निकालपत्र
व्दाराः-श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे वटवण्यासाठी दिलेला चेक त्यांनी वेळेत न वटवुन तक्रारदारास रक्कम अदा न करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार ही एकत्र कुटूंबातील रहीवाशी असुन तक्रारदाराची मुले मनोज वसंतराव पाटील व विनोद वसंतराव पाटील हे मौजे कल्याण येथे कॉन्ट्रॅक्टर महेश शिवाजी देशमुख यांचेकडे मजुरीने कामासाठी आहेत. सदर कामाचा मोबदला म्हणुन देना बँक, कलयाण चा चेक क्र.57926 रक्कम रु.27,000/- सदर मुलांची आई म्हणजेच तक्रारदार हिचे नांवाने दिलेला होता सदरचा चेक दि.11/3/2008 रोजी खाते क्र.30345314183 या तक्रारदाराचे विरुध्द पक्ष बँकेतील खात्यात वटण्यासाठी टाकला असता आजतागायत सदरची रक्कम तक्रारदार यांना मिळालेली नाही. सदरचा चेक वटवुन रक्कम तक्रारदारास वेळेत का मिळत नाही याची तक्रारदाराने विरुध्द पक्ष बँकेज जाऊन चौकशी केली असता तक्रारदारास कुठलेही समर्पक उत्तर मिळाले नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर होऊन विरुध्द पक्षाकडुन तक्रारदारास रु.27,000/- व त्यावरील व्याज अशी रक्कम अदा करण्याचे आदेश व्हावेत, नुकसान भरपाई व शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे.
तक्रारदाराने विरुध्द पक्षाचे शाखेत दि.11/3/2008 रोजी देना बँक शाखा कल्याण या शाखेचा चेक क्र.057926 रक्कम रु.27,000/- हा वसुलीसाठी जमा केला होता. नियमाप्रमाणे सदरचा चेक लगेचच स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा कल्याण (इस्ट) कडे पोस्ट ऑफीस बहादरपुर,ता.पारोळा,जि.जळगांव यांचेमार्फत रजिष्ट्रर पोष्टाने दि.13/3/2008 रोजी रजि.पावती क्र.3889 अन्वये पाठविला तथापी सदरचे रजिष्ट्रर मुदतीत मिळाले नाही म्हणुन विरुध्द पक्ष यांनी अनुक्रमे दि.17/4/2008, दि.7/5/2008, दि.17/5/2008, दि.28/5/2008 व दि.30/05/2008 रोजी सब पोष्ट ऑफीस, बहादरपुर व मुख्य पोष्ट ऑफीस, चाळीसगांव यांना लेखी कळविले तसेच फोन व्दारे संपर्कही केला त्याचप्रमाणे संबंधीतांना दि.17/6/2008 रोजी वकीलामार्फत रजि.नोटीस दिली. विरुध्द पक्ष यांचेकडु न कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही त्यामुळे तक्रारदारास कोणतीही नुकसानी रक्कम देण्यास अगर व्याज देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाहीत. वास्तविक तक्रारदाराने विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल न करता पोष्ट ऑफीस विरुध्द तक्रार दाखल करणे गरजेचे होते परंतु तक्रारदाराने चुकीच्या पध्दतीने विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारास संबंधीतांकडुन नवीन चेक अगर रोख रक्कम परस्पर घेणे शक्य होते तथापी तक्रारदाराने तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही. तक्रारदाराचे नुकसान झाले आहे असे सिध्द झाल्यास त्यास पोष्ट ऑफीस, बहादरपूर व चाळीसगांव हे जबाबदार आहे. नियमानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा चेक क्लियरन्ससाठी पाठविलेला आहे त्यात कोणताही हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केलेला नाही. सबब वरील कारणाचा विचार होऊन तक्रारदाराने विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेली तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी, प्रस्तुत अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- तक्रारदाराकडुन विरुध्द पक्षास देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचे शपथपत्र याचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांचेकटे वटण्यासाठी दिलेल्या चेकची रक्कम
विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास वेळेत अदा न करुन
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - तक्रारदार हिने विरुध्द पक्ष बॅंकेतील तिचे खाते क्र. 30345314183 मध्ये देना बँक, कल्याण चा चेक क्र.57926 रक्कम रु.27,000/- हा दि. दि.11/3/2008 रोजी वटवण्यासाठी दिला होता याबाबत उभयतांमध्ये कोणताही वाद नाही. तथापी सदरचा चेक वटवण्यासाठी दिल्यानंतर अनेकवेळा तक्रारदार हिने चौकशी करुनही सदरचे चेकची रक्कम तक्रारदाराचे खात्यात जमा न करुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास प्रदान केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केल्याचे तक्रार अर्ज व त्यासोबतचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
7. विरुध्द पक्ष यांनी याकामी हजर होऊन लेखी खुलासा दिलेला असुन त्याव्दारे त्यांची याकामी कोणतीही सेवा त्रृटी अगर निष्काळजीपणा नसल्याचे कथन करुन नियमाप्रमाणे सदरचा चेक लगेचच स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा कल्याण (इस्ट) कडे पोस्ट ऑफीस बहादरपुर,ता.पारोळा,जि.जळगांव यांचेमार्फत रजिष्ट्रर पोष्टाने दि.13/3/2008 रोजी रजि.पावती क्र.3889 अन्वये पाठविला तथापी सदरचे रजिष्ट्रर मुदतीत मिळाले नाही म्हणुन विरुध्द पक्ष यांनी अनुक्रमे दि.17/4/2008, दि.7/5/2008, दि.17/5/2008, दि.28/5/2008 व दि.30/05/2008 रोजी सब पोष्ट ऑफीस, बहादरपुर व मुख्य पोष्ट ऑफीस, चाळीसगांव यांना लेखी कळविले तसेच फोन व्दारे संपर्कही केला त्याचप्रमाणे संबंधीतांना दि.17/6/2008 रोजी वकीलामार्फत रजि.नोटीस दिली. त्यामुळे याकामी विरुध्द पक्ष यांचा कोणताही निष्काळजीपणा झालेला नसुन प्रस्तुत कामी पोष्ट ऑफीस, बहादरपुर व चाळीसगांव हेच जबाबदार असल्याचे नमुद करुन तक्रारदाराचे त्यांचेविरुध्द तक्रार दाखल करावयास पाहीजे होती याकामी विरुध्द पक्ष यांचेकडुन कोणतीही सेवा त्रृटी झालेली नाही असे प्रतिपादन केलेले आहे.
8. उपरोक्त विवेचन, तक्रारदाराची तक्रार, विरुध्द पक्षाचे म्हणणे, दोन्ही बाजुंनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता विरुध्द पक्ष यांनी दि.25/9/2008 चे कागद-यादीसोबत सुपरिटेंडेंट ऑफ पोष्ट ऑफीस, जळगांव विभाग, जळगांव यांचे पत्राची छायाप्रत दाखल असुन तिचे अवलोकन करता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराने दिलेला चेक वटवण्यासाठी पाठवितांना पाकीटावर कल्याण (ईस्ट) असा पत्ता नमुद केला होता प्रत्यक्षात सदरची शाखा ही कल्याण (वेस्ट) येथे कार्यरत असल्याचेही पत्रात नमुद आहे त्यामुळे पाकीटावर विरुध्द पक्षाचे संबंधीत कर्मचा-यांकडुन पत्ता लिहीतांना चुक झाली असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा चेक चुकीच्या पत्यावर वटवण्यासाठी पोष्ट केल्याने व तक्रारदार यांना वेळेत चेकची रक्कम वटवुन न दिल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. मुद्या क्र.2 - तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर होऊन विरुध्द पक्षाकडुन तक्रारदारास रु.27,000/- व त्यावरील व्याज अशी रक्कम अदा करण्याचे आदेश व्हावेत, नुकसान भरपाई व शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे. आमचे मते तक्रारदार ही विरुध्द पक्ष यांचेकडुन चेक ची वटवायची रक्कम रु.27,000/- चेक विरुध्द पक्षाकडे वटवण्यासाठी टाकेलेली दि. 11/3/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अंशतः मंजुर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना एकुण रक्कम रु.27,000/- (अक्षरी रु.सत्तावीस हजार मात्र ) दि.11/03/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत तक्रारदारास अदा करावेत.
( क ) विरुध्द पक्ष यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/-(अक्षरी रु.दहा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/-(अक्षरी रु.तीन हजार मात्र) या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत तक्रारदारास अदा करावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 17/10/2014. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.विश्वास दौ.ढवळे )