आदेश पारीत व्दारा – रत्नाकर ल. बोमिडवार, सदस्य.
1. अर्जदाराने, सदर तक्रार, गैरअर्जदार सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली यांचे विरुध्द, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.
... 2 ...
... 2 ...
2. अर्जदार, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोलीचा ग्राहक असून विद्युत मिटर (नो यूज) वापरात नसतांनाही, युनिटप्रमाणे देयक दिले. देयकांत दुस-या मीटरचे छायाचिञ दर्शवून जादा रकमेची मागणी केली.
3. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. विद्युत पुरवठा क्रमांक RLB-2366 असून, ग्राहक क्रमांक 470120354813 हा आहे. विद्युत मिटरचे भाडे भरलेले आहे. दिनांक 21/8/2008 ला रुपये 30/- शेवटचे देयक भरले, त्यानंतर थकबाकी नाही. जुलै 2008 मध्ये 124 युनिट दाखवून रुपये 340/- चे देयक देण्यात आले. लेखी तक्रारी नंतर, देयकात दुरुस्ती करुन रुपये 30/- चे देयक दिले, त्यानुसार देयक भरले. माहे ऑगष्ट 2008 मध्ये पून्हा 124 युनिट दाखवून रुपये 730 चे देयक प्राप्त झाले. तक्रारी नंतर कोणतीच कार्यवाही केली नाही. माहे सप्टेंबर 2008 मध्ये परत 124 युनिट दर्शवून थकबाकीसह रुपये 1,130/- चे देयक प्राप्त झाले. दिनांक 22/10/2008 ला लेखी तक्रार दाखल केली, परंतू कार्यवाही केली नाही. सदर निवासस्थानी राहात नसतांना, विद्युत कार्यालयात मिटर ‘नो युज’ कळविले व मिटरखाली ‘नो युज’ ची सूचना लावली असल्याने सन 2006 पासून रुपये 30/- चे देयक प्राप्त होत असून, ते नियमित भरीत आहे. माहे ऑक्टोंबर 2008 मध्ये 124 युनिट दाखवून थकबाकीसह रुपये 1,560/- चे देयक प्राप्त झाले. देयकात दूस-याच विद्युत मिटरचे छायाचिञ देवून, जादा रकमेचे बील देण्यात आले. अर्जदारास वारंवार लेखी तक्रार देऊन सुध्दा काही दखल न घेता दूर्लक्ष करुन, सेवा देण्यांत ञृटी केली आहे. विद्युत मिटर ‘नो युज’ असतांनाही जादा बिलाची मागणी करुन मानसिक ञास दिला. अर्जदाराने, दिनांक 14/2/2006 चे आदेशानुसार देणे असलेली रुपये 560/- व्याजासह व मानसिक ञासाबद्दल रुपये 20,000/- वसूल करुन देण्याची मागणी केलेली आहे.
4. अर्जदाराने, आपल्या तक्रारीतील कथनाच्या सत्यतेसाठी निशाणी 5 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. सदर तक्रार नोंदणी
... 3 ...
... 3 ...
करुन, गैरअर्जदारास नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार वेळोवेळी हजर झालेत.
5. गैरअर्जदाराने, आपल्या लोखी बयाणात, अर्जदाराला माहे जुन 2008 पर्यंत वापर नसल्याचे विज देयक देण्यात आले आहे. माहे जुलै 2008 ला वाचन घेतांना वेगळयाच मिटरवर, सदर ग्राहक क्रमांकाचे (स्टीकर) पट्टी लावून मिटर वाचन घेतल्यामुळे, (INACSC) वाचन जुळत नसल्यामुळे सरासरी विज देयक तयार झाले. सदर चूक, नेमून दिलेल्या एजन्सीकडून नजर चूकीने झाली. एजन्सीला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. अशावेळी, सरासरी विज देयक तयार झालेल्या बिलाची दूसरे योग्य मिटर वाचन मिळाल्यानंतर सरासरी विज देयकाची रक्कम वजा करुन विज देयक तयार होत असते. त्याप्रमाणे, माहे डिसेंबर 2008 चे बिलात दूरुस्ती झालेली आहे असे प्रतिपादन करुन, तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
(1) गैरअर्जदाराने चुकीचे देयक दिले आहे काय ? होकारार्थी.
(2) मिटरचे छायाचिञ दुस-यांचे आहे काय ? होकारार्थी.
(3) अर्जदार मानसिक ञासाबद्दल मोबदला होकारार्थी.
मिळण्यास पाञ आहे काय ?
(4) अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ होकारार्थी.
आहे काय ?
(5) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
... 4 ...
... 4 ...
// कारणे व निष्कर्ष //
मुद्दा क्रमांक 1 ते 4 :–
7. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला यात वाद नाही. विद्युत पुरवठयाचे देयक अर्जदार नियमित भरत होता. अर्जदार त्याचे निवासस्थानी राहात नसतांना, मिटर ‘नो युज’ म्हणून गैरअर्जदाराला कळविले होते. त्यानुसार, सन 2006 पासून रुपये 30/- चे देयक प्राप्त होत होते ते अर्जदार नियमित भरत होता. दिनांक 21/8/2008 ला रुपये 30/- शेवटचे देयक भरले. त्यानंतर माञ दुस-याच मिटरचे छायाचिञ देवून 124 युनिट दाखवून जुलै रुपये 340/-, ऑगष्ट रुपये 730/-, सप्टेंबर रुपये 1,130/-, ऑक्टोंबर रुपये 1,560/- चे देयक अर्जदारास प्राप्त झाले. तक्रार दाखल केली, परंतू दखल घेतल्या गेली नाही.
8. गैरअर्जदाराने, फोटो चूक असल्याचे कबूल केले. मिटर नो युज मध्ये आहे, मान्य केले. अॅव्हरेज (सरासरी) बिल दिले ते डिसेंबरच्या बिलात दुरुस्त करुन दिले. संबंधित एजन्सीला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली.
9. अर्जदाराने नियमितपणे ‘नो युज’ चा बिल जुन 2008 पर्यंत देयक दिनांक 8/8/2008 प्रमाणे रुपये 30/- प्रमाणे भरणा केलेला आहे. परंतू, त्यानंतर गैरअर्जदार यांनी बेकायदेशिरपणे, योग्य शहानिशा न करता, एजन्सीच्या चूकीच्या अहवालावरुन सरासरी देयक दिले असल्याचे दाखल बिलावरुन दिसून येते. सदर अवाजवी बिलाची रक्कम भरण्यास अर्जदार पाञ नाही. त्यामुळे, ते खारीज करणे न्यायोचित होईल. अर्जदाराने शेवटचा बिल भरणा केला, त्यानंतर नियमाप्रमाणे, नो युज चे बिल प्रतिमाह रुपये 30/- प्रमाणे आजतागायत भरण्यास पाञ आहे. तशी, बिलात दुरुस्ती करुन, गैरअर्जदाराने बिल द्यावे व त्या थकीत बिलावर कोणताही व्याज, दंड घेऊ नये, असे या न्यायमंचाचे मत आहे.
... 5 ...
... 5 ...
10. गैरअर्जदाराने आपले तोंडी युक्तीवादात असे सांगीतले की, अर्जदाराने, आमचेकडील अंतर्गत तक्रार निवारण सेल कडून दाद न मागता, सदर तक्रार दाखल केले आहे, ती योग्य नाही. गैरअर्जदारार यांचे हे म्हणणे संयुक्तीक नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-3 नुसार, अर्जदार या न्यायमंचा मार्फत दाद मागू शकतो, असे या न्यायमंचाचे मत आहे.
11. गैरअर्जदार यांनी तोंडी युक्तीवादात असे सांगीतले की, कनिष्ठ अभियंता यांचेकडून ‘नो युज’ बाबत चौकशी केले असता, तसा त्यांनी रिपोर्ट दिला. गैरअर्जदार यास कनिष्ठ अभियंता यांचा रिपोर्ट प्राप्त होऊन सुध्दा, अर्जदाराचा बिल दुरुस्ती करुन दिला नाही, ही गैरअर्जदार यांचे सेवेतील न्युनता असल्याचे स्पष्टपणे सिध्द होतो.
12. यासंबंधात, अर्जदाराला नाहक ञास सहन करावा लागला. त्याला मानसिक संताप आलयाने, सदर तक्रार दिनांक 11/12/2008 ला दाखल केली. ग्राहक सरंक्षण कायद्याच्या कलम 24-ए नुसार तक्रार ही मुदतीत आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. गैरअर्जदाराने, अर्जदारास तक्रार दाखल केल्यानंतरही कार्यवाही उशिरा केल्याने, मानसिक ञास सहन करावा लागला. गैरअर्जदाराने, डिसेंबर 2008 चे बिलात दुरुस्ती करुन दिली. परंतू, त्याचा मानसिक ञासाचे काय ? असा प्रश्न पडतो. गैरअर्जदाराने, अर्जदारास योग्यप्रकारे सेवा दिली नाही. अर्जदारास, मानसिक, शारीरीक ञास दिला त्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, मुद्दा क्रमांक 1 ते 4 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 5 :–
13. वरील मुद्दा क्रमांक 1 ते 4 चे विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
... 6 ...
... 6 ...
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदाराने दिलेले जुलै 2008 पासूनचे बिल रद्द करण्यात
येत आहे.
(3) गैरअर्जदाराने जुलै 2008 पासून आजपर्यंत नो युज चे रुपये
30/- प्रमाणे बिल आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत तयार करुन द्यावे, त्यावर कुठलाही व्याज, दंड लावू नये.
(4) अर्जदाराने, गैरअर्जदार यांचेकडून नो युज चे बिल प्राप्त
झाल्यानंतर 15 दिवसांचे आंत भरणा करावे.
(5) अर्जदारास, मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2,000/-
आणि तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(6) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :– 12/02/2009.