ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
ग्राहक तक्रार क्रमांकः- 227/2012
आदेश दिनांक : - 22/11/2013
श्री. राकेश गोपाळ पाठारे,
रा. फ्लॅट नं. 001, सूरज रोशन बिल्डींग,
सेक्टर 10, प्लॉट नं. 59, कामोठे,
नवी मुंबई – 410209.
विरुध्द
मे. सूरज एंटरप्रायझेस, तर्फे भागीदार,
1. श्री. शिरिषकुमार रंगराव चव्हाण,
2. ज्योती शिरिषकुमार चव्हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,
ऑफिस पत्ता - ए – 280, वाशी प्लाझा, सेक्टर 17,
वाशी, नवी मुंबई – 400708.
घरचा पत्ता - ओषा कबिर, सेक्टर 10,
दुसरा मजला, रुम नं. 201, प्लॉट नं. 42,
नवीन पनवेल, खांदा कॉलनी (रेल्वे ट्रॅक जवळ) .... सामनेवाले
समक्ष :- मा. अध्यक्षा, स्नेहा एस. म्हात्रे
मा. सदस्य, एस.एस. पाटील
उपस्थिती :- तक्रारदार स्वतः व त्यांचे वकील अॅड. विजय शिंदे हजर
विरुध्दपक्ष क्र. 1 एकतर्फा चौकशी
आदेश
(दि. 22/11/2013)
द्वारा मा. सौ. स्नेहा एस. म्हात्रे, अध्यक्षा
1 तक्रारदार हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर रहातात. विरुध्दपक्ष हे सूरज एंटरप्रायझेस ही भागीदारी संस्था असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्हाण व इतर तिघेजण हे सदर सूरज एंटरप्रायझेसचे भागीदार असून त्यामार्फत ते इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात.
2. तक्रारदारांनी त्यांची मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्या विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या पावत्या, उभयपक्षांत दि. 02/08/2010 रोजी स्वाक्षरीत केलेल्या व दि. 03/08/10 रोजी नोंदणीकृत झालेल्या करारनाम्याची प्रत, विरुध्दपक्षासोबत दि. 03/03/13 रोजी झालेल्या M.O.U. ची प्रत तसेच लेखी युक्तीवाद व इतर आवश्यक कागदपत्रे, इत्यादी दाखल केले आहेत. विरुध्दपक्ष यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द दि. 02/08/13 रोजी प्रकरण कैफियतीशिवाय चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले. त्यानंतरही विरुध्दपक्ष हे गैरहजर राहिल्यामुळे तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले.
3. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर रहातात. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्दपक्ष हे सूरज एंटरप्रायझेस ही भागीदारी संस्था असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्हाण व इतर तिघेजण हे त्या संस्थेचे भागीदार असून त्यामार्फत ते इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात.
4. तक्रारदार पुढे म्हणतात की, त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे खालील कोष्टकात दिलेला फ्लॅट बुक केला व त्यासाठी सदर सदनिकेच्या खरेदीसाठी एकूण मोबदला म्हणून रु. 8,71,000/- ही रक्कम उभयपक्षांत ठरली होती. व करारनाम्यामध्ये नमूद केल्यानुसार तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना रु. 2,25,000./- (नि. 32) नुसार करारनामा नोंदणीकृत करताना दिलेली दिसून येते. व त्यानंतर तक्रारदाराने विरुध्दपक्षाला (नि. 30) वर दर्शविलेल्या पेमेंट शेडयूल नुसार उर्वरित रक्कम भरण्याचे उभयपक्षांत ठरल्याचे दिसून येते. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारदारांनी सदर सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी रु. 92,750/- विरुध्दपक्षाला अदा करावेत अशी अट करारनाम्यातील अट क्र. (15 डी) मध्ये नमूद केलेली आहे.
विरुध्दपक्षाने तक्रारदाराला सदर बुक केलेल्या फ्लॅट क्र. 001, सूरज रोशन, प्लॉट नं. 59, सेक्टर 10, कामोठे, पनवेल, नवी मुंबई या फ्लॅटच्या विक्रीबाबत दि. 02/08/10 रोजी करारनामा स्वाक्षरीत करुन दि. 03/08/10 रोजी जॉईंट सबरजिस्ट्रार, पनवेल यांचेकडे नोंदवून दिला व सदर करारनाम्यावर तक्रारदारांनी रु. 49,920/- मुद्रांकशुल्क व नोंदणीशुल्क रु. 11,220/- भरले व त्यानंतर जानेवारी 2012 मध्ये विरुध्दपक्षाने तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा दिलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत सदर सदनिका तक्रारदारांच्या मालकीची असल्याबाबत तक्रारदारांच्या नांवाचे ताबापत्र (Possession Letter) दिलेले नाही. तसेच एन.ओ.सी. दिलेले नाही.
5. तक्रारीचे कारण हे रोज घडत असल्याने तक्रारदाराने सदर तक्रार विहित मुदतीत दाखल केली आहे. तसेच तक्रारीचे कारणही या मंचाच्या कार्यक्षेत्रात येते व याबाबत इतर कुठल्याही न्यायालयात तक्रारदाराने दावा दाखल केलेला नाही. यासाठी खाली दिलेल्या कोष्टकाप्रमाणे तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून मानसिक त्रास, न्यायिक खर्च याची मागणी केली आहे.
अ क्र | त. क्र. | त.दार नांव | वि.प. नांव | एकूण मोबदला रक्कम रु. | त.ने वि.प.ला दिलेली रक्कम व मुद्रांकशुल्क व नोंदणीशुल्कापोटी भरलेली रक्कम रु. | सदनिका क्र., इमारत नांव, व एरिया (कारपेट) | अलॉट- मेंट लेटर दि. | त.दाराने मागणी केलेली रक्कम रु. |
1 | 227/ 12 | राकेश पाठारे | सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार 1.श्री.शिरिष कुमार चव्हाण, 2. ज्योती शिरिषकुमार चव्हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे, | 8,71,000/- | 2,25,000/- (रु. 49,920/- मुद्रांकशुल्क व रु. 11,220/- नोंदणीशुल्क) | 001, सूरज रोशन, प्लॉट नं. 59, सेक्टर 10, कामोठे, पनवेल,नवी मुंबई. 365.7 चौ.फूट | 18-05-10 | मान.त्रास- 4,50,000/- न्यायिक खर्च- 20,000/- |
6. तक्रारदारांनी त्यांची मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्या विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेली रु. 2,25,000/- ची पावती, उभयपक्षांत दि. 02/08/10 रोजी स्वाक्षरीत केलेल्या व दि. 03/08/10 रोजी नोंदणीकृत झालेल्या करारनाम्याची प्रत, विरुध्दपक्षासोबत दि. 03/03/13 रोजी झालेल्या M.O.U. ची प्रत तसेच लेखी युक्तीवाद व इतर आवश्यक कागदपत्रे, सिडको यांनी 25/11/09 रोजी श्री. रामा बाळू म्हात्रे म्हणजेच सदर प्लॉट क्र. 59 चे जमिन मालक यांना सदर प्लॉटवर बांधकाम करण्यास परवानगी दिलेले पत्र, दि. 25/11/09 रोजीचे सिडको यांनी जमिन मालक श्री. रामा म्हात्रे यांचे नांवे दिलेले Commencement Certificate, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन करुन मंचाने सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्यांचा विचार केला.
मुद्दा क्रमांक – 1 तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्रा.सं.का. चे कलम
2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक – 2 तक्रारदाराला विरुध्दपक्ष यांनी दोषपूर्ण
सेवा दिली आहे काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक – 3 तक्रारदार हे विरुध्दपक्षाकडून नुकसानभरपाई
व खाली दिलेल्या विवेचनातील खुलाशाप्रमाणे
ताबापत्र (Possession Letter)मिळण्यास पात्र आहेत काय ?
उत्तर - होय.
विवेचन मुद्दा क्रमांक – 1 तक्रारदार हे विरुध्दपक्ष याचे ग्राहक आहेत. तसेच तक्रारदाराने त्यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्दपक्ष यांना सदर सदनिकेच्या खरेदीपोटी ठरलेल्या मोबदल्याची पूर्ण रक्कम दिलेली आहे. परंतु अभिलेखामध्ये विरुध्दपक्षाने तक्रारदारांना रु. 2,25,000/- रक्कम मिळाल्याबाबत दिलेली पावती नि. 30 वर उपलब्ध आहे. सदर पावती सूरज एंटरप्रायझेस या नांवाने विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला दिली असून त्याखाली सूरज एंटरप्रायझेसच्या वतीने श्री. शिरिषकुमार चव्हाण यांनी स्वाक्षरी केलेली दिसत आहे.
तसेच दि. 02/08/10 रोजी उभयपक्षांमध्ये सदर फ्लॅट क्र. 001, सूरज रोशन, प्लॉट नं. 59, सेक्टर 10, कामोठे, नवी मुंबई करारनामा स्वाक्षरीत करुन जॉईंट सबरजिस्ट्रार, पनवेल यांचेकडे नोंदवून दिला आहे व सदर करारनाम्यानुसार तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्यात सदर सदनिकेच्या विक्रीसाठी एकूण मोबदल्याची रक्कम रु. 8,71,000/- ठरल्याचे दिसून येते. व त्यापैकी तक्रारदाराने करारनामा नोंदणीकृत करताना रु. 2,25,000/- दिलेले असून उर्वरित रक्कम म्हणून रु. 6,46,000/- (नि. 30 वर) दर्शविलेले आहेत. तसेच मुद्रांकशुल्कापोटी रु. 49,920/- व नोंदणीशुल्कापोटी रु. 11,220/- दि. 03/08/10 रोजी तक्रारदाराने सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल 3 यांचेकडे भरल्याचे नि. 32 (इंडेक्स II) वर दिसून येते. तक्रारदाराने विरुध्दपक्षाला अद्यापपर्यंत एकूण 8,71,000/- रु. अदा केल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. व त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारदारांशी करारनामा नोंदणीकृत करुन सदर वादग्रस्त सदनिकेचा तक्रारदारांना जानेवारी 2012 मध्ये ताबा दिलेला आहे. यावरुन तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते.
विवेचन मुद्दा क्रमांक – 2 विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराकडून वादग्रस्त सदनिका विक्रीबाबत वर नमूद केल्याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्कम स्विकारून व तक्रारदारांशी वर नमूद केल्याप्रमाणे सदर सदनिकेचा करारनामा नोंदविल्यानंतर तक्रारदारांना सदर सदनिकेचा जानेवारी 2012 मध्ये ताबा दिला परंतु त्यानंतर विरुध्दपक्षाने मुळ जमिन मालक श्री. बाळू म्हात्रे यांचेमार्फत तक्रारदाराला दि. 21/08/12 रोजी सदर सदनिका तक्रारदारांनी खाली करुन द्यावी व त्याचा ताबा पुन्हा विरुध्दपक्षाला द्यावा याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली आहे असे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. परंतु अभिलेखामध्ये श्री. हेमंत नाक्ती यांना वर नमूद केलेली नोटीस पाठविली असल्याबाबतची प्रत उपलब्ध आहे. त्यानंतर तक्रारदारांनी विरुध्दपक्षाच्या कार्यालयास वारंवार भेटी देऊन तक्रारदार रहात असलेल्या सदनिकेचे ताबापत्र तक्रारदारांना देण्यात यावे याबाबत विरुध्दपक्षाला विनवण्या केल्या परंतु त्याबाबत विरुध्दपक्षाने तक्रारदारांना काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विरुध्दपक्षाने त्यांच्या करारनाम्यामध्ये तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडून ताबापत्र घेण्यासाठी रु. 92,750/- ही रक्कम भरावी लागेल असे नमूद केले आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्षाला रु. 2,25,000/- इतकी रक्कम भरलेली कागदपत्रांचे अवलोकन केले असता दिसून येते. तसेच तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सदर सदनिकेच्या खरेदीसाठी ठरलेल्या मोबदल्याची एकूण रक्कम रु. 8,71,000/- विरुध्दपक्षाला दिली आहे. परंतु तरी देखील विरुध्दपक्षाने तक्रारदारांना सदर सदनिकेचे ताबापत्र देण्याबाबत व एन.ओ.सी. (मूळ जमिन मालक यांची) देण्याबाबत पुढे काहीही कार्यवाही केलेली नाही. व तक्रारदारांना ताबापत्र देण्यासंबंधी टाळाटाळ केली. यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दिलेली दोषपूर्ण सेवा आहे हे सिध्द होते.
विवेचन मुद्दा क्रमांक – 3 सदर तक्रार प्रकरणामधील तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी विरुध्दपक्षाशी नोंदणीकृत केलेल्या सदनिकेचे ताबापत्र व एन.ओ.सी. तक्रारदारांना देण्यात यावे याबाबत विरुध्दपक्षाकडे वारंवार पाठपुरावा करुनही विरुध्दपक्षाने तक्रारदारांना अद्याप सदर सदनिेकेचे ताबापत्र व एन.ओ.सी. दिलेले नाही तसेच सदर सदनिकेचा करारनामा नोंदवून व सदनिकेचा ताबा तक्रारदारांना दिल्यानंतर विरुध्दपक्षाने मूळ जमिन मालक श्री.बाळू म्हात्रे यांचेमार्फत दि. 21/08/12 रोजी तक्रारदारांनी सदर सदनिका खाली करुन त्याचा ताबा पुन्हा विरुध्दपक्षाकडे द्यावा याबाबत कायदेशीर नोटीस पाठवून तक्रारदारांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला, तसेच ग्राहक मंचाकडे वकीलांमार्फत विरुध्दपक्षाविरुध्द तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून मानसिक त्रासासाठी रक्कम रु. 25,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- एवढी रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- द्यावेत.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो,
अंतिम आदेश
1. तक्रारदाराची तक्रार क्र. CC/227/12 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून दि. 03/03/13 रोजीच्या M.O.U. नुसार तसेच तक्रारीतील प्रार्थनेच्या पर्यायानुसार विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांकडून करारानाम्याच्या अटी शर्तींनुसार काही रक्कम येणे बाकी असल्यास तक्रारदारांकडून सदर उर्वरित रक्कम मिळाल्यानंतर सदर सदनिका क्र.001, सूरज रोशन, सेक्टर 10, प्लॉट 59, कामोठे नवी मुंबई याचे ताबापत्र व एन.ओ.सी. तक्रारदारांना आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यांचे आत द्यावे.
3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला नुकसानभरपाईपोटी रु. 25,000/- (अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार मात्र) द्यावेत.
4. वर नमूद केलेल्या आदेशाचे पालन विरुध्दपक्ष याने आदेश पारीत तारखेपासून 02
महिन्यांत करावे.
5. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 22/11/2013.
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस.म्हात्रे )
सदस्य अध्यक्षा
अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
विवेचन मुद्दा क्रमांक – 1 तक्रारदार हे विरुध्दपक्ष याचे ग्राहक आहेत. कारण तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांच्याकडे वरील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे वादग्रस्त सदनिका बुक केली व त्यासाठी त्यांनी विरुध्दपक्ष यांना मोठया प्रमाणात एकूण मोबदल्याच्या रकमेपैकी रक्कमही दिली. त्याची रीतसर पावती विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला दिली आहे. व ती नि. Exh. A वर अभिलेखात उपलब्ध आहे. सदर पावती सूरज एंटरप्रायझेस या नांवाने विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला दिली असून त्याखाली सूरज एंटरप्रायझेसच्या वतीने स्वाक्षरी केलेली दिसत आहे.
तसेच विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला वरील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे सदर वादग्रस्त सदनिकेच्या बुकींगबाबत दि. 10/10/09 रोजी अलॉटमेंट लेटरही दिले आहे. सदर अलॉटमेंट लेटरवरही विरुध्दपक्ष तर्फे त्यांचे भागीदार यांनी स्वाक्षरी केलेली आहे. तसेच दि. 02/09/11 रोजी उभयपक्षांमध्ये सदर फ्लॅट क्र. बी 001, सूरज सदन, प्लॉट नं. 11, सेक्टर 16, कामोठे, नवी मुंबई करारनामा स्वाक्षरीत करुन जॉईंट सबरजिस्ट्रार, पनवेल यांचेकडे नोंदवून दिला आहे व सदर करारनाम्यानुसार तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्यात सदर सदनिकेच्या विक्रीसाठी एकूण मोबदल्याची रक्कम रु. 9,93,375/- ठरल्याचे दिसून येते. व त्यापैकी तक्रारदाराने करारनामा नोंदणीकृत करताना रु. 1,51,000/- दिलेले असून उर्वरित रक्कम म्हणून रु. 8,42,375/- (नि. 48 वर) दर्शविलेले आहेत. तसेच मुद्रांकशुल्कापोटी रु. 72,060/- व नोंदणीशुल्कापोटी रु. 14,910/- दि. 02/09/11 रोजी तक्रारदाराने सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल 3 यांचेकडे भरल्याचे नि. 21 वर दिसून येते. तक्रारदाराने दि. 08/03/10 पर्यंत विरुध्दपक्षाला एकूण 6,26,000/- रु. अदा केल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. व त्याबाबत विरुध्दपक्षाने तक्रारदाराला दिलेल्या पावत्या तक्रारदारांनी अभिलेखात नि. "ए" वर जोडलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते.
विवेचन मुद्दा क्रमांक – 2 विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराकडून वादग्रस्त सदनिका विक्रीबाबत वर नमूद केल्याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्कम स्विकारूनही व तक्रारदाराला अलॉटमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या सदनिकेचा ताबा लवकरात लवकर देण्याचे कबूल करुनही तसेच तक्रारदारांबरेाबर दि. 02/09/11 रोजी सदर सदनिकेच्या खरेदीबाबत वर विवेचन मुद्दा क्र. १ मध्ये उल्ल्ेख केल्याप्रमाणे करारानामा नोंदवून देखील विरुध्दपक्षाने अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा दिलेला नाही. याउलट, तक्रारदाराकडून वारंवार विचारणा होऊनही त्यांनी तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. तसेच तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत श्री. प्रकाश एकनाथ राऊत यांनी विरुध्दपक्ष याचे भागीदार श्री. शिरिषकुमार रंगराव चव्हाण व श्री. संतोष तांबे विरुध्द दाखल केलेल्या पोलिस कंम्प्लेंट बाबतची कागदपत्रे लावली आहेत. अशाप्रकारे विरुध्दपक्षाच्या भागीदारांविरुध्द तक्रारदारासारख्या इतर फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी कायदेशीर कारवाई चालू केल्यानंतर विरुध्दपक्ष याने तक्रारदाराशी दि. 03/03/13 रोजी समझोतापत्र (M.O.U. Memorandum of Understanding) स्वाक्षरीत केले. म्हणजेच सदर M.O.U. नुसार विरुध्दपक्ष याने तक्रारदारांना सदनिकेचा ताबा हवा त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात येईल व ज्यांना त्यांनी विरुध्दपक्षाकडे सदर सदनिका खरेदीसाठी भरलेली एकूण रक्कम परत हवी असेल त्यांना ती परत करण्यात येईल असे पर्याय निवडण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने खाली नमूद केल्याप्रमाणे पैसे परत मिळावेत हा पर्याय निवडला व त्यासमोर आपली स्वाक्षरी केलेली आहे. असे असूनही विरुध्दपक्षाने तक्रारदाराशी सदर प्रकरण तडजोडीने मिटविण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अनेक मिटींग्ज घेतल्या. परंतु अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा किंवा सदनिका खरेदीबाबत विरुध्दपक्षाकडे भरलेली रक्कम परत केली नाही. यावरुन विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे हे स्पष्ट होते.
विवेचन मुद्दा क्रमांक – 3 सदर तक्रार प्रकरणामधील तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सदनिकेचा ताबा किंवा विरुध्दपक्षाला सदर सदनिका खरेदी करण्यासाठी दिलेली एकूण रक्कम व्याजासह परत करावी असे पर्याय त्यांच्या प्रार्थनेमध्ये दिले आहेत. व सदर तक्रारदारांनी खाली नमूद केलेल्या M.O.U. तील कोष्टकानुसार देखील विरुध्दपक्षाकडून त्यांनी विरुध्दपक्षाकडे भरलेले सदनिका खरेदीबाबतची एकूण रक्कम व्याजासह परत मिळावी असा पर्याय निवडला आहे. विरुध्दपक्ष याने वरील विवेचनात नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे तसेच उभयपक्षांत समझोतापत्र (M.O.U.) केल्यानंतरही तक्रारदाराला विरुध्दपक्षाने अद्याप सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा किंवा वि.प. यांचेकडे तक्रारदाराने सदर सदनिका विकत घेण्यासाठी भरलेली एकूण रक्कम तक्रारदाराला परत केलेली नाही. तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडे भरलेली एकूण रक्कम तक्रारदारांना विरुध्दपक्ष यांनी (सदर सदनिकेबाबत दिलेल्या अलॉटमेंट लेटरच्या तारखेपासून ते सदर रक्कम अदा करण्याच्या दिवसापर्यंतचे व्याज) 15 टक्के व्याजासह आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यांचे आत परत करावी. तसेच विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारदार मानसिक त्रासासाठी रक्कम रु.25,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- एवढी रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
तसेच वि.प. यांनी तक्रारदाराल दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिध्द झाले आहे त्यामुळे तक्रारदाराला त्यांनी खालील M.O.U. च्या कोष्टकामध्ये स्विकारलेल्या पर्यायानुसार विरुध्दपक्ष यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे.
अ.क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नांव | विरुध्दपक्षाचे नांव | तक्रारदाराने निवडलेला पर्याय(घर / पैसे) |
1. | 227/12 | श्री. राकेश गोपाळ पाठारे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार (1. श्री.शिरिषकुमार चव्हाण, 2. ज्योती शिरिषकुमार चव्हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे) | |
वर नमूद केलेल्या कोष्टकाप्रमाणे विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना त्यांनी तक्रारदारांकडून सदर सदनिकेच्या विक्रीसाठी स्विकारलेल्या रकमेबाबत दि. 03/03/13 रोजी तक्रारदारांसोबत M.O.U. स्वाक्षरीत केला होता व सदर M.O.U. प्रमाणे जुलै 2013 पर्यंत सदर रक्कम तक्रारदारांना विरुध्दपक्ष दुपटीने परत करणार इत्यादी आश्वासन दिले होते. परंतु त्याबाबत विरुध्दपक्षाने पुढे कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यामुळे तक्रारदारांना घोर फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे. म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्षा बरोबर दि. 03/03/13 रोजी उभयपक्षांत केलेल्या M.O.U. प्रमाणे पैसे मिळावे हा पर्याय स्विकारला आहे. तसेच त्यांच्या तक्रारीतही त्यांनी सदनिकेचा ताबा किंवा विरुध्दपक्षाकडे भरलेले पैसे परत मिळावेत हा पर्याय दिलेला आहे.
तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांनी सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा देण्यास विलंब झाल्यामुळे भाडयाच्या जागेत रहायला लागल्यामुळे विरुध्दपक्ष याने त्यांना रु. 2,25,000/- तक्रारदाराला सदर भाडयापोटी आलेल्या खर्चाची रक्कम परत करावी. तसेच विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला तक्रारदाराने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर रुपये 1,00,000/- इतक्या व्याजाची रक्कम परत करावी अशी मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी याबाबत लिव्ह अँड लायसन्स (Leave & License Agreement) करारनाम्याची प्रत प्रत्येक महिन्याला त्यांनी किती रक्कम भाडयासाठी भरली किंवा कर्जाऊ घेतलेल्या रकमेबाबत ती कोणाकडून / कुठल्या बँकेकडून घेतली इत्यादीबाबतचे पुरावे तक्रारीसोबत जोडलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मान्य करता येत नाही. विरुध्दपक्ष याने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु. 25,000/- व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रु. 15,000/- द्यावेत. सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो,
अंतिम आदेश
1. तक्रारदाराची तक्रार क्र. CC/227/12 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून दि. 03/03/13 रोजीच्या M.O.U. नुसार तसेच तक्रारीतील प्रार्थनेच्या पर्यायानुसार विरुध्दपक्ष यांचेकडे भरलेली एकूण रक्कम रु. 6,26,000/- (अक्षरी रु. सहा लाख सव्वीस हजार मात्र ) परत मागितली आहे ती रक्कम विरुध्दपक्ष यांनी 15% व्याजासह दि. 10/10/2009 पासून म्हणजेच सदर सदनिका अलॉट केलेल्या दिवसापासून ते रक्कम प्रत्यक्ष अदा करण्याच्या दिवसापर्यंतचे व्याज, अशी एकूण रक्कम आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यांमध्ये परत करावी.
3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला नुकसानभरपाईपोटी रु. 25,000/- (अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार मात्र) द्यावेत.
4. वर नमूद केलेल्या आदेशाचे पालन विरुध्दपक्ष याने आदेश पारीत तारखेपासून 02
महिन्यांत करावे.
5. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 22/11/2013.
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस.म्हात्रे )
सदस्य अध्यक्षा
अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.