::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 15/11/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एप्रिल 2013 मध्ये आय पी कनेक्शन घेवून विज पुरवठा घेतला होता. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार यांच्याकडील भरारी पथकाचे अधिकारी विज कनेक्शन पाहण्याकरीता 15/3/13 ला आले व त्याची तपासणी करुन रिपोर्ट मध्ये अर्जदाराकडील विज कनेक्शनचे आय. पी. वरुन सी. एल. करण्याचे नमुद केले त्यावर असेसमेट करुन अर्जदाराला असेसमेट रिकव्हरी जोडून व चालु बिल अशी एकूण रक्कम 1,79,690/- रु. चे दि. 4/5/13 रोजी चुकीचे व बेकायदेशिर बिल पाठविले सदर देयकामध्ये गैरअर्जदाराने 1,43,647/- रु. चुकीचे पध्दतीने केलेली असेसमेंटची मागणी अर्जदाराकडून केली होती. त्यासंदर्भात अर्जदाराने दि. 6/6/13 रोजी गैरअर्जदाराला पञ लिहीले व सदर देयक चुकीचे आहे असे कळविले. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही व गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतम सेवा दर्शवून अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे म्हणून सदर तक्रार अर्जदाराने मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दिलेले दि. 4/5/13 चे देयक व त्यामध्ये नमुद केलेली असेसमेटचेी रक्कम 1,43,647/- रु. बेकायदेशिर ठरवून गैाअर्जदाराना वादग्रस्त देयक रद्द करण्याचा आदेश व्हावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं.11 वर लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, तक्रारीतील कंपनी ग्राहक या परिभाषेत मोडत नाही. तक्रारीतील कंपनी ही चार चाकी तयार वाहन विक्रीचा व्यवसाय करते. व वाहनाचे दुरुस्ती साठी शोरुमचे तळभागाचा वापर करीत असते. सदर जागेवर वर्कशॉप दर्शविल्याने व अर्जदारास केलेल्या मागणीनुसार गैरअर्जदार यांनी औदयोगिक विज पुरवठा अर्जदाराला देण्यात आले होते. परंतु दि. 15/3/13 रोजी गैरअर्जदारांचे अधिका-यांनी चौकशीकरण्यावर असे निर्देशनास आले कि, सदर विज कनेक्शनचा वापर अर्जदाराची कंपनी व्यवसायाहेतु करित आहे म्हणून भरारी पथकाने मौक्यावर पंचानामा करुन त्या पंचनाम्यावर अर्जदार कंपनीचे प्रतिनिधीची सही घेतली त्या पंचनाम्याकरीता अर्जदाराचे कंपनीने कोणताही त्यावेळी हस्तक्षेप नोंदविला नाही. अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदाराला नाकबुल आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही न्युनतम सेवा किंवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नसून नियमाप्रमाणे अर्जदारास विज देयक दिले आहे सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1)अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
2)आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराच्या तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदार ही ट्रायस्टार कार्स प्रा. लिमी. कंपनी आहे. कंपनी कायदा 1956 प्रमाणे जर कंपनी प्रा. लि. असली तर ती कंपनी चालविण्याकरीता निर्देशक नेमलेले असतात. व त्यांचे मालक भागधरक असतात. म्हणून अर्जदाराचे असे म्हणणे कि, अर्जदाराची कंपनी स्वंयरोजगारासाठी सुरु आहे हे ग्राहय धरण्यासारखे नाही.
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार
- III(2006) CPJ 409 (NC)
HOTEL CORP OF INDIA LTD V/S. DELHI VIDYUT BOARD & ORS.
Decided on 23.2.2006
Consumer Protection Act, 1986- Section 2(1)(c), 2(1)(g)- Complaint- Electricity- Installation of electric line- Non-refund of deposited amount- Complainant hotel- Electric line was to be utilized for commercial purpose- Definition of consumer excludes service for commercial purpose- Complaint not maintainable under Act. Result – Complaint dismissed.
- I(2013) CPJ 40(NC)
PURAN MURTI EDUCATION SOCIETY V/S. UHBVNL
Decided on 14.12.2012
Consumer Protection Act, 1986- Sections 2(1)9d), 2(1)(g), 21(b)-Electricity Connection- “Non-domestic’ use- Consumer- Commercial purpose- Determination- Contention, “Non-domestic” does not automatically became “ commercial” and that motive of petitioner is benevolent, for a social cause, not for making products and selling them in market- Not accepted- Power is taken and utilized for the purpose of running private Engineering College- No evidence that college is being run for a charitable purpose- Complainant is not consumer.
सदर प्रकरणात सुध्दा अर्जदाराच्या कंपनीने विज पुरवठयाचा वापर मारोती चार चाकी वाहनाचे विक्री करीता केलेला आहे. वरील न्यायनिर्णयाचा आधार घेता मंचाच्या मताप्रमाणे अर्जदार हे ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 2 (ड) (ii) प्रमाणे अर्जदाराची कंपनी ग्राहक संज्ञेत मोडत नाही सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1)अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2)दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
3)उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 15/11/2014