Maharashtra

Nanded

CC/08/125

Fakruddin Sharafoddin Badgujar - Complainant(s)

Versus

Suresh M Dewangam - Opp.Party(s)

Ganesh Jamkar

11 Dec 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/125
1. Fakruddin Sharafoddin Badgujar R/o Mominpura, Tq KinwatNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Suresh M Dewangam R/o A-156, Ajaynagar, BilaspurBilaspurChattisgarh2. Reliance General Insurance Co Ltd through General Manager6th floor, Land mark building, Vardha Road, NagpurNagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 11 Dec 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  125/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 26/03/2008
                           प्रकरण निकाल तारीख   - 11/12/2008
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
फक्रूद्यीन शरफोद्यीन बडगुजर
वय, 33 वर्षे, धंदा व्‍यापार
रा. मोमीनपूरा, किनवट ता. किनवट                        अर्जदार जि. नांदेड.
 
     विरुध्‍द.
 
1.   सुरेश एम.देवंगम,
    वय, सज्ञान, धंदा व्‍यापार
    रा.अ-156, आजेयानगर, बिलासपुर
    (छत्‍तीसगड)
2.   रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
    द्वारा, जनरल मॅनेजर
    6 वा मजला लन्‍ड मार्क बिल्‍डींग, वर्धा रोड.
    नागपूर ता.जि.नागपूर-440 010                      गैरअर्जदार
3.   रिजनल क्‍लेम्‍स मॅनेजर,
    रिलायन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
    3 रा माळा, संगम कमिर्शिअल, कॉम्‍लेक्‍स,
    सगम ब्रिल कॉर्नर, डॉ. आंबेडकर रोड,
    प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाजवळ,
    पूणे-411 001.
4.   रिलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी
    फ्रंचाईजी, कार्यालय, आलीभाई टॉवर,
    शिवाजी नगर, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील               - अड.गणेश जामकर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे                - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र. 2, 3 व 4 तर्फे वकील - अड.ऐ.जी.कदम
                               निकालपञ
            (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या )
 
              गैरअर्जदार यांनी विमा दावा न देऊन अर्जदारास ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
                             अर्जदार हा किनवट येथे भ्रमण यंञ विक्री व दुरुस्‍तीचा व्‍यवसाय करतो. अर्जदार यांने घरगूती वापरासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांची टाटा या कंपनीची इंडिका डिएलई ही कार दि.27.7.2007 रोजी रु.1,53,000/- ला खरेदी केली. हि गाडी बिलासपूर छत्‍तीसगड येथे नोंदणी करण्‍यात आलेली होती. तिचा नंबर सी.जी.10-अ-7005 असा आहे. सदरील कारचा विमा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून दि.28.7.2007 रोजी उतरविला होता.  त्‍यांचा विमा नंबर 100056118  विमा हा रु.2,00,000/- चा उतरविण्‍यात आला होता. विम्‍याचा हप्‍ता रु.5333/- व प्रक्रिया शूल्‍क रु.680/- व एज्‍यकेशन केस रु.19.20 असे मिळून रु.5,992/- भरलेले आहेत. नांदेड प्रादेशिक परिवहन अधीकारी यांचे कडे हस्‍तांतर करण्‍यासाठी बिलासपूर येथून नाहरकत प्रमाणपञ घेतले होते. नांदेड येथे हस्‍तातरी करण्‍यासाठी येत असताना दि.27.8.2007 रोजी पोलिस स्‍टेशन भोकरच्‍या हददीत भोसी येथे सदर वाहनास अपघात झाला. वाहन हबीबोद्यीन चव्‍हाण हा चालवित होता. पोलिस स्‍टेशन भोकर यांनी अपघाताची नोंद क्र.21/2007 नुसार केली. पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. सदर पंचनामा दाखल करण्‍यात आलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना दि.29.8.2007 रोजी माहीती देण्‍यात आली. गैरअर्जदारांनी दिलेल्‍या फॉर्मवर अर्जदाराने वाहनाबाबत व त्‍यांच्‍या मालकी बाबत पूर्ण माहीती दिली व त्‍यावर सही सूध्‍दा केली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सर्व्‍हे करुन पाहणी अहवाल सादर केला आहे तो केस मध्‍ये दाखल आहे. वाहनाचे पूर्ण नूकसान झालेले आहे त्‍यामूळे गैरअर्जदार हे विम्‍याची पूर्ण रक्‍कम देण्‍यास बांधीत आहेत. तरी गैरअर्जदारांनी विम्‍याची रक्‍कम दिली नाही. अर्जदारास सदर वाहनास सुरक्षा गरज असल्‍याचे कारणामूळे दावा नामंजूर केला. वाहन हे अर्जदाराच्‍या नांवे नांदेड येथे हस्‍तांतरीत न झाल्‍यामूळे त्‍यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. अर्जदाराने विमा उतरवितांना गैरअर्जदार यांना रु.5999/- दिलेले आहेत. अखेरीस अर्जदाराने नोंदणीकृत टपालाने नोटीस पाठविली त्‍या नोटीसला गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी उत्‍तर दिले नाही. विम्‍याचे हस्‍तांतरण नागपूर कार्यालयातून नांदेड येथील कार्यालयात जे होण्‍याचे होते तो केवळ औपचारीक बाब होती. अर्जदार यांनी इतर कोठेही या विम्‍याचा नूकसान भरपाई मिळण्‍यासाठी अर्ज केला नाही. अर्जदाराची मागणी आहे की, विमा दावा रु.2,00,000/- व दावा मंजूर न केल्‍यामूळे अर्जदारास खूप मानसिक ञास झाला त्‍यामूळे रु.30,000/- मिळावेत तसेच गैरअर्जदाराकडे जाणे येणे हा खर्च रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/-असे एकूण रु.2,55,000/- गैरअर्जदारांकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश झाले.
 
              गैरअर्जदार क्र. 2, 3 व 4  हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांनी अर्जदाराचा दावा फेटाळला असून अर्जदारानी केलेले आरोप खोटे असल्‍याचे म्‍हटले आहे. वाहनाचा चालक हबीबोद्यीन यांचे कडे असलेले लायसन्‍स हे पाञतेचे नव्‍हते त्‍यामूळे योग्‍य लायसन्‍स अभावी दावा नामंजूर केला आहे. पोलिस स्‍टेशन भोकर यांनी गैरअर्जदार यांचेकडे वाहन कायदयानुसार सर्व कागदपञ 30 दिवसांचे आंत पाठवीणे आवश्‍यक होते तसे त्‍यांनी केलेले नाही. गैरअर्जदार यांना अर्जदाराच्‍या गांवा बददल व कामाबददल काहीही माहीती नाही. त्‍यांनी वाहन गैरअर्जदार क्र. 1 यांचे कडून खरेदी केले या बाबत काहीही माहीत नाही असे म्‍हटले आहे. त्‍यांनी त्‍याबाबत कोणतेही कागदपञ गैरअर्जदार यांचेकडे दिलेले नाहीत. वाहनाचा विमा उतरविला होता ही बाब सूध्‍दा त्‍यांना मान्‍य नाही. 1000561182 या नंबरची पॉलिसी त्‍यांनी श्री. सूरेश देवंगम यांना दिलेली आहे. वाहनाच्‍या हस्‍तांतरणा बाबतची बाब त्‍यांनी अमान्‍य केली आहे. वाहनाचा अपघात झाला व त्‍यामध्‍ये वाहनाचे व मधील व्‍यक्‍तीचे नूकसान झाले ही बाब त्‍यांनी अमान्‍य केली आहे. गैरअर्जदार हे अमान्‍य करता की, अर्जदार यांनी त्‍यांचेकडून पॉलिसी घेतली व रु.5999/- त्‍यांचेकडे भरले तसेच ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. अर्जदार यांचा झालेला व्‍यवहार हा बिलासपूर येथे झाल्‍यामूळे या मंचाला कार्यक्षेञ येत नाही.अर्जदार यांनी केलेली रु.20,000/- व रु.30,000/- ची मागणी त्‍यांना मान्‍य नाही. पॉलिसी सूरेश देवंगम यांचे नांवे आहे. त्‍यामूळे ती पॉलिसी अर्जदाराच्‍या नांवे हस्‍तांतरीत झाल्‍याशिवाय अर्जदार यांना क्‍लेम मागता येणार नाही. वरील सर्व बाबी वरुन गैरअर्जदारांनी सेवेत कमतरता केलेली दिसत नाही. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दची ही तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे, तसेच गैरअर्जदार क्र. 2,3 व 4 तर्फे पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल करण्‍यात आले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                    उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?         नाही.                                    
2.   काय आदेश ?                          अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
                            
              अर्जदार यांनी प्रस्‍तूतचा अर्ज त्‍यांचे मालकीचे वाहनाचे अपघातापोटी विमा क्‍लेमची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडून मिळण्‍यासाठी या मंचामध्‍ये दाखल केलेला आहे. अर्जदार यांनी प्रस्‍तूतच्‍या अर्जासोबत विमा पॉलिसी दाखल केली आहे. सदरची पॉलिसी ही सूरेश देवंगम,रा. अ-156, आजेयानगर, बिलासपूर (छत्‍तीसगढ)  या नांवे नमूद केलेली आहे. त्‍यामूळे अर्जदार यांचे नांवाचा विमा पॉलिसीवर कूठेही उल्‍लेख नाही. अर्जदार यांनी दि.27.11.2008 रोजीचे अर्जासोबत एक खरेदी विक्री पञ दि.27.7.2007 चे दाखल केलेले आहे. सदर खरेदीविक्री पञावर खरीदनेवाले का नाम फक्रूरीद्यीन शरफोद्यीन बडगुजर आणि बेचनेवालेका नाम अखील अहेमद अब्‍दूल बशीरखॉ असे नमूद केलेले आहे ? सदरील अर्जामध्‍ये इंडिका हे वाहन अर्जदार यांनी सूरेश देवंगम यांचेकडून खरेदी केले बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांचे टाटा इंडिका कार हे वाहन ड्रायव्‍हींग करणा-या ड्रायव्‍हर जवळ वैध वाहन परवाना नव्‍हता असे म्‍हणलेले आहे. तसेच टाटा इंडीका कार नंबर सीजी-10-ऐ-005 या वाहनाची विमा पॉलिसी नंबर 1000561182 असा असून विमा श्री. सूरेश देवंगम यांचे नांवे उतरविलेला आहे.  
              अर्जदार यांनी अर्जामध्‍ये टाटा इंडिका कार या वाहनाचा अपघात झाल्‍यामूळे वाहनाच्‍या पूर्ण नूकसानी बददल गैरअर्जदार यांचेकडून भरपाई मिळण्‍याची मागणी केलेली आहे परंतु प्रस्‍तूत अर्जदार हे सदर विमा कंपनीचे ग्राहक आहेत ही बाब अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत.त्‍यामूळे  अर्जदार यांचा सदरचा गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्‍दचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा,1986 अंतर्गत ग्राहक या संज्ञेमध्‍ये बसत नसल्‍याने नामंजूर करण्‍यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार, शपथपञ व कागदपञ तसेच वकीलामार्फत केलेला यूक्‍तीवाद तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जवाब,शपथपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                        आदेश
1.                                         अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील    श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                    सदस्‍या                             सदस्‍य
 
 
 
जे. यु. पारवेकर
लघूलेखक.