तक्रारकर्त्याने त्यांचे राहते घरी विरुद्ध पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता विद्युत मीटर घेतले असून सदर मीटरचा विरुद्ध पक्ष यांनी 17/4/2014 रोजी दिलेल्या विज देयका नुसार 7612081113 असा क्रमांक असून त्यामध्ये 918 वाचन वर मिटर बंद अशी नोंद आहे. विरुद्ध पक्ष यांनी 78 युनिट वापर दाखवून रुपये 360 चे सरासरी देयक तक्रारकर्त्यास दिले व तसेच त्याच वापर व रकमेचे दिनांक 18/10/2014 व दिनांक 18/11/2014 चे सुद्धा वीज देयक दिले. तक्रारकर्त्याने दिनांक 27/11/2014 रोजी विरुद्ध पक्ष यांचेकडे उपरोक्त विज देयकांमध्ये दुरुस्ती करून मागितली परंतु विरुद्ध पक्ष यांनी सुधारित वीज देयक देण्यात येईल असे सांगितल्यावरहि सुधारित देयक दिले नाही. मे 2015 रोजी विरुद्ध पक्ष यांनी 78 युनिट्सचे थकबाकी जोडून रुपये 790 चे वीज देयक तक्रार कर्त्याला दिले. सदर देयकाचा तक्रारकर्त्याने दिनांक 25/5/2015 रोजी भरणा केला. विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 8/8/2015 रोजी जुने वापरलेले नादुरुस्त 3454 युनिट झालेले मीटर लावून दिले. विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 29/9/2015 रोजी दिलेल्या विज देयका मध्ये मिटर रिडींग 3454 दाखवून चालू मीटर रिडींग 918 अशी चुकीची नोंद आहे. सदर 918 चे विज देयक हे चुकीचे असल्याने विरुद्ध पक्षाकडे तक्रार केल्यावर विरुद्ध पक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे रुपये 600/- चा भरणा केला. विरुद्ध पक्ष यांनी सदर मीटर हे योग्य असल्याने मीटर निरीक्षण प्रमाणपत्र तक्रारकर्त्याला मीटर लावताना दिले नाही. तक्रारकर्त्याकडे जूने नादुरूस्त मिटर लावल्याने दिनांक 27/10/2015 चे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 असे तीन महिन्याचे वीज वापर 804 युनिट रुपये 7300/- एवढी दर्शविलेली रक्कम चुकीची आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 6/11/2015 रोजी विरूध्द पक्षाकडे जाऊन तोंडी तक्रार केली तसेच 5801175830 क्रमांकाचे मिटर चे निरीक्षण करण्यास रुपये 100/- चा भरणा केल्यानंतर विरुद्ध पक्ष यांनी सदर मीटरची तपासणी न केल्याने दिनांक 22/11/2015 चे विज देयकामध्ये दिनांक 10/10/2015 ते 10/11/2015 या महिन्याच्या कालावधीच्या मिटर रिडींग 404 वीज वापराची नोंद आहे. तक्रारकर्त्याचा वीज वापर हा कमी असून सदर विज देयका मध्ये नमूद वापर हा चुकीचा आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्या कडील वीज वापरासंबंधी कधीही मोका चौकशी निरीक्षण अहवाल तयार केला नाही. म्हणून वीज देयकाची रक्कम व थकबाकी रक्कम रुपये 11 240 असलेले दिनांक 27/10/2015 दिनांक 22/11/2015 चे दोन्ही देयक हे बेकायदेशीर व नियमाविरुद्ध असल्याने रद्द होणे आवश्यक आहे. विरुद्ध पक्ष यांनी मीटर तपासणी केल्याबाबत अहवालही दिला नाही व वीज देयक ही वेळेवर दुरुस्त केले नाही, तक्रारकर्ता हा योग्य वीज देयकाची रक्कम भरण्यास तयार असल्यावरही विरुद्ध पक्ष हे तक्रारकर्त्यास उपरोक्त चुकीचे वीज देयकाचा भरणा करण्यास भरीस पाडत आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सुधारित विजदेयक व मीटर तपासणी बाबत कोणताही रेकॉर्ड न देऊन तसेच कोणतीही सूचना न देता दिनांक 22/11/2015 रोजी तक्रारकर्त्या कडील वीजपुरवठा खंडित केला आहे. सदर वीजपुरवठा पूर्ववत करण्याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक 18/9/2017 रोजी अधिवक्ता श्री खोबरागडे मार्फत विरुद्ध पक्ष यांना नोटीस पाठविली. सदर नोटीस ला वि.प.यांनी 29/9/2017 रोजी चुकीचे उत्तर दिले. विरुद्ध पक्ष यांनी तक्रार कर्त्या प्रति अनुचित व्यापार पद्धती अवलंबली तसेच सेवेत न्यूनता दिल्याने तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडे क्रमांक. 5801175830 चे नादुरुस्त मीटरच्या तपासणीकरिता दिनांक 6/11/2015 रोजी रुपये 100/- चा भरणा केला असल्याने सदर मीटर तपासणीचा अहवाल विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावा. विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 27/10/2015 व 22/11/2015 चे दोन्ही विजदेयक रद्द करून तक्रारकर्त्या कडील विज वापर विचारात घेऊन सुधारित विजदेयक तक्रारकर्त्यास द्यावे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्या कडील तात्पुरता खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने जोडून द्यावा तसेच विरुद्ध पक्ष यांनी शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 10,000/- तक्रारकर्त्यास द्यावा. 2. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष यांना मंचा तर्फे नोटीस काढण्यात आली. विरुद्ध पक्षाने हजर होऊन आपले लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करून त्यांमध्ये तक्रारकर्त्याकडे निवासी वापराकरिता 452150110422 क्रमांकाचे वीज कनेक्शन दिले असून दिनांक 17/4/2014 चे विजदेयका मध्ये 7612081113 क्रमांकाचे मीटरमध्ये 918 वाचन वर मीटर बंद पडले अशी नोंद आहे याबाबत वाद नसल्याचे नमूद केले असून पुढे आपले विशेष कथनामध्ये नमूद केले की विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्या चे दिनांक 29/9/2017 चे नोटीस ला उत्तर देऊन सदर देयकाचा भरणा करण्यास जबाबदार आहेत. जर तक्रारकर्त्यास पुन्हा वीज कनेक्शन हवे असल्यास जुनी थकबाकी भरणे आवश्यक आहे तसेच नवीन विज कनेक्शन करिता नवीन फॉर्म भरणे आवश्यक आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सेवेत न्यूनता दिली नसल्याने तक्रारकर्त्यास कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा हक्क नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. 3. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व वि.प. चे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष् यांचा ग्राहक आहे काय. ? होय 2. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्रुटीपूर्ण सेवा दिल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारण मिमांसा मुद्दा क्र.1 व 2 बाबत :- 4. तक्रारकर्त्याने निवासी वापराकरीता विरूध्द पक्ष यांचेकडून विद्युत पूरवठा घेतला असून सदर विद्युत मिटर हे तक्रारकर्त्याचे नांवाने आहे व त्याचा विज जोडणी क्रमांक 452150110422 व जूना मिटर क्रमांक 7612081113 हा व . नवीन मिटर क्रमांक 5801175830 हा आहे ही बाब विरूध्द पक्ष यांनी लेखी कथनामध्ये मान्य केली असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की दस्त क्र.अ-1 ते अ-4 या विजदेयकांमध्ये मीटर क्र. 7612081113 फॉल्टी व एकूण विजवापर 78 दर्शविलेला असून अनक्रमे रू.350/-, रू.360/-, रू.350/-, रू.380/- विजदेयकाची रक्कम नमूद आहे. तसेच वि.प.यांनी आपले लेखी कथनामध्ये सुध्दा विजदेयक दि.17.4.2014 मध्ये मिटर क्र. 7612081113 मध्ये 918 मिटरवाचन वर मिटर बंद अशी नोंद आहे याबाबत वाद नाही असे कथन केले आहे. यावरून उपरोक्त मिटर हे दोषयुक्त होते व तरीसुध्दा वि.प.हे तक्रारकर्त्याला सरासरी विजदेयके देत होते हे सिध्द होते. सदर जुने मीटर हे दोषयुक्त असल्याने ते काढून वि.प.ने दिनांक 8/8/2015 रोजी क्रमांक. 5801175830 चे विद्युत मिटर बसविले परंतु दस्त क्र.5 व दस्त क्र.6 वर दाखल अनुक्रमे दि.21/9/2015 व दि.27/10/2015 चे विजदेयकामध्ये अनुक्रमे चालू रिडींग 918 मागिल रिडींग 3454, चालू रिडींग 4258 मागील रिडींग 3454 आहे व रू.950/, रू.7300/- व रू.11,240/- अशी विजदेयकाची रक्कम दर्शविलेली आहे. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे 5801175830 क्रमांकाचे विद्युत मिटर तक्रारकर्त्याकडे बसवून दिले तेंव्हाच त्याचे मागील रिडींग 0 हवे होते परंतु तेंव्हाच त्याचे मागील रिडींग 3454होते हे दस्त क्र.अ-6 चे विजदेयकावरून स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने सदर मिटरची तपासणीकरीता विरूध्द पक्ष यांचेकडे दिनांक 6/11/2015 रोजी रू.100/- भरणा केला. परंतु तरीसुध्दा वि.प.यांनी तक्रारकर्त्याकडील विजमिटरची तपासणी न करताच दिनांक 22/11/2015 चे मागील थकबाकी जोडून रू.11,240/- चे विजदेयक दिले. सदर पावती व विजदेयक दस्त क्र.अ-7 वअ-8 वर दाखल आहे. व त्यानंतर दिनांक 22/11/2015 रोजी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडील विजपुरवठा कोणतीही पुर्वसूचना न देता खंडीत केला आहे. परंतु त्याबाबत विरूध्द पक्षाने आपले लेखी कथनामध्ये कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही अथवा सदर बाब तपासणी अहवाल, नोटीस वा कोणताही दस्त दाखल करून सिध्द केलेली नाही. यावरून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दिली हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसीक त्रास झाल्यामुळे तो विरूध्द पक्षाकडून यथोचीत नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 5. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश |