जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/81 प्रकरण दाखल तारीख - 15/04/2009 प्रकरण निकाल तारीख – 15/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या. शिवाजी नरसिंग जगताप, वय वर्षे 48, व्यवसाय खाजगी नौकरी, अर्जदार. रा.लालकुंटा धर्माबाद ता.धर्माबाद जि. नांदेड. विरुध्द. 1. सुनिल अन्ड कंपनी, गैरअर्जदार. 376, मिंट स्ट्रीट दुसरा माळा,सौकार्पेट, चेनाई – 600079 मार्फत प्राधिकृत अधिकारी. 2. महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्सीयल सर्व्हीसेस लि, दुसरा माळा, साधना हाऊस 570 पो.बॉ. मार्ग वरळी, मुंबई – 400018, मार्फत प्राइज़ अधिकारी. 3. सुनिल अन्ड कंपनी (फायनांन्स कंपनी) मार्फत कलेक्शन इन्चार्ज श्री. राजेश विजयकुमार जैन, मेन रोड मु.हदगांव ता.हदगांव जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.जी.कोलते. गैरअर्जदार क्र.1 व 3 तर्फे वकील - अड.गजानन खनगुंडे गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन एम.एच.26-एल- 460 हे वाहन स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी घेतले. सदरील वाहन खरेदी करण्यासाठी वित्त पुरवठा महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनी यांचेकडुन घेतला. त्यानुसार दि.13/09/2003 रोजी रु.3,30,000/- चा आर्थिक पुरवठा केला. सदरील कर्ज जुलै 2006 मध्ये पुर्ण परतफेड करण्याचे अर्जदाराने गैरअर्जदारासोबत करार केला होता. पण ते अर्जदारास त्या वेळेस भरण्यास जमले नाही म्हणुन अर्जदार सदरील कर्ज भरु शकले नाही. गैरअर्जदार महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनी त्यांचे कर्ज परतफेड करण्यासाठी तगादा लावू लागले म्हणुन अर्जदाराने जुलै 2006 मध्ये गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडुन रु.88,000/- वित्त पुरवठा घेऊन तो गैरअर्जदार क्र. 2 महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनी यांचे कर्जाची परतफेड करण्यासाठी भरले. त्यामध्ये कर्ज रक्कम रु.57,600/- आणि फायनांन्स चार्जेस म्हणुन रु.30,400/- असे एकुण रु.88,000/- गैरअर्जदार क्र. 3 सुनिल अन्ड कंपनी यांनी अर्जदारास दिली. सदरील रु.88,000/- गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना परस्पर जमा करुन खाते बेबाक करण्याचे ठरले व सदरील वाहनावर आर.टी.ओ.मध्ये त्यांचा चार्ज लावण्याचे ठरले. या बदल्यात अर्जदाराने गैरअर्जदारास 24 हप्त्यामध्ये रु.5,000/- प्रती महीना याप्रमाणे रु.1,20,000/- रक्कम देण्याचे ठरले त्यात मुद्यला शिवाय रु.32,000/- चार्जेसचा समावेश होता व त्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराच्या नांवे आर.टी.ओ. नांदेडकडे पत्र पाठवुन सदरील वाहनावरील त्यांचा चार्ज काढुन अर्जदाराच्या नांवे वाहन करण्याबद्यलचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. पुर्ण पैसे भरुन देखील त्या शिवाय जास्तीचे पैसे भरुनही गैरअर्जदाराने अर्जदारास ठरल्याप्रमाणे सेवा दिली नाही व उलट रु.1,20,000/- ची अधिक मागणी केली म्हणुन अर्जदारास सदरील तक्रार दाखल करावी लागली. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे व गैरअर्जदाराने वाहन जप्त करु नये म्हणुन अंतरिम मनाई हुकूम मागीतलेला आहे. अर्जदाराने त्यांचे नांवे असलेले सर्टीफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ मोटर व्हेईकल याचे झेरॉक्स कॉपी त्यानंतर गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे भरणा केलेले तारखेनुसार रक्कम व पावती नंबर व तारखा याची एक स्वतंत्र तक्ता तयार केला आहे तसेच रु.5,000/- महीना भरल्याप्रमाणे भरलेल्या पावत्या व जेवढे जास्तीचे पैसे भरले आहे त्याचा डि.डी. दाखल केलेले आहे. त्यानंतर अर्जदाराने महिंद्रा अन्ड महिंद्रा कंपनीचे अकांऊट लेजर दाखल करण्याची परवानगी मागतली वती त्यांना देण्यात आली,नि.क्र.24. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यामध्ये त्यांनी असे निवेदन केले आहे की, त्यांनी कुठल्याही प्रकारची त्रुटीयुक्त सेवा अर्जदारास दिली नाही. अर्जदाराने रु.1,55,000/- कर्ज घेतले होते व रु.69,750/- फायनांन्स चार्जेस व इतर कागदपत्र चार्जेस रु.4,750/- असे एकुण रु.2,29,500/- अर्जदाराने उचलले होते. करारात ठरल्याप्रमाणे हप्ता भरण्यास विलंब केला अथवा कसुर केला तर उशिरा भरलेल्या हप्त्यावर 36 टक्के व्याज द्यावे लागेल असे अर्जदाराने कबुल केले होते. अर्जदाराने रु.7,650/- प्रती महिना भरतो असे कबुल केला होता असे असतांना त्यांच्या विनंतीवरुन रु.5,000/- प्रती महिना स्विकारण्यास गैरअर्जदार क्र. 1 तयार झाले. वरील सर्व रक्कम करार संपुष्टात येईपर्यंत संपुर्ण रक्कम भरेल असे आश्वासन अर्जदाराने दिलेले होते. उलटपक्षी अर्जदाराने रु.7,650/- हप्ता ऐवजी रु.5,000/- प्रती महिना हप्ता भरला व अर्जदारास कुठलीही त्रुटीची सेवा दिली नाही. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यत यावा अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे व त्यांना झालेल्या मानिकस त्रासाबद्यल रु.10,000/- द्यावेत अशी मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी शपथपत्र दाखल केले नि.12 व हायर पर्चेस अग्रीमेंटची प्रत दाखल केलेली आहे तसेच अकांऊट स्टेटमेंट दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय? 3. अर्जदाराने जास्तीची भरलेली रक्कम तो गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना वापस मागु शकतो काय ? मागणी केलेली ती रक्कम गैरअर्जदार देण्यास बांधील आहेत काय? होय. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडुन रु.88,000/- कर्ज घेतले होते याबद्यल कुठेही वाद नाही. सदरील परिस्थिती दोन्ही उभय पक्षास मान्य आहे म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. मुद्या क्र. 2,3 व 4 - अर्जदाराने दि.13/09/2003 रोजी महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनीकडुन वाहन घेण्यासाठी रु.3,30,000/- चे कर्ज घेतले होते. सदरील कर्ज जुलै 2006 मध्ये पुर्ण परतफेड व्हायला पाहीजे होते पण अर्जदारास ते शक्य झाले नाही. म्हणुन अर्जदाराने जुलै 2006 मध्ये कर्ज रक्कम रु.57,600/- फायनांन्स चार्जेस रु.30,400/- असे एकुण रु.88,000/- रक्कम बाकी भरण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांच्याकडुन घेतले व ही कर्ज गैरअर्जदार क्र.2 महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनी यांना देण्याचे ठरले त्याप्रमाणे दि.19/07/2006 रोजी रु.88,000/- रक्कम गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी मंजुर करुन ती परस्पर महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनीकडे पाठवुन दिली व त्यांचे खाते बेबाक करुन आर.सी.बुक वर स्वतःचे चार्जची नोंद केली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आर.सीस. बुक अर्जदार यांना न देता गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सुपूर्द केले. सदरील रु.88,000/- कर्ज हे प्रती महिना रु.5,000/- प्रमाणे 24 हप्ते असे एकुण रु.1,12,000/- भरण्याचे ठरले उलट त्यात मुद्यला व्यतिरिक्त रु.32,000/- चार्जेसचा समावेश होता हे सर्व घेतलेली रक्कम परतफेड झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराच्या नांवे आर.टी.ओ. नांदेडकडे पत्र पाठवुन सदरील वाहनावरील त्यांचा चार्ज काढुन अर्जदाराच्या नांवे वाहन करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरले. अर्जदार यांनी पुर्ण पैसे भरल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली त्या वेळेस अजुन पुर्ण पैस परतफेड झालेली नाही असे सांगितले म्हणुन अर्जदाराने अजुन पैस भरणे चालु ठेवले व पैसे भरल्याचे खाते उताराची प्रत तसेच कर्ज परतफेडीचे अटी व नियम व आर.सी.बुकची सत्य प्रतीची मागणी केली. अर्जदाराने जास्तीचे पैसे भरले हे अर्जदार यांचे लक्षात आल्यानंतर हप्ते भरण्याचे थांबवले व गैरअर्जदारांना पत्र दिले की, त्यांना रु.1,20,000/- भरणा करणे पोटी नोंव्हेबर 2008 अखेर एकुण रक्कम रु.1,83,,600/- भरणा केली आहे तेंव्हा अधिकचे भरणा केलेली रक्कम रु.63,600/- परत करुन आर.टी.ओ.नांदेड यांना पत्र पाठवुन ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी ती विनंती मान्य केली नाही व अर्जदाराच्या कुठल्याही पत्रास उत्तर दिले नाही. उलटपक्षी वाहन जप्त करण्याची धमकी अर्जदारास दिली म्हणुन अर्जदाराने सदरील अर्ज न्यायमंचा समोर मांडले. अर्जदाराने सुनिल अन्ड कंपनीकडे भरलेल्या हप्त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे. --------------------------------------------------------------------------- अ.क्र. पावती क्र. दि. रक्कम डि.डी.नं. दिनांक --------------------------------------------------------------------------- 1. 3 19/11/06 5000 94222 26/10/06 2. 2 19/11/06 5000 177532 30/10/06 3. 6458 19/12/06 5000 - - 4. 7742 18/02/07 5000 95316 15/01/07 5. 7556 24/04/07 5000 406797 18/04/07 6. 9152 19/07/07 10000 407834 26/06/07 7. कांऊटंरफोईल 06/07/07 5000 SBH DD धर्माबाद 8. 9536 19/08/07 5000 578630 06/08/07 9. 11366 19/11/07 5000 580052 23/10/07 10. 11365 19/11/07 5000 580223 06/11/07 11. 12568 19/01/08 5000 580941 18/12/07 12. 12569 19/01/08 5000 949779 11/01/08 13. 14272 20/02/08 5000 950515 12/02/08 14. 15129 20/03/08 5000 951621 18/03/08 15. 15130 30/03/08 5000 951662 19/03/08 16. काऊंटर फोईल 05/05/08 5000 DD धर्माबाद 17. DD 21/05/08 5000 83606 21/05/08 18. 16114 20/07/08 5000 267030 18/06/08 19. 16718 19/08/08 5000 DD 25/07/08 20. DD 16/09/08 25000 385820 16/09/08 21. DD 16/09/08 25000 385821 16/09/08 22. DD 25/11/08 33600 501374 25/11/08 -------------------------------------------------------------------------------------------- Total Rs. 1,83,600/- -------------------------------------------------------------------------------------------- अर्जदाराने एकुण रु.1,88,600/- चे पावत्या दाखल केले जे की, त्यांनी गैरअर्जदाराकडे भरणा केलेले आहेत. तसेच अर्जदाराने दाखल केलेले महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनांन्स कंपनीचे अकांऊट लेजर पेजेस पहाता त्यावर दि.19/07/2006 रोजी रु.57,600/- कर्ज रक्कम व रु.30,360/- हायर पर्चेस चार्जेस याची नोंद आहे व दि.19/07/2006 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी रु.88,000/- गैरअर्जदार क्र.2 यांना दिलेले असून अर्जदाराचे खाते बेबाक केलेले आहे. याबद्यलचा स्पष्ट पुरावा अर्जदाराने मंचा समोर दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी निवेदनामध्ये मांडलेल्या कुठल्याही गोष्टींच्या पुष्टयार्थ पुरावे मंचा समोर सत्य प्रतीत मांडलेले नाही व त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने घेतलेले कर्ज रु.1,55,000/- ते त्यांचे म्हणणे खरे वाटत नाही. तसेच आजपर्यंत अर्जदाराने त्यांचेकडे जमा केल्यानंतरही रु.1,12,000/- आऊट स्टॅडींग कर्ज रक्कम थकीत आहे हेही सिध्द होत नाही. रु.88,000/- कर्जावर रु.1,83,600/- ची परतफेड करुन सुध्दा रु.1,12,000/- थकीत रक्कम राहणे शक्य वाटत नाही. अर्जदार हा ग्रामीण भागीतील रहीवाशी आहे व त्यांनी त्यांच्या कुटूंबासाठी उत्पन्न व्हावे या दृष्टीने घेतलेल्या गाडीवरील कर्ज बोजा किती आहे हे त्यांना समजत नाही म्हणुन गैरअर्जदार यांनी केलेले निवेदन हे बरोबर वाटत नाही. म्हणुन अर्जदाराचा अर्ज मंजुर करावे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे भरलेली रु.63,600/- रक्कम अर्जदारास वापस द्यावी तसेच आर.टी.ओ.नांदेड यांना सदरील वाहनावरील गैरअर्जदार क्र. 1 चे एच.पी.चार्जेस काढुन टाकण्यासाठी आर.टी.ओ.यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. आदेश. 1. अर्जदार यांचा अर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 3 कर्ज वसुली पोटी घेतलेली जास्तीची रक्कम रु.63,600/- दि.18/06/08 पासुन 10 टक्के व्याज दराने एक महिन्यात अर्जदारास वापस करावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.2,000/- गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी द्यावे. 4. आदेश क्र.2 व 3 मधील रक्कम एक महिन्याच्या आंत अर्जदारास मंचासमोर द्यावी अन्यथा पुर्ण रक्कमेवर (रु.63,600/- व त्यावरील व्याज) अधिक रु.2,000/- या सर्व रक्कमेवर रक्कम फिटेपर्यंत 10 टक्के व्याज दराने द्यावे लागेल. 5. गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी आर.टी.ओ. नांदेड यांना ना हरकत प्रमाणपत्र पाठवुन द्यावे. 6. उभय पक्षकार यांना निर्णय कळविण्यात यावा. (श्री. बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |