(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून, त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिलाविरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.514/10 अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या इथे गैरअर्जदार यांच्यातर्फे घरगुती वापरासाठी वीज मीटर बसविण्यात आले आहे. सदरील मीटर हे डॉ.सुशिल के.खन्ना यांच्या नावे असून, ते स्वतःया नावावर करण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे दि.11.03.2008 रोजी अर्ज दाखल केला. गैरअर्जदार यांनी, त्यांच्या अर्जाची दखल न घेता त्यांच्या नावे मीटर ट्रान्स्फर करुन दिलेले नाही. सदरील वीज मीटर वरील बिले ही आजही डॉ.सुशिल के.खन्ना यांच्या नावे येत असून, अर्जदार त्याचा नियमितपणे भरणा करीत आहेत. अर्जदाराकडे लावण्यात आलेले वीज मीटर हे दर्शनी भागात लावण्यात आलेले असून त्यावरील रिडींग सहज घेता येते. गैरअर्जदार यांनी, त्यांना फेब्रुवारी 2010 या महिन्याचे वीज बिल रिडींग न घेता सरासरी 387 युनिट या प्रमाणे दिले. मार्च 2010 मध्ये त्यांना 968 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले. गैरअर्जदार यांनी हे बिल देताना फेब्रुवारी 2010 मध्ये सरासरीवर आधारीत देण्यात आलेले 387 युनिटचे बिल वजा केले नाही. त्यामुळे त्यांना अधिक रक्कम भरावी लागली असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांनी एप्रिल व मे 2010 या महिन्यात देखील रिडींग न घेता, सरासरीवर आधारीत 433 युनिटचे वीज बिल आकारले, ज्याचा भरणा अर्जदाराने केला आहे. जून 2010 मध्ये गैरअर्जदार यांनी, त्यांना 2887 युनिट वीज वापराचे बिल आकारले, ज्यातून त्यांनी मागील महिन्यात सरासरीवर आधारीत आकारलेले वीज बिल कमी केले नाही गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे त्यांना वाढीव रक्कम भरावी लागली असल्याचे सांगून गैरअर्जदार यांनी सुधारीत वीज बिल देण्याची, मीटर त्यांच्या नावे ट्रान्स्फर करुन देण्याची, नियमितपणे मीटर रिडींग घेण्याची, व मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने मीटर त्यांच्या नावे ट्रान्स्फर करुन देण्याबाबत त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, पण या बरोबर त्यांनी नियमाप्रमाणे ट्रान्स्फर फी भरलेली नसल्यामुळे मीटर त्यांच्या नावे ट्रान्स्फर करुन देण्यात आलेले नाही. एप्रिल 2010 व मे 2010 या दोन महिन्यात मीटर रिडरने रिडींग घेतलेले नसल्यामुळे त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी करण्यात आली. जून 2010 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यानंतर अर्जदारास 18576/- रुपयाचे बिल देण्यात आले, ज्यामध्ये एप्रिल व मे 2010 या काळाचे 5173/- रुपयाचे वीज बिल वजा करण्यात (3) त.क्र.514/10 आले. अर्जदारास त्यांच्यातर्फे नियमितपणे वीज बिल देण्यात आलेले असून, अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदाराकडे लावण्यात आलेले मीटर हे डॉ.एस.के.खन्ना यांच्या नावे असून, अर्जदाराने ते स्वतःच्या नावावर ट्रान्स्फर करुन घेण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे दि.11.03.2008 रोजी अर्ज दिलेला आहे, ज्याची पोच पावती अर्जदाराने तक्रारीसोबत जोडलेली आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात, अर्जदाराने ट्रान्स्फर फी भरली नाही, म्हणून मीटर ट्रान्स्फर करण्यात आले नाही असे म्हटले आहे. पण ट्रान्स्फर फी किती भरावी याबाबत अर्जदारास कळविलेले दिहसून येत नाही, किंवा ते कळविल्याचा कोणताही पुरावा जवाबासोबत दाखल केलेला नाही, गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल.चे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, जानेवारी 2010 मध्ये अर्जदारास मीटरवरील नोंदीप्रमाणे 516 युनिट वीज वापराचे बिल दिले. या वीज बिलापर्यंत दोन्ही पक्षात कोणताही वाद नाही. फेब्रुवारी 2010 मध्ये गैरअर्जदार यांनी मीटर रिडींग न घेता, अर्जदारास सरासरीवर आधारीत 387 युनिट वीज वापराचे बिल व 3489.79 रुपयाचे बिल आकारले. मार्च 2010 मध्ये मीटर रिडींग घेतल्यानंतर अर्जदारास 968 युनिट वीज वापराचे बिल आकारण्यात आले. या वीज बिलातून फेब्रुवारी 2010 मध्ये आकारण्यात आलेले 2070.06 या रकमेचे क्रेडीट देण्यात आले. अर्जदाराने जानेवारी 2010 चे बिल भरलेले नसल्यामुळे त्यांना फेब्रुवारी 2010 मध्ये 387 युनिट वापराची क्रेडीट देण्यात आलेली रक्कम योग्य असल्याचे दिसून येते. एप्रिल 2010 व मे 2010 या दोन महिन्यात गैरअर्जदार यांनी अर्जदारास पुन्हा रिडींग न घेता 433 युनिट वीज वापराचे बिल आकारले. जून 2010 मध्ये रिडींग उपलब्ध झाल्यानंतर अर्जदारास एप्रिल 2010 व मे 2010 या दोन महिन्याचे 5173.87 रुपये वीज बिलातून क्रेडीट देण्यात आले, जे योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. जुलै 2010 नंतरची बिले योग्य असल्याचे सी.पी.एल.वरुन दिसून येते. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची वीज बिलाबाबत दाखल केलेली तक्रार (4) त.क्र.514/10 अमान्य करण्यात येत असून, मीटर ट्रान्स्फर व नियमित मीटर रिडींग घेण्याबाबतची तक्रार मान्य करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येत असून, गैरअर्जदार यांनी नियमाप्रमाणे रक्कम आकारुन मीटर अर्जदाराच्या नावे 30 दिवसात ट्रान्स्फर करुन द्यावे. 2) गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरचे नियमित रिडींग घेऊन अर्जदारास नियमितपणे वीज बिल द्यावे. 3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी व खर्चाबददल रु.500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |