Maharashtra

Nagpur

CC/384/2017

KASHINATH GANAJI MATALE - Complainant(s)

Versus

STATE BANK OF INDIA ( EARLIER STATE BANK OF MYSORE) - Opp.Party(s)

20 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/384/2017
( Date of Filing : 07 Sep 2017 )
 
1. KASHINATH GANAJI MATALE
R/O. 1389, NANDAJI NAGAR, BEHIND CHITANVISPURA POLICE CHOWKI,MAHAL, NAGPUR-440032
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. STATE BANK OF INDIA ( EARLIER STATE BANK OF MYSORE)
FARMLAND, BEHIND HOTEL CENTRE POINT, RAMDASPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
2. CENTRAL BANK OF INDIA, THROUGH BRANCH MANAGER
MAIN BRANCH, LIC SQUARE, KAMPTEE ROAD, NAGPUR-440001,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 ADV. M. R. JOHRAPURKAR, Advocate for the Opp. Party 0
Dated : 20 Mar 2023
Final Order / Judgement

सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैसयांच्‍या आदेशान्‍वये.

  1. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं.1 व 2 यांचा ग्राहक आहे. वि.प.क्रं.1 चे पूर्वीचे नाव स्‍टेट बॅंक ऑफ म्हैसूर असे होते ते बदलून आता स्टेट बॅंक ऑफ इंडीया असे आहे. तक्रारदाराचे वि.प.क्रं.1 या बॅंकेत मागील 25 वर्षापासून बचत खाते असुन त्यांचा  खाते क्रं.54030907385  आहे. सदर खात्यात तक्रारदाराचा पगार जमा होत असे. वि.प.क्रं.2 ही सुध्‍दा बॅंकीग कंपनी असुन त्यांचे एटीम मशीन महाल येथे आहे. वि.प.क्रं.1 ने तक्रारदाराला त्यांच्या बॅंकेचे एटीम कार्ड दिले होते. तक्रारकर्ता वि.प.क्रं.2 चे एटीम मशीन मधुन पैसे काढण्‍याकरिता उपयोग करीत असे. तक्रारदाराने दिनांक 5.9.2016 रोजी रुपये 10,000/- काढण्‍याचा प्रयत्न केला असता त्यांना रुपये 10,000/- प्राप्त झाले व त्याची पावती मिळाली. त्यावेळी 11-12-52 वाजता एटीएम मशीनमध्‍ये व्यवहार झाल्यानंतर तक्रारदाराचे खात्यात रुपये 56,686.96 रक्कम शिल्लक असल्याचे दर्शवित होते. तक्रारदाराला पुन्हा पैशाची आवश्‍यकता असल्याने त्यांनी पुन्हा रुपये 10,000/- काढण्‍याकरिता एटीम कार्ड मशीन मध्‍ये टाकले असता एटीएम मशीनचे स्क्रीनवर “नो कॅश ” असे लिहून आले व त्यांत रुपये 5,000/- लेफ्ट असे लिहून आले. याचाच अर्थ मशीनमधे केवळ रुपये 5,000/- शिल्लक होती असे तक्रारदाराने नमुद केले आहे. परंतु त्यानंतर तक्रारकर्ता रुपये 10,000/- काढावयास गेला असता तक्रारदाराला परत रुपये 10,000/- काढल्याबद्दल पावती प्राप्त झाली व त्यांचे खात्यात शिल्लक रुपये 46,686.96 असे असल्याबाबत वेळ 11:13:51 वाजता नमुद असलेली पावती मिळाली परंतु रक्कम मिळाली नाही. सदर दिवशी गणेश चतुर्थीनिमीत्य बॅंकेला सुट्टी असल्याने तक्रारकर्ता बॅंकेत तक्रार नोंदवू शकला नाही म्हणुन तक्रारदाराने ई-मेलवर तक्रार नोंदविली. तक्रारकर्ता दुस-या दिवशी दिनांक 6.9.2016 रोजी वि.प.क्रं. 1-बॅंकेत जाऊन माहिती दिली असता त्यांनी कळविले की, तुमच्या खात्यात संध्‍याकाळ पर्यंत रक्कम परत येईल. परंतु दिनांक 7.9.2016 पर्यत सुध्‍दा तक्रारदाराचे खात्यात रक्कम जमा न झाल्याने तक्रारदाराने वि.प.क्रं.1-बॅकेत लेखी तक्रार नोंदविली त्यांचा तक्रार क्रं. AT4099988608 असा आहे. वि.प.क्रं.1 यांनी सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 20.9.2016 रोजी वि.प.ला परत पत्र पाठविले व त्यांना रुपये 100/- प्रतीदिन प्रमाणे दंड मिळण्‍याची मागणी केली.  त्यानंतर 20.9.20216 रोजी वि.प.क्रं.1 ने तक्रारदाराला पत्र पाठवून कळविले की तक्रारदाराचे तक्रारीवर कार्यवाही सुरु आहे.   वि.प.क्रं.1 चे विनंतीवरुन तक्रारदाराचे रिझर्व बॅंकेच्या लोकपाल यांचेकडे दिनांक 25.11.2016 व दिनांक 6.2.2017 रोजी तक्रार केली व त्यापोटी दिनांक 20.1.2017 रोजी  तक्रारदाराचे खात्यातुन रुपये 575/- रुपये सदरच्या  तक्रारीबाबत वजा केले. रिझर्व बॅंकेच्या लोकपाल यांनी तक्रारदाराला दिनांक 12.4.2017 रोजी पत्राव्दारे कळविले की, आवश्‍यक लेखी व तोंडी पूरावे व कागदपत्रांचे अभावी तक्रार बंद केली आहे. त्याशिवाय वि.प.क्रं.2 ने दाखल केलेले सदर एटीएम मशीनीचे सीसीटीव्ही फुटेजमध्‍ये सदर घटना दिसुन आली नाही.  यावरुन वि.प.क्रं.2 यांनी बॅंकेचे लोकपाल यांना आवश्‍यक सीसीटीव्ही मधील सदर घटनेचे संपूर्ण फुटेज पुरविले नाही व तक्रारदारासोबत फसवणुक केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
  2.  तक्रारदाराने वि.प.क्रं.1 व 2 यांना वारंवार तोंडी तक्रार करुन देखिल त्यांचे तक्रारीची दखल घेतली नाही म्हणुन दिनांक 21.3.2017 व 24.3.2017 रोजी नोंदणीकृत पोस्टाने वि.प.क्रं.1 व 2 यांना पत्र पाठविले तरीसुध्‍दा वि.प.क्रं.1 व 2 ने कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारदारास रुपये 10,000/- परत केले नाही. वास्तविक वि.प.क्रं.1 ने वि.प.क्रं.2 सोबत आवश्‍यक चर्चा करुन तक्रारदाराचे खात्यात 7 दिवसांचे आत रुपये 10,000/- जमा करणे आवश्‍यक होते. परंतु वि.प.क्रं.1 व 2 ने कोणतीही आवश्‍यक कार्यवाही केली नाही त्यामुळे तक्रारदारास त्यांचे रुपये 10,000/- मिळू शकले नाही व तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागता म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन त्यांनी रुपये 10,000/- व त्यावर दिनांक 5.9.2016 पासुन प्रतीदीन रुपये 100/- दंड प्रत्यक्ष रक्कम मिळे पर्यत देण्‍यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच शारिरिक,मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी व तक्रारीचे खर्चाची मागणी केली आहे.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प.ला नोटीस काढण्‍यात आली. नोटीस मिळूनही वि.प. 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणून दिनांक 17.10.2018 रोजी तक्रार  त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.   
  4. वि.प.क्रं.1 नोटीस मिळुन तक्रारीत हजर झाले व आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्रं.1 आपल्या लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली असुन त्यांचे वि.प.कं.1 कडे मागील 25 वर्षापासुन खाते असल्याचे म्हणणे नाकारले आहे. परंतु बॅंकेच्या  एटीएम पॉलीसीनुसार तक्रारकर्ता वि.प.क्रं.2 चे एटीएम कार्ड वापरू शकतो. तक्रारदाराने रुपये 10,000/- ही रक्कम एकदा काढल्यावर परत रुपये 10,000/- काढले असता रक्कम मिळाली नाही ही बाब नाकारली आहे. तसेच एटीएम मशीनचे स्क्रीनवर “ नो कॅश ”  असे लिहून आले  व त्यांत रुपये 5000/- लेफ्ट असे लिहून आल्यावर तक्रारदाराने रुपये 10,000/- काढण्‍याची एटीएमव्दारे प्रक्रीया करावयास नको होती.  यावरुन तक्रादाराने एटीएम मशीन व्दारे रुपये 10,000/- काढले असता तक्रारदारास 11:13:51 वाजता पावती मिळाली व तक्रारदाराचे खात्यात रुपये 46,686.96 एवढी रक्कम शिल्लक असल्याची पावतीवर नमुद आहे. सदर व्यवहाराचे दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने व वि.प.क्रं.2 ची बॅंक बंद असल्याने व एटीएम मध्‍ये त्याबाबत कोणतीही हेल्पलाईन क्रमांक नसल्याने तक्रारकर्ता तक्रार करु शकला नाही याबाबत वि.प.क्र 2 सांगू शकेल.  तसेच तक्रादाराचे खात्यातुन रुपये 575/- तक्रारदाराने रिझर्व बॅंकेकडे केलेल्या तक्रारीचे शुल्क म्हणुन वजा करण्‍यात आले आहे. तसेच रिझर्व बॅंकेचे लोकपालाने तक्रारदाराची तक्रार आवश्‍यक कागदोपत्री पूराव्या अभावी खारीज केली आहे. त्यामूळे वि.प. क्रं.1 ने तक्रारदाराची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  5. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व वि.प.ने दाखल लेखी उत्तराचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

  मुद्दे                                                                 उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय.
  2. वि.प.ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?          होय.
  3. काय आदेश  ?                                                          अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं.1 व 2 यांचा ग्राहक आहे. वि.प.क्रं.1 चे पूर्वीचे नाव स्‍टेट बॅंक ऑफ म्हैसूर असे होते ते बदलून आता स्टेट बॅंक ऑफ इंडीया असे आहे. तक्रारदाराचे वि.प.क्रं.1 यांचे बॅंकेमधे मागील 25 वर्षापासून बचत खाते आहे. वि.प.क्रं.2 ही सुध्‍दा बॅंकीग कंपनी असुन त्यांचे एटीम मशीन महाल येथे आहे. तक्रारकर्ता वि.प.क्रं.1-बॅंकेचे एटीम कार्ड व्दारे वि.प.क्रं.2 बॅकेचे एटीम मशीनमधुन पैसे काढण्‍याकरिता उपयोग करीत असे. तक्रारदाराने दिनांक 5.9.2016 रोजी रुपये 10,000/- काढण्‍याचा प्रयत्न केला असता त्यांना रुपये 10,000/- प्राप्त झाले व त्याची पावती मिळाली. त्यानंतर एटीएम मशीन तक्रारदाराचे खात्यात रुपये 56,686.96 रक्कम शिल्लक असल्याचे दर्शवित होती. तक्रारदाराला पुन्हा रुपये 10,000/- काढण्‍याकरिता एटीमव्दारे प्रयत्न केला असता एटीएम मशीनचे स्क्रीनवर “ नो कॅश ” असे लिहून आले.  परंतु तक्रारदाराला परत रुपये 10,000/- काढल्याबद्दल पावती प्राप्त झाली व त्यांचे खात्यात शिल्लक रुपये 46,686.96 असल्याबाबत वेळ 11:13:51 वाजता नमुद असलेली पावती मिळाली. परंतु रक्कम प्राप्त झाली नाही. त्यादिवशी गणेश चतुर्थीनिमीत्य बॅंकेला सुट्टी असल्याने तक्रारकर्ता बॅंकेत तक्रार नोंदवू शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराने ई-मेलवर तक्रार नोंदविली. परंतु दिनांक 7.9.2016 पर्यत सुध्‍दा तक्रारदाराचे खात्यात रक्कम जमा न झाल्याने तक्रारदाराने वि.प.क्रं.1-बॅकेत लेखी तक्रार नोंदविली त्यांचा तक्रार क्रं. AT4099988608 असा आहे. वि.प.क्रं.1 यांनी सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.  
  2. वि.प.क्रं.1 चे सांगण्‍यावरुन तक्रारदाराने रिझर्व बॅंकेच्या लोकपाल यांचेकडे दिनांक 25.11.2016 व 6.2.2017 रोजी तक्रार केली. रिझर्व बॅंकेच्या लोकपाल यांनी तक्रारदाराला आरबिट्रेशनकरिता बोलविले नाही व दिनांक 12.4.2017 रोजी पत्राव्दारे कळविले की, आवश्‍यक लेखी व तोंडी पूरावे व कागदपत्रांचे अभावी तक्रार बंद केली व दिनांक 20.1.2017 रोजी वि.प.क्रं.1 बॅंकने तक्रारदाराचे खात्यातुन रुपये 575/-एटीएम तक्रारीबाबत वजा केले.  वास्तविक वि.प.क्रं.2 यांनी आयोगात हजर राहून सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखल करुन आपले म्हणणे सिध्‍द करणे आवश्‍यक होते. परंतु वि.प.क्रं. 2 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. तसेच तक्रारदाराने रिझर्व बॅंकेचे लोकपाल यांचेकडे तक्रार केली असल्यामूळे त्याबाबत शुल्क आकारण्‍याचा बॅंकेला अधिकार असल्याने तक्रादाराचे खात्यातुन रुपये 575/-तक्रारीचे शुल्क म्हणुन वजा करण्‍यात आले आहे ते योग्य असल्याने त्याबाबत कोणताही आदेश करता येणार नाही. तसेच वि.प.क्रं.1 व 2 यांनी आपल्या सेवेत त्रुटी केली असल्याबाबत तक्रारदाराने कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. तसेच तक्रारदाराने दुस-यांदा रुपये 10,000/-एटीएम मशीन मधुन काढण्‍याकरिता गेले असता एटीएम  स्क्रीनवर  “ नो कॅश ” असे लिहून आले, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.  परंतु तक्रारदाराने त्याबाबतची एटीएम मशीनची पावती अभिलेखावर दाखल केली नाही. त्यामूळे तक्रारदाराने ठोस पुरावा दाखल न केल्यामूळे सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे अस आयोगाचे मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे....

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
  3.  उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.