Maharashtra

Additional DCF, Thane

CC/12/140

Mr.Hemchandran C Pillai - Complainant(s)

Versus

Suraj Enterprises Through its Partner 1)Shrishkumar Rangrao Chavan 2)Smt.jyoti Chavan 3) Mr.Deepak T - Opp.Party(s)

Adv.V.R.Shinde

22 Nov 2013

ORDER

ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
 
Complaint Case No. CC/12/140
 
1. Mr.Hemchandran C Pillai
CGS, Quarter, Sector-1, B.No105,RNo976,Antophill, Mumbai 400037.
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suraj Enterprises Through its Partner 1)Shrishkumar Rangrao Chavan 2)Smt.jyoti Chavan 3) Mr.Deepak Tambe 4) Mr.Santosh Tambe
A-280, Vashi Plaza, Sector-17, Vashi, Navi Mumbai.
Mumbai
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S.Patil MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

ठाणे जिल्‍हा अतिरिक्‍त ग्राहक तक्रार निवारण मंच,

कोंकण भवन, नवी मुंबई. 

 

                                 ग्राहक तक्रार क्रमांकः-  140, 223,

            226/2012

                          आदेश दिनांक : -   22/11/2013

  

1. श्री. हेमचंद्रन पिल्‍लई,

  रा. सीजीएस क्‍वार्टर्स, सेक्‍टर 1,

  बि. नं. 105, रुम नं. 976, अँटॉपहिल,

  मुंबई – 400037.                                   (तक्रार क्र. 140/12)

 

2. श्री. प्रकाश विनायक सावंत,

   रा. के – 204, आर.बी.आय. स्‍टाफ क्‍वार्टर्स,

   नॉर्थ अॅव्‍हेन्‍यू, आर्य समाजच्‍या जवळ,

   सांताक्रूझ (पश्चिम) मुंबई 400054.                   (तक्रार क्र. 223/12)

 

3. श्री. अरुण महादेव नरसाळे,

   रा. एम – 6, आंबेकर नगर,

   जी.डी.आंबेकर मार्ग, परेल, मुंबई                      (तक्रार क्र. 226/12)

 

विरुध्‍द

           

मे. सूरज एंटरप्रायझेस, तर्फे भागीदार,

 1. श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण,

 2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,

 ऑफिस पत्‍ता - ए – 280, वाशी प्‍लाझा, सेक्‍टर 17,

 वाशी, नवी मुंबई – 400708.                    

  घरचा पत्‍ता - ओषा कबिर, सेक्‍टर 10,

  दुसरा मजला, रुम नं. 201, प्‍लॉट नं. 42,

  नवीन पनवेल, खांदा कॉलनी (रेल्‍वे ट्रॅक जवळ)            ....  सामनेवाले

                समक्ष :-  मा. अध्‍यक्षा, स्‍नेहा एस. म्‍हात्रे 

        मा. सदस्‍य, एस.एस. पाटील  

 

 

उपस्थिती :- तक्रारदार स्‍वतः व त्‍यांचे वकील अॅड. विजय शिंदे हजर

            विरुध्‍दपक्ष क्र. 1  एकतर्फा चौकशी

           

                       आदेश

    (दि.  22/11/2013)

   द्वारा मा. सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे, अध्‍यक्षा

 

1          तक्रारदार हे वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर रहातात.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 हे सूरज एंटरप्रायझेस ही भागीदारी संस्‍था असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण व इतर तिघेजण हे सदर सूरज एंटरप्रायझेसचे भागीदार असून  त्‍यामार्फत ते  इमारत बांधकामाचा व्‍यवसाय करतात. 

 

2.          तक्रार क्र. 140/12, मधील तक्रारदारांनी  तक्रारदाराची  मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या  विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍या, उभयपक्षांत दि. 02/09/11 रोजी नोंदणीकृत केलेली करारनाम्‍याची प्रत, विरुध्‍दपक्षासोबत दि. 03/03/13 रोजी झालेल्‍या M.O.U. ची प्रत तसेच लेखी युक्‍तीवाद व इतर आवश्‍यक कागदपत्रे, दि. 10/10/09 रोजीचे अलॉटमेंट लेटर इत्‍यादी दाखल केले आहेत.  

              तक्रार क्र. 223/12 मधील तक्रारदारांनी मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या  विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍या, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाला दिलेल्‍या रकमेच्‍या धनादेशाची झेरॉक्‍सप्रत, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाचे भागीदार श्री. शिरिष आर. चव्‍हाण यांना दि. 17/05/12 रोजी पाठविलेली कायदेशीर नोटीस, अंतरिम आदेशाची प्रत, विरुध्‍दपक्षासोबत दि. 03/03/13 रोजी झालेल्‍या M.O.U. ची प्रत तसेच लेखी युक्‍तीवाद, विरुध्‍दपक्षाचे विरुध्‍द श्री. रामचंद्र जगदाळे यांनी दाखल केलेल्‍या F.I.R. ची प्रत व इतर आवश्‍यक कागदपत्रे, इत्‍यादी दाखल केले आहेत. 

            तक्रार क्र. 226/12 मधील तक्रारदारांनी तक्रारदारांनी मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या  विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍या, सिडको यांनी दि. 01/07/11 रोजी साडेबारा टक्‍के योजनेनुसार निवासी भूखंडाचे वाटप जमिनीच्‍या मूळ मालकांना केल्‍याबाबतचे पत्र, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाचे भागीदार श्री. शिरिष आर. चव्‍हाण यांना दि. 18/06/12 रोजी पाठविलेले स्‍मरणपत्र , व दि. 24/05/12 रोजी पाठविलेल्‍या पत्राची प्रत,  अंतरिम आदेशाची प्रत, विरुध्‍दपक्षासोबत दि. 03/03/13 रोजी झालेल्‍या M.O.U. ची प्रत तसेच लेखी युक्‍तीवाद, विरुध्‍दपक्षाचे विरुध्‍द श्री. रामचंद्र जगदाळे यांनी दाखल केलेल्‍या F.I.R. ची प्रत व इतर आवश्‍यक कागदपत्रे, इत्‍यादी दाखल केले आहेत. 

         विरुध्‍दपक्ष यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द वर नमूद केलेल्‍या तीनही तक्रार प्रकरणांमध्‍ये  दि. 02/08/13 रोजी सदर प्रकरणे कैफियतीशिवाय चालविण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले. त्‍यानंतरही विरुध्‍दपक्ष हे गैरहजर राहिल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून प्रकरणे अंतिम आदेशासाठी ठेवण्‍यात आली.

 

3.         तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.        

          तक्रारदार हे वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर रहातात.  तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष हे सूरज एंटरप्रायझेस ही भागीदारी संस्‍था असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण व इतर तिघेजण हे त्‍या संस्‍थेचे भागीदार असून  त्‍यामार्फत ते  इमारत बांधकामाचा व्‍यवसाय करतात. 

 

4.          तक्रारदार पुढे म्‍हणतात की, त्‍यांनी विरुध्‍दपक्ष यांचेकडे खालील कोष्‍टकात दिलेला फ्लॅट बुक केला व त्‍यासाठी मोबदला म्‍हणून खाली नमूद केल्‍याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्‍कम विरुध्‍दपक्ष यांना दिली.  व विरुध्‍दपक्षाने  तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदाराला सदर बुक केलेल्‍या फ्लॅट क्र. बी / 501, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, नवी मुंबई या फ्लॅटच्‍या विक्रीबाबत दि. 02/09/11 रोजी करारनामा स्‍वाक्षरीत करुन जॉईंट सबरजिस्‍ट्रार, पनवेल यांचेकडे नोंदवून दिला व सदर करारनाम्‍यावर तक्रारदारांनी खालील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे योग्‍य ते मुद्रांकशुल्‍क व नोंदणीशुल्‍क भरुन देखील विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा अद्याप पर्यंत दिलेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराला  सन 2011 पासून आतापर्यंत भाडयाने जागा घेऊन रहावे लागले व त्‍यासाठी त्‍यांना आतापर्यंत रु. 2,25,000/- इतका भाडयापोटी खर्च आला तसेच त्‍यांनी आतापर्यंत व्‍याजापोटी एकूण रु. 1,00,000/- खर्च केले आहेत. 

            विरुध्‍दपक्षाने तक्रार क्र. 223/12 व 226/12 मधील तक्रारदारांकडून सदनिकेच्‍या खरेदीपोटी मोठया प्रमाणात रक्‍कम घेऊनही  तक्रारदारांना त्‍यांनी खरेदी केलेल्‍या सदनिकांचा ताबा दिलेला नाही.  त्‍यामुळे  वर नमूद केलेल्‍या तक्रार क्र. 223/12 मधील तक्रारदारांना  दि. 30/01/2010 पासून आतापर्यंत भाडयाने जागा घेऊन रहावे लागले व त्‍यासाठी त्‍यांना आतापर्यंत रु. 3,00,000/- इतका भाडयापोटी खर्च आला तसेच त्‍यांनी कर्जाऊ घेतलेल्‍या  रकमेवरील व्‍याजापोटी एकूण रु. 3,00,000/- खर्च केले आहेत असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत नमूद केले आहे.

      तक्रार क्र. 226/12 मधील तक्रारदारांना  दि. 30/01/2010 पासून आतापर्यंत भाडयाने जागा घेऊन रहावे लागले व त्‍यासाठी त्‍यांना आतापर्यंत रु. 1,00,000/- इतका भाडयापोटी खर्च आला तसेच त्‍यांनी कर्जाऊ घेतलेल्‍या  रकमेवरील व्‍याजापोटी एकूण रु. 1,00,000/- खर्च केले आहेत असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

 

5.          तक्रारीचे कारण हे रोज घडत असल्‍याने तक्रारदाराने सदर तक्रार विहित मुदतीत दाखल केली आहे.  तसेच तक्रारीचे कारणही या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येते व याबाबत इतर कुठल्‍याही न्‍यायालयात तक्रारदाराने दावा दाखल केलेला नाही.  तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष यांचे कडून सदर वादग्रस्‍त सदनिकेचा तक्रारदाराला ताबा द्यावा, किंवा त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेली उभयपक्षांत ठरलेल्‍या मोबदल्‍यापैकी एकूण रक्‍कम तक्रारदाराला  व्‍याजासह परत करावी.  तसेच तक्रारदाराकडून  विरुध्‍दपक्षाने मोठया प्रमाणात रक्‍कम  घेऊनही वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा दिला नाही यासाठी खाली दिलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडून मानसिक त्रास, न्‍यायिक खर्च तसेच त्‍यांनी घेतलेल्‍या कर्जावरील व्‍याज व भाडयाची रक्‍कम याची मागणी केली आहे.

क्र    

त.

क्र.

त.दार

नांव

वि.प.

नांव

टोटल

मोबदला

रक्‍कम रु.

त.ने

वि.प.ला

दिलेली रक्‍कम व मुद्रांकशुल्‍क व नोंदणीशुल्‍कापोटी भरलेली रक्‍कम रु.

सदनिका

क्र., इमारत

नांव, व एरिया

(कारपेट)

अलॉट-

मेंट

लेटर दि.

 

त.दाराने

मागणी केलेली रक्‍कम रु.

1     

140/ 12

हेमचंद्रन  पिल्‍लई

सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार  1.श्री.शिरिष कुमार चव्‍हाण,     2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,

9,57,862/-

6,26,000/-

 

मुद्रांकशुल्‍क रु. 72,060/-नोंदणीशुल्‍क रु. 14,910/-       

बी / 501, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

 

424.35 चौ.फूट

10-10-09

भाडे – 2,25,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-  

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च-20,000/-  

 

 

 

2

223/ 12

प्रकाश सावंत     

सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार  1.श्री.शिरिष कुमार चव्‍हाण,     2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,

24,72,625/-

4,44,600/-      

602, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

855 चौ.फूट

 

 -------

 

भाडे – 3,00,000/-

कर्ज व्‍याज- 3,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

 

3

226/ 12

अरुण नरसाळे     

सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार  1.श्री.शिरिष कुमार चव्‍हाण,     2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,

28,53,750/-

12,60,000/-      

301, सूरज सारा, प्‍लॉट नं. 68, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल,नवी मुंबई.

855 चौ.फूट

 

 ------

भाडे – 1,00,000/-

कर्ज व्‍याज- 1,00,000/-

मान.त्रास- 5,00,000/-

न्‍यायिक खर्च- 20,000/-

 

 

6.            तक्रारदाराची  मूळ तक्रार, तक्रारीसोबत तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या  विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍या, व वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रार क्र. 140/12, 223/12 व 226/12 मधील दाखल केलेली कागदपत्रे  यांचे अवलेाकन केल्‍यावर तक्ररीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.

 

मुद्दा क्रमांक – 1         तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष यांचे ग्रा.सं.का. चे कलम

                        2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?

उत्‍तर        -           होय.

मुद्दा क्रमांक – 2         तक्रारदाराला विरुध्‍दपक्ष यांनी दोषपूर्ण

                        सेवा दिली आहे काय ?

उत्‍तर        -           होय.

 

मुद्दा क्रमांक – 3        तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाकडून  नुकसानभरपाई

                        व खाली दिलेल्‍या विवेचनातील खुलाशाप्रमाणे रक्‍कम मिळण्‍यास  

                        पात्र आहेत काय ?

उत्‍तर        -           होय.

विवेचन मुद्दा क्रमांक – 1        तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष याचे ग्राहक आहेत.  कारण तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष यांच्‍याकडे वरील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे वादग्रस्‍त सदनिका बुक केली व त्‍यासाठी त्‍यांनी विरुध्‍दपक्ष यांना मोठया प्रमाणात एकूण मोबदल्‍याच्‍या रकमेपैकी रक्‍कमही दिली.  त्‍याची रीतसर पावती विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदाराला दिली आहे.  व ती नि. Exh. A वर अभिलेखात उपलब्‍ध आहे.  सदर पावती सूरज एंटरप्रायझेस या नांवाने विरुध्‍दपक्ष याने तक्रारदाराला दिली असून त्‍याखाली सूरज एंटरप्रायझेसच्‍या वतीने स्‍वाक्षरी केलेली दिसत आहे. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

तक्रार क्र. 140/12

Sr.No.

Date

Receipt No.

Amount Rs.

1

11/09/2009

Blank

51,000/-

2

15/02/2010

1086

1,00,000/-

3

29/09/2009

On letter

1,95,000/-

4

15/09/2009

On letter

2,00,000/-

5

08/03/2010

On letter

80,000/-

 

Total Amt. Rs.

6,26,000/-

 

तक्रार क्र. 223/12

Sr.No.

Date

Receipt No.

Amount Rs.

1

21/07/2010

1339

1,00,000/-

2

05/08/2010

1409

3,44,600/-

 

Total Amt. PAID

4,44,600/-

 

तक्रार क्र. 226/12

Sr.No.

Date

Receipt No.

Amount Rs.

1

16/08/2010

1397

11,60,000/-

2

21/07/2010

1340

1,00,000/-

 

 

Total Amt. PAID

12,60,000/-

 

       तसेच विरुध्‍दपक्ष याने तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदाराला वरील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे सदर वादग्रस्‍त सदनिकेच्‍या बुकींगबाबत दि. 10/10/09 रोजी अलॉटमेंट लेटरही दिले आहे.  सदर अलॉटमेंट लेटरवरही विरुध्‍दपक्ष तर्फे त्‍यांचे भागीदार यांनी स्‍वाक्षरी केलेली आहे. तसेच दि. 02/09/11 रोजी उभयपक्षांमध्‍ये सदर फ्लॅट क्र. बी / 501, सूरज सदन, प्‍लॉट नं. 11, सेक्‍टर 16, कामोठे, नवी मुंबई करारनामा स्‍वाक्षरीत करुन जॉईंट सबरजिस्‍ट्रार, पनवेल यांचेकडे नोंदवून दिला आहे  व सदर करारनाम्‍यानुसार  तक्रारदार व विरुध्‍दपक्ष यांच्‍यात सदर सदनिकेच्‍या विक्रीसाठी एकूण मोबदल्‍याची रक्‍कम  रु. 9,93,375/- ठरल्‍याचे दिसून येते.  व त्‍यापैकी तक्रारदाराने करारनामा नोंदणीकृत करताना रु. 1,51,000/- दिलेले असून उर्वरित रक्‍कम म्‍हणून रु. 8,42,375/- (नि. 48 वर) दर्शविलेले आहेत.  तसेच मुद्रांकशुल्‍कापोटी रु. 72,060/- व नोंदणीशुल्‍कापोटी रु. 14,910/-  दि. 02/09/11 रोजी तक्रारदाराने सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल 3 यांचेकडे भरल्‍याचे नि. 21 वर दिसून येते.  तक्रारदाराने दि. 08/03/10 पर्यंत विरुध्‍दपक्षाला एकूण 6,26,000/- रु. अदा केल्‍याचे त्‍यांच्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.  व त्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराला दिलेल्‍या पावत्‍या तक्रारदारांनी अभिलेखात नि. "ए" वर जोडलेल्‍या आहेत.  तसेच तक्रार क्र. 223/12 व 226/12 मधील तक्रारदारांनी वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे विरुध्‍दपक्षाला अदा केलेल्‍या  रकमांच्‍या पावत्‍या विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना दिलेल्‍या आहेत. यावरुन तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.

 

विवेचन मुद्दा क्रमांक – 2               विरुध्‍दपक्ष यांनी तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदारांकडून  वादग्रस्‍त सदनिका विक्रीबाबत वर नमूद केल्‍याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्‍कम स्विकारूनही व तक्रारदाराला अलॉटमेंट लेटरमध्‍ये नमूद केलेल्‍या सदनिकेचा ताबा लवकरात लवकर देण्‍याचे कबूल करुनही तसेच तक्रारदारांबरेाबर दि. 02/09/11 रोजी सदर सदनिकेच्‍या खरेदीबाबत वर विवेचन मुद्दा क्र. १ मध्‍ये उल्‍ल्‍ेख केल्‍याप्रमाणे करारानामा  नोंदवून देखील विरुध्‍दपक्षाने अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा दिलेला नाही.  

          तक्रार क्र. 223/12 व 226/12 या प्रकरणांमध्‍ये तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाला सदर सदनिकेच्‍या खरेदीपोटी मोठया प्रमाणामध्‍ये रक्‍कम अदा करुनही विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराशी त्‍याबाबत करारनामा स्‍वाक्षरीत केला नाही किंवा नोंदवून दिलेला नाही.  याउलट, तक्रारदाराकडून वारंवार विचारणा होऊनही त्‍यांनी तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा देण्‍यास टाळाटाळ केली.  तसेच तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदाराने त्‍यांच्‍या तक्रारीत श्री. प्रकाश एकनाथ राऊत यांनी विरुध्‍दपक्ष याचे भागीदार श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण व श्री. संतोष तांबे विरुध्‍द दाखल केलेल्‍या  पोलिस कंम्‍प्‍लेंट बाबतची कागदपत्रे लावली आहेत.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाच्‍या भागीदारांविरुध्‍द तक्रारदारासारख्‍या इतर फसवणूक झालेल्‍या तक्रारदारांनी कायदेशीर कारवाई चालू केल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष याने तक्रारदाराशी दि. 03/03/13 रोजी समझोतापत्र (M.O.U. Memorandum of Understanding) स्‍वाक्षरीत केले.  म्‍हणजेच सदर M.O.U. नुसार विरुध्‍दपक्ष याने तक्रारदारांना सदनिकेचा ताबा हवा  त्‍यांना सदनिकेचा ताबा देण्‍यात येईल व ज्‍यांना त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडे सदर सदनिका खरेदीसाठी भरलेली एकूण रक्‍कम परत हवी असेल त्‍यांना ती परत करण्‍यात येईल असे पर्याय निवडण्‍यास सांगितले.  त्‍यानुसार तक्रारदाराने खाली  नमूद केल्‍याप्रमाणे पैसे परत मिळावेत हा पर्याय निवडला व त्‍यासमोर आपली स्‍वाक्षरी केलेली आहे.  असे असूनही विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराशी सदर प्रकरण तडजोडीने मिटविण्‍याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अनेक मिटींग्‍ज घेतल्‍या.  परंतु अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा किंवा सदनिका खरेदीबाबत विरुध्‍दपक्षाकडे भरलेली रक्‍कम परत केली नाही.  यावरुन विरुध्‍दपक्ष याने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे हे स्‍पष्‍ट  होते.

 

विवेचन मुद्दा क्रमांक – 3          सदर तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदनिकेचा ताबा किंवा विरुध्‍दपक्षाला सदर सदनिका खरेदी करण्‍यासाठी दिलेली एकूण रक्‍कम  व्‍याजासह परत करावी असे पर्याय  त्‍यांच्‍या प्रार्थनेमध्‍ये दिले आहेत. तक्रार क्र. 223/12 व 226/12 मध्‍ये तक्रारदारांनी सदर सदनिकेचा ताबा तसेच विरुध्‍दपक्षाकडून तक्रारदारांनी सदनिका खरेदीच्‍या मोबदल्‍यापोटी भरलेले पैसे परत मिळावेत अशी प्रार्थना त्‍यांच्‍या तक्रारीत केली आहे. (किंवा हा पर्याय दिलेला नाही).  परंतु तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदारांनी खाली नमूद केलेल्‍या M.O.U. तील कोष्‍टकानुसार विरुध्‍दपक्षाकडून त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेले सदनिका खरेदीबाबतची एकूण रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी असा पर्याय निवडला आहे. विरुध्‍दपक्ष याने वरील विवेचनात नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे तसेच उभयपक्षांत समझोतापत्र (M.O.U.)  केल्‍यानंतरही तक्रारदाराला विरुध्‍दपक्षाने अद्याप सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा किंवा वि.प. यांचेकडे तक्रारदाराने सदर सदनिका विकत घेण्‍यासाठी भरलेली एकूण रक्‍कम तक्रारदाराला परत केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्षाकडे भरलेली एकूण रक्‍कम तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष यांनी (सदर सदनिकेबाबत दिलेल्‍या अलॉटमेंट लेटरच्‍या तारखेपासून ते सदर रक्‍कम अदा करण्‍याच्‍या दिवसापर्यंतचे व्‍याज) 15 टक्‍के व्‍याजासह आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांचे आत परत करावी. तसेच तक्रार क्र. 223/12 व 226/12 मधील तक्रारदारांनी उभयपक्षांत झालेल्‍या M.O.U. प्रमाणे त्‍यांनी विरुध्‍दपक्षाकडे सदनिका खरेदीपोटी भरलेले मोबदल्‍याचे पैसे मिळावेत असा पर्याय निवडला आहे.  तसेच  विरुध्‍दपक्ष  यांचेकडून तक्रारदार मानसिक त्रासासाठी रक्‍कम रु.25,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु. 15,000/- एवढी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत.

            तसेच वि.प. यांनी तक्रारदाराल दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द झाले आहे त्‍यामुळे तक्रारदाराला त्‍यांनी खालील M.O.U. च्‍या कोष्‍टकामध्‍ये स्विकारलेल्‍या पर्यायानुसार विरुध्‍दपक्ष यांनी पूर्तता करणे आवश्‍यक आहे.

अ.क्र.    

तक्रार क्रमांक

तक्रारदाराचे नांव

विरुध्‍दपक्षाचे नांव

तक्रारदाराने निवडलेला पर्याय(घर / पैसे)

1.    

140/12

श्री. हेमचंद्रन पिल्‍ले     

सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार  1.श्री.शिरिष कुमार चव्‍हाण,     2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे,

 

पैसे

2.    

223/12

श्री.प्रकाश सावंत     

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार (1.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण, 2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे)

पैसे

3.

226/12

श्री. अरुण नरसाळे

1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे भागीदार (1.  श्री.शिरिषकुमार चव्‍हाण, 2. ज्‍योती शिरिषकुमार चव्‍हाण, 3. दिपक तांबे, 4. संतोष तांबे)

पैसे

          

            वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना त्‍यांनी तक्रारदारांकडून सदर सदनिकेच्‍या विक्रीसाठी स्विकारलेल्‍या रकमेबाबत दि. 03/03/13 रोजी तक्रारदारांसोबत M.O.U.  स्‍वाक्षरीत केला होता व सदर M.O.U.  प्रमाणे जुलै 2013 पर्यंत सदर रक्‍कम तक्रारदारांना विरुध्‍दपक्ष दुपटीने परत करणार इत्‍यादी आश्‍वासन दिले होते. परंतु त्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने पुढे कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांना घोर फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे.  म्‍हणून   तक्रारदाराने  विरुध्‍दपक्षा बरोबर दि. 03/03/13 रोजी  उभयपक्षांत  केलेल्‍या M.O.U.   प्रमाणे पैसे मिळावे हा पर्याय स्विकारला आहे.  तसेच त्‍यांच्‍या तक्रारीतही त्‍यांनी सदनिकेचा ताबा किंवा विरुध्‍दपक्षाकडे भरलेले पैसे परत मिळावेत हा पर्याय दिलेला आहे. 

            तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष यांनी सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा देण्‍यास विलंब झाल्‍यामुळे भाडयाच्‍या जागेत रहायला लागल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष याने त्‍यांना वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे प्रत्‍येक तक्रारदाराला सदर भाडयापोटी आलेल्‍या खर्चाची रक्‍कम परत करावी.  तसेच विरुध्‍दपक्ष याने वर नमूद केलेल्‍या कोष्‍टकाप्रमाणे प्रत्‍येक तक्रारदाराला तक्रारदाराने कर्जाऊ घेतलेल्‍या रकमेवर व्‍याजाची रक्‍कम परत करावी अशी मागणी केली आहे.  परंतु तक्रारदारांनी याबाबत लिव्‍ह अँड लायसन्‍स (Leave & License Agreement) करारनाम्‍याची प्रत प्रत्‍येक महिन्‍याला त्‍यांनी किती रक्‍कम भाडयासाठी भरली किंवा कर्जाऊ घेतलेल्‍या रकमेबाबत ती कोणाकडून / कुठल्‍या बँकेकडून घेतली इत्‍यादीबाबतचे पुरावे तक्रारीसोबत जोडलेले नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदारांची  ही मागणी मान्‍य करता येत नाही.   विरुध्‍दपक्ष याने तक्रार क्र. 140/12, 223/12, 226/12 मधील प्रत्‍येक तक्रारदाराला मा‍नसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रु. 25,000/- व न्‍यायिक खर्चापोटी प्रत्‍येकी रु. 15,000/- द्यावेत.     

    सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो,

                             अंतिम आदेश

1.     तक्रारदारांच्‍या तक्रार क्र. CC/140/12, CC/223/12, CC/226/12 अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

2.         तक्रार क्र. 140/12 मधील तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष यांचेकडून दि. 03/03/13 रोजीच्‍या M.O.U.  नुसार तसेच तक्रारीतील प्रार्थनेच्‍या पर्यायानुसार  विरुध्‍दपक्ष यांचेकडे भरलेली एकूण रक्‍कम रु. 6,26,000/- (अक्षरी रु. सहा लाख सव्‍वीस हजार मात्र )  परत मागितली आहे ती रक्‍कम विरुध्‍दपक्ष यांनी 15% व्‍याजासह  दि. 10/10/2009 पासून म्‍हणजेच सदर सदनिका अलॉट केलेल्‍या दिवसापासून ते रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करण्‍याच्‍या दिवसापर्यंतचे व्‍याज, अशी एकूण रक्‍कम  आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांमध्‍ये परत करावी.

           तक्रार क्र. 223/12 व 226/12 मधील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत दि. 03/03/13 रोजीच्‍या M.O.U.  नुसार विरुध्‍दपक्ष यांचेकडे भरलेली एकूण रक्‍कम अनुक्रमे रु. 4,44,600/- (अक्षरी रु. चार लाख चव्‍वेचाळीस हजार सहाशे मात्र) व  रु. 12,60,000/- (अक्षरी रु. बारा लाख साठ हजार मात्र) परत मागितली आहे ती रक्‍कम विरुध्‍दपक्ष यांनी 15% व्‍याजासह  आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्‍यांमध्‍ये परत करावी.

3.    विरुध्‍दपक्ष यांनी तक्रार क्र. 140/12, 223/12, 226/12 मधील प्रत्‍येक तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी प्रत्‍येकी रु. 25,000/- (अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी  प्रत्‍येकी रु. 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार मात्र) द्यावेत.

4.    वर नमूद केलेल्‍या आदेशाचे पालन विरुध्‍दपक्ष याने आदेश पारीत तारखेपासून 02

      महिन्‍यांत करावे.

5.    सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभयपक्षांना  पाठविण्‍यात याव्‍यात.

  ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.

 दिनांक – 22/11/2013.

 

                      (एस.एस.पाटील )     (स्‍नेहा एस.म्‍हात्रे )  

                         सदस्‍य              अध्‍यक्षा

            अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.

 

 
 
[HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.