(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे,अध्यक्ष (प्रभारी))
(पारीत दिनांक : 25 मे 2010)
अर्जदाराने, सदर दरखास्त गैरअर्जदाराचे विरुध्द, ग्राहक संरक्षण कायद्याचे
कलम 25 व 27 नुसार दाखल केली आहे. ग्राहक तक्रार क्र. 6/2009 आदेश दि. 22/7/2009 च्या आदेशाचे पालन न केल्यामुळे गै.अ.क्र. 1 ते 3 वर कार्यवाही करण्याची व वीज बिल बी.पी.एल. दराने देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे. दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदार यांना शो कॉज नोटीस काढण्यात आले.
गैरअर्जदार हजर होऊन, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात आपसी समझौता झाल्यामुळे, गैरअर्जदारा विरुध्द दरखास्त पुढे चालवायचे नाही, या आशयाची संयुक्त
... 2 ... चौ.अ.क्र.1/2010.
पुरसीस निशाणी 8 नुसार दाखल करुन, दरखास्त काढून टाकण्यात यावी, असे सांगीतले. दरखास्त मधील मागणी ही पुर्ण झाली असल्याने (Fully satisfied), अर्जदाराने दाखल केलेली पुरसीस निशाणी 8 नुसार, दरखास्त अंतिमतः निकाली काढून, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
अर्जदाराची दरखास्त निकाली.
(By way of withdrawal )
गडचिरोली.
दिनांक :- 25/05/2010.