जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 933/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-07/07/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/09/2013.
श्रीमती अलकाबाई राजु तायडे,
उ.व.सज्ञान, धंदाः मजुरी,
रा.मु.पो.हतनुर-टहाकळी,
ता.भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. अधिक्षक (सुप्रिटेंडन)
डाक घर, भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव व
इतर एक ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेशः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांचा विमा मिळणेकामी तक्रारदाराने प्रस्तुतचा अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. सदरकामी विरुध्द पक्ष यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले व तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तथापी विरुध्द पक्ष यांनी या प्रकरणी दि.23/01/2013 रोजी हजर होऊन तक्रारदार यांना एकुण रक्कम रु.4,88,053/- ही चेक व्दारे अदा केलेली असल्याचे नमुद केलेले आहे.
तक्रारदार हे मागील नेमलेल्या अनेक तारखांना सतत गैरहजर असल्याने या मंचातर्फे तक्रारदारास जा.क्र.642/13, दि.18/05/2013 अन्वये चौकशीची तारीख व वेळ कळवुन हजर राहण्याबाबत कळविले होते तथापी तक्रारदार हे या मंचाचे सुचना पत्र प्राप्त होऊनही अनुक्रमे दि.25/06/2013, दि.02/09/2013 व आज दि.23/09/2013 रोजी गैरहजर आहेत. यावरुन तक्रारदार यांना त्यांचा तक्रार अर्ज पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात आला.
ज ळ गा व
दिनांकः- 23/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.