निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 21/10/2013
कालावधी 01 वर्ष. 24 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
शांतीलाल पिता केशराभाई पटेल. अर्जदार
वय 34 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.प्रमोद शरदराव उमरीकर.
रा.जिंतूर रोड,तलरेजा टॉकीजच्या बाजुला परभणी.
ता.जि.परभणी.
विरुध्द
1 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादित. गैरअर्जदार.
परभणी,व्दारा अधीक्षक अभियंता, अॅड.एस.एस.देशपांडे.
मंडळ कार्यालय, परभणी.
2 महाराष्ट्र राज्य विद्युत कं.मर्यादित परभणी,
व्दारा उपकार्यकारी अभियंता,
शहर उपविभाग, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून ग्राहक क्रमांक 530010297833 चा उपभोक्ता असून सदरील मिटर हे वालूबहेन हंसराज पटेल यांच्या नावावर आहे व त्याचा वापर अर्जदार करतो, म्हणून गैरअर्जदाराचा तो ग्राहक आहे. सदरचा विद्युत वापर अर्जदार आपल्या घरगुती वापरासाठी करतो व गैरअर्जदाराने दिेलेले बिले वेळच्या वेळी भरणा करतो, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने एप्रिल 2012 पर्यंत 15860 युनीटचे विज भरणा गैरअर्जदाराकडे केले आहे. त्यावेळेस अर्जदाराचा विज वापर हा 142 युनिट दाखवला आहे. व त्यानंतर जुलै 2012 मध्ये 15860 रिडींगचे बिल देण्यात आले. व चालु रिडींग आर.एन.ए. दाखवली व मागील रिडींग 15860 व चालू रिडींग 36014 असे दाखवुन गैरअर्जदाराने अर्जदारास 2,03,760/- रु.चे लाईट बील दिले त्यावेळेस अर्जदाराचा वापर हा 20154 विज युनीट दाखवण्यात आला व गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची सेवा दिली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मागील दोन वर्षांचा विद्युत वापर पाहता 100 ते 150 युनीटचा वापर असून त्या पेक्षा कोठल्याही प्रकारचा जास्त वापर अर्जदार करत नाही. सदरचे बिल आल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराच्या कार्यालयात जावुन अर्ज दिला व त्यामध्ये अर्जदाराने असे म्हंटले आहे की, चालू रिडींग 15860 असतांना 15999 नंतर येणारे 16000 चे रिडींग मिटर मध्ये होत असतांना मिटर मधील 5000 चा आकड्याच्या बरोबर 1 चा आकडा सुध्दा फिरला आहे, त्यामुळे ती रिडींग 16014 ऐवजी 36014 झालेली आहे.व या बद्दल सदरील मिटरचे टेस्टींग करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर गैरअर्जदाराने सदरचे मिटर टेस्ट केले. शेवटी अर्जदाराने गैरअर्जदारास मिटर मधील खराबीमुळे अर्जदारास 16014 च्या ऐवजी 36014 चे चुकीचे बिल देण्यात आले ते दुरुस्त करुन द्यावे, म्हणून विनंती करण्यात आली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, जुलै 2007 मध्ये सदरील मिटरचे आर. वरुन सी. प्रमाणे अर्जदारास देयके दिली गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे बिल दुरुस्त करुन दिली नाही, म्हणून शेवटी अर्जदारास मंचात येणे भाग पडले व सदरची तक्रार दाखल करण्यास भाग पडले. व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैअरर्जदाराने दिलेले 2,07,840/- रुपयाचे बिल रद्द करण्याचा आदेश देवुन बिल दुरुस्त करुन द्यावे, गैरअर्जदाराने अर्जदाराचा खंडीत केलेला पुरवठा पुर्ववत चालू करण्याचा आदेश द्यावा व मानसिकत्रासापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास 10,000/- रुपये देण्याचा आदेश व्हावा व खर्चापोटी 5,000/- रुपये अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अशी विनंती केली आहे.
नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 6 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये जुलै 2012 चे बिल, जुन 2012 चे बिल, मिटर टेस्टींग रिपोर्ट, गैरअर्जदाराच्या इंजिनियरने लिहिलेले पत्र, मार्च 2012 चे बिल, अर्जदाराने गैरअर्जदारास मिटर बदलुन देणे बाबतचा अर्ज, मार्च 2011 चे बिल, जुन 2009 चे बिल, जूल 2012 चे बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच नि.क्रमांक 13 वर अर्जदाराने सदरच्या मिटरचे सी.पी.एल. दाखल केलेले आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदारास गैरअर्जदारा विरुध्द ग्राहक या नात्याने तक्रार
करण्याचा अधिकार आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदार विद्युत कंपनीचा ग्राहक होत नाही. कारण अर्जदाराने दाखल केलेल्या विद्युत बिलावरुन व सी.पी.एल. वरुन हे सिध्द होते की, ग्राहक क्रमांक 530010297833 हे वालूबहेन हंसराज पटेल यांच्या नावावर गैरअर्जदार विद्युत कंपनीने विद्युत कनेक्शन दिलेले आहे. व तसेच वालूबहेन हंसराज पटेल यांनी सदरची तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदारास कोणतेही अधिकारपत्र दिलेले नाही, वा अर्जदाराने तसे असल्यास मंचासमोर अधिकारपत्र दाखल केलेले नाही. म्हणून अर्जदार हा सी.पी. अॅक्ट 1986 नुसार कलम 2 (1) (डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही. त्यामुळे अर्जदारास विवादित बिले दुरुस्त करुन द्या, म्हणण्याचा गैरअर्जदारां विरुध्द ग्राहक या नात्याने वालुबहेन हंसराज पटेल यांचे अधिकारपत्र नसल्यामुळे अधिकार पोंहचत नाही व तसेच अर्जदार व वालुबहेन हंसराज पटेल यांचे नाते काय ? याबाबत अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात खुलासा केलेला नाही. सदरची तक्रार अर्जदारास दाखल करण्याचा कायद्यान्वये काही एक अधिकार नाही. असे मंचास वाटते. या बाबत मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी 2013(2) C.P.R. 91 (NC) राम निवास सोनी विरुध्द द प्रिन्सीपल व्हाइश मॉडेल सिनीयर से. स्कुल आणि ईतर revision Petition No. 3801 / 2011 मध्ये असे म्हंटले आहे की, Complaint filed by complainant on behalf of his major son without any authorization is not maintainable. व सदरचा निकाल हा या तक्रारीस लागु पडतो.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.