Maharashtra

Dhule

CC/12/107

Shri Anil Vishwas Patil - Complainant(s)

Versus

Sub Engineer Maharashtra State Electicity Distrubition Co.Ltd. - Opp.Party(s)

Shri Raosaheb Suryavanshi

30 Oct 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/12/107
 
1. Shri Anil Vishwas Patil
R/o Jebapur, Tal. Sakri
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sub Engineer Maharashtra State Electicity Distrubition Co.Ltd.
Rural Division, Samode, Tal. Sakri,
Dhule
Maharashtra
2. Asst. Engineer Maharashtra State Electicity Distrubition Co.Ltd.
Taluka Office, Tal. Sakri,
Dhule
Maharashtra
3. Excutive Engineer Maharashtra State Electicity Distrubition Co.Ltd
Opp. Gaurav hotel, Nakane Rd. Tal. Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:Shri Raosaheb Suryavanshi, Advocate
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  – १०७/२०१२                               तक्रार दाखल दिनांक  – २८/०६/२०१२

                                 तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१४

 

कै. विश्‍वास रूपचंद पाटील यांचे वारस

अनिल विश्‍वास पाटील

उ.व. – सज्ञान, धंदा-शेती

रा.जेबापुर, ता.साक्री, जि.धुळे                        . तक्रारदार

 

        विरुध्‍द

 

१) म.दुय्यम अभियंता सो.

महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी लि.

ग्रामीण विभाग सामोडे, ता.साक्री, जि.धुळे

२) म.सहाय्यक अभियंता सो.

महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी लि.

तालूका ऑफीस साक्री, ता.साक्री, जि.धुळे

३) म.कार्यकारी अभियंता सो.

महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनी लि.

गौरव हॉटेल समोर, नकाणे रोड, ता.,जि. धुळे           .सामनेवाला

 

  •  

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

उपस्थिती

(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.आर.बी. सुर्यवंशी)

(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.एल.पी. ठाकूर)

निकालपत्र

 (दवाराः मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

 

१.   सामनेवाले यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे जळालेल्‍या ऊसाची त्‍यांनी भरपाई द्यावी यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

 

२.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे मौजे दापूर, ता.साक्री शिवार गट क्र.१५०/२ ही शेतजमीन असून त्‍यात विहीर आहे.  त्‍या  विहिरीवर त्‍यांनी सामनेवाले यांच्‍याकडून वीज जोडणी घेतली आहे.  त्‍या  शेतात तक्रारदार यांनी १.६० आर एवढ्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती.  दि.२१/०१/२०११ रोजी दुपारी ३ वाजेच्‍या सुमारास अनिल विश्‍वासराव भदाणे यांच्‍या शेतातील वीज तार तुटून पडल्‍याने शॉर्टसर्कीट होवून आग लागली.  त्‍यात तक्रारदार यांच्‍या शेतातील सुमारे रूपये ३,९७,५१५/- एवढ्या किंमतीचा ऊस जळून खाक झाला. सामनेवाले यांनी या रकमेसह मानसिक त्रासापोटी रूपये १०,०००/-, तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- ची भरपाई द्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

 

३.   तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ७/१२ उतारा, खातेउतारा, वीज कंपनीच्‍या सामोडे येथील कनिष्‍ठ अभियंतांना दिलेले पत्र, पिंपळनेर पोलीस ठाण्‍यात दिलेली खबर, घटनास्‍थळाचा  पंचनामा,  नैसर्गिक आपत्‍ती पंचनामा, आगीचे कारण, सहाय्यक विद्युत निरीक्षकांनी घेतलेला जबाब, कनिष्‍ठ अभियंता अशोक शिवराम सोनवणे यांचा जबाब, वृत्‍तपत्रातील बातमी आदी कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत. 

 

४.   सामनेवाले यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला.  त्‍यात म्‍हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही. त्‍यामुळे सदरच्‍या न्‍यायमंचास सदर तक्रार चालविण्‍याचे न्‍यायक्षेत्र नाही. तक्रारदार सांगतो त्‍याप्रमाणे कोणतीही घटना घडलेली नाही, म्‍हणून सदरची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे. 

 

५.   तक्रारदार यांची तक्रार त्‍यासोबत त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षाच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद याचा विचार करता आमच्‍यासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.

 

               मुद्दे                                निष्‍कर्ष

  1. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक

आहेत काय ?                                    नाही 

 

  1.  आदेश काय ?                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

 

६. मुद्दा ‘अ’-     तक्रारदार यांच्‍या मौजे दापूर ता.साक्री शिवारातील गट क्र.१५०/२ वरील ऊसाचे पिक दि.२१/०१/२०११ रोजी सामनेवाले यांची वीज तार तुटल्‍यामुळे आग लागून त्‍यात जळाले अशी तक्रारदार यांची मुख्‍य तक्रार आहे. त्‍याबाबत सामनेवाले यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.  तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे  आणि त्‍यावर सामनेवाले यांनी दिलेला खुलासा या दोघांचेही मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले. त्‍यावरून  असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्‍या शेतात वीज तार तुटल्‍यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. तथापि, सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या खुलाशात या घटनेस ते जबाबदार नाही असा पवित्रा घेतला आहे. तक्रारदार यांनी घटनेची खबर,  घटनास्‍थळाचा पंचनामा, वीज कंपनीच्‍या कर्मचा-यांचे जबाब, आगीचे कारण आदी कागदपत्रे दाखल केली. त्‍यावरून दि.२१/०१/२०११ रोजी दुपारी ३ वाजेच्‍या सुमारास अनिल विश्‍वासराव भदाणे यांच्‍या शेतातील वीज तार तुटल्‍यामुळे शॉर्टसर्कीट  होवून आसपासच्‍या सहा शेतक-यांच्‍या शेतातील ऊसाच्‍या पिकाला आग लागून त्‍याचे नुकसान झाले असे दिसून येते. तक्रारदार यांनी इतर कागदपत्रांसोबत वीज बिलही दाखल केले आहे.  त्‍या बिलावर राजाराम दगा असे नाव असून ग्राहक क्रमांक ०८६७८७०७०१२६ असा नमूद केला आहे. यावरून सदरचे बिल हे तक्रारदार यांचेच आहे हे स्‍पष्‍ट होत नाही. सामनेवाले यांनी आपल्‍या खुलाशातही तक्रारदार व  सामनेवाले यांच्‍यात ग्राहक व सेवा देणार असे नाते नाही असा उल्‍लेख केला आहे. त्‍याबाबत तक्रारदार यांनी कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. 

 

 

     तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरून त्‍यांच्‍या शेतात सामनेवाले यांची वीज तार तुटून आगीची घटना  घडली  आणि त्‍यामुळे ऊसाचे पिक जळून त्‍याचे ५० टक्‍केपेक्षा अधिक नुकसान झाले हे दिसून येते.  तथापि, तक्रारदार हे सामनेवाले यांचे कशाप्रकारे ग्राहक आहेत याबबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही.  ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्‍या कलम २ मधील तरतुदीनुसार केवळ ग्राहकांच्‍याच किंवा ग्राहक म्‍हणून संबंध, नाते निर्माण होणा-या तक्रारदारांच्‍याच तक्रारी चालविण्‍याचा व त्‍यावर न्‍यायनिवाडा करण्‍याचा या मंचास अधिकार आहे.   ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ड) मध्‍ये  “ग्राहक” या शब्‍दाचा अर्थ आणि व्‍याख्‍या स्‍पष्‍ट केली आहे.  ती पुढील प्रमाणे.

 

 

२ (ड) ग्राहक याचा अर्थ...

 

 

(एक)      ज्‍याचे प्रदान करण्‍यात आले आहे किंवा प्रदान करण्‍याचे वचन    देण्‍यात आले आहे किंवा अंशत: प्रदान करण्‍यात आले आहे आणि अंशत: देण्‍याचे वचन देण्‍यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्‍थगित किंवा स्‍थगित प्रदानाच्‍या कोणत्‍याही पध्‍दतीखाली कोणताही माल खरेदी करते अशी कोणतीही व्‍यक्‍ती असा असून त्‍यात देण्‍यात आलेल्‍या किंवा देण्‍याचे वचन दिलेल्‍या किंवा अंशत: दिलेल्‍या व अंशत: देण्‍याचे वचन दिलेल्‍या प्रतिफलासाठी किंवा असा वापर अशा व्‍यक्‍तीच्‍या संमतीने झाला असेल अशा बाबतीत स्‍थगित प्रदानाच्‍या कोणत्‍याही पध्‍दतीनुसार असा माल खरेदी करणा-या व्‍यक्‍तीव्‍यतिरिक्‍त अशा मालाचा वापर करणा-या व्‍यक्‍तीचा समावेश असेल. परंतु, त्‍यात पुनर्विक्री करिता किंवा वाणिज्यिक प्रयोजना करिता असा माल खरेदी करणा-या व्‍यक्‍तींचा समावेश असणार नाही. 

 

 

(दोन)ज्‍याचे प्रदान करण्‍यात आले आहे किंवा प्रदान करण्‍याचे वचन देण्‍यात  आले आहे किंवा अंशत:प्रदान करण्‍यात आले आहे किंवा अंशत: देण्‍याचे वचन देण्‍यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्‍थगित प्रदानाच्‍या कोणत्‍याही पध्‍दतीनुसार कोणतीही सेवा (भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते) अशी कोणतीही व्‍यक्‍ती असा असून जेव्‍हा अशी सेवा प्रथम निर्दिष्‍ट व्‍यक्‍तीच्‍या संमतीने उपलब्‍ध झाली असेल अशा बाबतीत त्‍यात देण्‍यात आलेल्‍या किंवा देण्‍याचे वचन दिलेल्‍या किंवा अंशत: दिलेल्‍या किंवा अंशत: देण्‍याचे वचन दिलेल्‍या प्रतिफलासाठी किंवा स्‍थगित प्रदानाच्‍या कोणत्‍याही पध्‍दतीसाठी अशी सेवा (भाड्याने घेते किंवा तिचा लाभ घेते अशा) व्‍यक्‍तीखेरीज अशा सेवेच्‍या कोणत्‍याही लाभधा-याचा समावेश असेल. 

 

 

          वरील स्‍पष्‍टीकरणाचा/व्‍याख्‍येचा विचार करता, सदर तक्रारीत तक्रारदार यांनी ते सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्‍याचा कोणताही पुरावा सादर न केल्‍यामुळे ते सामनेवाले यांचे “ग्राहक”  आहेत हे सिध्‍द होत नाही.  याच कारणामुळे  मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत. 

 

 

७.   मुद्दा क्र. ‘‘ब’’    वरील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्‍द होत नाही.  ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीचा विचार करता, जे ग्राहक आहेत किंवा ज्‍यांचे सामनेवाले यांचेशी ग्राहक म्‍हणून नाते निर्माण झाले आहे त्‍यांच्‍याच तक्रारींबाबत न्‍यायनिवाडा करण्‍याचा या मंचाला अधिकार आहे. त्‍यामुळे सदर प्रकरणात तक्रारदार यांची तक्रार ग्राहक म्‍हणून मान्‍य करता येणार नाही, असे आमचे मत बनले आहे.  त्‍यामुळे न्‍यायनिवाडा करण्‍यासाठी तक्रारीतील इतर मुद्यांचा विचार करणे उचित होणार नाही असे आम्‍हाला वाटते. तथापि, न्‍यायाचे दृष्‍टीने तक्रारदार हे न्‍याय मिळवून घेण्‍यासाठी योग्‍य त्‍या न्‍याय व्‍यवस्‍थेकडे, मंचाकडे, प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात असेही आम्‍हाला नमूद करावेसे वाटते.  सबब या प्रकरणी आम्‍ही पुढील प्रमाणे आदेश करीत आहोत.

 

 

                आ दे श

 

  1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

  1. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

 

धुळे.

  1.  

 

              (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

                  सदस्‍य           अध्‍यक्षा

              जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.