निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 20/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 20/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 04/02/2014
कालावधी.01वर्ष.10 महिने.15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
बी.एन.रेड्डी. अर्जदार
वय 65 वर्षे,धंदा.घरकाम. अॅड.ए.डी.खापरे.
रा.वैभव नगर,परभणी.ता.जि.परभणी.
विरुध्द
1 उपकार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंम्पनी अॅड.एस.एस.देशपांडे.
(सोईस्तव वीज कंपनी) जिंतूररोड, परभणी.जि.परभणी.
2 उप अभियंता,फ्युज कॉल सेंटर, आहुजा संकुलाचे बाजुला,
वसमत रोड,परभणी.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घरगुती वापरासाठी विद्युत कनेक्शन घेतले होते, ज्याचा ग्राहक क्रमांक 530010148111 आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने सन 2010 पासून वेळोवेळी नियमीत विद्युत देयकाचा भरणा गैरअर्जदाराकडे केलेला आहे, परत अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने डिसेंबर 2010 ते फेब्रवारी 2012 पर्यंतचे बिले गैरअर्जदाराकडे भरलेले आहेत. अर्जदाराचा विज आकार देयक महिना ऑगस्ट 2011 चे देयक चालू रिडींगचे उता-यात 11325 नमुद आहे. हे बिल अर्जदारास मान्य असून वादाचा मुद्दा रिडींगची नोंद आहे. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराची रिडींग साखळी 10,000/- अशी आहे, तर गैरअर्जदाराने बेकायदेशिरपणे ती साखळी 20,000 गृहीत धरुन बिले दिले ते चुकीचे आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2012 चे चुकीच्या पध्दतीने बिले दिली. त्याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 15/03/2012 रोजी आपली लेखी तक्रार दिली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, फेब्रुवारी 2012 चे बिल रद्द ठरवण्यात यावे, व सदरचे बिल अर्जदारास दुरुस्त करुन देण्याचा आदेश व्हावा व तसेच गैरअर्जदाराने मानसिक व शारिरीक त्रासापोटी 15,000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 6 वर पुराव्याबाबत 15 कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये दिनांक 25/02/2012 चे बिल, 23/01/2012 चे लाईट बिल, 22/12/2011 चे लाईट बिल, 26/11/2011 चे बिल, 27/09/2011 चे बिल, 25/08/2011 चे बिल, 26/07/2011 चे बिल, 26/06/2011 चे बिल, 03/06/2011 चे बिल, 07/04/2011 चे बिल, 31/01/2011 चे बिल, 05/02/2011 चे बिल, 05/01/2011 चे बिल 15/03/2012 चे लेजर शीट (CPL) 2010 ते 2012 पर्यंतचे, दिनांक 15/03/2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेला तक्रार अर्ज कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपले लेखी निवेदन सादर केले व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे, गैरअर्जदाराने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, व सर्व विज बिले प्रत्यक्ष रिडींग प्रमाणेच दिलेली आहेत. व प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचा विज वापर हा 0.40 KW इतका आहे. तसेच अर्जदाराने सर्व विद्युत बिलाचा भरणा वेळेवर केला असता तर अचानक मोठे बिल आलेच नसते. अर्जदारास प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणेच विज बिले दिलेली आहेत. अर्जदाराचे घर बंद असायचे त्यावेळी गैरअर्जदारास पर्याय नसल्यामुळे काही बिले सरासरी द्यावी लागली, परंतु अर्जदाराची मिटरची प्रत्यक्ष रिडींग मिळाल्यानंतर सरासरीचे बिले वजा करुन प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणेच दिलेली आहेत. त्यामुळे मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफीयतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2012 चे चुकीचे
बिल आकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, गैरअर्जदाराने फेब्रुवारी 2012 चे चुकीचे मिटर रिडींग दाखवुन अर्जदारास अवाजवी बिल दिले आहे काय ? या बाबत अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वरील कागदपत्रा मधील नि.क्रमांक 6/13 वरील डिसेंबर 2010 चे बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10095 व चालु रिडींग 10225 दाखवीले आहे, नि.क्रमांक 6/12 वरील जानेवारी 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10225 व चालु रिडींग 10290 दर्शविले आहे, नि.क्रमांक 6/11 वरील फेब्रुवारी 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10290 व चालु रिडींग 10367 दर्शविले आहे, नि.क्रमांक 6/10 वरील मार्च 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10367 व चालु रिडींग 10462 दर्शविलेले आहे, नि.क्रमांक 6/9 वरील मे-2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10661 दर्शवुन चालू रिडींग RNA दाखविली आहे, नि.क्रमांक 6/8 वरील जुन 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10661 व चालु रिडींग Locked दाखविले आहे, नि.क्रमांक 6/7 वरील जुलै 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 10661 व चालु रिडींग 11116 अशी दाखविली आहे, नि.क्रमांक 6/6 वरील ऑगस्ट 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 11116 व चालु रिडींग 11325 दाखविली आहे, नि.क्रमांक 6/5 वरील सप्टेंबर 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडंग 11325 चालु रिडींग Locked दाखविले आहे, नि.क्रमांक 6/4 वरील नोव्हेंबर 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील 11379 व चालु रिडींग Locked अशी दर्शविली आहे, नि.क्रमांक 6/3 वरील डिसेंबर 2011 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 11379 व चालु रिडींग Locked अशी दाखवीली आहे, नि.क्रमांक 6/2 वरील जानेवारी 2012 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 11379 व चालु रिडींग Inaccess दाखविली आहे, व मुख्य वादाचे बिल नि.क्रमांक 6/1 वरील फेब्रुवारी 2012 च्या बिलाचे अवलोकन केले असता मागील रिडींग 11379 व चालु रिडींग 22120 असे एकुण सदर महिण्याचा 10741 युनिटचा विज वापर दाखवुन 1,06,530/- रु. चे लाईट बिल गैरअर्जदाराने अर्जदारास दिल्याचे दिसून येत आहे. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरचे लाईट बिल चुकीचे आहे व ते दुरुस्त करुन द्यावे, याबाबत लेखी तक्रार केली होती, ही बाब नि.क्रमांक 7 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. सदरचे फेब्रुवारी 2012 चे लाईट बिल एकदम चुकीच्या पध्दतीने गैरअर्जदाराने अर्जदारास दिले असे प्रथमदर्शनी मंचास वाटते, कारण एकदम एकाच महिन्यात 10741 युनिटचा वापर घरगुती वापरासाठी होते, हे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने दाखल केलेल्या बिलाचे अवलोकन केले असता अर्जदाराने जानेवारी 2012 पर्यंत लाईट बिले गैरअर्जदाराकडे भरले आहेत, हे नि.क्रमांक 6/1 वर दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 14 वर लेखी जबाबात केवळ मोघमपणे योग्य लाईट बिले दिली आहेत असे म्हंटले आहे, व याबाबत कसलाही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर आणला नाही, निश्चितपणे गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2012 चे लाईट बिल चुकीचे रिडींग दर्शवुन अयोग्य बिल दिले हे सिध्द होते. व
गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले फेब्रुवारी 2012 चे लाईट बिल रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पुढील दोन
महिन्याचे अर्जदाराचे मिटर रिडींग घेवुन अर्जदारास सदर रिडींगच्या प्राप्त
झालेल्या नवीन रिडींग नुसार अर्जदारास 01 महिन्याचे Average Bill काढून
फेब्रुवारी 2012 चे सुधारीत लाईट बिल करुन द्यावे
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.