नि.नं. १८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ८१/२०१०
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – ०५/०२/२०१०
तक्रार दाखल तारीखः – ०३/०३/२०१०
निकाल तारीखः - १९/०१/२०१२
----------------------------------------------
श्री दत्तात्रय तुकाराम गोरे
वय ६० वर्षे, धंदा – शेती
रा.कडेगाव ता.कडेगांव जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. चंद्रसेन आनंदराव देशमुख
२. श्री रविंद्र काशीनाथ पालकर
३. श्री सुनिल शंकर भस्मे
४. श्री श्रीकांत चंद्रकांत कराडकर
५. श्री महंमदहनिफ मुबारक आतार
६. श्री सुभाष जुगराज भंडारी
७. श्री बबन आप्पा रास्कर
८. श्री सुरेश महादेव नकाते
९. श्री राजेंद्र गोपीनाथ दिक्षीत
१०. सुरेशबाबा देशमुख सहकारी पतसंस्था मर्या.
कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली
नं.१ चेअरमन, नं.२ व्हा.चेअरमन,
नं.३ ते ९ संचालक, सुरेशबाबा देशमुख
सहकारी पतसंस्था मर्या. कडेगांव
ता.कडेगांव जि. सांगली
जाबदार क्र.१ व ९ वय – सज्ञान, धंदा-शेती,
रा.कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री एस.आर.माने
जाबदार क्र.१ ते १० – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार सुरेशबाबा देशमुख सहकारी पतसंस्था मर्या.कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविलेली होती. सदरचे ठेवीची मुदत पूर्ण झालेली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ४ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते १० यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. १ ते ९ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. प्रस्तुत प्रकरणी दाखल दामदुप्पट ठेवपावतीचे प्रतीचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवीत गुंतविलेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी नि.१७ ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्येही त्यांना अद्यापपर्यंत व्याज मिळालेले नाही असे नमूद केले आहे. ठेवीची मुदतही पूर्ण झालेली आहे. सबब या ठेवीतील मुदतीनंतर मिळणारी रक्कम मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.००७२९३ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.८०,०००/- (अक्षरी रुपये ऐंशी हजार फक्त) दि.२२/१/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.४/०३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: १९/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.