Dated the 11 Dec 2015
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
- तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द त्यांचे इमारतीतील टेरेसमधून होणा-यश गळतीसंदर्भात दाखल केली आहे. तक्रारदार यशोश्री को.ऑप. हौसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहतात. सदर सोसायटीची इमारत जुनी झाली असून बिल्डींगचे छत कमकुवत झाले आहे. सन 2008 साली छतावर मोबाईल टॉवर बसविण्याचे काम चालू असतांना छताला तडे गेले व तक्रारदारांच्या घरात मोठया प्रमाणावर गळती सुरु झाली.
- सामनेवाले यांना यासंदर्भात अनेकवेळा तोंडी व लेखी विनंती केली. प्रत्यक्ष गळती मोठया प्रमाणावर असल्याचे दाखवले. सामनेवाले यांनी छतावर प्लॅस्टिकचे पत्र्याचे शेड टाकण्याचे कबूल केले होते. परंतु अदयापपर्यंत लिकेजची दुरुस्ती केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
-
3. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांचे आक्षेप अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले क्र. 1 ते 3 यांचेमध्ये ग्राहकाचे नाते प्रस्थापित नाही. सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना सदर प्रकरणात व्यक्तीगतरित्या समाविष्ट केले आहे. तक्रारदार हे यशश्री हौसिंग सोसायटीचे ग्राहक आहेत. सबब तक्रारदारांची तक्रार ग्राहक मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. सामनेवाले क्र. 1 ते 3 तर्फे दि. 04/09/2014 रोजी आक्षेप अर्ज दाखल केला. सदर अर्जाची प्रत तक्रारदारांनी (Receive) घेतल्याबाबत अर्जावर नमूद आहे. परंतु तक्रारदारांनी सदर अर्जाला जबाब दाखल केला नाही. तक्रारदार सातत्याने गैरहजर असल्यामुळे उपलब्ध कागदपत्रांच्याआधारे प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
4. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांचा आक्षेप अर्ज, सामनेवाले यांचे वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालीलप्रमाणे निष्कर्ष मंच काढत आहेः
अ. तक्रारदार हे सामनवेाले क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक संरक्षण कायदा
कलम 2(1)(d) नुसार ग्राहक होत नाहीत.
ब. तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला देऊन सामनेवाले क्र. 1
ते 3 यांचेकडून सेवा विकत घेतलेल्या नाहीत.
क. सामनेवाले क्र. 1 ते 3 हे यशश्री हौसिंग सोसायटीचे अनुक्रमे
अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष होते. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 ते
3 यांना (Personal) व्यक्तीगतरित्या प्रस्तुत प्रकरणात समाविष्ट
केले आहे.
ड. तक्रारदार यशश्री हौसिंग सोसायटीचे सदस्य असून तक्रारदारांच्या
सदनिकेची गळती दुरुस्तीची कार्यवाही सोसायटीने त्यांचेमार्फत पूर्ण करणे बंधनकारक होते. तक्रारदारांनी यशश्री हौसिंग सोसायटी यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली नाही. तक्रारदार व यशश्री हौसिंग सोसायटी यांचेमध्ये ग्राहकाचे नाते प्रस्थापित होते.
तक्रारदार व सामनेवाले क्र. 1 ते 3 यांचेमध्ये व्यवस्थितरित्या ग्राहकाचे नाते प्रस्थापित होत नाही. तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 2(1)(d) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही.
अशा परिस्थितीत प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.
सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
- तक्रार क्र. 301/2010 फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.