Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

MA/1/2020

DEEPAK T KARAMCHANDANI - Complainant(s)

Versus

SURENDRA TELECOM - Opp.Party(s)

ARPANA PEREIRA

03 Dec 2020

ORDER

Addl. Mumbai Suburban District Consumer Disputes Redressal Forum
Admin Bldg., 3rd floor, Nr. Chetana College, Bandra-East, Mumbai-51
 
Miscellaneous Application No. MA/1/2020
( Date of Filing : 19 Mar 2020 )
In
Execution Application No. EA/16/31
 
1. DEEPAK T KARAMCHANDANI
FLAT NO 002 LORD HOUSE SHIVAJI CHOWK MULUND WEST MUMBAI 400082
...........Appellant(s)
Versus
1. SURENDRA TELECOM
SHOP NO 2 MARUTI CHS LTD L T ROAD NEXT TO BAWARCHI HOTEL HANUMAN CHOWK MULUND (E)MUMBAI 400081
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.V.KALAL PRESIDING MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 03 Dec 2020
Final Order / Judgement

अर्जदार यांच्‍यासाठी वकील श्रीमती परेरा हजर.  सदर किरकोळ अर्ज हा त्रयस्‍थ व्‍यक्‍ती

श्री.दिपक करमचंदानी यांनी दरखास्‍त अर्ज क्रमांक-31/2016 च्‍या अनुषंगाने दाखल केला आहे.  सदर दरखास्‍त प्रकरण निकाली निघाले असून दरखास्‍त प्रकरणातील सामनेवाले यांच्‍या विरुध्‍द मंचाने जारी केलेले वसुली प्रमाणपत्र जा.क्र.875, दि.26.12.2017 च्‍या अनुषंगाने वसुलीची कारवाई त्रयस्‍थ पक्षकार यांच्‍या मालमत्‍तेबाबत तहसिलदार, कुर्ला  (मुलूंड) यांच्‍या कार्यालयामार्फत करण्‍यात आलेली असून ती कारवाई रद्द करण्‍याबाबतचा सदर अर्ज या मंचासमोर सादर करण्‍यात आलेला आहे. 

या अर्जाच्‍या अनुषंगाने दरखास्‍तदार मुळ तक्रारदार श्री.म्रेनाथ पुजारी यांनी दि.27.10.2020 रोजी मा.जिल्‍हाधिकारी, मुंबई उपनगर वांद्रे यांच्‍याकडे पाठविण्‍यात आलेले वसूली प्रमाणपत्रानुसार वसुलीची कारवाई रद्द करण्‍याबाबत लेखी अर्ज सादर केला होता. 

तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून मंचाच्‍या आदेशाप्रमाणे संपुर्ण रक्‍कम प्राप्‍त झालेली असल्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या दि.27.10.2020 च्‍या अर्जावर मंचाने आदेश पारित करुन मंचाचे प्रबंधक यांनी मा.जिल्‍हाधिकारी मुंबई उपनगर, वांद्रे यांना सामनेवाले सुरेंद्र टेलिकॉम, मुलूंड यांच्‍या विरुध्‍दची वसुलीबाबतची कारवाई रद्द करण्‍याबाबत लेखीपत्र देण्‍याचे आदेश देण्‍यात आलेले आहे व तसे लेखीपत्र मंचाचे प्रबंधक यांनी दि.02.12.2020 रोजी मा.जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयाकडे पाठविले असल्‍याचे अभिलेखावरुन दिसून येते.  सदर पत्राची प्रमाणीत प्रत किरकोळ अर्जदार श्री.दिपक करमचंदानी यांना पाठविण्‍यात यावी. 

सदर किरकोळ अर्ज क्रमांक-01/2020 निकाली काढण्‍यात आला.  

 
 
[HON'BLE MR. S.V.KALAL]
PRESIDING MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.