// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 308/2014
दाखल दिनांक : 05/01/2015
निर्णय दिनांक : 18/06/2015
श्री सुरज शाहुराव भोयर,
वय 35 वर्षे, व्यवसाय –शेती
रा. सातेफळ, ता. चांदुर रेल्वे,
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लि. तर्फे
अधिक्षक अभियंता,
विद्युत भवन कॅम्प, अमरावती
- महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लि. तर्फे
कार्यकारी अभियंता (ग्रामीण विभाग)
विद्युत भवन कॅम्प, अमरावती
- महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लि. तर्फे
उप अभियंता, चांदुररेल्वे विभाग,
ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. बेले
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. अळसपुरकर
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 18/06/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तो विरुध्दपक्ष यांचा ग्राहक आहे. तक्रारदार हा शेतकरी असून त्याला त्याच्या शेतात विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने त्याने दि. ९.६.२०१० रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे अर्ज दिला होता त्याच्या शेतात भरपुर पाणी असणारी विहीर आहे. त्याला त्याच्या शेतात संत्रा बाग लावावयाची होती व त्यासाठी त्याने तो अर्ज केला होता. त्यानंतर दि. २३.७.२०१२ रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्याला रु. ५,६५०/- ची डिमांड नोट दिली जी रक्कम त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 कडे जमा केली, ती रक्कम जमा केल्यानंतर सुध्दा तक्रारदाराचे शेतात विद्युत लाईनचे पोल विरुध्दपक्षाने बसविले नव्हते. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने अर्ज केल्या नंतर इतर ज्या शेतक-यांनी
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..3..
विद्युत पोल मिळण्यासाठी अर्ज केला त्यांना विरुध्दपक्षाने विद्युत पुरवठा सुरु करुन दिला याबद्दल तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे चौकशी केली असतांना त्याला 200 फुट वायर आणण्यास सांगितले, त्यांनी ती वायर खरेदी करुन विरुध्दपक्षाकडे दिली व त्यानंतर दुस-या पोलवरुन तक्रारदाराच्या शेतात लाईन टाकून दिली व विद्युत पुरवठा करण्यात आला. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने थ्री फेजची मागणी केली असतांना त्याला सिंगल फेजचाच विद्युत पुरवठा करण्यात आला. तक्रारदाराच्या शेतातुन विद्युत पुरवठा करण्यासाठी 5 पोल गेलेले आहे फक्त एकच पोल त्याच्या शेतात त्याला पुरवठा देण्यासाठी बसवायचा होता परंतु विरुध्दपक्षाने तो बसविला नाही. तक्रारदाराला सिंगल फेजचा विद्युत पुरवठा करण्यात आल्यामुळे तो संत्रा बाग लावु शकला नाही त्यामुळे त्याचे शेत कोरडवाहू राहिल्याने त्यास मानसिक शारिरीक व आर्थिक नुकसान झालेले आहे व ती देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांची आहे. तक्रारदाराला विरुध्दपक्ष यांनी या कारणावरुन रु. ५,००,०००/- त्यास झालेल्या उत्पन्नाचे नुकसानी बाबत, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु. १०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- द्यावे या विनंतीसह हा तक्रार अर्ज दाखल केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..4..
3. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 11 ला त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारदाराने त्यांचे विरुध्द केलेल्या तक्रारी नाकारल्या. परंतु त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदाराने दि. ९.६.२०१० रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे विद्युत पुरवठा मिळण्यासाठी अर्ज केला होता. या दिवशी त्याने प्रोसेसिंग चार्जेस रु. ५०/- भरले होते. दि. २३.७.२०१२ रोजी तक्रारदाराला डिमांड नोट देण्यात आली त्याप्रमाणे त्याने रु. ५,६५०/- दि. २७.८.२०१२ रोजी विरुध्दपक्षाकडे जमा केले. त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदाराच्या शेतात 5 पोल ब-याच पुर्वी टाकण्यात आले होते. ज्यावरुन इतर शेतक-यांना विद्युत पुरवठा देण्यात आला. तक्रारदाराने त्याच्या शेतात घेतलेली विहीर ही या पोल पासुन ब-याच लांब असल्याने एक पोलची आवश्यकता होती. त्यांनी असे कथन केले की, शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी आलेल्या अर्जाचा तारखेनुसार अनुक्रमांकाप्रमाणे विद्युत पुरवठा त्या त्या शेतक-यांना देण्यात आला. तक्रारदाराने दि. २७.८.२०१२ रोजी डिमांड नोट प्रमाणे पैसे जमा केल्याने तयार केलेल्या अनुक्रमांकानुसार त्यास विद्युत पुरवठा करण्यासाठी दि. ७.४.२०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यांनी असेही कथन केले की, तक्रारदाराला थ्रीफेज विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..5..
तक्रारदाराने विहीर लगत एक खोली बांधली व त्या ठिकाणी त्याने विद्युत पुरवठा घेतला आहे. तक्रारदाराने विहीरीवर पाण्याचा कोणताही पंप बसविला नाही त्यामुळे तक्रारदाराने मागणी केल्या प्रमाणे रु. ५,००,०००/- ची नुकसान भरपाई देण्यास विरुध्दपक्ष हे जबाबदार नाही. तक्रारदाराने मागणी केल्या प्रमाणे अनुक्रमांकानुसार त्याला विद्युत पुरवठा देण्यात आला, विरुध्दपक्षाने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही यावरुन तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
4. तक्रारदाराने निशाणी 13 ला प्रतिउत्तर दाखल केले.
5. तक्रार अर्ज, लेखी जबाब, दाखल दस्त तसेच विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. अळसपुरकर यांचा युक्तीवाद ऐकला त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले. तकारदारातर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला नसून तोंडी युक्तीवाद करण्यात आला नाही.
मुद्दे उत्तरे
- विरुध्दपक्षाने सेवेत
त्रुटी केली आहे का ? .... अंशतः होय
- तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? ... अंशतः होय
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..6..
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
6. विरुध्दपक्षाने लेखी जबाबात हे कबुल केले आहे की, तक्रारदाराने त्याच्या शेतात विद्युत पुरवठा मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दि. ९.६.२०१० रोजी अर्ज केला होता व त्या दिवशी त्याने प्रोसेसिंग चार्जेस रु. ५०/- भरले. दि. २३.७.२०१२ रोजी त्यास डिमांड नोट देण्यात आली त्याप्रमाणे त्याने दि. २७.८.२०१२ रोजी रु. ५,६५०/- विरुध्दपक्षाकडे जमा केले.
7. विरुध्दपक्षातर्फे अॅड. श्री. अळसपुरकर यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने जरी असे कथन केले असेल की, त्याला थ्री फेजची विद्युत पुरवठा मागणी करुन सिंगल फेजचा विद्युत पुरवठा करण्यात आला, परंतु विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या फोटो वरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार यास थ्री फेजचे मिटर देण्यात आले होते. फोटो पाहिल्या नंतर अॅड. श्री. अळसपुरकर यांचा युक्तीवाद स्विकारण्यात येतो. सिंगल फेजचे मिटर देण्यात आले हे शाबीत करण्यासाठी तक्रारदाराने कोणतेही दस्त दाखल केले नाही. त्यामुळे थ्री फेजची मागणी करुनही सिंगल फेजचा पुरवठा करण्यात आला ही तक्रारदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..7..
8. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे त्याला सिंगल फेज विद्युत पुरवठा करण्यात आल्याने तो संत्राची झाडे लावु शकला नाही व बागायती पिके न आल्याने त्याचे रु. ५,००,०००/- चे आर्थिक नुकसान झाले आहे हे शाबीत करण्यासाठी तक्रारदाराने कोणताही समाधान कारक पुरावा दाखल केला नाही. विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या फोटोग्राफवरुन हे शाबीत होते की, तक्रारदाराने विहीर खोदली असून त्या विहीरीला पाणी सुध्दा आहे परंतु तक्रारदाराने, असे जरी नमूद केले की, विरुध्दपक्षाने सिंगल फेज विद्युत पुरवठा दिलेला आहे, तर त्याने विहीरीवर मोटर पंप बसविल्याचे दिसत नाही. त्याने ते का केले नाही याचे कोणतेही कारण समोर येत नाही त्याने हे शाबीत केले नाही की, सिंगल फेज विद्युत पुरवठा केला असतांना पाण्याचा पंप लावला तर त्या व्दारे पाणी मिळू शकत नाही. जर तरला अशा परिस्थितीत काही अर्थ नसल्याने व तक्रारदाराने स्वतःच पाण्याचा पंप व ते चालण्यासाठी विजेची मोटर घेवून ते विहीरीवर बसविले याबद्दलचा पुरावा दाखल न केल्याने त्याने आर्थिक नुकसानी बाबत केलेली रु. ५,००,०००/- ची मागणी अस्विकृत करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..8..
9. विरुध्दपक्षातर्फे अॅड. श्री. अळसपुरकर यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यास विद्युत पुरवठा दिल्या नंतर त्याने हे प्रकरण दाखल केले असे असतांना व दिलेल्या विद्युत पुरवठयाचा वापर तक्रारदार हा त्याच्या शेतातील घरासाठी करीत असल्याने त्याचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा. वर नमूद कारणावरुन अॅड. श्री. अळसपुरकर यांचा असा युक्तीवाद स्विकारता येत नाही. कारण विरुध्दपक्षाने कबुल केल्या प्रमाणे तक्रारदाराने दि. ९.६२०१० रोजी त्याच्या शेतात विद्युत पुरवठा मिळण्यासाठी अर्ज केला होता त्या दिवशी त्याच्या कथना प्रमाणे तक्रारदाराने रु. ५०/- प्रोसेसिंग चार्जेस जमा केले होते असे असतांना विरुध्दपक्षाने त्यानंतर जवळपास 2 वर्षाने तक्रारदाराला दि. २३.७.२०१२ रोजी डिमांड नोट दिली ती उशीरा का दिली याचे कारण विरुध्दपक्षातर्फे नमूद नाही. त्यांनी कथन केल्याप्रमाणे त्यास डिमांड नोट मिळाल्यावर दि. २७.८.२०१२ रोजी रु. ५,६५०/- विरुध्दपक्षाकडे जमा केले असे असतांना त्याने नमूद केल्याप्रमाणे दि. ७.४.२०१४ रोजी पुनश्च 2 वर्षानी वर्क ऑर्डर देण्यात आली. याबाबत विरुध्दपक्षाने असा खुलासा केला की, आलेल्या अर्जाच्या अनुक्रमांकानुसार विद्युत पुरवठा देण्यात आला, तक्रारदाराचा
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..9..
अनुक्रमांक नंतर होता यासाठी विरुध्दपक्षाने कोणतेही दस्त दाखल केलेले नाही. अनुक्रमांकानुसार विद्युत पुरवठा करण्यात आला याबाबत जो दस्त दाखल केला त्यात तक्रारदाराचे नाव नाही तसेच ती यादी जलै २०१२ पर्यंतची आहे. वास्तविक विरुध्दपक्षाने, तक्रारदार यांना जरी ऑगष्ट २०१२ मध्ये डिमांड नोट प्रमाणे पैसे भरले, तर त्याचा अनुक्रमांक काय येतो हे शाबीत करण्यासाठी जुलै २०१२ नुसार यादी दाखल करावयास पाहिजे होती. अर्ज दिल्या नंतर व प्रोसेसिंग चार्जेस भरल्यानंतर 2 वर्षापर्यंत तो अर्ज प्रोसेस न करणे व 2 वर्षा नंतर डिमांड नोट देणे त्यानंतर अर्जदाराने डिमांड नोट प्रमाणे पैसे भरल्यानंतर वर्क ऑर्डर 2 वर्षा नंतर देणे हे विरुध्दपक्षाकडून अपेक्षीत नाही. या प्रकरणात ते घडले असल्याने विरुध्दपक्षाने तक्रारदारास विद्युत पुरवठा करण्यासाठी बराच कालावधी घेतला असल्याने ती सेवेतील त्रुटी ठरते.
10. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे विरुध्दपक्षाने त्याच्या विहीरी जवळ एक पोल लावून विद्युत पुरवठा सुरु करुन देणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब पाहता त्याने तक्रारदाराच्या विहीरी जवळ तसा विद्युत पोल उभारल्याचे दिसत नाही. विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या फोटोग्राफ वरुन ही बाब
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..10..
शाबीत होते. तर तक्रारदाराने डिमांड नोट प्रमाणे पैसे भरले तर त्याच्या विहीरीजवळ विद्युत पोल बसवुन त्यावर मिटर बसवुन विद्युत पुरवठा करणे शक्य झाले असते परंतु विरुध्दपक्षाने तसे केलेले नाही. विरुध्दपक्षाने त्याच्या लेखी जबाबात दि. ७.४.२०१४ रोजी तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सुरु करुन दिला यावरुन विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो. केलेल्या त्रुटीचा विचार करता व तक्रारदारास विरुध्दपक्षाने सिंगल फेज विद्युत पुरवठा केला ही बाब शाबीत केलेली नाही हे विचारात घेता तक्रारदार हा त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. १०,०००/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होतो असा निष्कर्ष काढणे उचित होते. यावरुन मुद्दा क्र. 1 व 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येऊन खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंतशः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदारास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु. १०,०००/- (अक्षरी रु. दहा हजर फक्त) द्यावे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 308/2014
..11..
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी या तक्रार अर्जाचा खर्च रु. २,०००/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- विरुध्दपक्ष यांनी या आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे, अन्यथा नुकसान भरपाईची रक्कम रु. १०,०००/- वर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार राहील.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 18/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष