Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/81

Sau Maya Manikrao Sahare - Complainant(s)

Versus

Sub Executive Engineer O & M Division M S E D C L Mohapa - Opp.Party(s)

Shri M J Sahare

19 Oct 2015

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/81
 
1. Sau Maya Manikrao Sahare
Occ. Service R/o 89 Dyaneshwar nagar Old Manewada Road Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sub Executive Engineer O & M Division M S E D C L Mohapa
MSEDCL Mohapa Tah kalameshwar
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

      (आदेश पारित व्दारा – श्रीमती मनिषा यशवंत येवतीकर,   मा. सदस्या )

    - आदेश –

      ( पारित दिनांक 14 आक्‍टोबर 2015 )

 

  1. तक्रारकर्त्याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची 23/4/2012 पासून ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्या शेतातील घराकरिता घरगुती वापराचे मिटर लावून दिले.त्याचा ग्राहक क्रमांक 420280001511 असा आहे. तक्रारकर्तीने डिसेंबर 2014 पर्यतचे विद्युत देयक

भरलेले आहे. परंतु जानेवारी 2015 ला विरुध्‍द पक्षाने 1119 युनिटचे संग्रहित विज देयक रुपये 3450 चे तक्रारकर्तीला दिले कारण विरुध्‍द पक्षाने मागील 14 महिन्यापासून सरासरी 57 युनिटचे विज देयक तक्रारकर्तीला पाठवित होते.  तक्रारकर्ती पुढे असे नमुद करते की, विरुध्‍द पक्षाने मागील 14 महिन्यापासून विज मिटरचे वाचन केले नाही त्‍यामुळे जानेवारी 2015 मिटर वाचन करुन 1119 युनिटचे उच्च टेरिफ रेटने रुपये 3450 भुर्देड बसविला. सदर देयक हे 14 महिन्यामधे विभाजीत करुन दिल्यास ते तक्रारकर्ती भरण्‍यास तयार आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने तसे करुन न दिल्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्‍द पक्षाने दिलेल्या 14 महिन्याचे विद्युत देयकाचे 14 हप्ते पाडुन द्यावे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 20,000/-व तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5,000/-मिळावे इत्यादी मागण्‍या केल्या आहेत. 

  1. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत 05 दस्‍तऐवज दाखल केले त्यात विद्युत देयके, फेब्रुवारी-2014 ते जानेवारील-2015, कायदेशीर नोटीस,  इत्यादी कागदपत्रे दाखल आहेत.
  2. यात विरुध्‍द पक्षाला मंचातर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली नोटीस मिळुन विरुध्‍द हजर झाले व आपला लेखी जवाब नि.08 वर दाखल केला.
  3. विरुध्‍द पक्षाने आपला लेखी जवाबात तक्रारकर्तीचे सर्व मुद्दे अमान्य करुन तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्याची बाब मान्य केली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस एकत्रित 14 महिन्याचे देयक दिल्याची बाब अमान्य केली आहे.
  4. विरुध्‍द पक्ष आपले लेखी जवाबात नमुद करतात की फेब्रुवारी -2014 मधे जेव्हा विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीच्या मिटरचे वाचन करायला गेले असता घराला कुलुप होते त्यामुळे मिटर वाचन करु शकले नाही.तसेच तक्रारकर्तीचे घर हे फेबुवारी-2014 पासुन डिसेंबर-2015 (10 महिने ) पर्यत कुलुप लागलेले होते. त्यामुळे 10 महिन्याचे विद्युत मिटर वाचन घेता आले नाही म्‍हणुन 57 युनिटचे सरासरी विद्युत वापराचे 10 महिन्याचे विज देयक तक्रारकर्तीस देण्‍यात आले आहे.
  5. विरुध्‍द पक्ष पुढे असे नमुद करतात की जानेवारी -2015 मधे घराला कुलुप नसल्याने विद्युत मिटर वाचन घेतले असता  एकुण विज वापर रिडींग 3548 युनिट दर्शवित होते व फेब्रवारी महिन्यात वाचन केले असता रिडींग 2429 एवढे युनिट रिडीग दर्शवित होते त्यावरुन 3548 युनिट्स वजा 2429 युनिट्स केले असता 1119 युनिट्स एवढे निव्वळ विज वापराचे देयक तक्रारकर्तीस देण्‍यात आले त्यात विरुध्‍द पक्षाची कुठलीही सेवेतील त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  6. विरुध्‍द पक्षाने लेखी उत्तरासह जानेवारी 2014 ते जानेवारी-2015 चे कंन्झुमर पर्सनल लेजर ची प्रत दाखल केलेली आहे. 
  7. तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व उभयपक्षकारांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.  उभयपक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्‍यात आला.
  8. तक्रारीत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.
  9.        निष्‍कर्ष //*//
  10. तक्रारकर्तीची मुळ तक्रार ही विरुध्‍द पक्षाने विज मिटर वाचन न करता सरासरी देयक दिले याबाबत दाखल केले आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांतील कंन्झुमर पर्सनल लेजर जानेवारी 2014 ते जानेवारी -2015 चे अवलोकन करता असे दिसून येते की,मार्च 2014 ते डिसेंबर -2014 पावेतो तक्रारकर्तीचे घराला कुलुप असे नमुद आहे व कुलुप असल्याने विरुध्‍द पक्षाचे प्रतिनीधी सदर कालावधीतील विज वापराचे मिटर वाचन घेऊ शकले नाही व पुढे जानेवारी -2015 मधे तक्रारकर्तीच्या घरातील प्रत्यक्ष मिटर वाचन केले असता ते 3548 युनिट दर्शवित होते. म्हणुन 3548 युनिट्स मधुन फेब्रुवारी-2014 मधील मिटर वाचन 2429 इतके युनिट वजा करता उर्वरित 1119 युनिट्सचे देयक तक्रारकर्तीस देण्‍यात आल्याचे स्पष्‍ट दिसून येते.
  11. विरुध्‍द पक्षातर्फेतक्रारकर्तीस सरासरी 57 युनिट्चे देयक देण्‍यात येत होते तेव्हा तक्रारकर्तीने कोणत्याही प्रकारची तक्रार विरुध्‍द पक्षाकडे नोंदविल्याचे दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्तीने तोंडी युक्तीवादात असे म्‍हटले आहे की तक्रारकर्तीचे विद्युत मिटर हे घराबाहेर लावलेले असल्याने विज मिटर वाचन घेता येते. परंतु त्याबाबत तक्रारकर्तीने कोणताही सबळ पुरावा मंचासमक्ष दाखल केला नाही. त्यामुळे ते सिध्‍द होत नाही.  
  12. तक्रारकर्तीने आलेल्या देयकाचे हप्ते पाडून दिल्यास देयक भरण्‍याची तयारी दर्शविली आहे परंतु दिलेल्या देयकात विरुध्‍द पक्षाची कोणतीही चुक निर्देशनास येत नाही उलटपक्षी तक्रारकर्तीचे घर बंद असल्याने मिटर वाचन करता आले नाही यात विरुध्‍दपक्षाचे सेवेत त्रुटी आहे असे म्‍हणता येणार नाही.
  13. वरील सर्व परिस्थितीवरुन तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.करिता आदेश पुढील प्रमाणे.

                अं ती म  आ दे श  -

1.     तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.    उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा

      3.    आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्‍यात याव्या.

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.