जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१४१/२००९
----------------------------------------------
श्री विशाल बाळासाहेब पाटील
वय वर्षे सज्ञान, धंदा – ट्रान्स्पोर्ट
रा.द्वारा बाळासाहेब ए. पाटील, साक्षी अपार्टमेंट,
जैन बस्तीजवळ, गावभांग, सांगली ४१६४१६ ..... तक्रारदार
विरुध्द
श्री सुरेश राजाराम शहा
प्रोप्रा. आनंद टायर्स, २/७, हायस्कूल रोड,
महावीरनगर, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी युक्तिवादासाठी नेमणेत आले आहे. तक्रारदारतर्फे दि.१३/९/११ रोजी युक्तिवादासाठी मुदत मागणी अर्ज सादर करणेत आला आहे. सदर अर्ज शेवटची संधी देवून मंजूर करणेत आला आहे. त्यानंतरचे नेमले तारखेस तसेच आज रोजी तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. २०/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.