::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा. सदस्या)
(पारीत दिनांक :- 21/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, स्टेट बॅंक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफीस या दोघांनी मिळून बल्लारपूर येथे एस बी आय टायनी नावाची एक स्किम चालविली. सदर स्किम मध्ये अर्जदाराने फॉर्म भरुन सहभाग घेतला होता. सदर स्किम फॉमिलिटी पूर्ण झाल्यावर अर्जदार याचे दि. 17/2/08 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडिया व पोष्ट आफॅीस यांच्या तर्फे अर्जदार यांना खात्याबद्दलचे कार्ड इशु करण्यात आले होते. सदर खात्यात अर्जदाराने एकूण 50,000/- जमा केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून पैसे काढण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास गैरअर्जदार क्रं. 2 कडे संपर्क करण्यास सांगितले. अर्जदाराने ब्रॅंच मॅनेजर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांना भेटले व सदर खात्याबद्दलचे संपूर्ण दस्ताऐवज दाखवून दि. 18/01/13, 04/03/13 आणि दि. 24/01/14 रोजी लेखीस्वरुपात पैसे मिळण्यासाठी अर्ज केले. परंतु स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी पोष्ट ऑफीस मध्ये पैसे जावून काढण्यास सांगितले व तसे पञ दिले. सदर पञासोबत पोष्ट ऑफिस बल्लारपूर येथे संपर्क साधल्यानंतर असे कळविण्यात आले कि, सदर स्कीमचे उपकरण रकमा व स्टेट बॅंक ऑफ इंडिया चे हवाले करुन दिले आहे सर्व व्यवहार स्टेट बॅंक ऑफ इंडिया करीत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदर रक्कम घेवून ब-याचवेळा मागणी करुन सुध्दा अर्जदाराला रक्कम देण्यात आली नाही म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली रक्क्म रु. 50,000/- 15 टक्के व्याजाने गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे आादेश व्हावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 2 ला नोटीस मिळून सुध्दा सदर प्रकरणात हजर न झाल्यामुळे नि. क्रं. 1 वर दि. 13/08/14 रोजी प्रकरण गैरअर्जदार क्रं. 2 च्या विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रं. 1 हे हजर होवून नि. क्रं. 06 वर आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत केलेले गैरअर्जदार क्रं. 2 चे विरुध्द सर्व आरोप खरे असून गैरअर्जदार क्रं. 2 ने गैरअर्जदार क्रं. 1 पासून वरील नमुद असलेल्या स्किम अंतर्गत केलेला व्यवहारामधील वापरलेली मशीन दि. 22/03/12 चे पञ देवून परत मागण्यात आले होते. सदर व्यवहारातील कोड नसल्यामुळे व त्याची गैरअर्जदार क्रं. 2 कडून मागणीकरुन सुध्दा त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही व सदर व्यवहारातील आलेली रक्कम त्याच दिवशी गैरअर्जदार क्रं. 2 च्या खात्यात जमा करण्यात आली होती. म्हणून अर्जदाराचे असे म्हणणे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ने सदर व्यवहाराच्या रकमेचे गैरवापर केले हे चुकीचे आहे. गैरअर्जदार क्रं. 2 सदर विषयावर कोणतीही कार्यवाही केली नाही.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. 1 चे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा
अवलंब केला आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. स्टेट बॅंक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफीस या दोघांनी मिळून बल्लारपूर येथे एस बी आय टायनी नावाची एक स्किम चालविली. सदर स्किम मध्ये अर्जदाराने फॉर्म भरुन सहभाग घेतला होता. सदर स्किम फॉमिलिटी पूर्ण झाल्यावर अर्जदार याचे दि. 17/2/08 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडिया व पोष्ट आफॅीस यांच्या तर्फे अर्जदार यांना खात्याबद्दलचे कार्ड इशु करण्यात आले होते. सदर खात्यात अर्जदाराने एकूण 50,000/- जमा केलेली आहे. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 ला मान्य असल्याने व अर्जदाराने दाखल दस्तऐवजावरुन हे सिध्द होते कि, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. गैरअर्जदार क्रं. 1 ने नि. क्रं. 6 सोबत दाखल दस्तऐवजाचे अवलोकन करतांना असे दिसले कि, अर्जदाराने वरील नमुद असलेल्या स्किम मध्ये गैरअर्जदारांकडे पैसे जमा केले होते सदर स्किमच्या अटी व शर्ती नुसार गैरअर्जदार क्रं. 1 चे कार्यालयाने जमा कर्त्यांकडून रक्कम स्विकारुन गैरअर्जदार क्रं. 2 चे खात्यात जमा करायची होती व त्यासंबंधी अहवाल गैरअर्जदार क्रं. 2 कडे पाठवायचा होता. तसेच सदर रक्क्म जमा करतांना देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रं. 2 ची होती. गैरअर्जदार क्रं. 2 ने नोटीस मिळून सुध्दा गैरहजर राहीले व कोणतेही वादातील संदर्भात उत्तर किंवा बचावपक्ष सादर केले नाही म्हणून मंचाच्या मताप्रमाणे अर्जदाराने त्याचे शपथपञ व गैरअर्जदार क्रं. 1 ने दाखल जबाबामधून हे सिध्द केलेले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराची जमा केलेली रक्कम न देवून अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दर्शविली आहे व अनुंचित व्यापार पध्दतीची अवलंबना केली आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 2 च्या व्यवहारामध्ये मध्यस्थी म्हणून भुमिका निभावली असून गैरअर्जदार क्रं. 1 चे विरुध्द कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं.2 ने अर्जदाराची जमा केलेली रक्कम रु. 50,000/- जमा
केलेल्या तारखेपासून 12 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून
45 दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदार क्रं. 2 ने
रु.5,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(4) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015