तक्रार क्र.128/2015.
तक्रार दाखल दिनांक - 03/12/2015.
तक्रार नोंदणी दिनांक - 04/12/2015
तक्रार निकाल दिनांक - 04/06/2016
कालावधी 06 महिने 01 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
सौ.कांताबाई भ्र.हरीकिशनजी सोनी, अर्जदार
वय 61 वर्ष धंदा – घरकाम, अॅड.पी.व्ही.लडडा.
रा.शिवाजीनगर, परभणी.
विरुध्द
1. उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादीत, गैरअर्जदार
जिंतूर रोड,परभणी. अॅड.जी.आर.सेलूकर.
2. सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादीत,
जिंतूर रोड,परभणी.
कोरम - श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. - मा.सदस्या.
नि का ल प त्र
(निकालपत्र पारीत द्वारा – मा. सौ.अनिता इंद्र ओस्तवाल,सदस्या)
गैरअर्जदाराने सेवा त्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून गृहउपयोगी कारणांसाठी ग्राहक क्र.530010344530 अन्वये विदयूत पुरवठा घेतला होता. अर्जदारास सप्टेंबर 2014 ते एप्रील 2015 पर्यंत अवास्तव युनीटचे विदयुत देयक देण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.
महिना | युनिट |
सप्टेंबर 2014 | 3427 |
ऑक्टोंबर 2014 | 1048 |
नोंव्हेबर 2014 | 1048 |
डिसेंबर 2014 | 1048 |
जानेवारी 2015 | 1048 |
फेब्रुवारी 2015 | 1048 |
मार्च 2015 | 1048 |
एप्रिल 2015 | 12489 |
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरची प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन रिडींग न घेता मीटर रिडींगचा फोटो न घेता वाटेल तशा रिडींगचे विदयूत देयक अर्जदारास दिलेले आहेत. अर्जदाराच्या विनंतीवरुन गैरअर्जदाराने अर्जदाराचे विदयूत मिटर दि.25/03/2015 रोजी बदलले आता अर्जदाराच्या नवीन मिटरचा क्र.एन.5097485 असा आहे. सदर जुन्या मिटरची तपासणी गैरअर्जदाराच्या तज्ञ कर्मचा-यांनी अर्जदाराच्या समक्ष केली असता सदर मीटरमध्ये दोष असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ असा की, जुलै 2014 ते एप्रील 2015 पर्यंत अर्जदारास मिळालेले विदयूत देयक हे मिटर सदोष असल्याचा परीणाम होता. नवीन विदयूत मीटर योग्य असल्यामुळे अर्जदारास त्याचा विज वापरानुसार म्हणजे 300 ते 350 युनीटचे विदयूत देयक देण्यात येत आहेत. पुढे दि.28/09/2015 ते दि.28/10/2015 या कालावधीसाठी रक्कम रु.1,91,640/- चे विदयूत देयक अर्जदारास देण्यात आले. म्हणुन अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन सप्टेंबर 2014 ते एप्रील 2015 पर्यंत अर्जदारास देण्यात आलेली विदयूत देयक रद्द बातल करावे व अर्जदारास तिच्या विज वापरानुसार सुधारीत विदयूत देयक देण्यात यावी तसेच सुधारीत विज बिलातुन अर्जदाराने भरलेली अग्रीम रक्कम रु.20,000/- वजा करावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- दि.03/12/2015 पासुन 12 टक्के व्याजासह गैरअर्जदारांनी दयावेत अशी विनंती अर्जदाराने मंचासमोर केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.7 वर मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.20 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, ग्राहक न्यायमंचाने तक्रार क्र.85/2014 मध्ये दिलेल्या आदेशान्वये गैरअर्जदाराने माहे मे 2011 ते माहे एप्रील 2015 या कालावधीसाठी देण्यात आलेल्या विदयूत देयकामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. सदर दुरुस्तीबाबत दि.11 ऑगष्ट 2015 रोजी रिव्हीजन आय.डी.क्र.2496315 प्रमाणे दुरुस्तीचा अहवाल सादर करण्यात आला होता. या रिव्हीजनप्रमाणे प्रती महा 636 युनीटचा वापर असल्याचे निरीक्षण करुन बिल दुरुस्ती करण्यात आली. या विदयूत देयकामध्ये अर्जदारास इलेक्ट्रीसीटी चार्जेसमध्ये स्लॅब बेनीफिट ही देण्यात आला. या दुरुस्तीप्रमाणे तक्रारदाराचे मुळ देयक रक्कम रु.3,03,315/- झालेली असतांना व बेनिफीट देवून शक्य व आवश्यक त्या अॅडजस्टमेंट करुन अर्जदारास रक्कम रु.1,79,063/- चे सुधारित देयक देण्यात आले. या देयकामध्ये लॉक क्रेडीट रु.69,669/- ही देण्यात आले पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या विनंतीवरुन नवीन मिटर माहे 2015 मध्ये बसविण्यात आले. परंतु जूने मिटरची एफ.आर.दि.25/03/2015 पर्यंत 41742 के.डब्लू. इतकी झालेली होती रिडींग एफ.आर.मधील फरक 21732 एवढा होता. परंतू एफ.आर.12140 टाकण्यात आली होती. कारण मीटर टेस्ट होणे बाकी होते. तसेच कोर्ट आदेशाप्रमाणे 636 यूनीट प्रतीमहा प्रमाणे मे 2011 ते एप्रील 2015 पर्यंत रिव्हजन आय.डी.2496315 स्लॅब बेनिफीट देण्यात आले व त्याची रक्कम रु.38,785/- होती. सदरील रक्कम ही माहे ऑगष्ट 2015 च्या बिलातून कमी केली. परंतू ग्राहकाचे समाधान न झाल्यामुळे अर्जदारास मागील दुरुस्तीचे विदयूत देयक रद्द करुन नवीन मीटर बसविल्यानंतर त्यावरील रिडींग घेऊन व अर्जदाराचा सरासरी विज वापर लक्षात घेऊन बील दुरुस्तीच्या सुचना गैरअर्जदाराच्या संबधीत कर्मचा-यास दिल्या. सदरील बील दुरुस्ती ऑन लाइन असल्यमुळे पुन्हा दुरुस्ती होत नाही. त्यामुळे बील दुरुस्ती मॅनीवली करण्यास तोंडी सुचना वरीष्ठ विभागीय व्यवस्थापण परभणी यांनी दिल्या. नवीन मीटरवरील सरासरी वापर हा पाच महिन्यासाठी 1733 युनीट म्हण्जे 347 प्रती महा इतका आहे. त्यानुसार बिल दुरुस्ती केली असता बी 80, 153282 .61 होत आहे. परंतू पुर्वी केलेले बी 80 ही रद्द करुन नेट बी 80, 11449704 एवढी येत आहे. म्हणून बिल दुरुस्ती विवरणपत्राप्रमाणे दूरुस्ती करणे बाबत वरीष्ठाकडे मार्गदर्शन मागीतले होते. त्यानुसार विदयूत देयकामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे व सुधारीत विदयूत देयक अर्जदारास देण्यात आलेली आहेत. नंतरचे दुरुस्तीप्रमाणे ग्राहकास 77913.8/- एवढी रक्कम तफावत म्हणुन वजा करण्यात आली आहे व ग्राहकास संपुर्ण स्लॅब बेनीफिट देण्यात येवून त्यांना अतिरिक्त कोणतेही चार्जेस लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्जदारास दोन वेळा विदयूत देयक दुरुस्त करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नीरस्त करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र व पुराव्यातील कागदपत्र नि.21 वर मंचासमोर दाखल केले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. गैरअर्जदाराने अवाजवी युनीटचे विद्यूत देयक अर्जदारास देऊन सेवा
त्रुटी केल्याचे शाबीत झाले आहे काय? होय.
2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घरगुती वापरासाठी ग्राहक क्र.530010344530 अन्वये विदयूत पुरवठा घेतला आहे. अर्जदारास सप्टेंबर 2014 ते एप्रील 2015 पर्यंत खालीलप्रमाणे अवास्तव युनिटचे विदयूत देयक देण्यात आली.
महिना | युनिट |
सप्टेंबर 2014 | 3427 |
ऑक्टोंबर 2014 | 1048 |
नोंव्हेबर 2014 | 1048 |
डिसेंबर 2014 | 1048 |
जानेवारी 2015 | 1048 |
फेब्रुवारी 2015 | 1048 |
मार्च 2015 | 1048 |
एप्रिल 2015 | 12489 |
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मीटरची प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन रीडींग न घेता मन मानेल त्या पध्दतीने विदयूत देयक दिली अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदारास विदयूत देयकामध्ये दुरुस्ती करुन सुधारीत देयक दोन वेळा देण्यात आली. तसेच अर्जदाराच्या विनंतीवरुन दि.25/03/2015 रोजी नविन मीटर ही बसवून दिलेले आहे. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज निरस्त करण्याची विनंती गैरअर्जदारांनी केली आहे. यावर मंचाचे असे मत आहे की, सप्टेंबर 2014 ते एप्रील 2015 या कालावधीसाठी अर्जदारास देण्यात आलेले विदयूत देयकाचे अवलोकन केले असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते माहे सप्टेंबर 2014 ला 3427 युनिटचे ऑक्टोंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीसाठी 1048 युनीट प्रती महा या प्रमाणे विदयूत देयक देण्यात आल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराचे जुने मिटर दि.25/03/2015 रोजी बदलवून नवीन मीटर बसवीले जुन्या मीटरची तपासणी दि.27/03/2015 रोजी करुन त्याचा अहवाल तयार करण्यात आला. अहवालाची प्रत मंचासमोर दाखल केली आहे, त्याची पडताळणी केली असता, Body Seal position या कॉलमखाली No Seal तसेच Finding या कॉलमखाली Meter found abnormal व No alteration inside the meter असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. यावरुन अर्जदाराचे जुने मीटर सदोष असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्जदारास अवास्तव युनिटचे विदयूत देयक देवून गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिल्याचे मंचाचे ठाम मत आहे. माहे सप्टेंबर 2014 ते माहे एप्रील 2015 या कालवधीसाठी देण्यात आलेले सर्व विदयूत देयके रद्द बातल करणे न्यायोचित होईल. तसेच नवीन मीटर दि.25/03/2015 रोजी बसवील्यानंतर अर्जदाराचा विज वापर सरासरी 350 युनीट असल्याचे दिसून येते व हे अर्जदार व गैरअर्जदार दोघांनी मान्य आहे. त्यामुळे अर्जदारास 350 युनीट प्रतीमहा या प्रमाणे विदयूत देयक देण्याचा आदेश देणे योग्य ठरेल. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश.
1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. अर्जदारास माहे सप्टेंबर 2014 ते एप्रील 2015 या कालावधीचे देण्यात आलेली सर्व विदयूत
देयके रद्द बातल करण्यात येत आहे. त्या ऐवजी अर्जदारास उपरोक्त कालावधीसाठी प्रती महा 350 युनीटचे विदयूत देयक स्लॅब बेनिफीटसह व कोणतेही दंड व्याज न आकारता निकाल कळाल्यापासुन 45 दिवसांत देण्यात यावे.
3. अर्जदाराने या कालावधीमध्ये गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्कम या विदयूत देयकामध्ये समायोजीत करावी.
4. खर्चाबद्दल आदेश नाही.
5. दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा