Maharashtra

Kolhapur

CC/22/24

Vijay Ganpatrao Page & Other - Complainant(s)

Versus

State Bank Of India Manager - Opp.Party(s)

S.V.Jadhav

15 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/22/24
( Date of Filing : 10 Jan 2022 )
 
1. Vijay Ganpatrao Page & Other
349, Ratnappa Kumbhar Nagar, Pachgaon, Kolhpaur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. State Bank Of India Manager
Timbar Market, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Jul 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार क्र.1 व त्‍यांचे मयत बंधू श्री संजय गणपतराव पांगे यांनी वि.प. बँकेकडून रक्‍कम रु.2,70,000/- इतके गृहकर्ज घेतले होते.  सदर कर्जाकरिता वि.प. यांनी तक्रारदार यांचे प्‍लॉट नं.349 बाब‍तची अस्‍सल कागदपत्रे व तक्रारदार आणि रत्‍नाप्‍पा कुंभार नगर को-ऑप. सोसायटी नं. 2 पांचगाव कोल्‍हापूर यांचे दरम्‍यान झालेल्‍या भाडेकराराचा अस्‍सल स्‍टँप तारण म्‍हणून घेतलेले आहेत.  तदनंतर तक्रारदार क्र.1 यांनी त्‍यांची मुलगी कु. वरदा हिचे शिक्षणाकरिता सदर वि.प. यांचेकडून शैक्षणिक कर्ज रक्‍कम रु.2,44,000/- मंजूर करुन घेतलेले होते तथापि तक्रारदार यांनी सदर कर्जापैकी केवळ रु. 60,000/- उचल केलेले होते.  तक्रारदार यांनी सन 2013 मध्‍ये वि.प यांचेकडील गृहकर्ज खाते संपूर्ण फेडीने बंद केले आहे.  त्‍याबाबत वि.प. यांनी तक्रारदार यांना नो डयूज सर्टिफिकेट दिलेले आहे.  त्‍यावेळी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे तारण दिलेल्‍या अस्‍सल कागदपत्रांची मागणी केली असता वि.प. यांचे मॅनेजर यांनी अजून तुमचे मुलीचे शैक्षणिक कर्ज खाते सुरु आहेत, ते बंद झाल्‍यावर सदरची कागदपत्रे परत देवू, असे सांगितले.  तदनंतर तक्रारदार क्र.1 यांनी त्‍यांचे मुलीचे शैक्षणिक कर्ज खाते दि. 16/10/2020 रोजी पूर्ण फेडीने बंद केले आहे.  त्‍यावेळी तक्रारदारांनी वि.प. यांचकडे कागदपत्राची मागणी केली असता वि.प. यांनी कागदपत्रे देण्‍यास टाळाटाळ केली.  म्‍हणून तक्रारदार यांनी दि. 11/1/2021 रोजी वि.प. यांचेकडे लेखी अर्ज देवून कागदपत्रांची मागणी केली. परंतु तरीही वि.प. यांनी कागदपत्रे परत करणेस टाळाटाळ केली आहे.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून तक्रारदार यांचे प्‍लॉट नं. 349 ची अस्‍सल कागदपत्रे, तसेच भाडेकराराचा अस्‍सल स्‍टँप बिनशर्त परत मिळावा, तसेच आर्थिक नुकसानीपोटी रु. 20,000/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत वि.प. यांनी दिलेले नो डयू सर्टिफिकेट, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्‍या अर्जाची प्रत, संजय गणपती पांगे यांचे मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.

 

4.    प्रस्‍तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. 

     

5.   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून कर्जापोटी तारण ठेवलेली अस्‍सल कागदपत्रे मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. बँकेकडून गृहकर्ज व शैक्षणिक कर्ज घेतलेले असून त्‍याची संपूर्ण फेड केली आहे.  याबाबत वि.प. बॅंकेने दिलेली नो डयूज सर्टिफिकेट्स याकामी तक्रारदारांनी दाखल केलेली आहेत. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्‍तुत बाब नाकारलेली नाही.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट सिध्‍द झाली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार यांनी वि.प. बँकेकडून घेतलेली गृहकर्ज व शैक्षणिक कर्ज या दोन्‍ही कर्जांची परतफेड केलेली आहेत.  त्‍याबाबत वि.प बँकेने तक्रारदारांना नो डयूज सर्टिफिकेटही दिलेली आहेत. त्‍यावेळी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे तारण दिलेल्‍या अस्‍सल कागदपत्रांची मागणी केली असता वि.प. यांनी कागदपत्रे देण्‍यास टाळाटाळ केली.  म्‍हणून तक्रारदार यांनी दि. 11/1/2021 रोजी वि.प. यांचेकडे लेखी अर्ज देवून कागदपत्रांची मागणी केली. परंतु तरीही वि.प. यांनी कागदपत्रे परत करणेस टाळाटाळ केली आहे. तक्रारदारांनी याबाबत वि.प. वकीलांमार्फत दि. 08/03/2021 रोजी कायदेशीर नोटीसही पाठविली आहे.  तरीसुध्‍दा वि.प. यांनी तक्रारदारांना त्‍यांची अस्‍सल कागदपत्रे दिली नाहीत असे तक्रारदाराचे कथन आहे.    सदर कथनांचे पुष्‍ठयर्थ तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेल्‍या अर्जाची प्रत तसेच नोटीसची प्रत याकामी दाखल केलली आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत.  वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत.  म्‍हणून, वि.प. यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  म्‍हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  तक्रारदारांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्‍वासार्हता ठेवणे न्‍यायोचित वाटते.  सबब, तक्रारदार यांनी दोन्‍ही कर्जांची परतफेड करुनही वि.प. यांनी तक्रारदारांची अस्‍सल कागदपत्रे परत दिलेली नाहीत ही बाब याकामी शाबीत होते असे या आयोगाचे मत आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

8.    सबब, तक्रारदार हे वि.प.क्र. यांचेकडून तारणापोटी घेतलेली तक्रारदार यांचे प्‍लॉट नं.349 बाब‍तची अस्‍सल कागदपत्रे व तक्रारदार आणि रत्‍नाप्‍पा कुंभार नगर को-ऑप. सोसायटी नं. 2 पांचगाव कोल्‍हापूर यांचे दरम्‍यान झालेल्‍या भाडेकराराचा अस्‍सल स्‍टँप परत मिळणेस पात्र आहेत.  तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्‍कम वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.

 

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांचे प्‍लॉट नं.349 बाब‍तची अस्‍सल कागदपत्रे व तक्रारदार आणि रत्‍नाप्‍पा कुंभार नगर को-ऑप. सोसायटी नं. 2 पांचगाव कोल्‍हापूर यांचे दरम्‍यान झालेल्‍या भाडेकराराचा अस्‍सल स्‍टँप परत करावा.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/-  वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात

.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.