मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई दरखास्त क्रमांक – 33/2010, 34/2010 व 35/2010 मूळ तक्रार क्रमांक – 152/2006, 154-ए/2006 व 154-बी/2006 आदेश दिनांक - 22/02/2011 1) श्री. संपत दगडू धोंडे, द्वारा श्री प्रभाकर संभाजी तेलतांबडे, लोकमान्यनगर, चाळ नंबर 1, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला, मुंबई 400 070. (दरखास्त क्रमांक 33/2010)
2) श्री. रामचंद्र महादेव माने, रा. सावित्रीबाई चाळ, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला, मुंबई 400 070. (दरखास्त क्रमांक 34/2010)
3) श्री. वाल्मीक लक्ष्मण मोरे, रा. सावित्रीबाई चाळ, माळणीची चाळ, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला, मुंबई 400 070. (दरखास्त क्रमांक 35/2010) ....... अर्जदार/मूळ तक्रारदार विरुध्द
श्री. सुरेश लक्ष्मण मालुसरे, आर्क बिल्डींग, हॉल व्हिलेज रोड, कुर्ला (पूर्व), मुंबई 400 070.
दुसरा पत्ता. श्री. सुरेश लक्ष्मण मालुसरे, मु.पो. आळंद, ता. भोर, जि. पुणे. ......... गैरअर्जदार/मूळ सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती - उभयपक्ष हजर
- एकत्रित आदेश - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत दरखास्त प्रकरणे अर्जदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 अंतर्गत दाखल केलेली आहेत. प्रस्तुत प्रकरणात तिन्ही अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात आपसी तडजोड झालेली आहे, व त्याप्रमाणे त्यांनी तडजोडीबाबत लेखी अर्ज दाखल केलेले आहेत. उभयपक्ष मंचासमक्ष हजर राहून त्यांनी मौखिकरित्या आपसी तडजोडीस लेखी संमती असल्याबाबत कबूल केलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे तडजोड करण्यात आलेली आहे -
- वरील तिघांपैकी वाल्मीक लक्ष्मण मोरे यांना रुपये 1,45,000/ (रु. एक लाख पंचेचाळीस हजार फक्त) मी देण्याचे कबूल केले आहे. त्या पैकी मी ग्राहक तक्रार मंचाकडे भरलेले रुपये 25,000/- (रु.पंचवीस हजार फक्त) त्यांना मिळाले आहे. आज रोजी दिनांक 21/02/2011 रोजी मी त्यांना रु. 70,000/- (सत्तर हजार रु फक्त) दिले आहेत. म्हणजे एकूण त्यांना रु 95,000/- (पंच्याण्णव हजार रु फक्त) दिले आहेत बाकी माझेकडे रु.50,000/ (रु. पन्नास हजार फक्त) राहीले आहेत. ती रक्कम मी त्यांना दिनांक 20/05/2011 रोजी देणार आहे.
- रामचंद्र महादेव माने यांना रु. 1,45,000/ (रु. एक लाख पंचेचाळीस हजार फक्त) मी देण्याचे कबूल केले आहे. त्या पैकी मी ग्राहक तक्रार मंचाकडे भरलेले रुपये 25,000/- (रु.पंचवीस हजार फक्त) त्यांना मिळाले आहे. आज रोजी दिनांक 21/02/2011 रोजी मी त्यांना रु. 70,000/- (सत्तर हजार रु फक्त) दिले आहेत. म्हणजे एकूण त्यांना रु 95,000/- (पंच्याण्णव हजार रु फक्त) दिले आहेत, बाकी माझेकडे रु.50,000/ (रु. पन्नास हजार फक्त) राहीले आहेत. ती रक्कम मी त्यांना दिनांक 20/05/2011 रोजी देणार आहे.
- संपत दगडू धोंडे यांना रु. 1,35,000/- (रु. एक लाख पस्तीस हजार फक्त) मी देण्याचे कबूल केले आहे. त्या पैकी मी ग्राहक तक्रार मंचाकडे भरलेले रु. 25,000/- (रु.पंचवीस हजार फक्त) त्यांना मिळाले आहे. आज रोजी दिनांक 21/02/2011 रोजी मी त्यांना रु. 0,000/- (साठ हजार रु फक्त) दिले आहेत. म्हणजे एकूण त्यांना रु 85,000/- (पंच्याऐशी हजार रु फक्त) दिले आहेत. बाकी माझेकडे रु.50,000/ (रु. पन्नास हजार फक्त) राहीले आहेत. ती रक्कम मी त्यांना दिनांक 20/05/2011 रोजी देणार आहे.
सदर तडजोडीप्रमाणे प्रत्येक अर्जदाराला गैरअर्जदाराने रक्कम देण्याचे मान्य केलेले आहे. उभयपक्षांमध्ये आपसी तडजोड झाल्यामुळे व त्या अनुषंगाने गैरअर्जदार यांनी रक्कम देण्याचे मान्य केल्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे - - आदेश - 1) तिन्ही अर्जदार यांचे अर्ज आपसी तडजोड झाल्यामुळे मंजूर करण्यात येतात. 2) गैरअर्जदार यांनी करार तडजोडीप्रमाणे ठरलेल्या दिनांक रोजी अर्जदारांना रक्कम अदा करावी. जर या दिनांक रोजी रक्कम अदा न केल्यास सदर रकमेवर दर साल दर शेकडा 18 टक्के दराने व्याज रक्कम अदा होईपर्यंत गैरअर्जदारानी अर्जदारांना द्यावी.
3) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा. 4) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 22/02/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |