Maharashtra

Additional DCF, Thane

CC/12/109

Mr. Sushant Baban Katkar - Complainant(s)

Versus

Suraj Enterprises - Opp.Party(s)

Vijay & Sarala shinde

22 Nov 2013

ORDER

ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
 
Complaint Case No. CC/12/108
 
1. Mr. Dilip Bahrang Kale
Nagesh Patil Wadi, Ghatla Village, Opp. Jyotirling, Floor mill, Chembur, Mumbai 400 071.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through its Proprietor Mr. Shrishkumar Rangrao Chavan having office at A-280, Vashi Plaza, Sector 17, vashi Navi Mumbai 400 708 R/at Usha Kabir Sector 10 2nd Floor, room no. 201,plot no. 42 New Panvel, Khada Colony (Ne. Railway Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector - 8, Plot no. 35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharshtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/109
 
1. Mr. Sushant Baban Katkar
44/1083, B.P.T. New Colony, Nadkarni Park, Wadala(E) Mumbai 400 037.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through its Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan having office at A-20, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/110
 
1. Mr. Suraj Enterprises
Room no. 307, Tranzit Camp, Bldg no.T-2, Pratikash Nagar,Sion Koliwada, Mumbai 400 022.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
shop no. 07, Maruti Nandan, Sector -8, Plot no. 35, Kamothe, Navi Mumbai 410209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/112
 
1. Mr. Suresh Waman Pawar
34/38. B.P.Y. Old Coloney, Nadkarni Park, Wadala(E) Mumbai 400037
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Mumbai
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/113
 
1. Mr. Sandeep Vishnu Nalawade
Room no. 203, Tulsi Angan, Plot no.110C, Sector 50E, Seawood, Nerul, Navi Mumbai 400 706.
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/114
 
1. Mrs. Ladubhai Hanmant Shelke w/o. Mr. Hanmant Anna Shelke
28/22, B.P.T. Old Colony, Nadkarni Park, Wadala(E), Mumbai 400 037
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/115
 
1. Ravikant Jagannath Narvekar
Sahkar Hitvardhak Sangh no. 2, Room no.125, G.D.Ambekar Marg, Parel Village, Mumbai 12.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/116
 
1. Mr. Maheshwar Ladu Gauda
Chawl no.62, Room no. 569, Ramabai Ambedkar Nagar, Ghatkopar(E) Mumbai 400075.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Residing at Usha Kabir, Sector 10, 2nd floor, Room no, 201, Plot no, 42, New Panvel, Khanda Colony(Nr. Rly. Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/119
 
1. Mr.Apsarmiya M. Karbhari
Pradhan Building, R/no. 40, 2nd Floor, Dr. Mhasakar Hansa Road, Nr. Mafatlal Mill, Mazgaon, Mumbai 400 010.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/120
 
1. Mr. Apsarmiya. m. Karbhari
Pradhan Building, 2nd floor, Dr. Mhasakar Hansa Rd., Nr.Mafatlal Mill, Nazgaon, Mumbai 400 010.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/121
 
1. Mr. Anil Jaganath Narvekar
Hitvardhak Marg, Parel Village, Mumbai 400012.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
- Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/122
 
1. Mr. Prakash Vishram Hariyan
Jay Bhavani CHS Ldtd., C-40, 5th floor, Kamdev Nagar, Dharavi, Mumbai 400 017.
Mumbai
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu -
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/123
 
1. Mr. Ramchandra Bapu Jagdale
J/58, RBI Byculla colony, Nr. Maratha Mandir Rd., Mumbai Central Mumbai 400 017.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708.
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8, Plot no.35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharasntra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/125
 
1. Mr. Apsarmiya M. karbhari
Pradhan Building,R/No-40,2nd Floor,Dr.Mhasakar Hansa Road,Near Mafatlal Mill,Mazgaon,Mumbai-400010
Mumbai
MAH
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through its Proprietor Mr SAhirish Kumar Rangrao Chavan Having Office at A-280,Vashi,Navi Mumbai-400708.Residing at Osho Kabir,Sector-10,2nd Floor,Room No-201,Plot No-42,New Panvel,Khanda Colony(Near Railway Track
MAH
2. Mr Santosh Gautam Kanwalu
Shop No-07,Maruti Nandan,Sector-8,Plot No-35,Kamothe,Navi Mumbai-410209
Raigad
MAH
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/128
 
1. Sahebrao Kanse
Residing at 2/30,B.P.T,Old Colony,Nadkarni Park,Wadala(E),Mumbai-400037
Mumbai
MAH
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through its Proprietor Mr SAhirish Kumar Rangrao Chavan Having Office at A-280,Vashi,Navi Mumbai-400708.Residing at Osho Kabir,Sector-10,2nd Floor,Room No-201,Plot No-42,New Panvel,Khanda Colony(Near Railway Track
MAH
2. Mr Santosh Gautam Kanwalu
Shop No-7,Maruti Nandan,Sector-8,Plot No-35,Kamothe,Navi Mumbai-410209
Raigad
MAH
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/129
 
1. Mr. Lakshman Khashaba Jadhav
Sai Sadhan CHS Ltd,Plot No-101,1st floor,Sector-19,Koparkhairne,Navi Mumbai-400017
Thane
MAH
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
Through its Proprietor Mr SAhirish Kumar Rangrao Chavan Having Office at A-280,Vashi,Navi Mumbai-400708.Residing at Osho Kabir,Sector-10,2nd Floor,Room No-201,Plot No-42,New Panvel,Khanda Colony(Near Railway Track)
MAH
2. Mr Santosh Gautam Kanwalu
Shop No-07,Maruti Nandan,Sector-8,Plot No-35,Kamothe,Navi Mumbai-410209
Raigad
MAH
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/131
 
1. Mr. Raj Narayan Singh
R/at Qtr no. D-2/29, Old Nagar, Nr Health Center Colaba, Mumbai 400 005.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
- Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Smt. Joti Shrishkumar Chavan, Mr. Deepal Tambe, Mr. Santosh Tambe Office at A-280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. R/at Osha Kabir, Sector -10, 2nd floor,Room no. 201, Plot no.42, New Panvel,Khanda Colony(Nr. Railway Track)
Thane
Maharashtra
2. Mr. Santosh Gautm kanwalu
Dhop no. 07, Maruti Nandan Sector 8, Plot no. 35, Kamothe, Navi Mumbai 410209
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/132
 
1. Mr. Radhika Devi Shyammarayan Yadav
R/at Qtr no. MES 1/1, Old Nagar, Nr. Health Center Colaba, Mumbai 400 005.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises
- Through Prop. Mr. Shrishkumar Rangrao Chavan, Office at 280, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400708. Usha kabir, Sector -10, 2nd floor, Room no. 201, Plot no. 42, New Panvel, Khanda Colony (Nr. Railway Track).
Navi Mumbai
Thane
2. Mr. Santosh Gautam Kanwalu
Shop no. 07, Maruti Nandan, Sector 8 Plot no. 35, Kamothe, Navi Mumbai 410 209.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S.Patil MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

ठाणे जिल्‍हा अतिरिक्‍त ग्राहक तक्रार निवारण मंच,

कोंकण भवन, नवी मुंबई. 

 

                               ग्राहक तक्रार क्रमांकः-  108, 109, 110, 112,  

                              113, 114, 115, 116, 119, 120, 121, 122,

                123, 125, 128, 129/2012

                      आदेश दिनांक : -  22/11/2013

  

1. श्री. दिलीप बजरंग काळे,                            

 रा. नागेश पाटील वाडी, घाटला व्हिलेज,

 ज्‍योतिर्लिंग फ्लोअर मिलच्‍या समोर,

 चेंबूर , मुंबई 400071.                                (तक्रार क्र. 108/12)

 

2. श्री. सुशांत बबन काटकर,

 रा. 44/1083, बी.पी.टी.कॉलनी,

 नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व),                           (तक्रार क्र. 109/12)

 

3. श्री. विकास विजय जाधव,

  रा. रुम नं. 307, ट्रांझिट कँप,

  बिल्‍डींग नं. टी – 2, प्रतिक्षानगर,

  सायन कोळीवाडा, मुंबई – 400022.                     (तक्रार क्र. 110/12)

 

4. श्री. सुरेश वामन पवार,

  रा. 34/38, बी.पी.टी. ओल्‍ड कॉलनी,

  नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व),                           (तक्रार क्र. 112/12)

 

5. श्री. संदीप विष्‍णू नलावडे,

  रा. रुम नं. 203, तुलसी आंगन,

  प्‍लॉट नं. 110 सी, सेक्‍टर 50 ई,

  सीवूड, नेरुळ, नवी मुंबई – 400706.                    (तक्रार क्र. 113/12)

 

6. श्रीमती लाडूबाई हनमंत शेळके,

  रा. 28/22, बी.पी.टी. ओल्‍ड कॉलनी,

  नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व),                           (तक्रार क्र. 114/12)

  मुंबई – 400037.               

                       

7. श्री. रविकांत जगन्‍नाथ नार्वेकर,

 रा. सहकार हितवर्धक संघ क्र. 2,

 रुम नं. 125, जी.डी.आंबेकर मार्ग,

 परेल व्हिलेज, मुंबई – 400012.                         (तक्रार क्र. 115/12)

 

8. श्री. महेश्‍वर लाडू गौडा,

  रा. चाळ नं. 62, रुम नं. 569,

  रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व),

  मुंबई – 400075.                                    (तक्रार क्र. 116/12)

 

9. श्री. अपसरमियॉं एम. कारभारी,

  रा. प्रधान बिल्‍डींग, रुम नं. 40,

  दुसरा मजला, डॉ. म्‍हसकर हंसा मार्ग,

  मफतलाल मिलच्‍या जवळ, माझगांव,

  मुंबई – 400010.                                    (तक्रार क्र. 119/12)

 

10. श्री. अपसरमियॉं एम. कारभारी,

  रा. प्रधान बिल्‍डींग, रुम नं. 40,

  दुसरा मजला, डॉ. म्‍हसकर हंसा मार्ग,

  मफतलाल मिलच्‍या जवळ, माझगांव,

  मुंबई – 400010.                                    (तक्रार क्र. 120/12)

 

11. श्री. अनिल जगन्‍नाथ नार्वेकर,

  रा. सहकार हितवर्धक संघ क्र. 2,

  जी.डी.आंबेकर मार्ग, परेल व्हिलेज,

  मुंबई – 400012.                                    (तक्रार क्र. 121/12)

 

12. श्री. प्रकाश विश्राम हरियन,

  रा. जय भवानी सीएचएस लि.,

  सी – 40, पाचवा मजला, कामदेव नगर,

  धारावी, मुंबई – 400017.                           (तक्रार क्र. 122/12)

 

13. श्री. रामचंद्र बापू जगदाळे,

   रा. जे / 538, आर.बी.आय. भायखळा कॉलनी,

   मराठा मंदिर रोडच्‍या जवळ, मुंबई सेंट्रल,

   मुंबई – 400017.                                 (तक्रार क्र. 123/12)

 

14. श्री. अपसरमियॉं एम. कारभारी,

   रा. प्रधान बिल्‍डींग, रुम नं. 40,

   दुसरा मजला, डॉ. म्‍हसकर हंसा मार्ग,

   मफतलाल मिलच्‍या जवळ, माझगांव,

   मुंबई – 400010.                                 (तक्रार क्र. 125/12)

 

15. श्री. साहेबराव रघुनाथ कनसे,

   रा. 2/30, बी.पी.टी. ओल्‍ड कॉलनी,

   नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व),                        (तक्रार क्र. 128/12)

   मुंबई – 400037.               

 

16. श्री. लक्ष्‍मण खाशाबा जाधव,

   रा. साई सदन सीएचएस लि.,

   प्‍लॉट नं. 248 ए, प्‍लॉट नं. 101,

   पहिला मजला, सेक्‍टर 19, कोपरखैरणे,

   नवी मुंबई -                                     (तक्रार क्र. 129/12)

 

               विरुध्‍द

           

1. मे. सूरज एंटरप्रायझेस, तर्फे प्रोप्रायटर,

  श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण,

  ऑफिस – ए / 280,  वाशी प्‍लाझा,

  सेक्‍टर 17, वाशी, नवी मुंबई – 400705.        

  घरचा पत्‍ता - उषा कबिर, सेक्‍टर 10,

  दुसरा मजला, रुम नं. 201, प्‍लॉट नं. 42,

  नवीन पनवेल, खांदा कॉलनी (रेल्‍वे ट्रॅक जवळ)

 

2. श्री. संतोष गौतम कनवाळू ,

   शॉप नं. 07, मारुती नंदन, सेक्‍टर 8,

   प्‍लॉट नं. 35, कामोठे, नवी मुंबई. 410209.           ....  सामनेवाले क्र. 1 व 2

 

 

                समक्ष :-  मा. अध्‍यक्षा, स्‍नेहा एस. म्‍हात्रे 

        मा. सदस्‍य, एस.एस. पाटील  

 

उपस्थिती :- तक्रारदार स्‍वतः व त्‍यांचे वकील अॅड. विजय शिंदे हजर

            विरुध्‍दपक्ष क्र. 1  एकतर्फा चौकशी

            विरुध्‍दपक्ष क्र. 2 तर्फे अॅड.एस.आर.चंद्रे हजर.

 

                       आदेश

     (दि.  22/11/2013)

   द्वारा मा. सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे, अध्‍यक्षा

 

1.           वर नमूद केलेल्‍या 16 तक्रारींमध्‍ये विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 हे सारखेच आहेत तसेच उभयपक्षांतील वादविषय सुध्‍दा समान आहेत त्‍यामुळे कामकाजाच्‍या सोयीचे दृष्‍टीने या सर्व 16 तक्रारी एकाच दिवशी निकालासाठी ठेवलेल्‍या आहेत.  तसेच एकत्रित आदेशाद्वारे  ही सर्व तक्रार प्रकरणे निकाली काढण्‍यात येत आहेत ही बाब सर्वप्रथम स्‍पष्‍ट करण्‍यात येते.

 

2.        तक्रारदारांनी सदर प्रकरणांत तक्रारीसोबत प्रतिउत्‍तर,  पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद व इतर काही कागदपत्रे दाखल केली.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.   विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने त्‍यांचा  लेखी जबाब दाखल केला व त्‍यांचा लेखी जबाब हाच त्‍यांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र म्‍हणून ग्राह्य धरावे अशी पूरशिस दिली व ते लेखी युक्‍तीवाद दाखल करणार नसल्‍याचे नमूद केले.  त्‍यामुळे उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्‍यात आले.

 

3.         तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.        

          तक्रारदार हे वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर रहातात.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 हे सूरज एंटरप्रायझेस ही प्रोप्रायटरी कन्‍सर्न असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण हे सदर सूरज एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर / बिल्‍डर आहेत व त्‍यामार्फत ते बांधकामाचा व्‍यवसाय करतात.  विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे एक बांधकाम व्‍यवसायातील एजंट असून ते विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या दररोजच्‍या उदा. विक्रीच्‍या सदनिका दाखविणे / जागेसाठी ग्राहक आणणे इत्‍यादी व्‍यवसायात ते विरुध्‍दपक्ष क्र. 1 ला मदत करतात.

 

4.          तक्रारदार पुढे म्‍हणतात की, त्‍यांनी विरुध्‍दपक्ष यांचेकडे खालील कोष्‍टकात नमूद केलेला  फ्लॅट बुक केला व त्‍यासाठी मोबदला म्‍हणून खाली नमूद केल्‍याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना दिली.  व विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला सदर बुक केलेल्‍या फ्लॅटचा ताबा लवकारात लवकर देण्‍याचे कबूल करुनसुध्‍दा तसेच तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाला वारंवार विनवण्‍या करुनही अद्याप पर्यंत दिलेला नाही.  तसेच त्‍यामुळे तक्रारदाराला  आतापर्यंत भाडयाने जागा घेऊन रहावे लागले व त्‍यासाठी त्‍यांना आतापर्यंत खाली नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे भाडयापोटी खर्च आला तसेच त्‍यांनी आतापर्यंत कर्जाऊ घेतलेल्‍या रकमेवर व्‍याजापोटी खाली नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे खर्च केले आहेत. 

 

5.          तक्रारीचे कारण हे रोज घडत असल्‍याने तक्रारदाराने सदर तक्रार विहित मुदतीत दाखल केली आहे.  तसेच तक्रारीचे कारणही या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येते व याबाबत इतर कुठल्‍याही न्‍यायालयात तक्रारदाराने दावा दाखल केलेला नाही.  तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडून सदर वादग्रस्‍त सदनिकेचा तक्रारदाराला ताबा द्यावा, तसेच त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे भरलेली उभयपक्षांत ठरलेल्‍या मोबदल्‍यापैकी एकूण रक्‍कम तक्रारदाराला 18% व्‍याजाने परत करावी.  तसेच तक्रारदाराकडून  विरुध्‍दपक्षाने मोठया प्रमाणात रक्‍कम  घेऊनही वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा दिला नाही यासाठी खाली दिलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडून मानसिक त्रास, न्‍यायिक खर्च तसेच त्‍यांनी घेतलेल्‍या कर्जावरील व्‍याज व भाडयाची रक्‍कम याची मागणी केली आहे.

क्र     

त.

क्र.

त.दार

नांव

वि.प.

नांव

टोटल

मोबदला

रक्‍कम रु.

त.ने

वि.प.ला

दिलेली रक्‍कम

सदनिका

क्र., इमारत

नांव, व एरिया

(कारपेट)

अलॉटमेंट

लेटर दि.

 

त.दाराने

मागणी केलेली रक्‍कम रु.

1     

108/

12

दिलीप काळे

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

22,22,500/-      

7,00,000/-

303, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

635 चौ.फूट.

13-07-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज-1,00,000/-  

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-  

2

109/

12    

सुशांत

काटकर

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

13,33,500/-      

3,00,000/-      

103, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

635 चौ.फूट.

13-07-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

3     

110/

12    

विकास

जाधव  

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

13,54,500/-      

3,50,000/-      

302, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

630 चौ.फूट.

13-07-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

4     

112/

12    

सुरेश पवार      

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

13,23,000/-      

3,00,000/-      

102, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

630 चौ.फूट.

13-07-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

5     

113/

12    

संदीप नलावडे 

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

13,54,500/-      

3,00,000/-      

203, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

630 चौ.फूट.

24-10-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

6     

114/

12    

लाडूबाई शेळके  

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

12,68,500/-      

3,50,000/-      

403, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68,सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

590 चौ.फूट.

13-07-11

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

7     

115

/12    

रविकांत नार्वेकर

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

11,40,000/-      

5,70,900/-      

बी-302, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11,सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

414 चौ.फूट.

04-07-2009

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

8     

116/

12    

महेश्‍वर गौडा   

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

7,41,000/-      

7,13,200/-

ए-205, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11,सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

  269.1 चौ.फूट.

14-08-09

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

9     

119/

12    

अपसरमिया कारभारी

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

19,00,000/-      

16,66,000/-      

ए-202, ए - 203

सूरज कॉम्‍प्‍लेक्‍स,गट नं. 07, सुखापूर-पनवेल, गट नं. 8 सिलोटर रायपूर  

560 चौ.फूट.

560 चौ.फूट

29-04-11,  19-01-10

भाडे – (Not claimed in final prayer)

कर्ज व्‍याज- (Not claimed in final prayer)

मान.त्रास- 2,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

10     

120/

12    

अपसरमिया कारभारी

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

14,82,000/-      

15,52,000/-      

A – 601, 602

सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

269 चौ.फूट व 269 चौ.फूट

19-01-10

भाडे – (Not claimed in final prayer)

कर्ज व्‍याज- (Not claimed in final prayer)

मान.त्रास- 2,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

11     

121/

12    

अनिल नार्वेकर 

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

11,40,000/-      

4,15,000/-      

402, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

414 चौ.फूट

04-07-09

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

12     

122/

12    

प्रकाश हरियन 

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

7,99,500/-      

1,60,000/-      

502, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

269.1 चौ.फूट

07-12-09

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

13     

123/

12    

रामचंद्र जगदाळे

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

11,99,250/-      

3,20,000/-      

बी601 सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

269.1 चौ.फूट

08-07-09

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

14     

125/

12    

अपसरमिया कारभारी

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

14,82,000/-      

15,52,000/-      

ए-501, 502, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

269.1 चौ.फूट

22-08-09

भाडे – (Not claimed in final prayer)

कर्ज व्‍याज- (Not claimed in final prayer)

मान.त्रास- 2,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

15     

128/

12    

साहेबराव कनसे  

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

7,50,000/-      

7,90,000/-

202, सूरज लक्ष्‍मी गट नं. 42, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई.

590 चौ.फूट

22-01-10

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

16     

129/

12    

लक्ष्‍मण जाधव

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2. श्री.संतोष कनवाळू

11,34,000/-      

5,00,000/-      

बी601 सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

434.7 चौ.फूट

02-08-10

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

 

6.              विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने त्‍यांचा जबाब दाखल केला आहे.  त्‍या जबाबात त्‍यांनी तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांना सेवा देण्‍यासाठी कोणताही आर्थिक मोबदला दिलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्राहक नसून विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे सदर तक्रारीत आवश्‍यक पक्षकार नाहीत व विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे बांधकाम व्‍यवसायातील एजंट असून त्‍यांनी तक्रारदाराला ग्राहक म्‍हणून कोणतीही सेवा पुरविलेली नाही.  त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2 (1) (d) नुसार तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्राहक नसल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द दाखल केलेली तक्रार ही मंचात टिकण्‍यायोग्‍य नसून ती तक्रारदारावर कॉस्‍ट लावून खारीज करावी व विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या रोजच्‍या व्‍यावसायीक घडामोडींबाबत जबाबदार आहेत व विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने तक्रारदाराकडून काही रक्‍कम स्विकारली आहे याबाबत तसेच त्‍यांचेवरील इतर आरोपांबाबत नकारार्थी भूमिका घेऊन तक्रारदाराचे सगळे आरोप बिनबुडाचे असून ते आपणांस मान्‍य नसल्‍याचे नमूद केले आहे.   तसेच तक्रारदाराची तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रातील नसून ती विहीत मुदतीत दाखल न केल्‍याने व तक्रारदार व विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांच्‍यात Contract Act प्रमाणे कोणत्‍याही प्रकारे Privity of Contract  नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे तक्रारदाराला कोणत्‍याही प्रकारे देणे लागत नाहीत व त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार तक्रारदारावर कॉस्‍ट लावून खारीज करावी असे म्‍हटले आहे.

 

7.          तक्रारदाराची तक्रार, प्रतिउत्‍तर,  पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद व इतर कागदपत्रे, व विरुध्‍दपक्ष क्र. 2 चा लेखी जबाब यांचे अवलेाकन केल्‍यावर तक्ररीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.

 

मुद्दा क्रमांक – 1         तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 1 चे ग्रा.सं.का. चे कलम

                        2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?

उत्‍तर        -           होय.

मुद्दा क्रमांक – 2         तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्रा.सं.का. चे कलम

                        2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?

उत्‍तर        -           नाही.

मुद्दा क्रमांक – 3         तक्रारदाराला विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांनी दोषपूर्ण

                        सेवा दिली आहे काय ?

उत्‍तर        -           A)  क्र. 1 ने  दोषपूर्ण सेवा दिली आहे. 

                        B) विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचा तक्रारीत उल्‍लेख  

                           नाही.

 

मुद्दा क्रमांक – 4        तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 कडून  नुकसानभरपाई

                        व त्‍यांनी केलेल्‍या मागणीनुसार रक्‍कम मिळण्‍यास पात्र

                        आहेत काय ?

उत्‍तर        -           विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडून खाली नमूद केलेल्‍या विवेचन क्र. 4 

                        नुसार रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. परंतु विरुध्‍दपक्ष  

                        क्र. 2 कडून नुकसानभरपाई व त्‍यांनी मागितलेली रक्‍कम 

                        मिळण्‍यास पात्र  नाहीत.

                           

विवेचन मुद्दा क्रमांक – 1        तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 1 चे ग्राहक आहेत.  कारण तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष क्र.1 यांच्‍याकडे वरील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे वादग्रस्‍त सदनिका बुक केली व त्‍यासाठी त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना मोठया प्रमाणात एकूण मोबदल्‍याच्‍या रकमेपैकी रक्‍कमही दिली.  त्‍याची रीतसर पावती विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला दिली आहे.  व ती नि. Exh. A वर अभिलेखात उपलब्‍ध आहे.  सदर पावती सूरज एंटरप्रायझेस या नांवाने विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला दिली असून त्‍याखाली सूरज एंटरप्रायझेसचे मालक / प्रोप्रायटर या शिर्षकाखाली स्‍वाक्षरी केलेली आहे.

          तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला वरील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे सदर वादग्रस्‍त सदनिकेच्‍या बुकींगबाबत अलॉटमेंट लेटरही दिले आहे.  सदर अलॉटमेंट लेटरची प्रत अभिलेखात उपलब्‍ध आहे.  सदर अलॉटमेंट लेटरवरही विरुध्‍दपक्ष क्र. 1 तर्फे प्रोप्रायटर म्‍हणून श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण यांनी स्‍वाक्षरी केलेली आहे.  यावरुन तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.

 

विवेचन मुद्दा क्रमांक - 2             विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे एक बांधकाम व्‍यवसायातील एजंट असून ते विरुध्‍दपक्ष क्र. 1 तर्फे विक्रीसाठी उपलब्‍ध सदनिका, त्‍या सदनिका घेण्‍यास इच्‍छूक असलेल्‍या ग्राहकांना दाखविणे, त्‍याबाबतची बुकींगसाठी रक्‍कम स्विकारून विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे देणे इत्‍यादी कामे करतात.  परंतु तक्रारदाराने सदर प्रकरणात कुठेही ते विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्राहक असल्‍याबाबत उल्‍लेख केलेला नाही.  किंवा विरुध्‍दपक्षाने सदर सदनिका दाखविण्‍याचे काम करताना तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाला काही दलालीची (Brokerage) रक्‍कम दिली आहे याबाबतही उल्‍लेख केलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्राहक कसे आहेत हे तक्रारदार सिध्‍द करु शकलेले नाहीत.  किंवा विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे तक्रारदाराने काही रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 2 ची सदनिका बुकींगच्‍या व्‍यवहाराबाबत सेवा घेण्‍यासाठी दिले असल्‍याबाबत काहीही ठोस पुरावा तक्रारदाराने लावलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ग्राहक नाहीत.

 

विवेचन मुद्दा क्रमांक – 3 (A)               विरुध्‍दपक्ष क्र. 1  यांनी तक्रारदाराकडून  वादग्रस्‍त सदनिका विक्रीबाबत वर नमूद केल्‍याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्‍कम स्विकारूनही व तक्रारदाराला अलॉटमेंट लेटरमध्‍ये नमूद केलेल्‍या सदनिकेचा ताबा देण्‍याचे कबूल करुनही विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा दिलेला नाही तसेच करारनामाही नोंदवून दिलेला नाही.  याउलट, तक्रारदाराकडून वारंवार विचारणा होऊनही त्‍यांनी तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा देण्‍यास टाळाटाळ केली.  तसेच तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष क्र. 1 चे विरुध्‍द पोलिस कंम्‍प्‍लेंट दाखल केल्‍यानंतर व त्‍यांचेविरुध्‍द कायदेशीर कारवाई चालू केल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराशी दि. 03/03/13 रोजी उभयपक्षांतील समझोतापत्र (Memorandum of Understanding) स्‍वाक्षरीत केले.  म्‍हणजेच सदर M.O.U. नुसार विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने ज्‍या तक्रारदारांना सदनिकेचा ताबा हवा  त्‍यांना सदनिकेचा ताबा देण्‍यात येईल व ज्‍यांना त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे सदर सदनिका खरेदीसाठी भरलेली एकूण रक्‍कम परत हवी असेल त्‍यांना ती परत करण्‍यात येईल असे पर्याय निवडण्‍यास सांगितले.  त्‍यानुसार तक्रारदाराने कोष्‍टकात  नमूद केल्‍याप्रमाणे त्‍यांना हवा असलेला पर्याय निवडला व त्‍यासमोर आपली स्‍वाक्षरी केलेली आहे.  असे असूनही विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराशी सदर प्रकरण तडजोडीने मिटविण्‍याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अनेक मिटींग्‍ज घेतल्‍या,  परंतु अद्याप पर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा दिला नाही किंवा सदनिका खरेदीबाबत विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे भरलेली रक्‍कम परत केली नाही.  यावरुन विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे हे स्‍पष्‍ट  होते.

3 B)       विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे एक बांधकाम व्‍यवसायातील एजंट आहेत.  त्‍यांनी तक्रारदाराला वर नमूद असलेली  वादग्रस्‍त सदनिका विक्री करावयाची असल्‍याने त्‍याचे बुकींग करण्‍यासाठी किंवा इतर काही सेवा देण्‍यासाठी तक्रारदाराकडून दलालीची (Brokerage) रक्‍कम म्‍हणून काही पैसे घेतले याबाबत तक्रारीत तक्रारदाराने कोणताही उल्‍लेख केलेला नाही.  तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचा सदर प्रकरणात तक्रारदाराशी कुठल्‍याही प्रकारे थेट संबंध आल्‍याचा पुरावा किंवा कागदपत्र अभिलेखात उपलब्‍ध नाही.  त्‍यामुळे तक्रारदार व विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांच्‍यात Privity of Contract  आहे याबाबत तक्रारदार सिध्‍द करु शकलेले नाहीत.  तसेच तक्रारदाराने सदर तक्रारीत विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे  विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना देण्‍यासाठी भरलेली रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना दिलेली नाही इत्‍यादी बाबतचा कोणताही उल्‍लेख तक्रारदाराने  तक्रारीत केल्‍याचे दिसून येत नाही.  याउलट विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे तक्रारदाराने भरलेल्‍या एकूण रकमेच्‍या पावत्‍या विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला दिलेल्‍या आहेत.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे असे म्‍हणणे योग्‍य होणार नाही.   तसेच सदर तक्रारीत लावलेले विरुध्‍दपक्ष क्र. 2 विरुध्‍दचे पोलिस कंम्‍प्‍लेंट केल्‍याचे रिपोर्ट (F.I.R.) इत्‍यादी तक्रारदाराने दाखल केलेली नसून इतर त्रयस्‍थ व्‍यक्‍तीने दाखल केलेल्‍या F.I.R. ची प्रत तक्रारीत लावली आहे.

              तक्रारदाराने पान क्र. 27 वर लावलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्र. 2 विरुध्‍द न्‍यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्‍यायालय, पनवेल यांचा दि. 27/07/12 रोजीच्‍या  रिमांड रिपोर्टचे अवलोकन केले असता (पान क्र. 28) पॅरा क्र. 3 व पॅरा क्र. 5 (शेवटून दुसरी ओळ) विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने आरोपी क्र. 1 व 2 हा फसवणूक करणारा आहे हे माहित असूनही त्‍यांनी जनतेकडून एजंटच्‍या नांवाखाली रक्‍कमा स्विकारल्‍या आहेत.  आरोपी क्र. 1 व 2 यांस गुन्‍हा करण्‍यास मदत केली आहे व त्‍याचा तपास होणे बाकी आहे असा उल्‍लेख केलेला आहे.  तसेच ज्‍युडीशिअल मॅजिस्‍ट्रेट F.C. Panvel यांची दि. 27/07/12 रोजीची वि.प. 1 व 2 यांचेबाबत दिलेल्‍या आदेशाचे अवलोकन केले असता – खालील बाबी निदर्शनास आल्‍या की, वि.प. 1 यांनी तक्रारदारासारख्‍या अनेक लोकांकडून एकच सदनिका अनेकांना विकणे व खोटी कागदपत्रे करणे इत्‍यादी कामे केलेली आहेत.  व ते दि. 17/07/12 पासून पोलिस कस्‍टडीमध्‍ये आहेत.  तसेच वि.प. 2 बाबत वि.प. 2 यांना दि. 23/07/12 रोजी अटक करुन दि. 24/07/12 रोजी पनवेल कोर्टात हजर केल्‍यापासून ते दि. 27/07/12 पर्यंत पोलिस कस्‍टडीमध्‍ये असल्‍याचा उल्‍लेख केला आहे.  परंतु त्‍यांच्‍याकडून Investigating Officer यांना सदर प्रकरणाबाबत आज दि. 27/07/12 पर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही असा उल्‍लेख केलेला आहे व त्‍यामुळे वि.प. 2 हे सदर प्रकरणात पूर्णपणे दोषी असल्‍याचा कुठलाही पुरावा नसल्‍याने त्‍यांना दि. 09/08/12 रोजी पर्यंत MCR – मध्‍ये ठेवण्‍याचे आदेश केलेले दिसतात.  यावरुन तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष क्र. 2 वर केलेले आरोप अद्याप सिध्‍द व्‍हायचे आहेत असे दिसून येते.  यामुळे सदर प्रकरणात वि.प. 2 वर फौजदारी न्‍यायालयात खटला चालू असल्‍याचे दिसते.  तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत कुठेही वि.प. 2 यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असा किंवा वि.प. 2 हे ग्रा.सं.कायद्याचे कलम 2 (1) (r) (vi) नुसार अनुचित व्‍यापारी प्रथेस जबाबदार आहेत असा उल्‍लेख केलेला दिसत नाही.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वि.प. 2 ने तक्रारदाराची फसवणूक केली असल्‍यास व वि.प. 2 यांचेविरुध्‍द पनवेल कोर्टात फौजदारी गुन्‍हा दाखल होऊन त्‍याबाबतची कारवाई अद्याप जारी आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने पुन्‍हा त्‍याच मुद्दयांवर वि.प. 2 यांचा तक्रारदाराशी ग्राहक म्‍हणून काय संबंध आहे याचा खुलासा न करता तक्रार दाखल करणे संयुक्तिक नाही असे मंचाचे मत आहे व त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे असे म्‍हणता येणार नाही.   

 

विवेचन मुद्दा क्रमांक – 4            तक्रार क्र. 119/12, 120/12, 125/12 मधील तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीत विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडून प्रार्थना कलम (ए) मध्‍ये तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडे बुक केलेल्‍या सदनिकेचा ताबा मागितला आहे.  तसेच इतर तक्रार प्रकरणांमध्‍ये तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडून सदनिकेचा ताबा तसेच  विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे भरलेली रक्‍कम परत मागितली आहे.  तक्रार क्र. 119/12, 120/12, 125/12 मधील तक्रारदारांनी केवळ सदनिकेचा ताब्‍याची मागणी केलेली आहे. परंतु मंचाने विरुध्‍दपक्षक्र. 1 शी दि.03/03/13 रोजीच्‍या  उभयपक्षांत झालेल्‍या M.O.U.  मधील तक्रारदारांनी स्विकारलेल्‍या पर्यायाचा तक्रारदारांना न्‍याय देण्‍याचे दृष्‍टीने विचार केला.

इतर तक्रार प्रकरणामधील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदनिकेचा ताबा किंवा विरुध्‍दपक्ष क्र. 1 ला सदर सदनिका खरेदी करण्‍यासाठी दिलेली एकूण रक्‍कम 18% व्‍याजासह परत करावी असे पर्याय  त्‍यांच्‍या प्रार्थनेमध्‍ये दिले आहेत.  व सदर तक्रारदारांनी खाली नमूद केलेल्‍या M.O.U. तील कोष्‍टकानुसार देखील विरुध्‍दपक्षाकडून त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेले सदनिका खरेदीबाबतची एकूण रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी असा पर्याय निवडला आहे.    त्‍या पर्यायाप्रमाणे तसेच तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत मागणी केल्‍याप्रमाणे  विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना खालील  अंतिम आदेशात  नमूद  केल्‍याप्रमाणे  पूर्तता करुन  देण्‍याचे  आदेश मंच विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना देत आहे.  M.O.U.  मधील तक्रारदारांनी स्विकारलेले  पर्याय  खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.    

तक्रार क्रमांक

तक्रारदाराचे नांव

विरुध्‍दपक्षाचे नांव

तक्रारदाराने निवडलेला पर्याय  (घर / पैसे)

1.    

108/12

श्री.दिलीप काळे     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

2.    

109/12     

श्री. सुशांत काटकर     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

3.    

110/12     

श्री. विकास जाधव

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

4.    

112/12     

श्री. सुरेश पवार     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

5.    

113/12     

श्री. संदीप नलावडे

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

6.    

114/12

श्रीम.लाडूबाई शेळके

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

7.

115/12

श्री.रवीकांत नार्वेकर

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

8.

116/12

श्री. महेश्‍वर गौडा

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

 

 

9.    

119/12     

श्री.अपसरमियॉं कारभारी

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

10.    

120/12     

श्री.अपसरमियॉं कारभारी

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

11.    

121/12     

श्री. अनिल नार्वेकर     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

12.    

122/12     

श्री. प्रकाश हरीयन     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

13.    

123/12     

श्री. रामचंद्र जगदाळे     

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

14.    

125/12

श्री.अपसरमियॉं कारभारी

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

15.

128/12

श्री. साहेबराव कनसे

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

16.

129/12

श्री. लक्ष्‍मण जाधव

1. सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्‍हाण

2.श्री.संतोष गौतम कनवाळू

पैसे

         वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारांना त्‍यांनी तक्रारदारांकडून सदर सदनिकेच्‍या विक्रीसाठी स्विकारलेल्‍या रकमेबाबत दि. 03/03/13 रोजी तक्रारदारांसोबत M.O.U.   स्‍वाक्षरीत केला होता व सदर M.O.U.  प्रमाणे जुलै 2013 पर्यंत सदर रक्‍कम तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष क्र. 1 दुपटीने परत करणार इत्‍यादी आश्‍वासन दिले होते. परंतु त्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने पुढे कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांना घोर फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे.  म्‍हणून ज्‍या  तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्ष क्र. 1 बरोबर दि. 03/03/13 रोजी  उभयपक्षांत  केलेल्‍या M.O.U.   प्रमाणे सदनिका मिळावी हा पर्याय स्विकारला आहे त्‍या तक्रारदारांकडून सदर सदनिकेच्‍या खरेदीपोटी  उभयपक्षांत पूर्वी जो मोबदला ठरला आहे त्‍याच मोबदल्‍यात तक्रारदाराकडून सदर मोबदल्‍यापैकी उर्वरित रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने स्विकारुन व सदर सदनिकेच्‍या विक्रीचा करारनामा नोंदवून तक्रारदारांना सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा सर्व सोयी सुविधांसह आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांमध्‍ये तक्रारदारांना द्यावा.   

       जर काही कारणाने वि.प. 1 यांना ताबा देणे शक्‍य नसल्‍यास वि.प. 1 यांनी तक्रारदाराला वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे  त्‍यांनी वि.प. 1 कडे भरलेल्‍या एकूण रकमेवर 15% व्‍याज देऊन ती व्‍याजासह परत करावी.  (सदनिका तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने अलॉट केलेल्‍या तारखेपासून ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करेपर्यंतचे व्‍याज )

         ज्‍या तक्रारदारांनी दि. 03/03/13  रोजी उभयपक्षांत केलेल्‍या M.O.U.  नुसार  तसेच तक्रारीतील प्रार्थनेमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे सदनिका खरेदीसाठी भरलेली एकूण रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने परत करावी असा पर्याय दिला आहे त्‍या तक्रारदारांना वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे भरलेली एकूण रक्‍कम तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी (सदर सदनिकेबाबत दिलेल्‍या अलॉटमेंट लेटरच्‍या तारखेपासून ते सदर रक्‍कम अदा करण्‍याच्‍या दिवसापर्यंतचे व्‍याज) 15 टक्‍के व्‍याजासह आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांचे आत परत करावी.           

      तक्रार क्र. 108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12, मधील  तक्रारदारांना  विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा देण्‍यास विलंब केल्‍यामुळे भाडयाच्‍या जागेत रहायला लागल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने रु. 2,25,000/- प्रत्‍येक तक्रारदाराला सदर भाडयापोटी आलेल्‍या खर्चाची रक्‍कम परत करावी.  तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने प्रत्‍येक तक्रारदाराला तक्रारदाराने कर्जाऊ घेतलेल्‍या रकमेवर रुपये 1,00,000/- इतक्‍या व्‍याजाची रक्‍कम परत करावी अशी मागणी केली आहे.  परंतु या सर्व तक्रार प्रकरणांमध्‍ये तक्रारदारांनी याबाबत लिव्‍ह अँड लायसन्‍स (Leave & License Agreement) करारनाम्‍याची प्रत प्रत्‍येक महिन्‍याला त्‍यांनी किती रक्‍कम भाडयासाठी भरली किंवा कर्जाऊ घेतलेल्‍या रकमेबाबत ती कोणाकडून / कुठल्‍या बँकेकडून घेतली, तसेच त्‍यावर किती व्‍याज आकारले गेले,  इत्‍यादीबाबतचे पुरावे तक्रारीसोबत जोडलेले नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदारांची  ही मागणी मान्‍य करता येत नाही.  

           तसेच तक्रार क्र. 119/12, 120/12 व 125/12 मधील तक्रारदार हे एकच आहेत.  परंतु त्‍यांनी आपल्‍या तक्रारीच्‍या Final Prayer मध्‍ये मात्र आपल्‍याला विरुध्‍दपक्षाकडून भाडयाची रक्‍कम मिळणेबाबत कोणतीही मागणी केल्‍याचे दिसून येत नाही.  त्‍यांनी आपल्‍याला केवळ मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई तसेच न्‍यायिक खर्च मिळावा एवढीच मागणी केल्‍याचे दिसून येते.    त्‍यामुळे त्‍यांना केवळ मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून  व न्‍यायिक खर्चापोटी खाली नमूद केल्‍याप्रमाणे  नुकसानभरपाई देता येईल.  त्‍यामुळे  विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रार क्र. 108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 119/12, 120/12, 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12 मधील सर्व तक्रारदारांना मा‍नसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रु. 25,000/- व न्‍यायिक खर्चापोटी प्रत्‍येकी रु. 15,000/- द्यावेत.  

          विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचेविरुध्‍द वरील सर्व तक्रारदारांची तक्रार प्रकरणे 108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 119/12, 120/12 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12  खारीज करण्‍यात येतात.  तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांच्‍याकडून तक्रारदार कोणतीही नुकसानभरपाई किंवा न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र नाहीत.

       सबब, अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो,

                              अंतिम आदेश

1.     तक्रारदारांच्‍या  तक्रार क्र.  108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 119/12, 120/12 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12 विरुध्‍दपक्ष क्र. 1 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येतात.  व विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचे विरुध्‍द  वर नमूद केलेली सर्व तक्रार प्रकरणे खारीज करण्‍यात येतात.

2 अ. ज्‍या तक्रारदारांनी तक्रारदार व विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांच्‍यात दि. 03/03/13 रोजी झालेल्‍या M.O.U.   नुसार सदनिका हवी असा पर्याय स्विकारला आहे त्‍यांना सदर सदनिकेचा ताबा, विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराकडून सदनिका खरेदीबाबत पूर्वी ठरल्‍याप्रमाणे मोबदल्‍याची रक्‍कम स्विकारुन आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांत सदर सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करुन सर्व सोयीसुविधांसह ताबा द्यावा.

                                 किंवा

      विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना सदर सदनिकेचा ताबा देणे शक्‍य नसल्‍यास तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे दिलेली एकूण रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने 15% व्‍याजासह (सदर सदनिका तक्रारदारांना अलॉट केलेल्‍या तारखेपासून ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करण्‍याच्‍या दिवसापर्यंतचे व्‍याज ) आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांत परत करावी.

2ब.   तसेच ज्‍या तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडून दि. 03/03/13 रोजीच्‍या M.O.U.  नुसार तसेच तक्रारीतील प्रार्थनेच्‍या पर्यायानुसार  विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे भरलेली रक्‍कम परत मागितली आहे ती रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी 15% व्‍याजासह (सदर सदनिका अलॉट केलेल्‍या दिवसापासून ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करण्‍याच्‍या दिवसापर्यंतचे व्‍याज )  आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांमध्‍ये परत करावी.

3.    विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रार क्र. 108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 119/12, 120/12 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12, मधील सर्व तक्रारदारांना  नुकसानभरपाईपोटी प्रत्‍येकी रु. 25,000/- (अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी प्रत्‍येकी रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार मात्र) द्यावेत.

           विहित मुदतीत वर नमूद केलेल्‍या आदेशातील कलम 3 मध्‍ये नमूद केलेल्‍या आदेशाचे पालन विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी न केल्‍यास तक्रार क्र. 108/12, 109/12, 110/12, 112/12, 113/12, 114/12, 115/12, 116/12, 119/12, 120/12 121/12, 122/12, 123/12, 125/12, 128/12, 129/12 मधील सर्व तक्रारदार नुकसानभरपाई व न्‍यायिक खर्चाच्‍या रकमेवर आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने दंडात्‍मक व्‍याज मिळण्‍यास  पात्र रहातील.

5.    आदेशप्रत मिळण्‍याबाबत होणा-या खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्‍वतःचे स्‍व‍तः करावे.

6.    सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभयपक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात.

 

ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.

दिनांक – 22/11/2013.

 

 

                      (एस.एस.पाटील )     (स्‍नेहा एस.म्‍हात्रे )  

                           सदस्‍य              अध्‍यक्षा

               अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.

 

 

 

 

             

 

 

 
 
[HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.