--- आदेश ---
(पारित दि. 13-03-2009 )
द्वारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा
1 तक्रारकर्ता श्री. लक्ष्मण शामकुंवर यांनी विद्यमान मंचात ग्राहक तक्रार दाखल करुन वि.प.यांनी जारी केलेली रुपये 8980/-ची चुकिची विद्युत देयके रद्द करण्यात यावी व त्यांनी वि.प.यांचेकडे जुलै 2006 ते डिसेंबर 2006 पर्यंत भरलेली रक्कम ही योग्य देयकात समायोजित करण्यात यावी. रुपये 33264/- ही रक्कम 12% व्याजासह परत करण्यात यावी, जानेवारी 2007 नंतर जारी करण्यात आलेली विद्युत देयके रद्द करण्यात यावी, नविन मीटर देण्यात यावे व विरुध्द पक्षाकडून शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
2 वि.प.यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्रं. 9 मध्ये म्हटले आहे की, तक्रारकर्ता यांचे विरुध्द वीज चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर तक्रार ही मुदतबाहय आहे. तक्रारकर्ता हे स्वच्छ हाताने विद्यमान मंचापुढे न आल्यामुळे त्यांची तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
3 तक्रारकर्ता व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी दि. 29.12.08 रोजी ग्राहक तक्रार दाखल केली आहे व दि. 28.12.06 च्या पूर्वीच्या विद्युत देयकांच्या खरेपणाबद्दल शंका व्यक्त केली आहे. 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यामुळे या मुदतबाहय विद्युत देयकांचा विचार मंचास करता येणार नाही.
4 तक्रारकर्ता यांनी ‘ग्राहक स्वेच्छा विद्युत योजना 2006’ योजनेचा लाभ घेण्यासाठी रुपये 8980/- वीज चोरीसाठी वि.प.तर्फे जारी करण्यात आलेले, देयक रुपये 25264/- व कंपाऊडींग चार्जेस चे रुपये 8000/- वि.प.यांचेकडे भरलेले आहेत ते अंडर प्रोटेस्ट भरलेले दिसून येत नाही. शिवाय तक्रारकर्ता यांनी ‘ग्राहक स्वेच्छा विद्युत योजने अंतर्गत ’ वि.प.यांचेकडे दि. 29.12.06 रोजी केलेल्या अर्जात मीटरचे काच फुटलेले आहे व अनाधिकृतरित्या विद्युत भार वाढविला आहे हे कबूल केले आहे. त्यामुळे सदर रक्कम तक्रारकर्ता यांना परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
5 वि.प.यांनी दि. 16.11.06 ला तक्रारकर्ता यांचे मीटर काढून नेल्यानंतर सुध्दा त्यांना विद्युत देयके जारी केली आहेत. ही देयके रद्द होण्यास पात्र आहेत.
6 तक्रारकर्ता यांनी वि.प.यांचेकडे विद्युत परत सुरु करण्यासाठी अर्ज केल्याचे दिसून येत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना जारी केलेली दि. 16.11.06 नंतरची विद्युत देयके ही रद्द करण्यात येत आहेत.
2 तक्रारकर्ता यांचा विद्युत पुर्नः जोडणीचा अर्ज आल्यानंतर व त्यांनी मीटर नसल्याच्या कालावधीकरिता न्युनतम शुल्क भरल्यानंतर वि.प.यांनी तक्रारकर्ता यांचा विद्युत प्रवाह त्वरित सुरु करुन द्यावा.
3 वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत पुर्नःजोडणी देतांना कोणताही दंड अथवा व्याज लावू नये.