जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/166 प्रकरण दाखल तारीख - 11/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. कपील पि. बालाजी तोष्णीवाल वय 29 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.हदगांव ता. हदगांव जि. नांदेड विरुध्द. 1. अधिक्षक अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. गैरअर्जदार कार्यालय विद्यूत भवन, नांदेड. 2. कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. हदगांव ता. हदगांव, जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.आर. जीरोणकर गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदाराचे हदगांव येथे शेत सर्व्हे नंबर 82 मध्ये शेत आहे. यात गैरअर्जदार यांचे अर्जदाराचे मयत आजोबा बन्सीलाल बरीदचंद तोष्णीवाल यांचे नांवाने विज कनेक्शन आहे. त्यांचा नंबर एजी-54 असा आहे. विजेचे बिल अर्जदार स्वतः भरतात. अर्जदाराच्या शेतात विज कनेक्शन देण्यासाठी खांब रोवलेले आहेत. यावरील तारा लूज आहेत, एक विजेची तार तूटली म्हणून दि.17.07.2007 रोजी सकाळी 11 वाजता गैरअर्जदार यांचे फयूज कॉल रजिस्ट्रर मध्ये तक्रार नोंदविली आहे. सदरील तूटलेल्या तारेमधून विज प्रवाह वाहत आहे व गैरअर्जदाराने तक्रारीची वेळीच दखल न घेतल्यामूळे त्यांच दिवशी सध्याकाळी अर्जदाराची देवणी जातीची गाय विज तारेला स्पर्श होऊन तिचा शॉक लागून मृत्यू झाला. यांची तक्रार पोलिस स्टेशन हदगांव येथे दि.18.07.2007 रोजी केली. जिचा अपघात नोंद क्र.09/07 असा आहे. पोलिस स्टेशन हदगांव यांनी त्यांच दिवशी घटनास्थळ पंचनामा केला व दि.19.07.2007 रोजी गायीचे पोस्ट मार्टेम हदगांव येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केले व पोस्ट मार्टेम रिपोर्टप्रमाणे गायीचा मृत्यू हा विदयूत शॉक लागून झालेला आहे असे म्हटले आहे. दि.09.04.2005 रोजी गाय रु.20,000/- किंमतीस विकत घेतली होती त्यांचा दाखला सोबत जोडला आहे. गाय मृत्यू पावल्यामूळे अर्जदाराचे दूधाचे, शेण खताचे असे वार्षीक रु.10,000/- उत्पन्न मिळणार होते त्यात त्यांचे नूकसान झाले आहे. याबददलची नूकसान भरपाई रु.20,000/- मागण्यासाठी दि.08.07.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली, त्यांचे उत्तर गैरअर्जदार यांनी दि.20.08.2009 रोजी लेखी देऊन मागणी नाकारली आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, रु.20,000/- 18 टक्के व्याजासह मिळावेत, तसेच गायीच्या मृत्यूमूळे झालेल्या मानसिक व आर्थीक हाणीमूळे झालेले नूकसान भरपाई रु.2,30,000/- व्याजासह मिळावी, तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली, त्यांना नोटीस तामील झाली पण ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदारांनीहजर राहून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असताना त्यांनी ती घेतली नाही परंतु अर्जदार यांनी पाठविलेल्या दि.08.07.2009 रोजीच्या नोटीसला त्यांनी दि.20.08.2009 रोजी उत्तर दिलेले आहे. यात त्यांनी पहिला आक्षेप अर्जदार त्यांचे ग्राहक नाहीत व अर्जदार म्हणतात त्याप्रमाणे ते शेत त्यांचे आजोबाचे आहे. परंतु अर्जदार हे त्यांचा नातू या नात्याने त्या शेताचा उपभोग घेत आहेत त्यामूळे ते उपभोक्ता व लाभार्थी ग्राहक आहेत त्यामूळे गैरअर्जदाराचा पहिला आक्षेप मान्य करता येत नाही. तसेच गाय ही रु.20,000/- ची असल्याबददलचा दाखला दाखल केला आहे,त्यात किंमत रु.20,000/- दाखवलेली आहे. दि.18.07.2007 रोजीला गैरअर्जदार यांचे नांवाने रु.20,000/- ची गाय मृत्यू पावली असा अर्ज दिला. गायीचा घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट या प्रकरणात दाखल असून यात गायीचा मृत्यू हा इलेक्ट्रीकल शॉकने झालेला आहे असे सिध्द झालेले आहे. खरे तार तूटली नाही हे गैरअर्जदाराने सिध्द करावयास पाहिजे होते पण गैरअर्जदार हे हजरच झाले नाहीत. गैरअर्जदार जेव्हा हजर नाहीत व काही म्हणत नाहीत त्यामूळे यांचा उलट अर्थ असे घेण्यास हरकत नाही की, त्या दिवशी विज तार तूटलेली होती व गाय तीथे गेल्यामूळे विजेचा ताराचा शॉक लागला व त्यात ती मृत्यू पावली. अर्जदाराने हे ही म्हटले आहे की, फयूज कॉल सेंटरमध्ये यांची नोंद आहे. गैरअर्जदाराने उत्तर दिलेल्या नोटीसमध्ये यांचा नकार दिला असला तरी प्रकरणात हजर होऊन रेकार्ड रजिस्ट्रर दाखल करुन काय खरे खोटे ते सांगणे आवश्यक होते, ते ही ते करत नाहीत, यांचा अर्थ अर्जदाराची तक्रार त्यांना मान्य आहे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. अर्जदाराची गाय ही दाखल्याप्रमाणे दि.09.04.2005 रोजीची आहे व प्रकरण 2010 चे आहे म्हणजे पाच वर्षाने गायीचे वय वाढलेले आहे. त्यावेळेस जर रु.20,000/- किंमतीची गाय असेल तर गायीचे वय वाढल्यामूळे तिचे अर्धी रक्कम धरण्यास हरकत नाही. त्यामूळे रु.10,000/- मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. अर्जदाराने ज्या रक्कमेची मागणी केली आहे ती गाय जर जीवंत असती तर त्या मिळणा-या रक्कमेची आहे, होणा-या नूकसानी संबंधीची रक्कम अर्जदारास मागता येणार नाही. फक्त गायीची किंमत मागता येईल. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांचा निष्काळजीपणा दिसून येतो म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना गायीच्या किंमती बददल रु.10,000/- व त्यावर दि.11.06.2010 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.1,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- दयावेत. 4. पक्षकांराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |