Maharashtra

Gadchiroli

CC/15/2014

Shri. Enayat Ali Ajagar Ali - Complainant(s)

Versus

Superintendent Engineer, MSEDCL,Gadchiroli Tah. Distt. Gadchiroli & 1 Other - Opp.Party(s)

Miss. Najiya N. Saqyyad

26 May 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/15/2014
 
1. Shri. Enayat Ali Ajagar Ali
Age- 31 Yr., Occu.- Business, At. In Front Of Forest Check Post, Ashti, Th. Chamorshi, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Superintendent Engineer, MSEDCL,Gadchiroli Tah. Distt. Gadchiroli & 1 Other
M.S.E.D.C.L. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
2. K . Sarwe, Assistant Engineear, M.S.E.D.C.L. Chamorshi
At.Po.Th. Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 26 मे 2015)

                                      

                  तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 व 14 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदाराचे आष्‍टी येथे स्‍पेअर पार्टचे दुकान असून त्‍याव्‍यतीरीक्‍त अर्जदारास इतर कोणतेही कमाईचे साधन नाही व त्‍या दुकानापासून मिळणा-या उत्‍पन्‍नातून त्‍याची व कुटूंबाची उपजिवीका चालते.  अर्जदाराने दुकानाकरीता गैरअर्जदाराकडे रितसर अर्ज करुन वीज पुरवठा घेतला असून त्‍याचा ग्राहक क्र.480400004694 मिटर क्र.0715657138 असा आहे.  अर्जदाराचा वीज पुरवठा सी.एल.1643 प्रकारचा होता.  त्‍यानुसार फरवरी 2012 पर्यंत पाठविलेल्‍या वीज बिलाचा अर्जदाराने रितसर भरणा केला. अर्जदाराने महाराष्‍ट्र रेंट कंट्रोल अॅक्‍ट 1999 च्‍या कलम 29 अन्‍वये गैरअर्जदाराच्‍या कार्यालय आष्‍टी येथे कळवीले होते. अर्जदाराचे घरमालक हे कोणत्‍याही स्‍तरावर जाऊन अर्जदाराची खोली खाली करुन घेण्‍यास जोर लावत होते व त्‍यांनी गैरअर्जदाराचे कार्यालयातील अधिका-यांची दिशाभूल करुन दि.11.2.2012 रोजी घरमालक व गैरअर्जदार क्र.2 यांनी कोणतीही पूर्व सुचना न देता अर्जदाराचे मीटर जबरीने काढून घेऊन गेले.  अर्जदाराचा कोणताही दोष नसतांना व थकीत बाकी नसतांना गैरअर्जदार क्र.2 व इतर अधिकारी अर्जदाराचा मीटर जबरीने घेऊन, अर्जदाराच्‍या अधिकारावर हल्‍ला केला. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून तो ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतुदीत येतो. गैरअर्जदारांनी अर्जदारास अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.  अर्जदाराने गैरअर्जदारास दि.3.5.2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस गैरअर्जदारांना प्राप्‍त होऊनही त्‍याचे उत्‍तर अर्जदारास दिले नाही.  गैरअर्जदाराचे कृतीमुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे, गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराचे वीज मीटर पूर्ववत आणून लावून देण्‍याबाबत गैरअर्जदाराविरुध्‍द आदेश पारीत करण्‍यात यावा,  तक्रारीचा खर्च व नोटीस खर्च रुपये 1500/- गैरअर्जदारावर लादण्‍यात यावा, अशी प्रार्थना केली आहे.    

 

2.          अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 12 दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.8 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.9 नुसार 6 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. 

 

3.          गैरअर्जदाराने नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरातील विशेष कथनात नमूद केले की,  अर्जदाराने व्‍यावसायीक प्रयोजनाकरीता विद्युत पुरवठा मिळण्‍याकरीता दस्‍त क्र.अ-8 (V) नुसार दाखल केला. सदर दस्‍तासोबत संलग्‍न असलेल्‍या दस्‍तातील दस्‍त क्र.अ-8(IV), अ-8(III) हे ग्रामपंचायात आष्‍टी यांनी विद्युत पुरवठयासाठी नाहरकत प्रमाणपञ व अर्जदाराचे नांवे असलेल्‍या घराची गृहकर पावती आहे.  सदर दोन्‍ही दस्‍तावरुन अर्जदार हा घर क्र.136 चा मालक असल्‍याचे दर्शवीले होते.  अर्जदाराने विद्युत पुरवठा मिळण्‍याकरीता जोडलेल्‍या उपरोक्‍त दस्‍तावरुन अर्जदार हा विद्युत पुरवठा मागत असलेल्‍या घराचा मालक आहे असे समजून कायदेशीर बा‍बींची पुर्तता करुन अर्जदारास विद्युत पुरवठा देण्‍यात आला होता.  दि.21.11.2011 रोजी श्री कैलास ढेंगळे यांनी अर्जदारास ज्‍या जागेवर विद्युत पुरवठा देण्‍यात आला ती जागा अर्जदाराच्‍या मालकीची नसून ती जागा कैलास ढेंगळे याचे नावाची आहे अशी तक्रार दस्‍ताऐवजासह केली.  सदर तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली असता, अर्जदारास ज्‍या जागेवर विद्युत पुरवठयाची सोय उपलब्‍ध करुन दिलेली आहे त्‍या जागेचा मालक नाही.  अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विद्युत पुरवठयाकरीता अर्ज करीत असतांना सदर बाब लपवून ठेवली.  ज्‍या जागेवर विद्युत पुरवठा पुरविण्‍यात आलेला आहे त्‍या जागेवर अर्जदार हा कैलास ढेंगळे यांचा किरायेदार म्‍हणून राहात आहे.  अर्जदाराने केलेल्‍या अर्जात घर क्र.136 चा मालक असल्‍याचे कथीत करुन गैरअर्जदार यांना खोटे दस्‍ताऐवज पुरवीले.  सदर कृत्‍य हे गैरअर्जदार यांच्‍या विद्युत पुरवठा करण्‍याच्‍या नियमाविरोधी असल्‍याने गैरअर्जदाराने अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला.  अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची कृपा करावी.  

 

4.          अर्जदाराने नि.क्र.12 नुसार रिजॉईन्‍डर शपथपञ दाखल केले.  तसेच गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार पुरसीस दाखल केली. अर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, शपथपञ व गैरअर्जदाराचे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवजावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय.

2)    गैरअर्जदारांनी लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण            :  होय.

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अंतीम आदेश काय ?                              : अंतिम आदेशाप्रमाणे

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.          अर्जदाराने दुकानाकरीता गैरअर्जदाराकडे रितसर अर्ज करुन वीज पुरवठा घेतला असून त्‍याचा ग्राहक क्र.480400004694 मिटर क्र.0715657138 असा आहे.  अर्जदाराचा वीज पुरवठा सी.एल.1643 प्रकारचा होता, ही बाब अर्जदार व गैरअर्जदार दोन्‍ही पक्षाना मान्‍य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्‍द होते.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-  

 

6.          अर्जदाराने दाखल नि.क्र.3 वर दस्‍त क्र.अ-5 ते अ-9 ची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे माहिती अधिकार नियमाअंतर्गत अर्ज केले होते व त्‍या अर्जाचे उत्‍तरात गैरअर्जदाराने अर्जदाराचे वीज पुरवठा खंडीत करण्‍याबाबतचे कारण व अर्जदाराने वीज पुरवठा घेतावेळी गैरअर्जदाराकडे दाखल शपथपञ व सोबत इतर दस्‍ताऐवज देण्‍यात आले.  सदर दस्‍ताऐवजाची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराचे कर वसुली पावतीमध्‍ये अर्जदाराचा घर क्र.136 आहे, तसेच गैरअर्जदाराने नि.क्र.9 च्‍या खाली दस्‍ताऐवज ब-1 ते ब-6 ची पडताळणी करतांना असे दिसले की, कैलाश भोलेनाथ ढेंगळे या व्‍यक्‍तीने दि.28.11.2011 ला गैरअर्जदाराकडे अर्जदाराचे वीज पुरवठाकरीता अर्ज केले होते, तसेच नि.क्र.ब-4 ची पडताळणी करतांना असे दिसले की, श्री कैलाश भोलेनाथ ढेंगळे यांचे घर क्र.136/1 असा आहे.  गैरअर्जदाराने श्री कैलाश भोलेनाथ ढेंगळे यांनी केलेली तक्रारावर अर्जदाराचे घर क्रमांकाची पडताळणी न करता व अर्जदाराला कोणतीही पूर्व सुचना न देता अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत केलेला आहे. गैरअर्जदाराचे सदर प्रकरणात त्‍याचे बचाव पक्षात असे म्‍हणणे की, अर्जदाराने वीज पुरवठा घेतावेळी चुकीचे दस्‍ताऐवज तयार करुन गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे, ही बाब ग्राह्य धरण्‍यासारखी नाही. श्री कैलाश भोलेनाथ ढेंगळे यांनी दि.28.11.2011 ला गैरअर्जदाराकडे अर्जदाराविरुध्‍द केलेली तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदार व श्री कैलाश भोलेनाथ ढेंगळे याच्‍यांमध्‍ये न्‍यायालयात खटला चालु आहे. परंतु, सदर अर्ज/तक्रारी मध्‍ये त्‍या खटल्‍याचा कोणतेही विवरण दिलेला नाही.  गैरअर्जदार सदर तक्रार/अर्जाचा आधार घेऊन अर्जदाराचे वीज पुरवठा कोणताही ठोस पुरावा नसतांना खंडीत करु शकत नाही, असे मत मंचाचे ठरले आहे.  तसेच अर्जदाराने नि.क्र.3 वर दस्‍त क्र.अ-10 नुसार गैरअर्जदाराला त्‍या संदर्भात नोटीस पाठवून सुध्‍दा त्‍यावर कोणतेही उत्‍तर किंवा खुलासा केला नाही, ही बाब गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दर्शवीत असून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे असे सिध्‍द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

                       

 मुद्दा क्रमांक 3 बाबत :- 

 

7.          मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.       

                 

अंतिम आदेश  -

 

(1)   तक्रारदाराची तक्रार  अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

(2)   गैरअर्जदाराने अर्जदाराचा वीज पुरवठा पुर्ववत आणून लावून देण्‍याचा आदेश करण्‍यात येत आहे.

  

(3)   अर्जदाराला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासापोटी गैरअर्जदाराने रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2500/- देण्‍यात यावे. सदर रक्‍कम अर्जदाराचे पुढील नियमीत देयकांमध्‍ये समायोजीत करण्‍यात यावे. 

 

(4)   अर्जदाराने गैरअर्जदाराने दिलेल्‍या वीज देयकाचा भरणा नियमितपणे करावे.

 

(5)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 26/5/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.