Maharashtra

Nagpur

CC/381/2017

SHRI. SANJAY MADHUKAR CHOUDHARI - Complainant(s)

Versus

SUPRA COMPUTER SYSTEM - Opp.Party(s)

ADV. SHRI. DHIRAJ Y. KUMBHARE

07 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/381/2017
( Date of Filing : 06 Sep 2017 )
 
1. SHRI. SANJAY MADHUKAR CHOUDHARI
PLOT NO. 25, HAZARI PAHAD, GAYATRI COLONY NAGPUR-07
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SUPRA COMPUTER SYSTEM
VIP ROAD, T-POINT, DHARMPETH, NAGPUR-10
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Jan 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा.सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना लॅपटॉप व प्रिंटर कर्जावर विकत घेण्‍याकरीता लॅपटॉप व प्रिंटर ची निवीदा मागितली त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्षाने Lenovo Think Pad Laptop रुपये ४४,९९०/- आणि Brother Laser All in One Printer ची रुपये १२,४९०/- ची निवीदा तक्रारकर्त्‍याला दिली. तक्रारकर्त्‍याने लॅपटॉप आणि प्रिंटीर ची निवीदा विरुध्‍द पक्षाकडुन प्राप्‍त झाल्‍यावर एल.आय.सी. यांचेकडे कर्ज मिळण्‍याकरीता अर्ज केला आणि कर्ज मंजूर झाल्‍यानंतर एल.आय.सी. यांनी विरुध्‍द पक्षाला रुपये ५७,४००/- चा धनादेश पाठविला. विरुध्‍द पक्षाने धनादेश मिळाल्‍याबाबतची पावती अदा केली. विरुध्‍द पक्षाने दिनांक ४/११/२०१६ ला Lenovo Think Pad Laptop आणि Brother Laser All in One Printer डिलीवरी चालानसह तक्रारकर्त्‍याचे पत्‍यावर पाठविला. विरुध्‍द पक्षाला धनादेश व्‍दारे पाठविण्‍यात आलेली रक्‍कम मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाची Bill/Invoice देण्‍याची जबाबदारी होती. परंतू तक्रारकर्त्‍याने वारंवार विनंती करुनही विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला Bill/Invoice देण्‍यात अपयशी ठरला. सदर Bill/Invoice तक्रारकर्त्‍याला एल.आय.सी. यांना सादर करावयाचे होते व याबाबची कल्‍पना विरुध्‍द पक्षाला होती. तरी सुद्धा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला Bill/Invoice दिले नाही. एल.आय.सी. यांनी तक्रारकर्त्‍याला Bill/Invoice ची मागणी केली. तक्रारकर्त्‍याने १५-२० वेळा विरुध्‍द पक्षाला Bill/Invoice ची मागणी केली. परंतू प्रत्‍येकवेळी त्‍याने देण्‍याचे नाकारले. तक्रारकर्त्‍याला एल.आय.सी. यांनी नोटीस पाठविली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष यांना दिनांक १०/०८/२०१७ ला कायदेशीर नोटीस पाठविली आणि त्‍याव्‍दारे वस्‍तु विकत घेतल्‍याचे Bill/Invoice ची मागणी केली. परंतू विरुध्‍दपक्षाकडुन काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला आहे असे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला वस्‍तु विकत घेतल्‍याचे Bill/Invoice निर्गमीत करावे.
  3. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ५०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार विरुध्‍दपक्ष हा मे. सुप्रा कॅम्‍प्‍युटर चा मालक असुन कॅम्‍प्‍युटर आणि त्‍याचे सुटे भाग (Peripherals) विकण्‍याचा त्‍याचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला बरेचदा भेट देऊन वस्‍तु विकत घेतल्‍याचे Bill/Invoice देण्‍याची मागणी केल्‍याचे नाकारले आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक १०/०८/२०१७ अन्‍वये पाठविलेल्‍या  नोटीस मधील मजकुर विरुध्‍द पक्षाने पुर्णतः अमान्‍य केला आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  Lenovo Think Pad Laptop आणि Brother Laser All in One Printer दिनांक ४/११/२०१६ ला डिलीवरी चालानसह दिला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाने Tax Invoice No. 1611005, दिनांक ४/११/२०१६ अन्‍वये मुळ Bill/Invoice तक्रारकर्त्‍याला दिले. व्‍यापाराचे प्रचलित परंपरानूसार विरुध्‍द पक्षाने व्दितीय प्रतीवर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी घेऊन मुळ Bill/Invoice तक्रारकर्त्‍याला दिल्‍याची पोचपावती घेतली. विरुध्‍द पक्ष Bill/Invoice ची व्दितीय प्रतीची सत्‍य प्रत यासोबत अभिलेखावर दाखल करीत आहे. परंतू सदर मुळ Bill/Invoice मिळाल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याने लपवून ठेवून मंचासमोर सदर तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीत तक्रारकर्त्‍याने वारंवार मुळ Bill/Invoice ची विरुध्‍द पक्षाला मागणी केल्‍याचे नमुद केले आहे व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वारंवार मागणी करुनही ती दिली नाही असे नमुद केले आहे. सदरची तक्रार तक्रारकर्त्‍याने Bill/Invoice पावती हरवून व्दितीय प्रतीची मागणी केली याबाबत नाही आहे. परंतू लॅपटॉप आणि प्रिंटर पोहचविल्‍यानंतर Bill/Invoice दिले नाही याबाबत आहे. मा. मंचाने विरुध्‍द पक्षाला डुप्‍लीकेट Bill/Invoice प्रत देण्‍याचे आदेशीत केल्‍यास विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला डुप्‍लीकेट Bill/Invoice देण्‍यास तयार आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2. उभयपक्षाने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

  अ.क्र.                           मुद्दे                                                         उत्‍तर

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?              होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

                    दिली काय ?                                                                       नाही

III.   काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

कारणमिमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन Lenovo Think Pad Laptop आणि Brother Laser All in One Printer विकत घेण्‍याकरीता निवीदा मागितली व सदरची निविदा कर्ज उपलब्‍ध करुन घेण्‍याकरीता एल.आय.सी. यांना अर्जासोबत सादर केली. एल.आय.सी. यांनी तक्रारकर्त्‍याला कर्ज मंजूर केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाला ५७,४००/- चा धनादेश पाठविला व विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबतची पावती अदा केली. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.  दिनांक ४/११/२०१६ ला सदर धनादेशाव्‍दारे रुपये ५७,४००/- प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने Lenovo Think Pad Laptop आणि Brother Laser All in One Printer डिलीवरी चालान सह तक्रारकर्त्‍याच्‍या  पत्‍यावर पाठविला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला टॅक्‍स ईनवॉइस नंबर १६११००५ दिनांक ४/११/२०१६ अदा करुन मुळ पावती तक्रारकर्त्‍याला दिल्‍याबाबत व्दितीय प्रतीवर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी घेतली. सदर टॅक्‍स ईनव्‍हाइस वर घेतलेली तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी तक्रारकर्त्‍याने मंचाचे अभिलेखावर त्‍याचे तक्रार अर्जामध्‍ये केलेल्‍या स्‍वाक्षरीशी मिळतीजुळती आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास ईनव्‍हाईस बिल पुरविण्‍याबाबतची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे. तक्रारकर्त्‍याने मंचाचे अभिलेखावर दाखल केलेल्‍या प्रतीउत्‍तरामध्‍ये नविन लॅपटॉप मिळण्‍याची मागणी केली आहे. परंतू सदरची मागणी तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये केलेल्‍या मागणीशी सुसंगत नाही आहे.विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला Lenovo Think Pad Laptop आणि Brother Laser All in One Printer देतांना त्‍याचदिवशी मुळ बिल/ईनव्‍हाइस पुरविले आहे असे निर्दशनास येते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही ञुटीपूर्ण सेवा दिलेली नाही आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.