Maharashtra

Chandrapur

CC/18/58

Shri Sudhir Purushotam Mudewar - Complainant(s)

Versus

Sundarm Finance Limited - Opp.Party(s)

Adv. Gopal Patil

19 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/58
( Date of Filing : 09 Mar 2018 )
 
1. Shri Sudhir Purushotam Mudewar
chandankheda Tah Bhadrawari
chandrapur
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Sundarm Finance Limited
through Branch Registrar branch Chandrapur Om Bhawan Nagpur Road Chandrapur
chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Mar 2020
Final Order / Judgement

::: नि का :::

   (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :- 19/03/2020)

 

1.   तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  सदर तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे.

 

2.    तक्रारदारकर्त्‍याच्‍या मालकीचे  आयशर कंपनीचे टिप्‍पर वाहन असून त्‍याचा नोंदणी क्र.एमएच-40-वाय-2615 हा आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन मे-2016 मध्ये श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स या कपंनीकडुन विकत घेतले होते. त्‍यावेळी सदर वाहनाच्‍या नोंदणी प्रमाणपत्रावर व विमा पॉलीसीवर सुध्‍दा श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनीचे नाव होते. सदर वाहनाचा विमा कालावधी संपत आल्‍यामुळे तक्रारकर्ता हे वि.प.क्रं.1 यांच्‍याकडे वाहनाच्‍या विमा पॅालीसीचे नुतनीकरण करण्‍याकरिता गेले असता वि.प.क्रं.1 यांच्‍या सुचनेनूसार तक्रारकर्त्‍याने जुनी विमा पॉलीसी, नोंदणी प्रमाणपत्र,ओळखपत्र व इतर आवश्‍यक दस्‍तावेज तसेच त्‍यांनी मागणी केल्‍यानुसार विमा प्रिमीयम रक्‍कमेचा धनादेश सुध्‍दा त्‍यांना दिला. त्‍यांनतर वि.प.क्रं.1 यांनी वि.प.क्रं.2विमा कंपनी  यांचेकडून उपरोक्‍त वाहन विमाकृत करुन फक्त त्या विमा पॉलीसीचा क्रमांक 71070031170100003296 व कालावधी दिनांक 23/5/17 ते दिनांक 23/5/18  व पॉलीसीनंतर मिळेल असे सांगितले.   तक्रारकर्त्‍याच्‍या उपरोक्‍त वाहनाचा ऑगस्‍ट 2017 मध्‍ये अपघात होऊन वाहन क्षतीग्रस्‍त होऊन त्‍याचे नुकसान झाले. त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने वि.प.क्रं.1 यांना सुचना दिली असता त्‍यांनी कोटेशन मागितले. तक्रारकर्त्‍याने सदर क्षतीग्रस्‍त वाहन राजेश डेंन्‍टींग बॉडी वर्क्‍स या गॅरेजमध्‍ये दुरुस्‍तीला नेले असता त्‍यांनी वाहन दुरुस्‍तीच्या  खर्चाचे  रु. 1,92,500/- चे कोटेशन दिले. तक्रारकर्त्‍याने सदर कोटेशन वि.प.क्रं.1 यांचेकडे जमा केल्यानंतर त्‍यांनी मौक्‍यावर येऊन वाहनाची पाहणी करुन फोटो काढले व विमा क्‍लेम फॉर्म सुध्‍दा भरुन दिला होता. परंतु वि.प. यांनी सदर पॉलीसी ही तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने नसून श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स या कंपनीचे नावाने असल्‍याने विमा दावा देता येणार नाही असे कळविल्यानंतर तक्रारकर्त्‍याने पॉलीसी बघितली असता त्‍यावर त्‍याचे नाव नसून श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनीचेच नाव आहे असे निदर्शनास आले. तक्रारकर्त्‍याने वि.प. यांना उपरोक्‍त वाहनाच्‍या विमा पॉलीसीमध्‍ये झालेली चूक दुरुस्‍त करुन तक्रारकर्त्‍यास विमा दावा रक्‍कम देण्‍याची विनंती केली. परंतु वि.प.क्रं.1 व 2 यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने दिनांक 4/10/17 रोजी अधिवक्त्‍या मार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा वि.प.क्रं.1 व 2 यांनी त्‍याची पुर्तता केली नाही तसेच उत्‍तर सुध्‍दा दिले नाही. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त वाहनाच्‍या विमा पॉलीसीच्‍या नुतनीकरण करण्‍याकरिता आवश्‍यक सर्व दस्‍तावेज देऊन सुध्‍दा वि.प.क्रं.1 व 2यांनी दस्‍तावेज न पाहता निष्‍काळजीपणे उपरोक्‍त वाहनाची विमा पॉलीसी चुकीच्‍या नावाने काढुन आता विमा दावा रक्‍कम देण्‍यास नकार देत आहेत. वि.प.क्रं.1 व 2 यांनी ही तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत न्‍युनता केल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांविरुध्‍द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्‍याचे उपरोक्‍त वाहन क्रमांक एमएच-40-वाय-2615च्‍या विमा पॉलीसीचा क्रमांक 71070031170100003296 ची चुक दुरुस्‍त करुन तक्रारकर्त्‍याचे नाव मालक म्‍हणून नोंद करुन देण्‍याचे निर्देश वि.प. यांना  दयावेत  तसेच विरुध्‍द पक्षांना सदर वाहनाची अपघात नुकसान भरपाई विमा दावा रक्‍कम रु.1,92,500/- मंजूर करुन ,व्‍याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये 10,000/ आणि तक्रारखर्च रु. 5,000/- तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली.

3.   तक्रारकर्त्‍याची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्रं.1 व 2 यांना नोटीस काढण्‍यात आली. वि.प.क्रं.1 हजर होऊन त्‍यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्यामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन आपल्‍या विशेष कथनामध्‍ये नमुद केले की, वि.प.क्रं.1 हे तक्रारकर्ता व वि.प.क्रं. 2 यांचे मधील मध्‍यस्‍थ असुन त्‍यांनी वि.प.क्रं.1 यांचे अभिकर्ता म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या दस्‍तावेजाच्‍या आधारे पॉलीसी काढली होती. तक्रारकर्त्याने सदर वाहन हे श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनी यांचेकडून 2016 मध्ये विकत घेतले होते तेव्हा नोंदणी प्रमाणपत्रावर फायनान्‍स कंपनीचेच नाव होते.तक्रारकर्ता हे वि.प.क्रं.1 यांचेकडे आले असता त्यांनी  अभिकर्ता म्हणून तक्रारकर्त्याला दि. 2/5/2016 ते दि.1/5/2017 पर्यंतची पॉलीसी काढली होती त्यानंतर तक्रारकर्ता सदर पॉलीसीचे नुतनीकरण करण्याकरिता आले असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसारच विमा पॉलीसीच्‍या प्रस्ताव अर्जातील माहिती भरण्यात आली ती तक्रारकर्त्यास समजावून सांगण्यात आल्यानंतरच त्यावर तक्रारकर्त्याने स्वाक्षरी केली.विमा प्रस्ताव अर्जातील अटीनुसार फार्म भरतांना चुकीची माहिती दिली असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हि फॉर्मवर सही करणाऱ्या व्यक्तीची राहील परंत त्यावर तक्रारकर्त्‍याने कोणताही लेखी आक्षेप सादर केला नाही. नुकसानभरपाईचा वाद हा तक्रारकर्ता व वि.प.क्र. 2 यांच्यामध्ये असून नुकसानभरपाई रक्कम देण्याची जबाबदारी हि वि.प. क्र. 2 यांची आहे व वि. प. क्रं. 1हि विमा कंपनी नाही त्यामुळे नुकसानभरपाई देणे वा नाकारणे याच्याशी वि.प. क्र 1 यांचा प्रत्यक्षपणे कोणताही संबध नाही. वि. प.क्र.1 यांना अनावश्यक पक्ष म्हणून जोडले आहे सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्च बसवून खारीज करण्यात यावी.

4.     वि.प.क्रं.2 हजर होऊन त्‍यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्यामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन पुढे आपल्‍या विशेष कथनामध्‍ये नमुद केले की, नोंदणीप्रमाणपत्रानुसार ट्रक क्रमांक एमएच-40-वाय-2815 हा दिनांक 5/5/16 ला तक्रारकर्त्‍याचे नावाने झाला व त्यापुर्वीची सदर वाहनाची पॉलीसी क्रमांक 16010231160100001129 ही दिनांक 2/5/2016 ते दिनांक1/5/2017 या कालावधीकरीता काढलेली होती. उपरोक्‍त ट्रक दिनांक 5/5/2016 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने झाल्‍याने त्‍यांनी वि.प.क्रं.2 यांचेकडे अर्ज करुन स्‍वतःच्‍या नावाने पॉलीसी करुन घ्‍यायला पाहिजे होती.परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत कोणताही अर्ज सादर केला नाही. दिनांक1/5/2017 रोजी सदर ट्रकची पॉलीसी वैधता संपल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक 23/5/2017 रोजी वि.प.क्रं.1 यांचेकडे नविन पॉलीसीकरिता विचारणा केली व त्याकरीता दिलेल्‍या प्रपोजल फॉर्ममध्‍ये गाडी मालकाचे नाव श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनी चे टाकुन दिले व जुनी पॉलीसी मागितली असता त्‍यावर सुध्‍दा तेच नाव होते. तक्रारकर्त्‍याने पॉलीसी काढतांना जे नाव लिहुन दिले त्‍याच नावाने पॉलीसी काढण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याला सदर पॉलीसीमध्‍ये नाव चुकीचे वाटत होते तर त्‍यांनी विमा कंपनीकडे गाडी स्‍वतःच्‍या नावाने झाल्‍यावर किंवा पॉलीसी काढल्‍यानंतर सांगावयाचे होते. परंतु तक्रारकर्ता यांनी तसे काहीही सांगितले नाही. उपरोक्‍त वाहनाचा ऑगस्‍ट 2017 मध्‍ये अपघात झाला. परंतु तक्रारकर्त्‍याने अपघात झाल्‍याची तारीख, अपघात कोठे झाला याबाबत काहीही माहिती दिली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा कोणताही अपघात झाला नसल्‍याने त्‍यांनी विमा कंपनीला कोणतीही अपघाताची माहिती दिली नाही व वाहन सुध्‍दा दुरुस्‍त केले नाही. याशिवाय तक्रारकर्ता हा सदर वाहन हे व्‍यवसायाकरिता वापरत आहे.उपरोक्त  सर्व कारणास्‍तव तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍यात यावी ही विनंती.

5.     तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, लेखीयुक्तीवाद, तसेच विरूध्‍द पक्ष क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे,शपथपत्र, लेखी उ्त्‍तर व दस्‍तावेजांनाच वि.प.क्रं.1 यांचा लेखीयुकतीवाद समजण्‍यात यावा अशी नि.क्र.21 वर दाखल केलेली पुरसीस, वि.प.क्रं.2 यांचे लेखी कथन, दस्‍तावेज, शपथपत्र, लेखीयुक्तीवाद  उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि.प.क्र.1 व 2 यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍याबाबतची कारणमिमांसा आणी निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.

 

मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1)       विरूध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनता पूर्ण सेवा दिली आहे  :   नाही

      काय ?                                   

2)    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पाञ आहे

      काय ?                                 :  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1  बाबतः-

6.   तक्रारकर्त्‍याच्‍या मालकीचे  आयशर कंपनीचे टिप्‍पर वाहन असून त्‍याचा नोंदणी क्र.एमएच-40-वाय-2615 हा आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन मे-2016 मध्ये श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स या कपंनीकडुन विकत घेतले होते. त्‍यावेळी सदर वाहनाच्‍या नोंदणी प्रमाणपत्रावर व विमा पॉलीसीवर सुध्‍दा श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनीचे नाव असून सदर वाहन वि.प.क्रं. 1 अभिकर्ता यांचे मार्फत वि.प. क्रं. 2 विमा कं. यांचेकडे पॉलीसी क्रमांक 16010231160100001129 अन्वये दि. 2/5/2016 ते दि.1/5/2017 या कालावधीकरीता विमाकृत केलेले होते. या बाबत उभयपक्षात  वाद नाही. त्यानंतर सुद्धा तक्रारकर्त्‍याच्या कथनानुसार  दिनांक1/5/17 रोजी सदर ट्रकची पॉलीसी वैधता संपल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक 23/5/17 रोजी वि.प.क्रं.1 मार्फत वि.प.क्रं.2 यांचेकडे उपरोक्त वाहनाकरीता पॉलीसी काढली .परंतु तरीसुद्धा वि.प.2 यांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त वाह्नाचा ऑगस्‍ट 2017 मध्‍ये अपघात झाल्यानंतर सदर पॉलीसीअंतर्गत क्षतिग्रस्त वाह्नाची  नुकसानभरपाई विमा दावा रक्कम दिली नाही. वि.प.क्र. 2 यांनी नि. क्र.14 वरील दस्‍त क्रमांक 1 वर दाखल केलेल्या उपरोक्‍त वाहनाच्या दिनांक 23/5/17 ते दिनांक 23/5/18  या कालावधीच्या नविन पॉलीसी काढण्‍याकरिता दिलेल्या प्रपोझल फॉर्ममध्‍ये गाडी मालकाचे नाव श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनीचेच आहे व दिनांक 2/5/16 ते दिनांक 1/5/17 या कालावधीकरीता काढलेल्या  पूर्वीच्या /जुन्या  पॉलीसीवर सुद्धा तेच नाव आहे. तक्रारकर्त्‍याने नोंदणी प्रमाणपत्रावर उपरोक्‍त वाहन त्‍याच्‍या नावाने झाल्‍यानंतर पॉलीसी त्‍याच्‍या नावाने काढण्‍याकरिता वि.प.क्र.2 यांना दस्‍तावेज देऊन सुचित केले होते,हे दस्‍तावेजासह सिध्‍द केले नाही.

          मा. सर्वोच न्यायालय यांनी कंम्‍प्‍लीट इन्‍सुलेशन्‍स (प)लि. विरुद्ध न्यू इंडिया ऍशुरन्‍स कं. लि. 1996 या प्रकरणात दिलेल्या निवाड्यात ,

‘......It is only in respect of third party risks that section 157 of the New Act provides that the certificate of insurance together with policy of Insurance described therein  ‘shall be deemed  to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred.’If the policy of Insurance  covers other risks as well , e.g.,damage caused to the vehicle of the insured himself,that would be a matter falling outside Chapter XI of the New Act and in the realm of contract for which there must be an agreement between  the insurer and the transferee,the former undertaking to cover the risk or damage to the vehicle....’

असा निर्वाळा दिलेला आहे.

        मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ,श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.  विरुद्ध प्रेम प्रकाश 2018 मध्‍ये या प्रकरणात दिलेल्या निवाड्यात,

Insurance –Motor insurance –Private Car Package Policy –Transfer of –Theft of insured car –claim repudiated by insurance company on the ground that complainant did not have any insurable interest as he had no privity of contract with insurance company –Complaint allowed by fora below –Automatic transfer of insurance is only for third-party and not for owner of vehicle –For obtaining benefit of insurance for own damage,transferee has to apply to insurance company alongwith all papers-Same has not been applied in preent case –Impugned order set aside and complaint dismissed.

असा निर्वाळा दिलेला आहे.

       मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने , मुश्ताक मो. व अन्य विरुद्ध नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि. या प्रकरणात 2013 मध्‍ये दिलेल्या निवाड्यात ,

      ‘complainant failed to transfer insurable claim within 14 days from the date of registration,transferee had no insurable interest at the time of accident. He had no locus standi to file the claim.’ असा निर्वाळा दिलेला आहे.   

      तसेच  मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने, भारती एक्सा जनरलइंशुरन्स कं.लि. विरुद्ध सुभाष ठाकूर व अन्य या प्रकरणात दिलेल्या निवाड्यात,

      ‘NJ had transferred vehicle to complainant and also handed over possession of same complainant.Vehicle was registered in the name of complainant at time when it meet with accident.When vehicle was delivered to new owner and new owner took possession of vehicle then sale of movable property was complete. Complainant not applied for change in name of insurd in insurance policy.Complainant was not having insurable interest in vehicle.Repudiation justified.’

           

वरील मा. सर्वोच्‍च न्यायालय तसेच मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे न्यायतत्व प्रस्तुत प्रकरणात लागू पडते. प्रस्तुत प्रकरणात सुद्धा तक्रारकर्त्याने उपरोक्त वाहनाच्‍या नोदंणी प्रमाण पत्रामध्ये  दिनांक 20/5/16 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने नोंद झाल्‍यावर त्‍यांनी वि.प.क्रं.2 विमा कंपनी यांचेकडे अर्ज करुन जुन्‍या मालकाचे नाव रद्द करुन स्‍वतःच्‍या नावाने पॉलीसीमध्‍ये बदल करुन घ्‍यायला पाहिजे होता. याशिवाय तक्रारकर्त्‍याने नवीन पॉलीसी काढतांना विरुध्‍द पक्षांना जे नाव लिहुन दिले त्‍याच नावाने पॉलीसी काढण्‍यात आली. विमा कंपनीकडे गाडी स्‍वतःच्‍या नावाने झाल्‍यावर किंवा पॉलीसी काढल्‍यानंतर   तक्रारकर्ता उपरोक्त वाहनाचा मालक झाला असून त्याचे नावाने पॉलीसी काढण्‍याकरीता वा  नावाने ट्रान्स्फर करण्याकरीता विमा कंपनीला सूचित करण्‍याची जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची होती  परंतु तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष्‍ यांना सूचित केले होते वा त्याबाबत लेखी अर्ज सादर केला होते याबाबत कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे सदर पॉलीसीवर गाडी मालकाचे नाव श्रीराम इक्‍वीपमेंट फायनान्‍स कंपनीचेच आहे. सदर पॉलीसीमध्‍ये उपरोक्त वाहनाचा मालक म्हणून  तक्रारकर्त्‍याचे नाव नसल्याने विरुध्‍द पक्ष विमा कंपनी व तक्रारकर्ता यांच्‍यामध्‍ये कोणताही विमा करार नाही व  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्यास विरुध्‍द पक्षांचे विरुद्ध प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.मंचाच्‍या मते विरुध्‍द पक्षविमा कंपनी यांनि सदर पॉलीसी हि तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने नसल्याने विमा दावा रक्कम न देऊन तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही हे

दाखल दस्‍तावेजावरुन सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर नकारार्थी नोंद्विण्यात येते.

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

7.  मुद्दा क्रं. 1 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

 

 

            (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. 58/2018 खारीज  करण्‍यात येते.

 

            (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 

 

            (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

चंद्रपूर

दिनांक – 19/03/2020

 

 

                            

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                      सदस्‍या                    अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.