जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 189/2008. प्रकरण दाखल तारीख - 22/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/10/2008 समक्ष – मा.बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.सतीश सामते - सदस्य शिवासांब माधवराव बेरळे अर्जदार. वय, 36 वर्षे, धंदा शेती रा.बेरळी (बु.) ता. लोहा जि. नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित मार्फंत, अधिक्षक अभिंयता, नांदेड 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित गैरअर्जदार मार्फत, सहायक अभिंयता, लोहा ता. लोहा जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. के.जे.कवटीकवार गैरअर्जदार तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी याचे सेवेच्या ञूटी बददल व त्यांच्या निष्काळीपणामूळे रु.67,200/- चे नूकसान झाल्याबददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे बेरळी ता. लोहा येथे गट नंबर 521 मध्ये आपली शेती करतात. वर्ष 2007-08 या कालावधीत त्यांनी ऊसाची लागवड केली. गैरअर्जदाराकडून विहीरीवरील मोटारीसाठी विज पूरवठा घेतलेला आहे व पाईप लाईन द्वारे ते शेतीची भिजवड करीत होते. दि.11.3.2008 रोजी दूपारी डि.पी. तून आगीचे गोळे पडले. व आग लागली. त्यामूळे शेतातील तोडणीस आलेला 30 टन ऊस जळून नष्ट झाला व पाईप लाईन ही जळून खाक झाली. आंब्याच्या झाडाचे नूकसान झाले. आगीने रौद्ररुप धारण केल्यामूळे अग्नीशमन दलास नांदेड येथून बोलवावे लागले परंतु ते येईपर्यत सर्व पिक नष्ट झाले. दि.13.3.2008 रोजी सदरील घटनेची फिर्याद गून्हा नंबर 43/2008 नुसार पोलिस स्टेशन लोहा येथे नोंदणी केली आहे व घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. सदरील आग शॉर्टसर्कीटमूळे लागल्याचे निष्पन्न झाले. दि.12.3.2008 रोजी तलाठी सज्जा बेरळी यांनी पाच पंचा समक्ष पंचनामा केला.यांच दिवशी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे अर्ज देऊन नूकसान भरपाईची मागणी केली. त्यांस कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अर्जदाराची मागणी आहे की, शेतीच्या क्षेञफळ 33 आर मध्ये लावलेला 30 टन ऊसाचे नूकसान रु.27,000/- व पीव्हीसी पाईपचे नूकसान रु.4200/- असे एकूण रु.31,200/- ,दोन आंब्याचे झाडाचे नूकसान रु.10,000/- व त्यावर 12 टक्के व्याज, मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे एकच कार्यालय आहे. त्यांना नोटीस तामील झाली परंतु ते हजर होत नसल्याकारणाने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःची साक्ष दाखल केली, तसेच एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, महसूल पंचनामा व गैरअर्जदार यांना दिलेला अर्ज दाखल केला आहे. तसेच 7/12 ही दाखल केला आहे, हे सर्व दस्ताऐवज बारकाईने तपासून व अर्जदाराने वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदारांनी त्यांचे नांवे शेती असल्याबददल 7/12 दाखल केलेला आहे. यावरुन त्यांचे नांवाने 0.33 हेक्टर क्षेञ असल्याचे दिसून येते. ऊसाची लागवड वर्ष 2007-08 या हंगामात 0.30 हेक्टर मध्ये केली आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.11.3.2008 रोजी डि.पी. मधील आगीचे गोळे ऊडून शॉर्टसर्कीटने आग लागली व त्यामूळे त्यांचे ऊसाचे नूकसान झाले. याबददल त्यांनी पोलिस स्टेशन लोहा येथे गून्हा नोंदणी केली याबददलचा घटनास्थळ पंचनामा दाखल केलेला आहे. दि.12.3.2008 रोजी तलाठी सज्जा यांनी पंचनामा करुन नूकसानीचा आढावा घेतलेला आहे. यात दि.11.3.2008 रोजी शॉर्टसकीट मूळे आग लागली व 0.30 हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे व ऊसाची अंदाजे किंमत रु.27,000/- आहे तसेच पाईप जळाले त्यांची किंमत रु.5200/- आहे असे लिहीलेले आहे, यावर साक्षीदाराच्या सहया आहेत. दि.12.3.2008 रोजी गैरअर्जदार यांना तक्रार अर्ज लिहीलेला आहे. तसेच दि.10.4.2008 रोजी अधिक्षक अभिंयता, विज वितरण कंपनी यांच्या नांवे अर्ज दिलेला आहे. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात शॉर्टसर्कीटने आग लागली आहे असे म्हटलेले आहे. पण या बाबतचा कोणताही टेक्नीकल पूरावा त्यांने दाखल केलेला नाही. शिवाय त्यांच्या मते नांदेडहून अग्नीशमन दलाच्या दोन गाडया बोलवाव्या लागल्या असे त्यांने स्वतःच्या तक्रार अर्जात म्हटले आहे. या बाबतचे अग्नीशमन दलाचे बिल त्यांने दाखल केलेले नाही. यामूळे त्यांच्या म्हणण्यास पूष्ठी मिळत नाही. शिवाय पीव्हीसी पाईप लाईन जळून खाक झाली असे त्यांचे म्हणणे आहे परंतु पीव्हीसी पाईप लाईन या बददलची बिले व ती काय किंमतीची होती याबददलचा पूरावा त्यांनी दाखल केलेला नाही. पोलिस पंचनामा व घटनास्थळाचा पंचनामा व तहसिल कार्यालयाचा पंचनामा यात शॉर्टसर्कीटमूळे आग लागली असे जरी आले असले तरी ते टेक्नीकल बाबी खाञीने सांगू शकतील असे नाही. त्यामूळे नक्की आग कशामूळे लागली यांचा उलगडा होणे शक्य नाही. शिवाय पंचनामा मधील जे पाच साक्षीदार आहेत त्यांनी हे स्वतः पाहिले व एकंदर एवढे नूकसान झाले बददलचा पूरावा म्हणून कोणत्याही साक्षीदाराचे शपथपञ अर्जदारातर्फे दाखल करण्यात आलेले नाही. शेतीमधील पिकास आग लागल्याचे कारण अनेक असू शकतात व दिवसाढवळया जर डि. पी. मधील मोठे आगीचे गोळे उडाले असेल तर आजूबाजूचे शेतकरी शेतीत काम करीत असणार व या लोकांनी सूध्दा आग पाहिली असणार अशा साक्षीदाराचे पूरावे शपथपञाद्वारे अर्जदार देऊ शकले असते, असे पूरावे त्यांने समोर आणलेले नाही. म्हणून सबळ पूराव्याअभावी अर्जदाराची तक्रार सिध्द होऊ शकत नाही. म्हणून गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली असे ठामपणे म्हणता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |