9. श्री सुरेश महादेव नकाते, संचालक
10. श्री राजेंद्र गोपीनाथ दिक्षीत, संचालक
सर्वजण रा.कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एल.डी.भोसले
जाबदार क्र.1 ते 10 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे दामदुप्पट व मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीनंतरही परत मिळाली नाही म्हणून दाखल केली आहे.
2. सदरचे तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदाराने जाबदार क्र.1 ते 10 यांचेकडे खालील तपशीलाप्रमाणे दामदुप्पट व मुदत ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतविलेली होती.
अ.क्र. |
पावती नं. |
रक्कम ठेवल्याचा दिनांक |
रक्कम परतीचा दिनांक |
ठेव रक्कम रु. |
मुदती/आजअखेर होणारे व्याज |
1 |
007493 |
18/8/04 |
16/2/10 |
15000 |
दामदुप्पट |
2 |
007397 |
15/6/04 |
15/7/09 |
10000 |
दामदुप्पट |
3 |
008041 |
7/2/06 |
7/8/12 |
15000 |
7987 |
4 |
008040 |
7/2/06 |
7/8/12 |
15000 |
7987 |
5 |
008735 |
21/8/06 |
21/2/13 |
10000 |
4740 |
6 |
018977 |
22/5/06 |
7/7/06 |
10000 |
119 |
7 |
018987 |
1/06/06 |
17/7/06 |
10000 |
119 |
8 |
011592 |
29/8/06 |
14/10/06 |
3000 |
35 |
9 |
004315 |
26/8/02 |
26/3/07 |
10000 |
दामदुप्पट |
10 |
002303 |
29/8/05 |
29/2/12 |
10000 |
5816 |
11 |
002381 |
5/12/05 |
5/6/12 |
14000 |
7337 |
12 |
008010 |
2/1/06 |
2/7/12 |
10000 |
5430 |
13 |
018978 |
20/5/06 |
7/7/06 |
10000 |
119 |
14 |
018988 |
1/6/06 |
17/7/06 |
5000 |
59 |
15 |
006147 |
4/2/03 |
4/11/07 |
10000 |
दामदुप्पट |
16 |
002382 |
5/12/05 |
5/6/12 |
10000 |
5527 |
17 |
008011 |
2/1/06 |
2/7/12 |
10000 |
5430 |
18 |
008037 |
3/2/06 |
3/8/12 |
4000 |
2209 |
19 |
008044 |
7/2/06 |
7/8/12 |
15000 |
8304 |
20 |
008039 |
6/2/06 |
6/8/12 |
10000 |
5533 |
21 |
008043 |
7/2/06 |
7/8/12 |
15000 |
8304 |
22 |
008042 |
7/2/06 |
7/8/12 |
15000 |
8304 |
उपरोक्त ठेवी ठेवण्यामागचा उद्देश मुलांचे संगोपन, शिक्षण तसेच लग्न इत्यादी भविष्यकालीन खर्च भागविण्यासाठी होता. जाबदार क्र.1 ते 3 यांनी मुदत संपल्यानंतरही सदर ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. वकीलांमार्फत लेखी नोटीस देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून तक्रारदाराने ग्राहक मंचाकडे येवून आपला तक्रारअर्ज दाखल केला. तक्रारीमध्ये मुद्दल व्याजासह रु.3,64,759/- व सदर रकमेवर 14 टक्के व्याज तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने स्वतःचे शपथपत्रासह नि.5 वर एकूण 26 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1 ते 5 व 8 ते 10 यांना नोटीस लागूनही ते या प्रकरणात मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत किंवा आपले म्हणणे दाखल केले नाही. जाबदार क्र.6 व 7 यांनी नोटीसा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे जाबदार क्र.1 ते 10 यांचेविरुध्द नि.क्र.1 वर मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला आहे.
5. तक्रारदाराची तक्रार, लेखी म्हणणे, पुराव्यादाखल दाखल केलेली कागदपत्रे आणि त्यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंच खालील निष्कर्षाप्रत आलेले आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
6. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांचेकडे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या पावत्या नि.क्र. 5/1 ते 5/22 ला सादर केल्या आहेत. त्यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-सेवादार नाते प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते.
7. मुदत संपल्यानंतर तक्रारदारांची मुदत ठेव रक्कम परत न करणे ही सेवेतील त्रुटी आहे. यासंदर्भात अनेक न्यायनिवाडे पटलावर आलेले आहेत. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र. 1 ते 10 यांचा सेवादोष दिसून येतो.
8. जाबदार क्र.1 ते 10 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत किंवा आपले लेखी कथन सादर केलेले नाही. याचा निष्कर्ष असा निघतो की, तक्रारदाराने मंचासमोर मांडलेली तक्रार योग्य आहे आणि जाबदारांना ती मान्य असल्यासारखीच आहे.
9. संस्थेच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारास संचालक मंडळ जबाबदार असते. त्यासाठी Corporate Veil open करुन त्यांच्यावर आर्थिक जबाबदारी निश्चित करणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदार किंवा गुंतवणूकदार संचालकांवर विश्वास ठेवूनही वित्तीय संस्थेत गुंतवणूक करीत असतो. त्यामुळे जाबदार क्र. 2 ते 10 यांना आर्थिक जबाबदारी टाळता येणार नाही. किंबहुना तक्रारदाराची व्याजासह गुंतवणूक रक्कम रु.3,64,759/- मुदत संपल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 8 टक्के दराने देणेस बांधील आहे. शिवाय तक्रारदाराने मागणी केलेली मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- ही मागणी देखील मान्य करण्यात येत आहे. त्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार क्र.1 ते 5 यांनी मुदत ठेवीमध्ये गुंतविलेली व्याजासह एकूण रक्कम रु. 3,64,759/- प्रत्येक ठेवपावतीची मुदत संपल्याच्या तारखेपासून रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. जाबदार क्र.1 ते 10 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून 45 दिवसांत
करावी.
5. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 28/06/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष