द्वाराश्रीमतीप्रतिभाबा.पोटदुखे, अध्यक्षा–
अर्जदारांनी दाखलकेलेल्याग्राहकतक्रारी मध्ये गैरअर्जदार हे सारखेच असल्यामुळे व तक्रारीचाविषय सुध्दा सारखा असल्यामुळे एकाच आदेशाप्रमाणे सदर ग्राहक तक्रारी या निकाली काढण्यात येत आहेत. अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारींचा आशयअसाकी,..................................
1. गैरअर्जदारांनी सब मल्टी सर्व्हीसेस एण्ड मार्केटींग प्रा.लि. गोंदिया या नावाची कंपनी सुरु केली, त्याचा रजि.नं. 51310 एमएच 03 पीटीसी 139792 आहे. गैरअर्जदार क्रं. -1 ते 4 हे त्या कंपनीचे डायरेक्टर आहेत.
2. गैरअर्जदार कंपनीने छापील पुस्तिका, हॅन्ड बिल व वर्तमान पत्रात जाहिरात देऊन त्यांच्या विविध योजनेबद्दल माहिती जनतेला दिली व त्यांना स्वतःच्या व्यवसायात पैसे गुंतविण्याकरिता प्रवृत्त केले.
3. या योजनेप्रमाणे जर ग्राहकाने रुपये 200/- कंपनीला देऊन सदस्यत्व घेतले तर त्याला कंपनी तर्फे ओळख क्रं. दिला जात होता व ग्राहकाला कंपनीचे उत्पादन बुक करण्याची संधी मिळायची कंपनीच्या मासिक उत्पन्न योजनेप्रमाणे ज्या ग्राहकाला ओळख क्रमांक प्राप्त झाला आहे, त्यांनी रुपये200/- देणारे 3 सदस्य बनविणे जरुरी होते. तसेच त्या 3 सदस्यांनी सुध्दा प्रत्येकी रुपये 200/- देणारे 3 सदस्य बनविणे गरजेचे होते. अशा प्रकारे 364 सदस्यांची एक साखळी तयार करावयाची होती. ज्या ग्राहकाने अशा 364 सदस्यांची साखळी पूर्ण केली त्याला रुपये 84,800/- मिळतील अशी ही योजना होती. कंपनीने ग्राहकांना सोबत असे सुध्दा अभिवचन दिले होते की, कंपनीच्या एक महिन्याच्या उलाढालीचा 1% भाग ग्राहकाला मिळेल. अनेक अर्जदारांनी 364 शृखंला पूर्ण करण्याकरिता स्वतःच हजारो रुपये रक्कम भरली.
4. अशा त-हेने अनेक ग्राहकांनी पैसेचा भरणा करुन सुध्दा गैरअर्जदारांनी त्यांनी कंपनी तर्फे कोणतेही उत्पादन दिले नाही अथवा परिपक्व रक्कम सुध्दा दिली नाही.
5. अशा पध्दतीने गैरअर्जदारांनी आम जनतेची फसवणूक करुन त्यांच्याकडून त्यांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे हडप केले आहेत.
6. अर्जदारांनी अनेक वेळा गैरअर्जदार कंपनीच्या डायरेक्टर्सनां व डेपो मॅनेजरला भेटून व दूरध्वनी द्वारे सुध्दा अनेक वेळा विचारणा केली. शेवटी गैरअर्जदारांनी अर्जदारांना करारनामा द्वारे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. या योजने मध्ये काही ग्राहकांनी रुपये 350/- ही रक्कम ओळख क्रं. मिळण्यासाठी भरली होती व सदस्यांची शृखंला पूर्ण करण्याकरिता स्वतःच पूर्ण रक्कम कंपनीकडे जमा केली होती. गैरअर्जदारांनी करारनामा करुन सुध्दा अर्जदारांना कबूल केल्याप्रमाणे रक्कम परत केली नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून गैरअर्जदार यांनी पैसे परत न केल्यामुळे त्यांच्या सेवेत न्यूनता आहे असे ठरवून अर्जदारांनी भरलेली रक्कम व्याजासहीत परत करण्याचा आदेश व्हावा अशी मागणी अर्जदारांनी ग्राहक तक्रारी मध्ये केली आहे.
7. गैरअर्जदार यांचा क्रमांक हा प्रत्येक ग्राहक तक्रारीमध्ये वेगळा आहे. अनेक ग्राहक तक्रारी मध्ये काही गैरअर्जदार यांना नोटीस तामिल झालेली नाही. गैरअर्जदारांनी ग्राहक तक्रारींचे उत्तर देतांना असे म्हटले आहे की, गैरअर्जदारांनी सब मल्टी सर्व्हीसेस अण्ड मार्केटींग प्रा.लि. गोंदिया अशी कंपनी स्थापन केलेली नाही. अर्जदारानकडून ओळख क्रं. देण्याकरिता व सदस्याची शृखंला पूर्ण करण्याकरिता कोणतीही रक्कम घेण्यात आलेली नाही. अर्जदारांनी दाखल केलेली कागदपत्रे ही बनावट स्वरुपाची आहेत. अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारी मध्ये असे नमूद केले आहे की, त्यांनी कंपनीचे एजन्ट म्हणून काम केले आहे. तक्रारकर्ते हे ग्राहक नसल्यामुळे विद्यमान न्याय मंचास सदरहू प्रकरणे चालविण्याचा अधिकार नाही. सदर तक्रारी हया दिवाणी न्यायालयात चालविल्या जाव्यात अशा स्वरुपाच्या आहेत. अर्जदारांनी खोटया तक्रारी दाखल केल्यामुळे त्या खारीज होण्यास पात्र आहेत.
8. अर्जदारांनी गैरअर्जदारांकडे भरलेली रक्कम, दाखल केलेली कागदपत्रे व गैरअर्जदारांना नोटीस तामील झाल्याबद्दलची माहिती येणेप्रमाणे.
अ.क्र. | ग्राहक तक्रार क्रमांक | गैरअर्जदारांना नोटीस तामिल झाला नाही त्यांची नावे | अर्जदाराने गैरअर्जदारांकडे भरलेली कथित रक्कम | अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची स्थिती |
01 | 38/04 | वसंत व व्यंकटेश | रु.24,200/- | पैसे भरल्याच्या पावत्या रेकॉर्डवर नाहीत. अर्जदारांतर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे त्यांनी गैरअर्जदारांकडे पैसे भरले हे दाखविण्यास पुरेशी नाहीत. |
02 | 39/04 | वसंत, क्रिष्णाजी, व्यंकटेश | रु.24,200/- | -----‘’----- |
03 | 40/04 | वसंत व क्रिष्णाजी | रु.24,200/- | --------’’’-------- |
04 | 41/04 | क्रिष्णाजी व व्यंकटेश | रु.24,200/- | --------’’’-------- |
05 | 42/04 | क्रिष्णाजी व वसंत व व्यकंटेश | रु.24,200/- | --------’’’-------- |
06 | 43/04 | क्रिष्णाजी, वसंत व व्यंकटेश | रु.80,800/- | गैरअर्जदार कंपनीच्या नांवे काही डी.डी.च्या झेरॉक्स रेकॉर्डवर आहेत. करारनाम्याची झेरॉक्स रेकॉर्डवर आहे. मात्र त्यात ग्राहक तक्रारकर्त्याचे नांव नमूद नसून फक्त ठेवीदार असा उल्लेख आहे. |
07 | 44/04 | वसंत, व्यंकटेश व क्रिष्णाजी | रु.24,200/- | पैसे भरल्याच्या पावत्या रेकॉर्डवर नाहीत. अर्जदारा तर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे त्यांनी गैरअर्जदाराकडे पैसे भरले हे दाखविण्यास पुरेशी नाहीत. करारनाम्याची झेरॉक्स रेकॉर्डवर आहे मात्र त्यात ग्राहक तक्रारकर्त्याचे नांव नमूद नसून फक्त ठेवीदार असा उल्लेख आहे. |
08 | 45/04 | क्रिष्णाजी, वसंत व व्यंकटेश | रु.24,200/- | पैसे भरल्याच्या पावत्या रेकॉर्डवर नाहीत. अर्जदारातर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे त्यांनी गैरअर्जदाराकडे पैसे भरले हे दाखविण्यास पुरेशी नाहीत. |
09 | 46/04 | क्रिष्णाजी, वसंत व व्यंकटेश | रु.8,000/- | --------’’’-------- |
10 | 47/04 | क्रिष्णाजी, वसंत व व्यंकटेश | रु.24,200/- | --------’’’-------- |
11 | 48/04 | क्रिष्णाजी व व्यंकटेश | रु.8,000/- | --------’’’-------- |
12 | 49/04 | क्रिष्णाजी व वसंत | रु.72,800/- | --------’’’-------- |
13 | 50/04 | क्रिष्णाजी व व्यंकटेश | रु.24,200/- | --------’’’-------- |
14 | 56/04 | वसंत व व्यंकटेश | रु.24,200/- | अर्जदाराने पैसे भरल्याच्या मुळ पावत्या रेकॉर्डवर दाखल केल्या आहेत. |
15 | 57/04 | क्रिष्णाजी, वसंत व व्यंकटेश | रु.72,800/- | पैसे भरल्याच्या पावत्या रेकॉर्डवर नाहीत. अर्जदारातर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे त्यांनी गैरअर्जदाराकडे पैसे भरले हे दाखविण्यास पुरेशी नाहीत |
16 | 58/04 | वसंत व व्यंकटेश | रु.24,200/- | --------’’’-------- |
17 | 59/04 | वसंत व व्यंकटेश | रु.8,000/- | --------’’’-------- |
18 | 60/04 | वसंत व व्यंकटेश | रु.8,000/- | --------’’’-------- |
19 | 37/05 | व्यंकटेश व वसंत | रु.56,350/- | रु.71,600/- व रु.47,000/- च्या गैरअर्जदार कंपनीच्या नांवे काही डी.डी.च्या झेरॉक्स रेकॉर्डवर आहेत. करारनाम्याची झेरॉक्स रेकॉर्डवर आहे. मात्र त्यात ग्राहक तक्रारकर्त्याचे नांव नमूद नसून फक्त ठेवीदार असा उल्लेख आहे. |
20 | 38/05 | वसंत व व्यंकटेश | रु.18,550/- | --------’’’-------- |
21 | 39/05 | व्यंकटेश | रु.18,550/- | --------’’’-------- |
22 | 40/05 | व्यंकटेश | रु.42,350/- | --------’’’-------- |
9 दिनांक 19.12.2005 च्या विद्यमान न्याय मंचाच्या निर्णयानुसार गैरअर्जदार कांतीकुमार भोंदुजी ढेंगे व गैरअर्जदार भास्कर धोटे यांना प्रकरणातून वगळण्याचा आदेश पारित करण्यात आला. तसेच गैरअर्जदार निशिकांत भाऊराव मेश्राम यांचा मृत्यु झाल्यामुळे त्यांना वगळण्याचा आदेश दिनांक 04.09.2006 रोजी करण्यात आला. ब-याच प्रकरणात अनेक गैरअर्जदारांना अर्जदाराने नोटीस तामिल करण्याचा प्रयत्न सुध्दा केलेला नाही.
10 दिनांक 18.09.2006 रोजी विद्यमान न्याय मंचाने निशाणी क्रं. 1 वर आदेश पारित करुन अर्जदार यांना योजनेचे माहितीपत्रक, गैरअर्जदारां सोबतच्या करारनाम्याची प्रत व दिलेल्या रक्कमेच्या पावत्या रेकॉर्डवर दाखल कराव्यात असा आदेश केला होता. परंतु त्या आदेशाचे पालन करण्यात आले. नाही. ग्राहक तक्रार क्रमांक – 43/04, 44/04, 37/05, 38/05, 39/05 व 40/05 या तक्रारीमध्ये कारारनाम्याची प्रत रेकॉर्डवर आहे, मात्र यात ग्राहक तक्रारकर्त्याचे नांव नमूद नसून फक्त ठेवीदार असा उल्लेख आहे. ग्राहक तक्रार क्रं. 56/04 या प्रकरणात अर्जदाराने पैसे भरल्याच्या मुळ पावत्या रेकॉर्डवर दाखल केल्या आहेत. मात्र इतर प्रकरणात अशा पावत्या रेकॉर्डवर दाखल नाही. योजनेबाबत माहिती देणारी कागदपत्रे काही प्रकरणात रेकॉर्डवर दाखल आहेत.
11 ग्राहक तक्रार क्रमांक 37/05, 38/05, 39/05 व 40/05 या प्रकरणामध्ये अर्जदाराने, गैरअर्जदार कंपनीच्या नांवे काढलेलया रुपये 71,600/- व रुपये 47,000/- या डी.डी.ची झेरॉक्स रेकॉर्डवर आहे. ग्राहक तक्रार क्रमांक 43/04 मध्ये अनेक डी.डी. च्या झेरॉक्स रेकॉर्डवर आहेत. परंतु त्यांनी ग्राहक तक्रार अर्जात त्यापेक्षा कमी रक्कम दिलेली दाखविली आहे. इतर ही ग्राहक तक्रार अर्जांमध्ये गैरअर्जदार कंपनीकडे पैसे भरल्याची काही कागदपत्रे अर्जदारांनी दाखल केली आहेत. त्यातील अनेक कागदपत्रांवर गैरअर्जदारांच्या सहया नाहीत. ती ग्राहक न्याय मंचाच्या संक्षिप्त कार्य पध्दतीद्वारे निर्णय देण्याच्या दृष्टीने पुरेसी नाहीत.
12 गैरअर्जदारां तर्फे रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेल्या 1 (1992) सी.पी.जे. 30 (एन.सी.) मध्ये प्रकाशित झालेल्या देवाशिष मित्रा विरुध्द मॅनेजिंग डायरेक्टर, लक्ष्मी वर्षा कंपनी आणि इतर या प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, अर्जदांराची लक्ष्मी वर्षा कंपनी यात सदस्य म्हणून नोंदणी झाली व त्याला काही सेवा मिळण्याचा हक्क असेल जसा कंपनीची दुसरी कल्याण योजना ज्यात 100/- रुपये भरुन 1,50,000/- रुपये मिळू शकतात तरी सुध्दा अर्जदाराला ग्राहक म्हणून ग्राहक न्याय मंचात दाद मागण्याचा अधिकार नाही.
13 तसेच गैरअर्जदारांतर्फे दाखल करण्यात आलेल्या हरिष चंद्र अग्रवाल विरुध्द संजय गर्ग या 1995 (3) सी.पी.आर.512 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय राजस्थान राज्य आयोगाने प्रतिपादन केले आहे की, अर्जदार हा 200/- रुपये फी भरुन विक्री वाढ योजनेचा सदस्य झालेला असला तरी असे म्हणता येणार नाही की, त्याने कंपनीकडून सेवा घेतली आहे व तो ग्राहक आहे.
14 इंडियन फिटोचिम विरुध्द एस.के.बॅनर्जी या III (2004) सी.पी.जे. 227 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय उत्तरांचल राज्य आयोगाने असा निर्णय दिला आहे की, ग्राहक न्याय मंचानां फसवणूक व त्या द्वारे झालेले आर्थिक नुकसान याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नाही. कारण त्यामध्ये दिवाणी न्यायालया द्वारा सखोल चौकशीची गरज असते.
15 सदर तक्रारी मधील तक्रारकर्ता हे ग्राहक या व्याख्येत येत नाहीत व कायदा व तथ्य याबाबत गुंतागुंतीचे प्रश्न सदर प्रकरणात उद्भवलेले असल्यामुळे विद्यमान ग्राहक न्याय मंचाचे संक्षिप्त कार्य पध्दती द्वारे या प्रकरणांमध्ये निर्णय देणे हे शक्य नाही. अशा स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
अर्जदारांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारी खारीज करण्यात येत आहेत. मात्र त्यांना दिवाणी न्यायालय अथवा इतर सक्षम प्राधिकरणाकडे जाण्याची मुभा देण्यात येत आहे.
तसेच त्याप्रसंगी या न्यायमंचापुढे व्यतित केलेला वेळ मुदत कायद्याचे कलम – 14 अन्वये आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे ‘‘ लक्ष्मी इंजिनियरिंग विरुध्द पी.एस.जी. इंडस्ट्रीयल इन्स्टीटयुट ‘’’ 2 (1995) सी.पी.जे. 1 (एस.सी.) या प्रकरणातील निर्णयानुसार त्यांना वगळून घेता येईल.