Maharashtra

Nagpur

CC/10/701

Pradip Shankarrao Atkare - Complainant(s)

Versus

Subhash Pralhadji Deshbhratar - Opp.Party(s)

Adv. J.M. Shamkuwar

08 Aug 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/701
 
1. Pradip Shankarrao Atkare
c/o.Pramod Mendhe, Pardeshipura Road, Gaddi godam, Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Subhash Pralhadji Deshbhratar
C/o.Raju Febrication, Near Bus Stop Nara Road, Bhim Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. J.M. Shamkuwar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक :08/08/2011)
 
 
1.           प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 18.11.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
                       
2.          यातील तक्रारकर्त्‍याची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदारांनी त्‍याचेसोबत भुखंड विक्रीचा करारनामा रु.2,70,000/- ला केला होता आणि करारापोटी रु.1,50,000/- स्विकारले. सदरचा भुखंड गैरअर्जदारांनी किर्तीधर को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी यांचेकडून विकत घेतला होता. तक्रारकर्त्‍याने नागपूर सुधार प्रन्‍यास येथे चौकशी केली असता नाला विस्‍तारीकरणाचे दृष्‍टीने सदर भुखंड आरक्षीत असल्‍याचे सांगितले. तसेच श्री. अनिल नेरकर यांचेसोबत किर्तीधर को-ऑपरेटीव्‍ह सोसायटीने करारनामा केला असुन कब्‍जापत्र सुध्‍दा केले आहे. आणि नियमीतीकरणाकरीता नेरकर यांनी रु.1,000/- भरल्‍याचे माहित झाले. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याची फसवणुक केली आहे म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल करुन ती व्‍दारे त्‍यांनी करारापोटी गैरअर्जदारांना दिलेले रु.1,50,000/-, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईचे रु.3,00,000/-, नोटीसचा खर्च रु.1,000/- व तक्रारीच्‍या खर्चाचे रु.5,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
 
3.          गैरअर्जदारांना नोटीस बजावण्‍यांत आली असता ते मंचात हजर झाले मात्र त्‍यांनी मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला नाही, त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण विना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.18.03.2011 रोजी पारित केला.
 
5.          तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 17 किर्तीधर को.हाऊसिंग सोसायटीने गैरअर्जदाराला लावुन दिलेले विक्रीपत्र, अर्जदाराचा गैरअर्जदारासोबत झालेला करारनामा, माहितीच्‍या अधिकारा अंतर्गत ना.पु.प्र. ने दिलेली माहिती, नेरकर यांनी रु.1,000/- भरल्‍याची पावती, नेरकर आणि सोसायटीत झालेले बयानापत्र/कब्‍जापत्र, पोलिस स्‍टेशनला दिलेली तक्रार, नोटीस इत्‍यादी दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
 
 
 
 
6.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.25.07.2011 रोजी आली असता दोन्‍ही पक्ष युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊनही गैरहजर. त्‍यामुळे प्रकरण गुणवत्‍तेवरील निकालाकरीता ठेवण्‍यांत आले, तक्रारकर्त्‍याची तक्रार व तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
 
               -// नि ष्‍क र्ष //-
 
 
7.          सदर प्रकरणात तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांच्‍यामध्‍ये झालेला भुखंड विक्रीचा करारनामा हा आपसी करार आहे आणि गैरअर्जदार हे या प्रकरणात भुखंड विकासक किंवा भुखंड विक्रीचा व्‍यवसाय करणारी व्‍यक्ति नाही. ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत भुखंडासंबंधीचा वाद हा विकासक किंवा भुखंड विक्रीचा व्‍यवसाय करणा-या व्‍यक्तिंनी देऊ केलेल्‍या सेवेसंबंधी केवळ येऊ शकतो. वैयक्तिक भुखंड विक्रीचे प्रकरण दोन व्‍यक्तिंमधील विचारात घेणे शक्‍य नाही, कारण भुखंड ही स्‍थावर मालमत्‍ता ठरते आणि वस्‍तुंच्‍या संज्ञेत मोडत नाही. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही व मंचास अधिकारक्षेत्र प्राप्‍त होत नाही. यास्‍तव आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
2.    तक्रारकर्त्‍याने दिवाणी न्‍यायालयात किंवा योग्‍य ठिकाणी आपली तक्रार दाखल    करुन वाद सोडवावा.
3.    उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सोसावा.
 
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.