--- आदेश ---
(पारित दि. 08-10-2007)
द्वाराश्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा–
तक्रारकर्ता श्री. बलवंत पुरुषोत्तम सहस्त्रभोजने, यांनी गोंदिया जिल्हा ग्राहक पंचायत
तर्फे टाकलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.........
1. त.क.यांनी भारतीय दूरसंचार निगम गोंदिया वि.प.यांच्याकडून दूरध्वनी क्रं. 230589 हा घेतलेला आहे. या फोनवर एस.टी.डी.ची सवलत घेतलेली नाही. हे कनेक्शन 5-6 वर्षा पासून घेतलेले असून दर महिन्याला रुपये 300/- च्या आसपास देयक येत होते व त.क.त्याचा नियमितपणे भरणा करीत होते. परंतु फेब्रुवारी-06 पासून वि.प.यांनी अवास्तव देयक त.क.यांना पाठविण्यास सुरुवात केली.
2. या संबंधि तक्रारकर्ता यांनी दि. 17-04-2006, 11-06-2006 व 09-10-2006 रोजी वि.प.यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
3. त.क.यांनी मागणी केली आहे की, रुपये 17,860/- चे अवास्तव व अयोग्य देयक रद्द करण्यात यावे, त.क.यांनी त्यांचा टेलिफोन संच वि.प.यांच्याकडे जमा केला असल्यामुळे त्यांचे डिपॉझिट रुपये 2,000/- त.क.यांना परत होण्याचा आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासासाठी रुपये 5,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च वि.प.यांच्यावर लादण्यात यावा.
4. वि.प.क्रं. 1 व 2 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 8 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त.क.यांना एस.टी.डी.ची सवलत दिलेली नव्हती हे खोटे आहे. तसेच त.क.हे नियमितपणे देयकांचा भरणा करीत नव्हते. फेब्रुवारी-06 ते मे-06 या कालावधीत त.क.यांच्या 230589 या फोनवरुन मोबाईल क्रं. 9890007351 यावर असंख्य कॉल्स केल्या गेले, त्यामुळे त्या कालावधीत त.क.यांना जास्त आकारणीची बिले ही पाठविण्यात आली. फेब्रुवारी-06 ते मे-06 या कालावधीची देयके ही त.क.यांनी केलेली एकूण कॉल्स व त्याचा एकूण कालावधी यावर आधारित असून ती खरी आहे. त्यामुळे त.क.यांची तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
5. त.क.व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, दस्ताऐवज, केलेला युक्तिवाद व इतर पुरावा यावरुन असे निदर्शनास येते की, त.क.यांच्या दूरध्वनी क्रं. 230589 यावरुन मोबाईल क्रं. 9890007351 यावर अनेक कॉल्स केल्या गेलेले आहे. कॉल्सची माहिती ही पुढीलप्रमाणे आहे.
----------------------------------------------------------------------------------------
दिनांक वेळ कॉलींग नंबर मोबाईल कॉल चार्ज
नंबर डयुरेशन सेंकद युनिट
-----------------------------------------------------------------------------------------
11-03-06 22:14:33 230589 9890007351 5853 131
16-04-06 21:40:00 ---”--- ---”--- 4638 104
17-04-06 00:45:20 ---”--- ---”--- 7658 171
18-04-06 15:02:24 ---”--- ---”--- 4714 105
19-04-06 22:12:07 ---”--- ---”--- 4384 98
20-04-06 23:39:52 ---”--- ---”--- 4188 94
21-04-06 00:51:46 ---”--- ---”--- 5770 129
22-04-06 14:50:22 ---”--- ---”--- 7351 164
27-04-06 02:33:10 ---”--- ---”--- 8310 185
27-04-06 10:33:14 ---”--- ---”--- 3857 86
27-04-06 14:26:11 ---”--- ---”--- 4703 105
28-04-06 22:18:03 ---”--- ---”--- 6331 141
29-04-06 23:04:28 ---”--- ---”--- 5069 113
30-04-06 22:24:45 ---”--- ---”--- 6753 151
05-05-06 21:47:48 ---”--- ---”--- 4051 91
05-05-06 23:55:59 ---”--- ---”--- 4028 90
07-05-06 00:15:14 ---”--- ---”--- 6000 134
08-05-06 00:09:27 ---”--- ---”--- 7814 174
09-05-06 00:58:40 ---”--- ---”--- 5937 132
09-05-06 22:52:19 ---”--- ---”--- 3654 82
10-05-06 00:08:08 ---”--- ---”--- 3809 85
6. वि.प.यांनी टेलिकॉम डिस्ट्रीक इंजिनियर धर्मशाला विरुध्द व प्राणनाथ महाजन या I (1993) सीपीजे 99 एन.सी हा न्याय निवाडा रेकॉर्डवर दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, ग्राहकाने मीटर मध्ये दोष आहे हे सिध्द केले नाही तर वि.प.यांच्या सेवेत न्यूनता आहे असे म्हणता येत नाही. तसेच वि.प.यांनी संगनमत करुन ग्राहकाने फोन वापरल्यामुळे देयक जास्तीचे आले याचा थोडा तरी परिस्थितीजन्य पुरावा रेकॉर्डवर असल्याशिवाय टेलिफोनचे पाठविण्यात आलेले देयक हे बरोबर नाही असे म्हणता येत नाही.
7. त.क.यांच्या दूरध्वनी क्रं. 230589 वरुन मोबाईल क्रमांक 9890007351 वर मोठया कालावधीचे असंख्य कॉल्स केल्या गेलेले आहेत. तसेच वि.प.यांनी संगनमत करुन त.क.यांचा फोन वापरला असा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा रेकॉर्डवर नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
-- आदेश --
1) तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.