(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून क्लेम नं.एम.डी.10703751 पोटी रक्कम रु.21,300/- व क्लेम नं.एम.डी.10751648 पोटी उर्वरीत रक्कम रु.74,226/-मिळावेत, मानसिक, आर्थीक त्रासाबाबत रु.25,000/- व या अर्जाचा खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी पान क्र.32 लगत लेखी म्हणणे व पान क्र.33 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-नाही. 3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.एस.एस.अहिरे यांनी युक्तीवाद केलेला आहे तसेच सामनेवाला यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी युक्तीवाद केलेला आहे. तक्रार क्र.163/2011 सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 2 मध्ये “अर्जदार यांना दि.26/5/2010 ते 25/5/2011 या कालावधीसाठी रुपये दोन लाख व क्युमिलेटीव्ह बोनससाठी विमा पॉलिसी दिलेली आहे.” ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत वेगवेगळया कालावधीच्या विमा पॉलिसीज दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.5 च्या विमापॉलिसीज याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 2 मध्ये “तक्रारदारास सन 2003 मध्ये विमापॉलिसी मधुमेह, डायबेटीस मेलिटसचा एक्स्क्लुजन क्लॉज करुन दिलेली होती. तक्रारदारास 2007 पासून नवीन विमा पॉलिसीच्या अटी शर्ती प्रमाणे एक्स्क्लुजन क्लॉज लागु करुन पॉलिसी दिलेली होती त्याप्रमाणे डायबेटीस मेलिटस व हायपरटेन्शन असा पुर्व आजार असेल तर प्रथम व द्वितीय वर्षी काही रक्कम मिळणार नाही, तिस-या वर्षी 50% अँडमिसेबल क्लेम किंवा विमा पॉलिसीच्या 50% या पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम तसेच चौथ्या वर्षी 75% अँडमिसेबल क्लेम किंवा विमा पॉलिसीच्या 75% या पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम तसेच पाचव्या वर्षी 100% अँडमिसेबल क्लेम अशा प्रकारे रक्कम देण्याच्या अटीवर विमा पॉलिसी दिलेली होती.” असा उल्लेख केलेला आहे तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 3 मध्ये “अर्जदारास डायबेटीस मेलिटस असल्याचे लक्षात आल्यानंतर विमापॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार सदरचा क्लेम 2007 पासून 3 वर्षाचे आत असल्यामुळे दाखल केलेल्या क्लेमच्या 50% किंवा पॉलिसी रकमेच्या 50% यापैकी जी रक्कम देय असते ती रक्कम अर्जदार यांना दिलेली आहे.” असा उल्लेख केलेला आहे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये योग्य तो बदल करण्याचा अधिकार विमा कंपनीस आहे. 2007 साली विमा कंपनीने एक्स्क्लुजन क्लॉजमध्ये बदल करुन डायबेटीस मेलिटस व हायपरटेन्शन याबाबत किती रक्कम द्यावयाची याचा नवीन निर्णय घेतलेला आहे ही बाब सामनेवाला यांचे लेखी म्हणणे कलम 2 मधील मजकूर तसेच पान क्र.5 लगतच्या विमापॉलिसीज व पान क्र.23 लगतच्या विमा पॉलिसीमधील अटी व शर्ती तसेच सामनेवाला यांनी पान क्र.36 लगत दाखल केलेल्या विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती यावरुन स्पष्ट झालेल्या आहेत. अर्जदार यांना डायबेटीस मेलिटस हा आजार उद्वल्यामुळे व अर्जदार यांना सौम्य हार्ट अँटॅक आल्यामुळे सामनेवाला यांनी विमा पॉलिसीचे नवीन अटी व तक्रार क्र.163/2011 शर्तीनुसार अर्जदार यांचा योग्य तो विमाक्लेम मंजूर करुन अर्जदार यांना योग्य ती विमापॉलिसीची रक्कम अदा केलेली आहे ही बाब पान क्र.40 लगतचे सर्व कागदपत्रावरुन स्पष्ट झालेली आहे. वरीलप्रमाणे सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे विमाक्लेमबाबतीत विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार योग्य तीच सर्व कार्यवाही व पान क्र.40 लगतचे कागदपत्रानुसार योग्य त्या क्लेमची रक्कम दिलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. |