जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २६/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ०८/०४/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
१) वैशाली मोहन बोरसे
उ.व. – ४०, धंदा – घरकाम,
रा.वसमार, ता.साक्री जि.धुळे
२) हरीष मोहन बोरसे
उ.व. – २१ वर्षे, धंदा – शिक्षण,
रा.वसमार, ता.साक्री जि.धुळे
३) हर्षल मोन बोरसे
उ.व. – २१, धंदा – शिक्षण,
रा.वसमार, ता.साक्री जि.धुळे
४) सागर मोहन बोरसे
उ.व. – १९, धंदा – शिक्षण,
रा.वसमार, ता.साक्री जि.धुळे ................ तक्रारदार
विरुध्द
१) अधिक्षक धुळे डाक घर विभाग धुळे .
धुळे पोस्ट ऑफिस धुळे
२) शाखा अधिकारी
वसमार पोस्ट ऑफिस शाखा ता.जि.धुळे
३) पी.एम.जी. औरंगाबाद
द्वारा – मुख्य पोस्टमास्तर जनरल,
महाराष्ट्र सर्कल, ४ था माळा, मुंबई – ४०० ००१. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एन.के. भदाने)
(जाबदेणार तर्फे – प्रतिनिधी श्री.ए. के. शेख)
निकालपत्र
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. तक्रारदार यांच्या पतीने काढलेल्या आर्युविमा पॉलीसीचा मृत्युदावा सामनेवाला यांनी नाकाराला म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांच्या पतीने सामनेवाला यांच्याकडे दि.२९/०३/२००५ रोजी दरमहा रूपये ८६०/- चा हप्त भरून रूपये १,००,०००/- ची ग्रामीण डाक आर्युवीमा पॉलीसी काढली होती. सदर पॉलीसीचे मासीक हप्ते दि.३१/०३/२००८ पर्यंत तक्रारदार यांच्या पतीने नियमीत भरले होत. तक्रारदार यांच्या पतीचे दि.१२/१०/२००८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतर सामनेवाला यांच्याकडे सदरील आर्युविमा पॉलीसीवर मृत्यु दावा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा मृत्यु दावा फेटाळून लावला. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून वि୳मा पॉलीसी रक्कम रूपये १,००,०००/- अधिक बोनस रूपये ५०,०००/- व त्यावर पूर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.९% प्रमाणे व्याज. तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रूपये ५०,०००/- आणि अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
३. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.१ वर ग्रामीण डाक आयुर्वीमा पॉलीसीची प्रत, नि.२ वर डाक विभागाचा क्लेम अर्ज, नि.३ वर तक्रारदार यांना धुळे डाक विभाग धुळे यांनी पाठविलेले पत्र, नि.४ वर तक्रारदार यांचे पती मयत झाल्याचा मृत्यु दाखला, नि.५ वर शिधा पत्रिकेची प्रत दाखल केलेली आहे.
४. सामनेवाला हे मंचात हजर होऊन त्यांनी दि.१८/०६/२०१३ रोजी मंचात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांनी दि.१३/०५/२०१३ रोजी विमा पॉलीसी मंजूर करून रक्कम रू.१,१५,२८८/- ही तक्रारदार यांना धनादेश क्रमांक ९३४१२७ ने अदा करण्यात आलेली आहे असे नमूद केले आहे. सदर रकमेची मंजुरप्रत त्यांनी मंचात दाखल केलेली आहे. सदर कागदपत्राचा विचार करता तक्रारदार यांना क्लेमची रक्कम मिळाल्याचे स्पष्ट होते.
५. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दि.१८/०७/२०१३ रोजीच्या विनंती अर्जात असे म्हटले आहे की, तक्रारदारची तक्रारच्या विनंती कलम ‘अ’ हा सामनेवाला यांनी मंजुर केला आहे ती मागणी सोडून तक्रारदारची विनंती कलम ८(ब),(क),(ड),(ई) याचा विचार करून योग्य तो आदेश सामनेवाला विरूध्द करावा.
६. वरील उभयपक्षांच्या अर्जावरून व दाखल कागदपत्रांवरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे रक्कम अदा केलेली आहे. या कागदपत्राप्रमाणे तक्रारदार यांना रक्कम मिळाल्याने अर्जातील मुख्य मागणीप्रमाणे सामनेवाले यांनी सदर अर्जामध्ये हजर होतांना ताबडतोब पूर्तता केलेली आहे. याप्रमाणे सामनेवाला यांनी पूर्तता करणेकामी तत्परता दाखवली आहे. याचा विचारकरता मूळ मागणी ही पूर्ण झाल्याने इतर मागण्यांचा विचार करणे रास्त होणार नाही असे मंचास वाटते. तसेच तक्रारदार हे तारीख ०१/१०/२०१३ पासून सतत गैरहजर आहे.
वरील सर्व विवेचन पाहता, सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात यावा, असे मंचाचे मत बनले आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आ दे श
(अ) तक्रारदारांचीतक्रारनिकालीकाढण्यात येतआहे.
(ब) तक्रारअर्जाचेखर्चाबाबतकोणताहीआदेशनाही.
धुळे.
दि.१७/०२/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.