::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री.मिलींद बी. पवार (हिरुगडे) मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 29.04.2013)
1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार गै.अ.चे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अतंर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदाराचे वडीलांने अर्जदाराची मोटरसायकल नोंदणी क्रं. युपी-डीओ 338 दि. 04/10/2011 ला गै.अ.चे कार्यालयामार्फत सतना (मध्यप्रदेश) येथे पाठविण्याकरीता बुकींग केली होती. गाडी बुक करण्याकरीता आवश्यक सर्व कागदपञ व तिकीट बील संबंधी माहिती खालील प्रमाणे.
1) बल्लारपुर ते सतना (मध्यप्रदेश) गाडी क्रं. युपी -90 डीओ 338 पाठविण्याकरीता खर्च गै.अ.ने रु. 1039/- घेतले. बील क्रं.64939.
2) वाहनाचे व्हॅलुएशन रु. 10,000/- गै.अ.ने काढलेली.
3) वाहनाचे अस्सल व्हॅलुऐशन रु. 30,000/-
4) ज्या ट्रेनने वाहन पाठवायचे होते त्याचे गाडी नं. 12295.
5) बल्लारपुर ते बांधा (उत्तरप्रदेश) यांची दुरी 952 कि.मी.
6) बाहनाचा पार्सल तिकीट नं. एल 63383768.
3. अर्जदाराने गै.अ.मार्फत पाठवलेली मोटर सायकल अद्याप पर्यंत सतना (मध्यप्रदेश) येथे पोहचली नाही. गै.अ.चे कार्यालयामार्फत मोटरसायकल कुठे आहे व कोणत्या स्थितीत आहे याची माहिती मिळत नाही. मोटरसायकलचा दुरुपयोग कोणी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
4. गै.अ.चे निष्काळजीपणामूळे अर्जदाराला गैरसोय व ञास सहन करावा लागला. वारंवार गै.अ.कडे चौकशीकरीता चकरा माराव्या लागल्या प्रत्येक वेळी आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे गै.अ.ने अर्जदारास मोटरसायकल परत मिळवून द्यावी किंवा मोबदला म्हणून मोटरसायकलची किंमत म्हणून रु. 30,000/- द्यावे. दावा दाखल करण्याचा खर्च व शारिरीक व आर्थिक ञासापोटी रु. 30,000/- द्यावे अशी मागणी केली आहे.
5. अर्जदाराने तक्रारीच्या कथनापष्ठार्थ नि. क्रं. 4 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.विरुध्द नोटीस काढण्यात आला. नि. क्रं. 6 नुसार त्यास तामील झाला. परंतु गै.अ.हजर झाले नाही. त्याने लेखीउत्तर/बयाण व शपथपञ दाखल केले नाही.
6. गै.अ.ला संधी देवूनही हजर झाले नसल्याने नि.क्रं. 1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
7. अर्जदाराने नि. 8 वर शपथपञ दाखल केले व पुरसीस देवून तेच युक्तीवाद समजण्यात यावा असे म्हटले. वरील सर्व तक्रारीच्या आशयावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
8. अर्जदार यांची तक्रार व त्यासोबतची कागदपञे यांचे अवलोकन करता अर्जदार मुलचंद राजबहादुर यादव यांचे वडीलांने गै.अ.कडे अर्जदाराची मोटरसायकल नोंदणी क्रं.युपी -90 डीओ 338 गै.अ.चे कार्यालयामार्फत सतना (मध्यप्रदेश) येथे पाठविण्याकरीता बुकींग केली मोटरसायकल बुक करण्याकरीता सर्व सोपस्कार पार पाडलेत. गाडी पाठविण्याकरीता येणारा खर्च रु.1039/- गै.अ.ने घेतले व बिल क्रं. 64939 दिले. वाहनाची व्हॅलुऐशन गै.अ.ने रु.10,000/- काढली. ज्या ट्रेनने वाहन पाठवायचे होते त्याची गाडी क्रं. 12295 असून वाहनाचा पार्सल तिकीट क्रं. एल 63383768 आहे. सदर कागदपञ नि. 4/3 कडे दाखल आहे. अद्याप गाडी सतना येथे पोहचली नाही. व त्याची स्थिती माहीत नाही असे अर्जदाराचे म्हणणे आहे. त्यानंतर अर्जदार यांनी दि. 20/06/2012 रोजी आपले वकीलामार्फत गै.अ.यांना नोटीस पाठविले. सदर नोटीस नि.क्रं. 4/2 कडे दाखल आहे. सदर नोटीस गै.अ.यांना मिळाली आहे त्याची पोच नि. क्रं. 10/1 कडे दाखल आहे. तरीही गै.अ.यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
9. अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रं.4/3 व 4/5 कागदपञाचे अवलोकन केले असता नि. क्रं. 4/3 नुसार सदर अर्जदार यांची गाडी ट्रेन नं. 12295 ने पाठविलेली होती. परंतु नि. क्रं. 4/5 चे कागदपञ पहाता सदर अर्जदारांची गाडी ट्रेन नं. 12390 ने पाठविलेले दिसते. त्यामुळे नेमकी चूक गै.अ.यांनी केल्याचे निष्पन्न होते. व त्यासंदर्भात योग्य ती माहिती अर्जदाराला न देता तसेच अर्जदाराने बुकींग केल्याप्रमाणे त्यांची गाडी दिलेल्या पत्यावर न पोहचल्यामुळे अर्जदाराला गै.अ.ने सेवा देण्यात न्युनता केली आहे असे दिसुन येते. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. असे या न्यायमंचाचे मत आहे.
10. अर्जदार व गै.अ. या दोघांमध्ये झालेला व्यवहार पाहता अर्जदाराने आपली सर्व जबाबदारी पार पाडली. अर्जदाराची मोटरसायकल नमुद केलेल्या रेल्वे गाडीने सतना येथे पाठविण्याची जबाबदारी गै.अ.ची होती. तशी सेवा देण्यासाठी त्याची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपली सेवाच योग्यपणे बजावली नाही त्यामुळे सदर अर्जदारानी गै.अ.मार्फेत पाठविलेली मोटार सायकल अर्जदारालापरत करावी किंवा सदर मोटर सायकलची किंमत रु.30,000/- पकडली तर सदर गाडी 2006 या मॉडेलची आहे त्यामुळे 10% घसारा दर वर्षी प्रमाणे वजा करता 2006 ते 2012 पर्यंत दरवर्षी 3,000/- X 6 = 18,000/- होतात. अर्जदाराने गाडीचे व्हॅलुऐशन 30,000/- कबूल केली आहे.त्यामुळे 30,000/- - 18,000/- = 12,000/- एवढी रक्कम अर्जदाराला देणे उचित ठरेल तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रु. 3,000/- मिळण्यास पाञ आहे. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
11. गै.अ.ने अर्जदाराला सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे असे या न्यायमंचाचे मत आहे.
12. वरील कारणे व निष्कर्षानुसार तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
2) गै.अ.ने अर्जदारास त्याची मोटारसायकल आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासुन 30 दिवसाचे आत परत करावी किंवा मोबदला
म्हणून मोटारसायकलची किंमत रु. 12,000/- आदेशाची प्रत
प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावी.
3) गै.अ.ने अर्जदारास आर्थिक, शारिरीक व मानसिक ञासापोटी
रु.3,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत
द्यावी.
4) दोन्ही पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
चंद्रपूर,
दिनांक : 29/04/2013.