shri vishvanath shidu nalawde filed a consumer case on 06 Oct 2015 against sureshababa deshmukh na. sha .patsanstha in the Satara Consumer Court. The case no is CC/15/49 and the judgment uploaded on 27 Oct 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 49/2015.
तक्रार दाखल दि.12-3-2015.
तक्रार निकाली दि.6-10-2015.
दोघे रा.पार्ले, ता.कराड, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. सुरेशबाबा देशमुख नागरी सह.पतसंस्था मर्या.
कडेगांव, ता.कडेगांव, जि.सांगली तर्फे-
श्री. चंद्रसेन आनंदराव देशमुख, चेअरमन.
2. रविंद्र काशिनाथ पालकर, व्हा.चेअरमन.
3. सुशिल शंकर भस्मे, संचालक.
4. श्रीकांत चंद्रकांत कराडकर, संचालक.
5. महंमद हनिफ मुबारक आत्तार, संचालक.
6. सुभाष जुगराज भंडारी, संचालक.
7. बबन बाप्पा रास्कर, संचालक.
8. सुरेश महादेव नकाते, संचालक.
9. राजेंद्र गोपीनाथ दिक्षित, संचालक.
सर्व रा. कडेगांव, ता.कडेगांव, जि.सांगली .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड. राजीव गांधी
जाबदार 1 ते 9- नो से आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्या यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रारदार क्र.1 व 2 हे वर नमूद पत्त्यावर रहात आहेत. जाबदार ही सहकारी पतसंस्था असून ती या मे.कोर्टाचे स्थळसीमेत कार्यरत आहे. सदर पतसंस्था सभासद व इतर लोकांकडून ठेवी गोळा करणे, ठेवीदारानी मागणी करताच सव्याज ठेवी परत करणे, गरजेपोटी पतपुरवठा करणे अशा प्रकारचा व्यवसाय करते. जाबदार क्र.1 हे संस्थापक संचालक/चेअरमन आहेत. जाबदार क्र.2 ते 9 हे बँकेचे पदाधिकारी आहेत व बँकेचे दैनंदिन कारभारास ते जबाबदार आहेत. तक्रारदार क्र.1 व 2 यानी जाबदार पतसंस्थेत खालीलप्रमाणे रकमा ठेवलेल्या आहेत-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | व्याज मिळालेची तारीख |
1 | 016083 | 15,250/- | 17-11-04 | 17-12-07 | 31-10-07 |
2 | 016084 | 15,250/- | 17-11-04 | 17-12-07 | 31-10-08 |
3 | 016085 | 15,250/- | 17-11-04 | 17-12-07 | 31-10-07 |
4 | 017983 | 10,500/- | 23-09-05 | 23-10-08 | 31-12-07 |
5 | 017862 | 10,000/- | 09-05-05 | 09-06-08 | 31-12-07 |
6 | 016082 | 15,250/- | 17-11-04 | 17-12-07 | 31-08-07 |
एकूण रक्कम रु. 81,500/-
तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेत जाऊन ठेवपावत्यांच्या रकमांची वेळोवेळी मागणी केली परंतु जाबदारांनी रक्कम देणेस टाळाटाळ केली व शेवटी जाबदार पतसंस्थेने रक्कम किंवा व्याज देणेस असमर्थता दाखवली ते ऐकून तक्रारदारास प्रचंड मानसिक धक्का बसला. शेवटी तक्रारदारानी दि.31-12-2014 रोजी वकीलांतर्फे जाबदारांस नोटीस पाठवून ठेवपावत्यांच्या रकमा व त्यावरील व्याज व रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्क्याने होणारे व्याज अशा एकूण रकमेची मागणी केली. परंतु आजपावेतो तक्रारदारास काहीही रक्कम मिळालेली नाही. तक्रारदार वयस्कर असलेने व सतत आजारी असलेने तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. जाबदारास नोटीस मिळूनही त्यानी नोटीसीस उत्तर दिले नाही किंवा पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे सदर अर्ज दाखल करावा लागत आहे. जाबदार पतसंस्थेची शाखा कराड, ता.कराड, जि.सातारा ही मे.कोर्टाचे स्थळसीमेत आहे म्हणून मे.कोर्टास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार आहे. तसेच तक्रारदाराने सदर कारणास्तव इतर कोणत्याही कोर्टात दाद मागितलेली नाही. तक्रारदाराची विनंती की, त्याची जाबदार पतसंस्थेतील ठेव रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत त्या रकमेवर 18 टक्क्याने व्याज मिळावे, मानसिक त्रास व आर्थिक नुकसानभरपाईपोटी रु.50,000/-, व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा तसेच जाबदार क्र.1 ते 9 यांना संस्थेसाठी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणेत यावे. येणेप्रमाणे तक्रारअर्ज असे.
2. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे अँड.गांधी यांचे वकीलपत्र, नि.5 कडे पत्तापुरसीस, नि.4 कडे कागदयादी, नि.4/1 ते नि.4/6 कडे तक्रारदाराच्या मूळ मुदतठेव पावत्या, नि.4/7 कडे तक्रारदारातर्फे अँड.गांधी यांनी जाबदाराना पाठविलेल्या रजि.नोटीसची स्थळप्रत, नि.4/8 कडे पोस्टाची पावती, नि.4/9 कडे जाबदार क्र.1 चेअरमन/संचालक यांच्या सहीची पोहोचपावती, नि.4/10 कडे जाबदार पतसंस्थेची संचालक मंडळाची यादी, नि.5 कडे मंचातर्फे जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि.6 कडे जाबदार क्र.7, नि.7 कडे जाबदार क्र.1, नि.8 कडे जाबदार क्र.6, नि.9 कडे जाबदार क्र.4, नि.10 कडे जाबदार क्र.3, नि.11 कडे जाबदार क्र.9, नि.12 कडे जाबदार क्र.8, नि.13 कडे जाबदार क्र.5 यांच्या पोहोचपावत्या दाखल आहेत. नि.7 कडे जाबदारांचा वकीलपत्र, व म्हणणे देणेस मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.8 कडे तक्रारदाराचा जाबदारांविरुध्द एकतर्फा आदेश पारित करणेबाबतचा अर्ज, नि.9 कडे तक्रारदाराचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, नि.10 कडे तक्रारदाराची पुरसीस की, तक्रारअर्ज, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, दाखल ठेवपावत्या, नोटीसा हाच लेखी युक्तीवाद समजावा व सदरचे प्रकरण निकालावर नेमणेत यावे इ.कागदपत्रे दाखल आहेत.
3. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांची रक्कम देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन-
4. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. जाबदार पतसंस्था ही लोकांकडून ठेवस्वरुपात रकमा जमा करुन घेते व त्यामोबदल्यात त्याना त्यावर व्याज देते. प्रस्तुत कामी तक्रारदारांची रक्कम जाबदारांकडे मुदतठेव स्वरुपात ठेवली गेली. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. तसेच जाबदार पतसंस्थेने रक्कम ठेवून घेतली व त्यावर व्याज दयावयाचे ठरविलेने जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी ठरते. तक्रारदारानी मुदत संपलेनंतर वारंवार रकमेची मागणी करुनही जाबदारानी तक्रारदारांची रक्कम परत केली नसल्यामुळेच जाबदारांच्या कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटीही निर्माण झालेली आहे. आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही, ती त्यांनी त्यांना सव्याज वेळेत परत करावयास हवी होती व या सर्वाची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 9 यांचेवरच होती व आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 ते 9 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. सदर बाबतीत आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
5. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.16083 वरील रक्कम रु.15,250/- वर (दि.30-4-2008 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-5-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.016084 वरील रक्कम रु.15,250/- वर (दि.30-4-2008 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-5-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
4. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.16085 वरील रक्कम रु.15,250/- वर (दि.30-4-2008 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-5-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
5. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.017983 वरील रक्कम रु.10,500/- वर (दि.31-12-2007 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-1-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
6. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.017862 वरील रक्कम रु.10,000/- वर (दि.31-12-2007 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-1-2008 पासून दि.9-6-2008 पर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे व्याज देणेत यावे. मुदतपूर्तीनंतर म्हणजेच दि.10-6-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
7. तक्रारदार यांना ठेवपावती क्र.016082 वरील रक्कम रु.15,250/- वर (दि.30-4-2008 पर्यंतचे व्याज मिळालेचे ठेवपावतीवरुन दिसून येते.) दि.1-5-2008 पासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
8. तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 9 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.15,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-अदा करावेत.
9. वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत जाबदार क्र.1 ते 9 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या करावयाचे आहे. तसे न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
10. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
11. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.6-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.