रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 140/08 तक्रार दाखल दि. 6/12/08 निकालपत्र दि. 29/1/09 मे. सुमन मोटेल्स लि., तर्फे, मॅनेजिंग डायरेक्टर, श्री. सुरेंद्र मनसुखलाल खंदार, 308, पार्श्व चेंबर्स, 17/21, ईसाजी स्ट्रीट, वडगादी, मुंबई – 400003. ..... तक्रारदार विरुध्द
श्री. सुरेश मगनलालजी गोयल, प्रोप्रायटर, मे. न्यू शिव इलेक्ट्रीकल्स, मुंबई - पुणे महामार्ग, रायगड बाजारच्या समोर, शिळफाटा, खोपोली, ता.खालापूर, जि. रायगड. ..... विरुध्दपक्ष उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य तक्रारदारतर्फे – एकतर्फा विरुध्दपक्षातर्फे – एकतर्फा - नि का ल प त्र - द्वारा मा. अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस तक्रारदारांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाखाली दाखल केली होती. ती दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर सामनेवाले यांना तक्रारीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. 8/12/08 रोजी नोटीस पाठविण्यात आली. त्या नोटीसीची एक प्रत तक्रारदाराना पाठविण्यात आली. सामनेवालेची नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यात आली होती तर तक्रारदारांची नोटीस अंडर पोस्टींग ऑफ सर्टिफिकेटने पाठविण्यात आली होती. या दोन्ही नोटीसा तक्रारदारांनी नमूद केलेल्या पत्त्यावरच पाठविण्यात आल्या. त्यामध्ये त्यांनी 9/1/09 रोजी हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी तारीख देण्यात आली होती. 2. यातील सामनेवाले यांस पाठविलेली नोटीस "Unclaimed" म्हणून मंचाकडे परत आलेली आहे. त्यासंबंधीचा शेरा दि. 27/12/08 रोजी त्या पाकीटावर मारलेला आढळून येत आहे. तसेच तक्रारदारांनी पाठविलेले पाकीट सुध्दा 14/12/08 ते 19/12/08 अखेर पोस्टमन यांनी चौकशी करुन तक्रारदारांचे ऑफीस हे बंद असल्याने व तेथे कोणी मिळून येत नसल्याने 20/12/08 रोजी परत पाठवून देण्यात आले आहे ते मंचास 29/12/08 रोजी प्राप्त झाले आहे. तर सामनेवालेंचे पाकीट हे 31/12/08 रोजी प्राप्त झाले आहे. 3. या तक्रारीची तारीख 9/1/09 रोजी प्रथम ठेवण्यात आली होती. त्या दिवशी तक्रारदार व सामनेवाले हे दोघेही गैरहजर होते. पुन्हा या प्रकरणाची तारीख दि. 20/1/09 रोजी ठेवण्यात आली होती. त्या दिवशी सामनेवाले विरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत करण्यात आला. त्या तारखेसही ते दोघे गैरहजर असल्याने आज रोजी ती अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आली. 4. तक्रारदार हे तक्रार दाखल केल्यापासून आजअखेर मंचाकडे आलेले नाहीत. त्यांनी याकामी वकीलाची नेमणूकही केलेली आहे. परंतु त्यांचे वकीलही आजअखेर मंचाकडे हजर झालेले नाहीत. यावरुन त्यांना ही तक्रार चालविण्यात स्वारस्य नाही असे दिसून येत आहे. ते सतत गैरहजर राहिलेले दिसून येत आहेत. सामनेवालेंपैकी कोणीही हजर नसल्याने त्यांचेविरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश मंचाने आधीच पारीत केलेला आहे. 5. तक्रारदार हे गैरहजर असल्याने व सुनावणीच्या तारखेस ते गैरहजर असल्याने सदरील तक्रार ही त्यांचे गैरहजेरीच्या कारणास्तव निकाली (Complaint is dismissed for default) काढण्यात येत आहे. 6. या आदेशाची प्रत तक्रारदार व सामनेवाले यांना पाठविण्यात यावी. दिनांक – 29/1/09 ठिकाण – अलिबाग – रायगड.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |