जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/289 प्रकरण दाखल तारीख - 03/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 11/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या सौ.उर्मिलाबेन भ्र.प्रवीणभाई पटेल, वय 40 धंदा व्यापार रा. नागार्जुननगर,.नांदेड. अर्जदार. विरुध्द. स्टेट बॅंक ऑफ इंडिया तर्फे शाखा व्यवस्थापक, डॉक्टर्स लेन, वजिराबाद, नांदेड.. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.के.दागडीया गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.जे.एस.पांडे निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हिचे गैरअर्जदार बँकेमध्ये बचत खाते असून त्याचा खाते क्र.11265900859 असा आहे. अर्जदाराने तिचे पती प्रवीणभाई पटेल व सौ.जय भ्र.दिलीप पटेल यांच्या सोबत श्री.खंडेराव जळबाजी साखरे यांच्याकडुन मौजे कामठा खुर्द ता.जि.नांदेड येथील शेत गट क्र.229 पैकी 0 हेक्टर 12 आर जमीन अर्जदाराने दि.09/02/2009 रोजीचा विकत घेण्याचा तोंडी करार केला होता व सर्वांनी मिळून श्री खंडेराव साखरे यांना दि.09/02/2009 रोजी रु.1,00,000/- ईसारा रक्कम म्हणुन नगदी दिले. सदरील जमीनीमध्ये लावलेला कृपाळू महाराज यांचा बोर्ड आठ दिवसांच्या आंत काढावा व 15 दिवसात अर्जदार व ईतर यांनी श्री खंडेराव साखरे यांना रु.5,50,000/- द्यावेत. दि.09/02/2009 पासून आठ दिवसांत बोर्ड काढणे ही कराराची मुख्य शर्त होतती व तो बोर्ड काढल्यानंतरच त्यांना रु.5,50,000/- देणे होते. दि.09/02/2009 रोजी रु.50,000/- व दि.18/02/2009 रोजी रु.2,00,000/- चा धनादेश श्री. खंडेराव साखरे यांना दिले. श्री.खंडेराव साखरे यांनी सदर जमीनीवरील कृपाळू महाराज यांचा बोर्ड आठ दिवसात काढला नव्हता किंवा दि.24/02/2009 पर्यंत काढला नव्हता. श्री खंडेरावा यांना बोर्ड काढण्यासाठी वारंवार विनंती केली. पण तो खोटे आश्वासन देऊ लागला व एक दोन दिवसांत बोर्ड काढतो असे म्हणू लागला पण बोर्ड काढला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार बँकेस दि.23/02/2009 रोजीचे वरील धनादेशचे पेमेंट स्टॉप करण्याची विनंती केली. दि.23/02/2009 रोजीचे स्टॉप पेमेंटचे पत्र लिहून आप-आपल्या बॅकेत देण्या करीता गेले असता, दि.23/02/2009 ला बॅकेस सुटी होती व म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार बॅकेस दि.24/02/2009 रोजी सकाळी 10.30 वाजता ते पत्र दिले. अर्जदाराने गैरअर्जदारास दि.24/02/2009 रोजी स्टॉप पेमेंटचे पत्र दिलेले असतांना सुध्दा गैरअर्जदार बँकेने वरील दोन धनादेश ज्याची एकुण रक्कम रु.2,50,000/- एवढी होते ते दोन्ही धनादेश दि.25/02/2009 वटविले. सदरची बाब अर्जदाराच्या लक्षात आल्या बरोबर अर्जदाराने गैरअर्जदार बॅकेत जावून चौकशी केली असता, गैरअर्जदार बॅकेच्या व्यवस्थापकाने अर्जदारास आश्वासन दिले की, ते दोन्ही धनादेशाची रक्कम रु.2,50,000/- श्री. खंडेराव साखरे यांच्याकडुन मागवून घेऊन अर्जदाराच्या खात्यात जमा करतील. गैरअर्जदारांनी स्टॉप पेमेंट असतांना देखील धनादेश वटवून सेवेत त्रुटी केली म्हणून अर्जदारास गैरअर्जदाराकडुन रु.2,50,000/-, दि.25/02/2009 पासुन 18 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश करावे असे म्हटले आहे. व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणुन रु.1,000/- असे म्हटले आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले, त्यांचे म्हणणे असे की, दि.24/02/2009 रोजी सकाळी 10.30 वाजता पत्र दिले हे म्हणणे चुक आहे कारण अर्जदाराने गैरअर्जदार यांना रक्कम मिळाल्यानंतर पत्र दिले. त्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदाराने स्वतः दिलेल्या धनादेशाशी निगडीत नसल्यामुळे धनादेशाचे रोखीकरण करणे एवढेच गैरअर्जदार यांचे कर्तव्य होते. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदाराने दिलेल्या व्यक्तिला रोख पैसे देण्यात आले. अर्जदाराने दिलेले धनादेश हे दि.09/02/2009 व 18/02/2009 या तारखेचे असल्यामुळे अर्जदारास त्या तारखेपासुन केंव्हाही धनादेशाचे रोखीकरण थांबवता आले असते पण अर्जदार व त्याच्याशी व्यवहार झालेल्या व्यक्तीशी वाद निर्माण झाल्याने व अर्जदाराच्या हक्कात काहीही न राहील्यामुळे त्यांच्या वादात चिडुन जाऊन जानू बूजुन त्रास देण्यासाठी अर्ज केला आहे. अर्जदाराकडुन यासर्व त्रासाबद्यल रु.20,000/- खर्च म्हणुन देण्यात यावेत. तसेच यासंपुर्ण तक्रारीची पाहाणी केली असता, अर्जदार व त्यांच्याशी व्यवहार झालेल्या व्यक्तिशी वाद आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्यामुळे अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्यात यावा व रु.20,000/- मानसिक त्रास देण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर खालील मुद्ये स्पष्ट झाले. मुद्ये उत्तर. 1. अर्जदारा हे ग्राहक आहेत काय? होय 2. अर्जदार यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी गैरअर्जदार बांधील आहेत काय? नाही. 3. आदेश काय? \अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांचे गैरअर्जदार बँक यांचेकडे सेव्हींग खाते व त्यावर व्यवहार चालू आहे. म्हणुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्या नं. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 अर्जदार हयांनी आपल्या तक्ररीमध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार बँक हयांचेकडे Stop Payment चा अर्ज दिला असतांना देखील बँकेने समोरच्या व्यक्तिला अर्जदाराकडुन मिळालेल्या चेकचे पैसे कॅश केले. अर्जदार हीच्या म्हणण्याप्रमाणे दि.23/02/2009 रोजी तीने गैरअर्जदार बँक हयांचे नांवाने Stop payment चा अर्ज दिला होता ती पून्हा आपल्या तक्रारीत असेही लिहीले की, दि.23/02/2009 रोजी बँकेला सुटटी असल्यामुळे तो अर्ज तीने दि.24/02/2009 रोजी दिला. पण अर्जदार हीचा अर्ज पाहता त्यावर दि.23/02/2009 अशीच तारीख आजही आहे जर तो अर्ज तीने दि.24/02/2009 रोजी दिला तर त्यावर बँकेत तरी कमीतकमी दि.24/02/2009 अशी तारीख लिहील्या शिवाय घेतला नसता तसेच बँकेचा शिक्का त्याचे बाजूची विना दिनांकाची सही हया सर्व गोष्टी अर्जाबद्यल संदीग्धता दाखवतात. ज्या व्यक्तिला गैरअर्जदार यांनी चेक दिले त्यास सदर तक्रार अर्जात गैरअर्जदार म्हणून पार्टी करणे आवश्यक होते पण अर्जदाराने त्यास पार्टी केले नाही.? तसेच गैरअर्जदार हयांनी युक्तीवाद केला त्यावेळी तोंडी असे कथन केले की, अर्जदाराने बँकेच्या विरुध्द व ज्या व्यक्तिला चेक दिले त्याचे विरुध्द दिवाणी न्यायालयात या आधीच केस दाखल केली आहे. त्यावर अर्जदाराने त्यास होकार दिला. अर्जदाराने पुर्वीच आपल्या तक्रारीत हया गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक होते. यावरुन अर्जदार काही तरी लपवत आहे व स्वच्छ हाताने समोर आलेली नाही हे स्पष्ट होते. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रार अर्जावर न्यायदान करण्यासाठी सखोल पुराव्याची गरज आहे. अर्जदाराने जे कागदपत्र दाखल केलेले आहेत त्यावरुन वरवर निष्कर्ष काढणे अर्जदारास न्याय मिळण्याचे दृष्टीने हितावह नाही. अर्जदाराने यापुर्वी सदरचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे. त्याठिकाणी सखोल पुरावा तपासल्या जातो व तेथेच अर्जदारास योग्य न्याय मिळू शकतो. दिवाणी न्यायालयात अर्जदाराने केलेला अर्ज सिध्द झाला व त्यानंतरही अर्जदार केवळ सेवेतील त्रुटीबाबत पुन्हा मंचा समोर तक्रार घेऊन येवू शकतो. हया निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2. खर्च ज्याचे त्याने सहन करावा. 3. उभय पक्षांना निर्णय कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाड पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |