तक्रारदार : वकीलामार्फत हजर. सामनेवाले : -- *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश 1. तकारदारांनी प्रस्तुतची तक्रार स्टेट बॅक ऑफ इंडिया, कांदिवली (पश्चिम) शाखा यांचे विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मार्च, 2004 मध्ये रु.4,50,000/- गृह कर्ज घेतले होते व तक्रारदारांचे कथना प्रमाणे व्याजाचा दर निश्चित (Fixed) 8 टक्के होता व मासीक हप्ता रु.4,305/- होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सा.वाले यांनी 2004-2005 ते 2009-2010 दरम्यान वेगवेगळया दराने व्याजाची आकारणी केली व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणें सा.वाले बँकेने तक्रारदारांकडून केवळ 8 टक्के दराने व्याज घ्यावे व व्याजाची फेर आकारणी त्या दराने करावी. 2. तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर देखील सुनावणीचे दरम्यान कर्ज मंजूरी आदेश करारनाम्याची प्रत हजर करावी असा निर्देश देण्यात आला होता व प्रकरण दिनांक 25.3.2011 रोजी सुनावणीकामी नेमण्यात आले होते. 3. तक्रारदारांनी दिनांक 25.3.2011 रोजीची नोटीस परस्पर सा.वाले त्यांचे बँकेत दिली होती. त्याप्रमाणे सा.वाले बँकेचे वकील हजर झाले व त्यांनी काही कागदपत्र दाखल केली. प्रस्तुत मंचाने तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केलेली कागदपत्रे व सा.वाले यसांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचा एकत्रितपणे वाचन कले. 4. तक्रारदाराने तक्रारीसोबत सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या दिनांक 14.12.2010 रोजीच्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्याचे वाचन केले असता असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना असे स्पष्टपणे कळविले की, तक्रारदारांनी व्याजाचा दर हा बदलत्या रेट (Floating) प्रमाणे स्विकारले होते व तो कधीच फीक्स नव्हता. तक्रारदारांचे कागदपत्रावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांच्या गृहकर्जाचे बरेचसे हप्ते थकीत झाले असून ती रक्कम तक्रारदार यांचेकडून येणे आहे. तक्रारदारांनी त्यांच्या दिनांक 28.3.2008 च्या पत्राची प्रत पृष्ट क्र.21 वर दाखल केली आहे. त्यावरुन असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना व्याजाचे दराचे संदर्भात बदल पाहिजे असल्यास संमती देण्यास कळविले होते. परंतु तक्रारदाराने तसी संमती दिली नव्हती. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत मुळचा कर्जाचा करारनामा, मंजूरी आदेश यांच्या प्रती हजर केलेल्या नाहीत. तसेच तक्रारदारांनी फीक्स रेट दराने सा.वाले यांचेकडून कर्ज घेतले होते या बाबतचा कुठलाही पूरावा दाखल केलेला नाही. 5. तक्रारदारांनी दिनांक 14.6.2011 रोजी जादा कागदपत्रांचा संच दाखल केला. त्यामध्ये सा.वाले बँकेने तक्रारदारांना दि.21.3.2011 रोजी दिलेल्या पत्राची प्रत आहे. त्यामध्ये देखील व्याजाचा दर बदलता राहील असे नमुद केलेले आहे. कर्ज मंजूरी पत्र दिनांक दि.4.3.2004 ची प्रत दाखल आहे. त्यामध्ये देखील व्याजाचा दर बदलता राहील असे नमुद केलेले आहे. तक्रारदारांनी या संचामध्ये तक्रारदारांच्या खाते उता-याच्या काही प्रती हजर कलेले आहेत व त्यावर व्याजाचा दर 9.25 असा नमुद केलेला आहे. त्यावरुन तक्रारदारांच्या प्रतिनिधींनी असे कथन केले की, व्याजाचा दर हा निश्चित होता व बदलता नव्हता. तथापी त्याच खाते उता-यामध्ये दिनांक 29.6.2009 ची नोंद हे दर्शविते की, व्याजाचा दर 9.75 वरुन 9.25 करण्यात आला. ही नोंद देखील असे दर्शविते की, व्याचादा दर निश्चित नव्हता नव्हता व बदलता होता. 6. या उलट सा.वाले यांनी जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्यावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना कर्ज मंजूर करताना जे पत्र दिले होते त्यामध्ये 2.25 टक्के दराने R.B.I. बँकेच्या दारापेक्षा कमी म्हणजे बदलत्या दराने कर्ज वाटप केले होते. सा.वाले यांनी दाखल केलेल्या पत्रावरुन असे दिसते की, सा.वाले दिनांक 5.1.2005 चे पत्रात तक्रारदारांना ते फीक्स दराने व्याज आकारण्यात तंयार नाही असे कळविले होते. 7. एकंदरीत सर्व कागदपत्रावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना गृह कर्ज बदलत्या दराने दिले होते व ते कधीही निश्चित दराने दिले होते असे दिसून येत नाही, त्या बद्दलचा पुरावा नाही. यावरुन असे दिसते की, तक्रारातील कथने ही केवळ कांगावा असून पच्छात बुध्दीने व प्रलंबीत हप्ते चुकविण्याचा किंवा कमी करण्याचा प्रस्तुत तक्रारीमध्ये प्रयत्न आहे. सबब तक्रार प्रथम दर्शनी दाखल कामी काही तथ्य आहे असे दिसून येत नसल्याने पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |