Maharashtra

Nagpur

CC/187/2015

Nisheeth Ashok Sharma - Complainant(s)

Versus

State Of Maharshtra Through G.R.P. Wardha Railway Station Wardha Central Railway - Opp.Party(s)

Shrik M. Nankani

07 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/187/2015
 
1. Nisheeth Ashok Sharma
Ram Nagar Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. State Of Maharshtra Through G.R.P. Wardha Railway Station Wardha Central Railway
Railway Station Wardha
Wardha
Maharastra
2. D. R. M. Railway Nagpur
Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Dec 2016
Final Order / Judgement

 

 (आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

                                  आदेश

                       पारित दिनांक–07   डिसेंबर,  2016)

 

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे – तक्रारकर्ता दिनांक 14.8.2014 रोजी त्याचे पत्नी सोबत सिंकदराबाद ते नागपूर,3 टायर एसी बी-2, आसन क्रं.10 व 11, गाडी क्रं.17005 हैद्राबाद-दरभंगा एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. दि. 15.8.2014 रोजी सकाळी सहा वाजता तक्रारकर्त्याचे असे लक्षात आले की, त्याच्या पत्नीची बॅग चोरीला गेली त्यात भ्रमणध्‍वनी व दोन डेबीटकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट, व रोख रक्कम 7000/- व एक छत्री, जेण्‍टस पर्स, त्यात डेबीट कार्ड व रोख रक्कम 20,000/- असे एकुण रुपये 94,000/- चे तक्रारकर्त्याचे समान चोरीला गेले. सदर घटना चंद्रपूर आणि वडोली रेल्वेस्टेशनचे मधे झाली होती. दि.15.8.2014 रोजी तक्रारकर्त्याचे पत्नीने रेल्वे पोलीस स्टेशन नागपूर येथे तक्रार नोदविली. दि.25.8.2014 रोजी सदर तक्रार वर्धा पोलीस स्टेशनचे कार्यकक्षेत घटना घडली असल्याने पाठविण्‍यात आली. सहा महिने गेल्यानंतरही चोरी गेलेले सामान तक्रारकर्त्याला मिळाले नाही म्हणुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आलेली आहे. 
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्याचे झालेले एकुण नुकसान रुपये 94,000/-व्याजासह मिळावे व तक्रारीचा खर्च वि.प.कडुन तक्रारकर्त्याला मिळावा असे आदेशीत करावे. 
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष नोटीस मिळुन सुध्‍दा हजर झाले नाही म्हणुन वि.प.क्रं.1 व 2 चे विरुध्‍द नि.क्रं.1 वर तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍यांनी तक्रार, दस्तऐवज, तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचा समक्ष खाली मुद्दे विचारार्थ आले.

                 मुद्दे                                                                     निष्‍कर्ष

      1.   तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ?                     होय.

      2.   विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती न्युनतम सेवा

          दर्शविलेली आहे का?                                                      होय.

      3.   आदेश ?                                                                अंतिम आदेशाप्रमाणे.

                             -कारणमिमांसा-

  1. मुद्दा क्र.1 बाबत –तक्रारकर्ता हा पत्नीसह सिकंदराबाद ते नागपूर, हैद्राबाद-दरभंगा एक्स्प्रेसने प्रवास करीत होते व त्याकरिता त्यांनी नियमाप्रमाणे रेल्वेचे तिकीट काढले होते ही,  बाब  नि.क्रं.2 वर दाखल दस्त क्रमांक-1 वरुन सिध्‍द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष.चा ग्राहक आहे.  म्हणुन मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  2. मुद्दा क्र.2 बाबत –तक्रारकर्त्याने नि.क्रं. 2 वर दस्त क्रं.2 वर प्रथम सुचना रिपोर्ट ची पडताळणीकरतांना असे दिसले की, तक्रारकर्त्याचे सामान व रोख रक्कम चंद्रपूर ते वडोली दरम्यान दि. 15.8.2014 रोजी चोरी गेले त्याबाबत तक्रारकर्त्याचे पत्नीने तक्रार नोंदविलेली आहे. वि.प. सदर तक्रारीमधे नोटीस मिळूनही हजर झाले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने तक्रारीत मांडलेले कथनावरुन असे सिध्‍द होत आहे की, तक्रारकर्त्यास गाडीतुन प्रवास करतांना वि.प.ने तक्रारकर्त्याला योग्य रितीने सुरक्षा प्रदान केलेली नाही. तसेच मंचाचे असे मत आहे की, वि.प. ची गाडीतील प्रवांशाना योग्य ती सुरक्षा देण्‍याची जबाबदारी आहे व ती जबाबदारी वि.प.ने तक्रारकर्त्याला योग्य प्रकारे पुरविली नाही म्हणुन तक्रारकर्त्याचे सामान चोरीला गेले यावरुन असे सिध्‍द होते की वि.प.ने तक्रारकर्त्याला प्रवासादरम्यान न्युनतम सेवा पुरविली आहे. सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी देण्‍यात येते.
  3. मुद्दा क्रं.बाबत - मुद्दा क्रं.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-आदेश-

             1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

             2.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला चोरी गेलेल्या सामान व नुकसान                             

               भरपाई दाखल  रु.94,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.

              3. वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून

                 30 दिवसांचे आंत करावी.

              4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.