(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाले यांचेकडे तक्रार अर्ज कलम 1 मध्ये वर्णन केलेनुसार एकूण सहा ठेवपावत्या व बचत खाते यामध्ये गुंतवणूक केलेली होती. त्यामधील रक्कम सामनेवाला यांनी परत केलेली नाही. यामुळे अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून ठेवपावती वरील व बचत पावतीवरील रक्कम व्याजासह परत मिळावी, मानसिक शारिरीक त्रास, आर्थिक नुकसान भरपाई पोटी व तक्रार अर्जाचे पोटी एकूण रु.1,00,000/- मिळावेत या मागणीसाठी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज आहे.
सामनेवाले क्र.1 ते 3 यांना कामी पान क्र.19, पान क्र.20, पान क्र.21 चे रजिष्टर ए.डी.पोस्टाचे पोचपावती प्रमाणे नोटीस मिळालेनंतही गैरहजर राहीलेले आहेत. त्यामुळे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे विरुध्द दि.13/5/2011 रोजी एकतर्फा आदेश करणेत आलेले आहेत. .
अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्दे
1. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? होय
3. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या
ठेवपावतीवरील व बचतखात्यावरील रक्कम व्याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र
आहेत काय?--- होय
4. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या
मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस
पात्र आहेत काय? --- होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 3 विरुध्द
अंशतः मंजूर करणेत येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांनी पान क्र.29 लगत युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केलेली आहे. सामनेवाले हे अंतीम युक्तीवादाचेवेळी गैरहजर राहिलेले आहेत.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रातील कथन सामनेवाले यांनी स्पष्टपणे नाकारलेले नाही. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 1 मध्ये एकूण सहा ठेवपावत्यांबाबत व बचत खात्याबाबत सविस्तर वर्णन व तपशिल दिलेला आहे. याकामी अर्जदार यांनी पान क्र.24 ते 26 लगत एकूण 6 ठेवपावत्या दाखल केलेल्या आहेत व पान क्र.5 व 6 लगत बचत खाते क्र.23/3059 ची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. या सर्व कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.5 चे बचत खात्याची झेरॉक्स प्रत व पान क्र.24 ते पान क्र.26 लगतच्या एकूण 6 ठेवपावत्या याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना ठेवपावत्यावरील रक्कम व्याजासह व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह परत केलेली नाही हे स्पष्ट होत आहे. यामुळे सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.5 चे बचत खाते व पान क्र.24 ते पान क्र.26 लगतच्या ठेवपावत्या या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या ठेवपावती वरील रक्कम व्याजासह व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी अर्जदार यांना ठेवपावतीवरील व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह परत केली नाही. सदर रक्कम परत मिळावी यासाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यास खर्चही करावा लागला आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवालें नं.1 ते 3 यांचेकडून वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या
मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः
1. मा. राष्ट्रीय आयोग यांचेसमोरील रिव्हीजन अर्ज क्र.2528/2006 निकाल
ता.24/7/2008 रिझर्व बँक ऑफ इंडिया वि. ईश्वरअप्पा.
2. 2009 सी.टी.जे. राष्ट्रीय आयोग पान क्र.20, आशिष रमेशचंद्र बिर्ला वि.
मुरलीधर राजधर पाटील.
3. मा. राज्य आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील प्रथम अपिल क्र.
652/2008 निकाल ता.14/11/2008 चिंतामणी नागरी सह. पतसंस्था, धुळे
वि. शकुंतला नेमीचंद वर्मा.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्तीवादाबाबतची पुरसिस तसेच वर उल्लेख केलेली वरिष्ठ कोर्टांची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अ)अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 3 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात
येत आहे.
ब)आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैय्यक्तीक व
संयुक्तीकरित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
ब-(1) बचत खाते क्र.23/3059 वरील रक्कम रु.25,751/- द्यावेत व या रकमेवर
दि.2/10/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने व्याज
द्यावे.
ब-(2) ठेवपावती क्र.07886 वरील रक्कम रु.40,000/- द्यावी व या रकमेवर
दि.29/8/2007 ते दि.29/9/2008 पर्यंत द.सा.द.शे.11.5% दराने व्याज
द्यावे व दि.30/9/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने
व्याज द्यावे.
ब-(3) ठेवपावती क्र.07888 वरील रक्कम रु.40,000/- द्यावी व या रकमेवर
दि.29/8/2007 ते दि.29/9/2008 पर्यंत द.सा.द.शे.11.5% दराने व्याज
द्यावे व दि.30/9/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9%
दराने व्याज द्यावे.
ब-(4) ठेवपावती क्र.34587 वरील रक्कम रु.44,983/-द्यावी व या रकमेवर
दि.11/5/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज
द्यावे.
ब-(5) ठेवपावती क्र.221336 वरील रक्कम रु.20,277/- द्यावी व या रकमेवर
दि.27/5/2007 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज
द्यावे.
ब-(6) ठेवपावती क्र.34583 वरील रक्कम रु.56,229/- द्यावी व या रकमेवर
दि.1/5/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याज
द्यावे.
ब-(7) ठेवपावती क्र.34586 वरील रक्कम रु.44,983/- द्यावी व या रकमेवर
दि.11/5/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने
व्याज द्यावे.
क) मानसिक त्रासापोटी रु.15,000/-दयावेत.
ड) अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.
इ) वर कलम ब-(1) ते .ब-(7) मध्ये दिलेनुसार ज्या रकमा अर्जदार यांना देय
आहेत त्यापैकी काही रकमा अर्जदार यांना सामनेवाले यांनी यापूर्वी अदा केलेल्या असल्यास त्याची वजावट वरील रकमेमधून करणेत यावी.