Maharashtra

Bhandara

EA/15/30

Ramnath Prasad Bidesh Prasad - Complainant(s)

Versus

State Bank of India - Opp.Party(s)

Adv. K.I. Ramteke

30 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Execution Application No. EA/15/30
( Date of Filing : 05 Aug 2015 )
In
Complaint Case No. CC/12/87
 
1. Ramnath Prasad Bidesh Prasad
R/o. Type 13/5, Sunflag Colony, Warthi, Tah. Mohadi, Dist. Bhanadara
Bhandara
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. State Bank of India
Through Branch Manager, Gonda Branch, Gonda, Uttarpradesh
Gonda
Utter Pradesh
2. Canara Bank, Through Branch Manager
Branch Sunflag, Warthi, Bhandara Road, Tah. Mohadi, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Dec 2021
Final Order / Judgement

प्रस्‍तुत ग्रा.सं.कायदयाचे कलम 27 खालील दरखास्‍त प्रकरणात आज दरखास्‍तदार व त्‍यांचे वकील गैरहजर. प्रकरणातील अभिलेखाचे अवलोकन करण्‍यात आले असता असे दिसून येते की, ग्राहक मंच, भंडारा  यांनी मूळ ग्राहक तक्रार क्रं-सीसी/12/87 निकाल पारीत दिनांक-03.01.2015 रोजी दिलेल्‍या आदेशाचे  गैरअर्जदार क्रं 1 स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया तर्फे शाखाधिकारी, शाखा गोंडा, तालुका जिल्‍हा गोंडा (उत्‍तरप्रदेश) यांनी केलेले असलयाने गैरअर्जदार क्रं 1 यांचे नाव कलम 27 खालील प्रकरणातून वगळण्‍यात येते असे जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा यांनी नि.क्रं 1 वर दिनांक-04.04.2016 रोजी आदेशित केल्‍याचे दिसून येते. त्‍याच प्रमाणे  गैरअर्जदर क्रं 2 कॅनरा बॅंक तर्फे शाखाधिकारी, वरठी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांनी वारंवार जिल्‍हा ग्राहक मंचा समक्ष त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक मंचाचे मूळ तक्रारीतील आदेशा विरुध्‍द मा.राज्‍य आयोग यांचेकडे अपिल केले असल्‍याचे मौखीक सांगितले असे मागील रोजनाम्‍यांवरुन दिसून येते परंतु त्‍या संदर्भात अपिला बाबतचे कोणतेही दस्‍तऐवज अभिलेखावर उपलब्‍ध नाहीत परंतु  विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंंके तर्फे त्‍यांचे वकील श्री एन.पी.राहांगडाले यांनी ग्राहक मंचा समक्ष  दिनांक-14.09.2016 रोजी पुरसिस दाखल करुन जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा यांचे मूळ तक्रारीतील आदेश दिनांक-03.01.2015 अनुसार जिल्‍हा ग्राहक मंचात आदेशाचे पुर्ततेपोटी एकूण रक्‍कम रुपये-7000/- भरलेले असल्‍याचे नमुद करुन सोबत रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या जोडल्‍या आहेत असेही नमुद आहे. रुपये-3500/- आणि रुपये-3500/-  या प्रमाणे जिल्‍हा ग्राहक मंचात भरल्‍याच्‍या शासनाच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती अभिलेखावर उपलब्‍ध आहेत. मूळ तक्रारीतील आदेशा प्रमाणे गैरअर्जदार क्रं 2 बॅंकेला शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-2000/- अशा रकमा त.क. यांना दयावयाच्‍या होत्‍या.सदर दरखास्‍त प्रकरण हे सन-2015 पासून जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  प्रलंबित आहे.  दरखास्‍त प्रकरणाात   दरखास्‍तदार सातत्‍याने अनुपस्थित  आहेत. अभिलेखावरुन गैरअर्जदार क्रं 1 व क्रं 2 यांनी  जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा यांनी मूळ तक्रारीत दिलेल्‍या  आदेशाचे अनुपालन केल्‍याचे दिसून येते,  करीता  सदर दरखास्‍त प्रकरण खारीज करण्‍यात येऊन गैरअर्जदार क्रं 1 व क्रं 2 यांना ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 27 खालील गुन्‍हयातून मुक्‍त करण्‍यात येते.  दरखास्‍त प्रकरण नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते. नि.क्रं 1 वर आदेश पारीत करण्‍यात आला. आदेशाची नोंद संबधित पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांनी घ्‍यावी.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.