दरखास्तदार गैरहजर.
प्रस्तूतचे दरखास्त प्रकरण दरखास्तदार यांनी कलम-27 खाली या आयोगाने तक्रार क्र.RBT/CC/11/249 या प्रकरणात दिनांक 3 ऑगस्ट, 2017 रोजी पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दाखल केलेले आहे.
सदरच्या आदेशाविरुध्द सामनेवाले स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी मा.राज्य आयोगासमोर दाखल केलेले अपील क्र.A/17/1138 या प्रकरणात मा.राज्य आयोगाने दिनांक 18 जुलै, 2019 च्या आदेशान्वये खारीज करुन या आयोगाचा आदेश कायम केला होता.
या आदेशाविरुध्द सामनेवाले स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी मा.राष्ट्रीय आयोगासमोर दाखल केलेले Revision Petition No.2196/2019, मा.राष्ट्रीय आयोगाने दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 रोजी मंजूर केले असून या आयोगाने मूळ तक्रारीत दिनांक 3 ऑगस्ट, 2017 रोजी पारीत केलेला आदेश व मा. राज्य आयोगाने अपीलात दिनांक 18 जुलै, 2019 रोजी पारीत केलेला आदेश रद्द केला असून या आयोगासमोरील मुळ तक्रार क्र.RBT/CC/11/249 खारीज केली आहे.
सदरच्या आदेशाविरुध्द मुळ तक्रारदार यांनी मा.सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेली विशेष अनुमती याचिका क्र. SLP (C) 2551/2020 दिनांक 7 फेब्रुवारी, 2020 च्या आदेशान्वये खारीज करण्यात आलेली आहे.
सबब, दरखास्तदार यांनी कलम-27 खाली या आयोगाने तक्रार क्र.RBT/CC/11/249 या प्रकरणात दिनांक 3 ऑगस्ट, 2017 रोजी पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दाखल केलेले प्रस्तूतचे दरखास्त प्रकरण, मा.राष्ट्रीय आयोगाच्या वर नमूद आदेशानुसार, या आयोगाचा मुळ आदेश रद्द केल्याने व मुळ तक्रार खारीज केल्याने, निरर्थक ठरत असल्याने निकाली काढण्यात येते.