Maharashtra

Ratnagiri

CC/103/2020

Prakash Raghunath Salvi - Complainant(s)

Versus

Suhas Manohar Shinde for Prop. Rachana Developers - Opp.Party(s)

M.B.Bhatawdekar, U.M.Bhatawdekar, S.A.Rajwade, T.K.Chavan

21 Aug 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/103/2020
( Date of Filing : 03 Dec 2020 )
 
1. Prakash Raghunath Salvi
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
2. Udaykumar Raghunath Salvi
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
3. Ketaki Kiran Salvi
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
4. Swapnil Shivaji Karale
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
5. Smita Amol Kelkar
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
6. Neha Nitin Gangal
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
7. Sneha Pranav Thakur
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
8. Nitin Trivikram Kulkarni
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
9. Rekha Shantaram Ambre
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
10. Rekha Nilesh Palkar
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
11. Manasi Manoj Sawant
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
12. Suhas Vijay Patil
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
13. Mangesh Mahadev Shinde
Raghunath Apartment, Nachane Road, Behind the Aagashe Empire, Near Salvi Stop, Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Suhas Manohar Shinde for Prop. Rachana Developers
101, Rachana Denizen, Nutan Nagar, Nachane Road
Ratnagiri
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ARUN R GAIKWAD PRESIDENT
 HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE MEMBER
 HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 21 Aug 2024
Final Order / Judgement

- नि का ल प त्र -

(दि.21-08-2024)

 

व्‍दारा : श्री. स्वप्निल द.मेढे, सदस्य,

 

1)  सामनेवाला यांनी तक्रारदार राहात असलेल्या इमारतीतील बांधकामातील त्रुटी व विकसनाच्या कामातील कायदेशीर त्रुटी दुर करुन न दिल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज आयोगात दाखल केला आहे.

 

  तक्रार अर्जाचा सारांश तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे थोडक्‍यात असा-

     सामनेवाला यांनी तक्रारदार क्र.1 व 2 तसेच तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती किरण रघुनाथ साळवी यांचेकडून गाव मौजे नाचणे, ता.जि.रत्नागिरी येथील सर्व्हे नं.410 हिस्सा नं.8ड, क्षेत्र 570 चौ.मी.ज्याचा नगर भूमापन क्र.598अ1/63 ही मिळकत विकसनाकरिता घेतली. त्याचा विकसन करार दि.29/09/2017 रोजी झाला. तसेच सामनेवाला यांचे नांवे नोंदणीकृत मुखत्यारपत्रदेखील लिहून दिलेले आहे. सदर मिळकतीवर सामनेवाला यांनी तळ मजला(स्टिल्ट पार्कींग) अधिक चार मजले अशा इमारतीचे बांधकाम केले. सदर इमारतीचे नांव रघुनंदन असे ठेवण्यात आले. सदर इमारतीमधील निवासी सदनिका क्र.1, 201, 301 या निवासी सदनिका अनुक्रमे उदयकुमार, किरण व प्रकाश रघुनाथ साळवी यांना विकसन कराराचा मोबदला म्हणून सामनेवाला यांनी दिलेल्या असून सदर सदनिका तक्रारदार क्र.1ते 3 यांच्या प्रत्यक्ष कब्जामध्ये आहेत. उर्वरित निवासी सदनिका सामनेवाला यांनी इतर लोकांना विक्री केल्या. असून तक्रारदार क्र.4ते 13 हे या सदर निवासी सदनिकांच्या खरेदीदार व्यक्ती आहेत. सदर निवासी सदनिकांचे साठेखत, खरेदीखत झाले असून त्याचा सर्व खर्च तक्रारदार यांनी केलेला असून सोसायटी फॉर्मेशन, एम.एस.ई.बी. चार्जेस, लिगल चार्जेस इत्यादीसाठी सामनेवाला यांनी तक्रारदार क्र.4 ते 13 कडून रक्कम घेतलेली आहे. सामनेवाला यांनी सदर इमारतीच्या बांधकामामध्ये व त्या अनुषंगीक अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. सदरच्या त्रुटी दुर करण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी विनंत्या करुनही सामनेवाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.17/08/2020 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून बांधकामाबाबतच्या एकूण 17 त्रुटीबाबत व विकसन कामातील कायदेशीर एकूण 8 त्रुटीबाबत कळविले. सदर नोटीस मिळालेनंतर सामनेवाला यांनी दि.31/08/2020 रोजी वकीलांमार्फत खोटे व खोडसाळ उत्तर पाठविले. बांधकामाबाबतच्या तसेच कायदेशीर त्रुटी सामनेवाला यांनी त्यांच्या नोटीस उत्तरामध्ये मान्य केलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

 

2.    सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना खालीलप्रमाणे पूर्तता करुन देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.

  1. वाद इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या स्प्रिंग तसेच टो गार्ड बसविणे, तसेच लिफ्टचे गंजलेले दार बदलून मिळावे. लिफ्टच्या मोटरवरील लिकेज स्लॅब दुरुस्त करुन मिळावा, तसेच लिफ्टचे वार्षिक मेंटेनन्स कंत्राट नुतनीकरण करुन मिळाणेबाबत आदेश व्हावा.
  2. सामनेवाला यांनी रघुनंदन इमारतीसाठी फॅब्रिकेटेड चेंबर कव्हर्स पुरविण्याचा आदेश व्हावा.
  3. रघुनंदन इमारतीतील रहिवाशांसाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून नळाचे पाणी पुरवठा सुरळीत करुन मिळणेबाबतचा आदेश व्हावा.
  4. लिफ्टच्या मोटर रुममध्ये लाईटची सुविधा करुन देण्याबाबत सामनेवालांना आदेश व्हावा.
  5. इमारतीच्या सदनिका व इतर ठिकाणी बसविण्यात आलेली निकृष्ट दर्जाची इलेक्ट्रीक पॅनेल बदलून चांगल्या दर्जाची पॅनेल बसवण्याचा आदेश व्हावा.
  6. सदनिकांमधील हलणा-या टाईल्स दुरुस्त करुन देण्याचा आदेश सामनेवालांना व्हावा.
  7. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या आवारामध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याचा सामनेवालांना आदेश व्हावा.
  8. इमारतीच्या कंपाऊंडवॉलच्या आतील आजुबाजूचा परिसर प्रकाशीत करण्याची अपुरी लाईट व्यवस्था सुधारित करुन देणेबाबत आदेश व्हावा.
  9. निवासी सदनिका क्र.103 चे लिक असलेले बेसीन, खिडकीची तडकलेली काच, लाईटसाठी वापरलेले सामान व वायरिंग निकृष्ट दर्जाचे असलेने हे सर्व दोष सामनेवाला यांनी दुर करुन देणेबाबत आदेश व्हावेत.
    1.  

झिरपते.सदरचा दोष सामनेवालांनी दूर करुन देणेबाबत आदेश व्हावा.

11. सामनेवालांनी तात्पुरती बांधलेली संडासची टाकी काढलेल्या ठिकाणी व्यवस्थीत भर घालण्याचा सामनेवालांना आदेश व्हावा.

12. टेरेसच्या ओपनिंगमधून पावसाचे पाणी पार्किंग मध्ये पडून साचत आहे. तसेच सदरचे पाणी सदनिकांच्या भिंतीवरुन झिरपत असल्याने भिंतींना ओल धरत आहे.तरी सामनेवाला यांनी योग्य ती दुरुस्ती करुन सदर दोष सामनेवालांनी दूर करुन देणेबाबत आदेश व्हावा.

13. निवासी सदनिका क्र.204 मध्ये स्लॅब मधुन पाणी झिरपत आहे. आवश्यक ती दुरुस्ती करुन सामनेवालांनी सदरचा दोष दूर करुन देणेबाबत आदेश व्हावा.

14. संडास टाकीवर गॅस पास होणेसाठी पी.व्ही.सी.पाईप बसविण्याचा आदेश सामेनवाला यांना व्हावा.

15. सदनिका क्र.001, 202 यांच्या दरवाजांची निकृष्ट दर्जाची लॉक बदलून चांगल्या दर्जाची लॉक बसविण्याचा सामनेवालांना आदेश व्हावा.

16. इमारतीच्या दोन्ही टेरेसवर पत्राशेड स्वखर्चाने उभारुन देण्याचा आदेश सामनेवालांना करण्यात यावा.

17. निवासी सदनिका क्र.4 मध्ये पाणी गळते तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत सदनिकेमध्ये पावसाचे पाणी भरते. त्यामुळे सदरचे दोष दूर करणेबाबत सामनेवालांना आदेश व्हावा.

18. इमारतीवरील मुख्य टेरसेला तडे गेलेने पावसाचे पाणी मोठया प्रमाणात इमारतीमध्ये झिरपत आहे. त्याबाबत योग्य ती दुरुस्ती करण्याचा सामनेवाला यांना आदेश व्हावा.

19. पाणी झिरपून सदनिकांच्या आतीली भिंतींचा रंग खराब झाला आहे व फ्लोरिंगमधून मोठया प्रमाणात ओल येत आहे. त्यामुळे सदनिकांच्या आतील भिंतींना नव्याने रंग देण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा.

20. सदनिका क्र.2 मधील किचनच्या गॅलरीमध्ये मोठया पावसाचे उलटे पाणी भरते. सदरचा दोष दुर करुन योग्य ती दुरुस्ती करुन देणेबाबत सामनेवालांना आदेश व्हावा.

21. इमारत व रहिवाशांच्या सुरक्षिततेकरिता वॉचमन नेमण्याचा सामनेवालांना आदेश व्हाव.

22. निवासी सदनिका क्र.2 व 203 मधील प्लंबींगचे काम पूर्ण करुन देण्याचा आदेश सामनेवालांना करण्यात यावा.

23. सर्व सदनिकामधील प्लंबींगकरिता वापरलेले सामान अत्यंत निकृष्ट दर्जाचे असलेने सदरचे सामनेवाला बदलून चांगले सामान देण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा.

24. इमारतीला बाहेरच्या बाजूने चांगल्या दर्जाचा रंग वापरुन इमारतीचे रंगकाम करुन देण्याचा सामनेवाला यांना आदेश व्हावा.

25. इमारतीच्या सोसायटीकरिता लागणा-या कार्यालयाचे नुतनीकरण चांगल्या दर्जाचे साहित्य वापरुन करुन देण्याचा आदेश सामनेवालांना व्हावा.

 

तसेच विकसनाच्या कामामध्ये असलेल्या खालील नमुद कायदेशीर त्रुटी दुर करुन देण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा.

  1. रघुनंदन या निवासी संकुलातील रहिवासी सदनिका धारकांची को-ऑपरेटीव्ह सोसायटी सामनेवाला यांनी स्वखर्चाने स्थापन करुन देण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा.
  2. सामनेवाला यांनी वाद मिळकतीचे कव्हेअन्स डीड करुन देण्याचा आदेश सामनेवाला यांना व्हावा.
  3. सामनेवाला यांना वाद इमारतीचा विमा उतरविणेबाबत आदेश व्हावा.
  4. वाद इमारतीसाठी सामनेवाला यांनी वीज ट्रान्सफॉर्मर बसवून देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा.
  5. निवासी सद‍निका क्र.302 लगत असलेला टेरेस सर्व सदनिकाधारकांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्याचा सामनेवाला यांना आदेश व्हावा.
  6. सदर वाद मिळकतीवर सामनेवाला यांनी पलूस सहकारी बँकेचा रक्कम रु.69,90,000/-चा ठेवलेला बोजा कमी करणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा.
  7. तक्रारदार क्र.1ते 3 यांना विकसन कराराचा मोबदला म्हणून ज्या निवासी सदनिका दिलेल्या आहेत त्याचे नोंदणीकृत खरेदीखत तक्रारदाराचे नांवे करुन देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा.

 

3.    वरीलप्रमाणे सामनेवाला यांचेकडून आदेशाची पूर्तता करुन मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदर आयोगास विनंती केली आहे. तसेच प्रत्येक तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,00,000/- मिळावेत व सदर रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 %दराने व्याज मिळावे अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.

 

4.    तक्रारदाराचे त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडील कागदयादीसोबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली दि.17/08/2020 रोजीच्या नोटीसची प्रत, सदर नोटीस सामनेवाला मिळालेची पोष्टाची पोहोच पावती, सदर नोटीसला सामनेवाला यांनी दि.31/08/2020 रोजी दिलेले उत्तर, सामनेवाला यांचे सदनिका विक्रीच्या किंमतीबाबतचे स्पष्टीकरण, सामनेवालाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असलेबाबत दर्शविणारे फोटो, रघुनंदन इमारतीचा बांधकाम नकाशा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.18 कडे उदयकुमार रघुनाथ साळवी यांचे नोटरी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.20/1 कडे प्रणव ठाकूर यांचे साठेखताची प्रत दाखल केली आहे. नि.40 कडे तक्रारदार प्रकाश रघुनाथ साळवी यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. नि.55 कडे तक्रारदार क्र.9 सौ. रेखा शांताराम आंब्रे यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.56 कडे तक्रारदार क्र.13 मंगेश महादेव शिंदे यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.57 कडे तक्रारदार क्र.2 उदयकुमार रघुनाथ साळवी यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.58 कडे तक्रारदार क्र.3 केतकी किरण साळवी यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.59 कडे तक्रारदार क्र.4 श्री स्वप्नील शिवाजी कराले यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.60 कडे तक्रारदार क्र.6 स्नेहा नितीन गांगल यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.61 कडे तक्रारदार क्र.7 स्नेहा प्रणव ठाकूर यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.62 कडे तक्रारदार क्र.10 रेखा निलेश पालकर यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.63 कडे तक्रारदार क्र.5 स्मिता अमोल केळकर यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.64 कडे तक्रारदार क्र.11 मानसी मनोज सावंत यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.65 कडे तक्रारदार क्र.12 सुहास विजय पाटील यांचे साक्षीदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.66 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.83 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.                                            

 

  1.  

 

  1.  

    

7.  तक्रारदाराची तक्रार, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या आयोगाच्या विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यावर कारणमिमांसेसहीत नमूद निष्‍कर्ष खालीलप्रमाणे-

 

.क्र

              मुद्दे

    निष्‍कर्ष

1

तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध निर्माण होतात काय ?

 

होय

2

सामनेवालांनी तक्रारदारांना सोसायटीच्या नांवे कन्व्हेन्स डीड करुन न देऊन व विकसन कराराप्रमाणे इतर सोई सुविधा न देऊन दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

होय

3

सामनेवालाकडून तक्रारदारांना सोसायटीच्या नांवे कन्व्हेन्स डीड करुन मिळणेस व विकसन कराराप्रमाणे इतर सोई-सुविधा मिळणेस तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 

- कारणमिमांसा -

8. मुदृा क्रमांकः 1 – सामनेवाला यांनी तक्रारदार क्र.1, 2 आणि तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती किरण रघुनाथ साळवी यांचेकडून गाव मौजे नाचणे, ता.जि.रत्नागिरी येथील सर्व्हे नं.410 हिस्सा नं.8ड,क्षेत्र 570 चौ.मी.ज्याचा नगर भूमापन क्र.598अ1/63 ही मिळकत विकसनाकरिता घेतली. त्याबाबत सामनेवाला यांनी नि.14 कडील कागदयादीमध्ये नि.14/1 कडे तक्रारदार क्र.1 व 2 तसेच तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती किरण रघुनाथ साळवी व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या समजूतीच्या कराराची प्रत, नि.14/2 कडे दि.29/09/2013 रोजीचे रजि.विकसन करारनामा, नि.14/3 कडे रजि.कुलमुखत्यारपत्र, तसेच नि.14/4 कडे दि.30/05/2019 रोजीचे संमत्तीपत्र दाखल केले आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार क्र.1 व 2 तसेच तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती किरण रघुनाथ साळवी व सामनेवाला यांचेमध्ये वाद मिळकत विकसनाकरिता करार झालेचे दिसून येते. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी सदर वाद मिळकतीवर रघुनंदन नावाची इमारत बांधली आहे. सदरची बाब तक्रारदार व सामनेवाला यांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब मुदृा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

9. मुदृा क्रमांक 2 : –तक्रारदार क्र.1, 2 आणि तक्रारदार क्र.3 यांचे मयत पती किरण रघुनाथ साळवी व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या दि.29/09/2017 रोजीच्या विकसन कराराप्रमाणे सामनेवाला यांनी वाद मिळकतीवर रघुनंदन या इमारतीचे बांधकाम केले. तक्रारदाराने त्यांच्या तक्रार अर्जात कथन केले आहे की, सदर इमारतीमधील निवासी सदनिका क्र.1, 201, 301 या निवासी सदनिका अनुक्रमे उदयकुमार, किरण व प्रकाश रघुनाथ साळवी यांना विकसन कराराचा मोबदला म्हणून सामनेवाला यांनी दिलेल्या असून त्या सदर तक्रारदारांच्या ताब्यात आहेत. परंतु सामनेवाला यांनी सदर तक्रारदार यांना सदर सदनिकांचे नोंद खरेदीखत करुन दिलेले नाही. तसेच सदर वाद मिळकतीवर बांधलेल्या इमारतीमध्ये बांधकामाबाबतच्या अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत तसेच विकसन करारप्रमाणेही काही त्रूटी राहिलेल्या आहेत त्या सामनेवाला यांनी पूर्ण कराव्यात. सदरच्या बाबी सामनेवाला अमान्य केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराने तक्रारीत कथन केलेल्या ब-याच त्रुटीची पूर्तता केलेली असलेचे कथन केले आहे.   

 

  1.  

 

त्रुटी क्र.1 :- इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टचे तळ मजला, पहिला व दुसरा मजला येथील लिफ्टचा दरवाजा गंजलेला आहे. तसेच लिफ्टच्या प्रवेशाच्या ठिकाणी फरशी फुटलेली असून लिफ्टचा तळ व फरशी यामध्ये फट आढळून आलेली आहे.

 

त्रुटी क्र.2 :- पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता चेंबर लहान असून त्यावर लोखंडी जाळीचे कव्हर व्यवस्थित बसविलेले आढळून येत नाही.

 

त्रुटी क्र.3 :- इमारतीला नगर परिषदेचे नळ कनेक्शन आढळून येते.

 

त्रुटी क्र.4 लिफ्टच्या मोटररुममध्ये लाईटची सुविधा आढळून आलेली नाही.

 

त्रुटी क्र.5 :- सदनिका व इतर ठिकाणी बसविण्यात आलेली इलेक्ट्रीक पॅनेल व इतर विदयुत फिटींग व्यवस्थित केलेले नाही.

 

त्रुटी क्र.6 :- सदनिकांमधील प्रसाधनगृहातील तळाची व भिंतीची फरशी व्यवस्थित बसविलेली नाही. याठिकाणच्या फरशीचे सांधे व्यवस्थित न केल्याने गळती व भिंतींना ओल निर्माण होत आहे.

 

त्रुटी क्र.7 :- इमारतीमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविलेले आढळून आलेले नाही.

 

त्रुटी क्र.8 :- इमारतीच्या कंपाऊंड वॉलच्या आत लाईटची व्यवस्था पुरेशी नाही.

 

त्रुटी क्र.9 :- सदनिका क्र.103 चे बेसिन मधून पाणी झिरपत असल्याचे आढळून आले. कॉमन पॅसेजमधील इलेक्ट्रीक वायरिंग व्यवस्थित नसल्याचे आढळून आले.

 

त्रुटी क्र.10:- इमारतीमधील सर्वच किचन सिंकचे काम व्यवस्थित केलेले नसल्याचे आढळून येते. सिंकच्या आकारापेक्षा ओटयाची फरशी जास्त प्रमाणात कापलेली असल्याने सिंक व फरशीमधील सांधकाम मोठे झालेले असलेने सतत गळती होते असे निदर्शनास आले.

 

त्रुटी क्र.11:- सामनेवाला यांनी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेली संडासची टाकी काढून त्याठिकाणी भर घातली नाही असे आढळून आलेले नाही.

 

त्रुटी क्र.12 :- टेरेसवरील पावसाचे पाणी वाहून नेणा-या पाईपलाईनचे काम व्यवस्थित न केल्याने आवश्यक तिथे पाईपसाठी तोडलेला स्लॅबच्या ठिकाणी व्यवस्थित वॉटर प्रुफींग न केल्याने गळती होत असल्याचे निदर्शनास आले.

 

त्रुटी क्र.13 :- निवासी सदनिका क्र.204 मध्ये स्लॅबमधून पाणी झिरपते कारण इमारतीच्या टेरेसचे वॉटरप्रुफींगचे काम उखडलेले दिसते त्यामुळे गळती होत आहे.

 

त्रुटी क्र.14:- सेप्टीक टँकवर गॅस पास होण्यासाठी व्हेंट पाईप बसविण्यात आलेला नाही. हे धोकादायक ठरु शकते.

 

त्रुटी क्र.15 :- सदनिका क्र.001, 202 सदनिकांची मुख्य दरवाज्याची लॅच खराब असल्याचे आढळून येते.

त्रुटी क्र.16 :- टेरेसचे वॉटरप्रुफींग काम जागोजागी उखडून भेगा पडल्या असल्याने गळती मोठया प्रमाणात होऊ शकते. हे काम पूर्णपणे नव्याने व दर्जेदार, योग्य उतार, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप व्यवस्थित बसवून करणे आवश्यक आहे.

 

त्रुटी क्र.17 :- निवासी सदनिका क्र.4 मधील प्रसाधनगृहाचे पाईपमधून पाणी पार्किंगच्या डक्टमध्ये गळत असल्याचे निदर्शनास आले. तसेच गॅलरीमध्ये पाण्याचा निचरा करणारा पाईप व्यवस्थित न बसविल्याने पावसाचे पाणी निचरा न होता साठून राहते.

 

त्रुटी क्र.18:- टेरेसचे वॉटरप्रुफींगचे काम उखडलेने पूर्णपणे नव्याने योग्य उतार व पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप व्यवस्थित बसवून करणे आवश्यक आहे.

 

त्रुटी क्र.19:- इमारतीचे बाहय गिलाव्याला तडे गेलेले आढळून आले तसेच बाहेरील रंगकाम व्यवस्थीत केलेले नसल्याने पावसाच्या बाजूकडून भिंतींना आतून ओल येऊन रंगकाम खराब होत असल्याचे आढळून येते.

 

त्रुटी क्र.20 :- सदनिका क्र.2 मध्ये किचनच्या गॅलरीमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाईपमधून पाणी उलट गॅलरीमध्ये जमा होते.

 

त्रुटी क्र.21 :- इमारत व आतील रहिवाशांच्या सुरक्षिततेकरिता वॉचमन नेमलेला नाही याबाबत भाष्य नाही.

 

त्रुटी क्र.22 :- इमारतीचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण पाईपलाईनचे काम व्यवस्थित केलेले आढळून येत नाही. यामुळे भिंतींना ओल येणे व गळती होणे याबाबी निदर्शनास येतात.

 

त्रुटी क्र.23 :- इमारतीचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण पाईपलाईनचे काम व्यवस्थीत केलेले आढळून येत नाही. दर्जा सर्वसाधारण आहे.

 

त्रुटी क्र.24 :- इमारतीचा बाहेरील रंगकाम व्यवस्थित केले नसल्याचे आढळून येते.

 

त्रुटी क्र.25 :- सोसायटी कार्यालयाचा मुख्य दरवाजा व प्रसाधनगृहाचा दरवाजा तसेच युरोपियन कमोड जुने वापरल्याचे आढळून येते.

  1.  

 

12.   परंतु सामनेवाला यांनी विकसन कराराप्रमाणे रघुनंदन या निवासी अपार्टमेंटची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र क्र.आरटीजी/(आरटीजी)/एचएसजी/(टीसी)/3380/2020-21/सन2021नि.71/1 कडे दाखल केलेले आहे. तसेच वाद मिळकतीचे कव्हेअन्स डीड करुन देण्यास सामनेवाला तयार असलेचे त्यांचे लेखी युक्तीवादात कथन केलेले आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास रघुनंदन या वाद इमारतीचे कन्व्हेन्स डीड न करुन देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. परंतु वाद इमारतीचा विमा उतरविणेबाबत करारामध्ये कुठेही नमुद नसलेने सदरची बाब मान्य करता येणार नाही. तसेच वाद इमारतीसाठी महावितरणाच्या निर्देशानुसार योग्य पध्दतीने वीज पुरवठा सुरु असलेने ट्रान्सफॉर्मर बसवून देणेबाबतची मागणी हे आयोग फेटाळत आहे. तसेच निवासी सद‍निका क्र.302लगत असलेला 46.89चौ.मी.चे टेरेस क्षेत्र विकसन करारानुसार दि.19/06/2020 रोजीच्या नोंदणीकृत खरेदीखत क्र.1744/2020 अन्वये सौ.ज्योती पांडूरंग पाटील यांना सामनेवाला यांनी विक्री केलेचे असलेने सदरचा टेरेस सर्व सदनिकाधारकांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची तक्रारदारांची मागणी मान्य करता येणार नाही. तसेच सामनेवाला यांनी सदर वाद इमारतीच्या उभारणीसाठी रक्कम रु.69,90,000/-चे घेतलेले कर्ज दि.25/06/2020 रोजी संपूर्ण परतफेड केलेबाबतचे पत्र सामनेवाला यांनी नि.77/6 कडे दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदार क्र.1 ते 3 यांचे नोंदणीकृत खरेदीखत तक्रारदाराचे नांवे करुन दिले असलेचे सामनेवाला यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये कबूल केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये विकसन कामातील नमुद केलेल्या कायदेशीर एकूण 6 त्रुटींची सामनेवाला यांनी पूर्तता केलेचे दिसून येते. परंतु तक्रारदार सामनेवालाकडून रघुनंदन या वाद इमारतीचे कन्व्हेन्स डीड करुन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  

 

13.   तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ 1999- Supreme (Bom)453  IN THE HIGH COURT OF BOMBAY- Ramagauri Keshvlal Virani Vs Walkeshwar Trivani Cooperative Housing Society Ltd’, others Writ Petition No.4577 of1985, decided on 5-7-1999 हा न्यायनिवाडा दाखल केलेला आहे. सदर न्यायनिवाडयाचा विचार करता तक्रारीतील वस्तुस्थिती व न्यायनिवाडयातील वस्तुस्थिती विसंगत असल्याकारणाने सदरचा न्यायनिवाडा या तक्रारीस लागू होत नाही.

       

  1. दृा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

15. मुदृा क्रमांक 3 : – वरील सर्व विवेचनांचा विचार करता हे आयोग या निष्कर्षाप्रत आले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी सदर वाद इमारतीचे दि.07/04/2022 रोजी कोर्ट कमिशन करुन नि.37 कडे दाखल केलेल्या अहवालातील त्रुटी क्र.3, 7 व 21 वगळता इतर सर्व त्रुटींची पूर्तता करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर सामनेवाला यांच्या सदोष सेवेमुळे तक्रारदारास साहजिकच मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे. परंतु तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी मागणी केलेली प्रत्येक तक्रारदाराला रक्कम रु.2,00,000/-ची मागणी ही अवास्तव व अवाजवी आहे. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.40,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे मुदृा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

16. मु्दृा क्र.4:- वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

- आ दे श -

 

(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

(2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी सदर वाद इमारतीचे कोर्ट कमिशन करुन नि.37 कडे दाखल केलेल्या अहवालातील त्रुटी क्र.3, 7 व 21 वगळता इतर सर्व त्रुटींची अहवालाप्रमाणे पूर्तता करुन दयावी.

(3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना रघुनंदन या वाद मिळकत इमारतीचे कन्व्हेन्स डीड करुन दयावे.

(4) तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.40,000/-(र.रुपये चाळीस हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- (र.रुपये दहा हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.

(5) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्‍या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.

(6) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्‍यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्‍द दाद मागू शकेल.

(7) उभय पक्षकारांना निकालपत्राच्‍या सत्‍यप्रती विनामुल्‍य पुरवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. ARUN R GAIKWAD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.