(मंचाचे निर्णयान्वये, श्री रत्नाकर ल.बोमीडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 30 ऑक्टोंबर 2010)
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, गैरअर्जदार यांनी रिडींगप्रमाणे योग्य पध्दतीने तीनही बिलामध्ये दुरुस्ती करुन व जुन ते सप्टेंबर 2009 व सप्टेंबर ते डिसेंबर 2009 च्या भरलेल्या बिलामधून वजा करुन बिल मिळविण्याकरीता ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय खालील प्रमाणे.
2. अर्जदार हा येंगलखेडा, ता.कुरखेडा, जिल्हा - गडचिरोली येथील रहिवासी असून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक आहे. त्याचेकडे 1001569398 क्रमांकाचे मीटर आहे. त्यात बिघाड आल्यामुळे त्याच्या तक्रारीनुसार लाईनमनने ते मीटर दि.29.5.09 ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मालेवाडा येथे जमा केले. तेंव्हा, शेवटची रिडींग 1340, मागील रिडींग 1228 नुसार 112 युनीट वापर
... 2 ... (ग्रा.त.क्र.21/2010)
झाला तरी अंदाजे बिल 168 युनीटचे वापर दाखवून 540 रुपयाचे बिल आले ते पूर्णपणे त्याने भरले.
3. दिनांक 16.6.09 ला 9010836101 क्रमांकाचे नविन मीटर 0.2 रिडींगवर लावून देण्यात आले. त्याचा तक्रारीनुसार जुन 09 ते सप्टेंबर 09 चे बिलात 47 युनीट सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 चे बिलात 558 जुन्याच मीटर नुसार व डिसेंबर 09 ते मार्च 10 चे बिलात 183.788 नविन मीटर नुसार युनिट अधिक दाखविले आहे.
4. जुन 09 ते सप्टेंबर बिल घेूवन अर्जदार म.रा.वि.वि.कं. मालेवाडा येथे गेले असता, तेथील कर्मचा-याने रिप्लेसमेंट रिपोर्ट 30.6.09 ला पाठविला. परंतु, कुरखेडा कार्यालयाने नविन मीटरची नोंद केली नाही, म्हणून अंदाजे बिल पाठविले, पुढील बिल बरोबर येईल, सदर बिल भरुन टाका असे सांगीतले, 600/- रुपयाचे बिल भरले. त्यानंतर, सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 चे बिल आले, त्यातही जुनेच मीटर क्रमांक होते. त्यानुसार फोटो रिडींग 185 आहे. त्यात चालु रिडींग 1850 दाखवून 622 युनिटचे बिल देण्यात आले. ते बिल दुरुस्तीसाठी मालेवाडा येथे 2 वेळा चकरा माराव्या लागल्या नंतर सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 च्या आधीचे मागील 5 बिलाचे झेरॉक्स आणण्यास सांगीतले ते घेवून गैरअर्जदार 3-4 दिवस मालेवाडा येथे जात होता, परंतु कोणीही भेटत नव्हते, शेवटी तेथील कर्मचा-याने बिल दुरुस्तीचा अर्ज लिहून कुरखेडा येथील कार्यालयात जाण्यास सांगीतले.
5. म.रा.वि.वि.कं. कुरखेडा येथील कर्मचा-याने अर्ज स्विकारुन 8 दिवसानंतर येण्यास सांगीतले. आठ दिवसांनंतर तेथे गेले असता, चिडून थातुर-मातुर उत्तर दिले, कितीही ञास घेशील तरी बिल दुरुस्त होणार नाही. यावेळी, थोडीफार रक्मक भर व मार्च 2010 चे बिलामध्ये रिडींग प्रमाणे दुरुस्ती करुन मिळेल व 400/- रुपयाचे बिल बनवून दिले, ते भरले. त्यानंतर, मार्च 2010 चे बिल आले. त्यात दि.26.6.09 पासून मार्च 2010 पर्यंत वापरलेल्या संपूर्ण युनिटचे बिल देण्यात आहे व मागील चुकीच्या बिलातील बाकी असलिेली रक्कम डेबीट जोडण्यात आली. ते बिल घेवून चुकीच्या दुरुस्तीसाठी मालेवाडा व कुरखेडा येथे 4-5 वेळा चकरा मारुन बिल दुरुस्त करुन न दिल्यामुळे, झालेल्या अन्याया विरोधात ग्राहक न्यायमंचामध्ये तक्रार दाखल केली. जुन ते सप्टेंबर 09 व सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 चा भरलेल्या बिलामधून वजा करुन नविन बिल मिळण्याची मागणी केली.
6. अर्जदाराने, तक्रारीसोबत नि.क्र.3 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आल्या. गैरअर्जदारांनी नि.क्र.8 नुसार लेखी बयाण दाखल केले.
7. त्यांच्या लेखी बयाणानुसार मुखरु लुल्या पुराम, येंगलखेडा, ता.कुरखेडा यांचा मीटर क्र.1001569398 ची शेवटची रिडींग 1340 KW होती त्यांना जुन 09 ते सप्टेंबर 09 चे बिल RNA देण्यात आले, ते 168 युनीट दिले होते. ही दोन्ही बिले RNA ची दिल्यामुळे, त्यांना डिसेंबर 09 चे बिलात एकुण 946.41 वजावर देण्यात आली आहे. डिसेंबर 09 चे बिलामध्ये शेवटची रिडींग 1850 KW व मागील रिडींग 1228 दाखवून 622 युनीटचे बिल दिले होते. मीटर बदलते वेळी शेवटचे रिडींग 1340 KW
... 3 ... (ग्रा.त.क्र.21/2010)
होते. त्यामुळे, ग्राहकास 510 युनीटचे जादा बिल देण्यात आले होते, ते दुरुस्त केले आहे. पुढील बिलामध्ये वजावट करण्यात येर्इल.
8. मार्च 2010 चे बिल हे चालु रिडींग 259 KW व मागील युनिट 2 KW असे 257 युनिटचे बिल देण्यात आले. त्यामध्ये, मीटर बदलले दिसून येते, ते योग्य आहे.
9. कनिष्ठ अभियंता, मालेवाडा यांनी रिप्लेसमेंट रिपोर्ट 30.6.09 ला पाठविला होता. उपविभाग कुरखेडा येथे कर्मचारी कमी असल्यामुळे व कामाचा व्याप जास्त असल्याने ते रिल्पेसमेंट पुढील बिलामध्ये दुरुस्त करण्यात आले.
10. रिडींग घेणा-या एजंन्सीने सदर ग्राहकाची डिसेंबर 09 च्या बिलातील चालु रिडींग 1850 KW दाखविण्यात आले, ग्राहकाला चुकीचे बिल देण्यात आले होते व चुकी करीता रिडींग घेणा-या एजन्सीला दंड लावण्यात आलेला आहे.
11. अर्जदाराने, शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने, संधी देवूनही शपथपञ दाखल केले नाही. त्यामुळे, शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यात आला. अर्जदाराने, युक्तीवाद केला. परंतु, संधी देवूनही गैरअर्जदाराने युक्तीवाद केला नाही.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व अर्जदाराने दाखल केलेले शपथपञ व युक्तीवाद यावरुन खालील कारणो व निष्कर्ष काढता येतात.
// कारणे व निष्कर्ष //
12. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा मीटर क्र. 1001569398 यामध्ये दोष होता, म्हणून अर्जदाराने 29.5.09 ला तक्रार केल्यामुळे, मीटर कंपनीच्या लाईनमनने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कार्यालय मालेवाडा येथे जमा केले. तेंव्हाच्या रिडींग नुसार जुन 09 ते सप्टेंबर 09, सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 व डिसेंबर 09 ते मार्च 10 चे बिलात अनुक्रमे युनिट 47, युनिट 558 व युनिट 183.788 जादा युनिट दाखविले आहे. तसेच, 26.6.09 ला नविन मीटर क्र.9010836101 हा मीटर 0.2 रिडींग लावून देण्यात आला. परंतु, जुन 09 ते सप्टेंबर 09 व सप्टेंबर 09 ते डिसेंबर 09 चे बिल जुन्याच मिटर क्र.9001569398 नुसार देण्यात आल्याचे स्पष्ट होते, ही सेवेतील ञुटी आहे.
13. बिल दुरुस्त करण्यासाठी, अर्जदाराने वारंवार मालेवाड व कुरखेडा येथे चकरा माराव्या लागल्या, कर्मचा-यांकडून अरेरावीची उत्तरे मिळत गेल्याने, अर्जदारास मानसिक झाला.
14. गैरअर्जदार आपले लेखी बयाणात म्हणतात की, डिसेंबर 09 चे बिलामध्ये शेवटचे रिडींग 1850 KW व मागील रिडींग 1228 दाखवून 622 युनिटच्या वापराचे बिल दिले होते. ग्राहकाचे मीटर बदलतेवेळी शेवटची रिडींग 1540 KW होते, त्यामुळे ग्राहकाची 510 युनीटचे जादा बिल देण्यात आले होते, हे मान्य केले. तसेच, रिप्लेसमेंट
... 4 ... (ग्रा.त.क्र.21/2010)
रिपोर्ट 30.6.09 पाठविला होता. परंतु, कुरखेडा येथे कमी कर्मचारी असल्यामुळे दुरुस्त करण्यास विलंब झाल्याचे ही त्यांनी मान्य केले. यावरुन, गैरअर्जदाराचे सेवेत न्युनता असल्याचे दिसून येते.
15. सदर चुक रिडींग घेणा-या एजन्सीने केलेली असल्याने, त्या एजंन्सीला दंड लावण्यात आला. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सेवेत अक्षम्य ञुटी आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
16. ह्या सर्व बाबीमुळे अर्जदारास मानसिक, शारिरीक, आर्थिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे, अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे.
अर्जदाराची तक्रार अशंतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराने, भरलेली जादा रक्कम येणा-या बिलातून वजा करुन
सुधारीत बिल देण्यात यावे.
(2) गैरअर्जदार यांनी, शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी
रुपये 5,000/- नुकसान भरपाई अर्जदारास द्यावे.
(3) वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी, आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(4) आदेशाची प्रत उभयतांना देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/10/2010.