मंचः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, श्री.वि.गं.जोशी, सदस्य. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- तक्रारदार : गैरहजर. सामनेवाले : गैरहजर. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- , श्री.वि.गं.जोशी, सदस्य ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे. 2. या प्रकरणात सा.वाले ए.टी.एम व डेबीट कार्डाची सेवा पुरविणारी बँक आहे. तर तक्रारदार बोटीवर नोकरी करतात व त्यांचे म्हणण्यानुसार ते बोटीवर/जहाजावर त्यांचे नोकरी निमित्त बरेच दिवस असतात. 3. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे ए.टी.एम/डेबीट कार्ड ते जहाजावर भर समुद्रात असताना कोणीतरी वापरुन त्यातील रक्कमा काढून घेतल्या. तक्रारदार हे जहाजावर नियमितपणे कार्यरत आहेत. त्यामुळे ते बराच काळ समुद्रातच असतात. 4. तक्रारदार असे निवेदन करतात की, त्यांचे वडील गंभीरपणे आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या पत्नीला पैशाची गरज भासली. त्यावेळी त्यांच्या ए.टी.एम/डेबीट कार्डाच्या खात्यात पैसे नसल्याचे समजले. त्यांच्या पत्नीने बँकेशी संपर्क करुन सदर खाते गोठवण्याच्या सूचना दिल्या. तो पर्यत त्या खात्यात रक्कम शिल्लक नव्हती. या प्रकाराबाबत त्यांच्या पत्नीने वेळोवेळी बँकेच्या अधिका-यांशी संपर्क साधला. तसेच बँकेच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. परंतु पोलीसांनी सदर तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. कारण पोलीसांच्या म्हणण्यानुसार सदर तक्रार बँकेने नोंदवावयाला हवी. 5. तक्रारदारांचे असे म्हणणे की, या प्रकरणाचा बँकेशी पाठपुरावा केला. तरी त्यातुन काही निष्पन्न झाले नाही. या उलट बँकेच्या अधिका-यांनी मलेशीयामध्ये जेथे हा गुन्हा घडला तेथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवावयास सांगीतला. 6. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार खाते धारकांच्या पैशाची जबाबदारी बँकेने ध्यावयाला हवी. तसेच कोणत्याही प्रकारची अफरातफर झाल्यास त्याची शहानिशा करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, ते व्यापारी नसून नोकरदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना नियमीत हेलपाटे घालणे शक्य नाही. तसेच कष्टाचे पैसे गेल्याने आर्थिक नुकसान व दुःखसुध्दा आहे. बॅंकेचे अधिकारी याबाबत काहीही कृती करण्यास तंयार नसल्यामुळे नाईलाजाने या मंचासमोर यावे लागले. त्यांनी तक्रारअर्ज दाखल करुन खालील मागण्या केल्या. 1) मुळ रक्कम रु.50,000/- व्याजासहीत. 2) नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च. 7. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन या प्रकरणात आपले म्हणणे मांडणे. सा.वाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दिनांक 8.3.2008 रोजी तक्रार केल्यावर ताबडतोब ए.टी.एम/डेबीट कार्ड गोठवण्यात आले. सदर कार्ड हे मलेशीया या ठिकाणी दुकानांमध्ये कार्ड वापरुन माल खरेदी केला गेलेला आहे. 8. सा.वाला यांचे असे म्हणणे आहे की, ए.टी.एम/डेबीट कार्ड खात्याच्या करारानुसार ग्राहकांने त्याचे कार्ड गहाळ न होण्याची काळजी त्यांनी स्वतःच घ्यायला हवी, आणि ते गहाळ झाल्यास व त्याचा दुरुपयोग झाल्यास त्यास बँक जबाबदार असणार नाही. सदर प्रकरण दिनांक 16.10.2008 रोजी बँकेच्या ओंमबुडसमन कडे सुनावणीला होते. त्यावर निकाल न होता त्यात काही तथ्य नाही म्हणून बंद करण्यात आले. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, ही तक्रार खोटी व अर्धवट आहे. म्हणून ती चालु शकत नाही. त्यामुळे ती रद्द करावी. 9. तक्रार अर्ज, कैफीयत व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, शपथपत्र, तसेच बँकेचे विवरणपत्र, इ-मेल याची पहाणी व अवलोकन केले. तत्पूर्वी तक्रारदार व सा.वाले यांचा युक्तीवाद दि.4.1.2010 व 21.4.2010 ऐकला. वरील सर्व बाबींचा साकंल्याने विचार केल्यानंतर तक्रार निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात आले. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1. | सा.वाला यांनी सेवेत कमतरता तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे तक्रारदारांनी सिध्द केलेले आहे का ? | नाही. | 2. | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळविण्यास पात्र आहेत का ? | नाही | 3. | आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 10. या प्रकरणाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांचेकडे ए.टी.एम/डेबीट कार्ड स्वतःकडे व त्यांचे पत्नीकडे अशी दोन कार्डे उपलब्ध होती. तसेच तक्रारदार व त्यांची पत्नी हे क्वीचित प्रसंगी त्याच्या निवासस्थानी एकत्रित उपलब्ध असतात. कारण तक्रारदार हे जहाजावर कार्यरत असल्यामुळे बराच काळ घरापासून दूर असतात. अशा परिस्थितीत कार्डाचा रोजच्या रोज होणारा वापर हा एकमेकांना माहित असणे साधारणपणे अशक्य आहे. 11. तक्रारदाराने कार्डासाठी बँकेबरोबर केलेल्या करारानुसार ए.टी.एम.क्रेडीट कार्ड सांभाळण्याची व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे तक्रारदारांची आहे असे सा.वाले यांनी दाखल केलेल्या अटी शर्तीच्या नियमावलीनुसार सिध्द होते. त्यामुळे कार्डाच्या गैर वापराबाबत पूर्णपणे बँकेला जबाबदार धरता येत नाही. 12. तकारदाराने आपल्या प्रतिउत्तरात एका ठिकाणी असे नमुद केले आहे की, तक्रारदार हे स्वतः जास्तीत जास्त वेळ जहाज समुद्रात असताना जहाजावर असतात. त्यावरुन ते जहाजावरुन किना-यावर गेलेच नाहीत असे सिध्द होत नाही. ए.टी.एम/डेबीट कार्डाच्या विवरण पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, हया खात्यात किती शिल्लक आहे याची कल्पना वापरणा-याला होती. हया कार्डाव्दारे जी खरेदी केली गेली. ती काही मोठया रक्कमेसोबत अगदी छोटया व शुल्लक रक्कमांचीही होती आणि ती तीन दिवस चालली होती. त्यावरुन असे अनुमान काढणे वावगे होणार नाही की, कार्ड वापरणा-याला त्याच्या वापराची घाई नव्हती. सदर कार्ड वापरासाठी तक्रारदारांनी आपल्या मित्रास दिले असल्याचे नाकारता येत नाही. या व्यवहाराची कल्पना जरी तक्रारदारांना आली नाही तरी ती त्यांच्या पत्नीला ताबडतोब कळणे शक्य होते. 13. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ जहाजावरील हजेरीपत्रक दाखल केले आहे. त्यावरुन ते जहाज सोडून कोठेही गेले नव्हते किंवा पूर्णवेळ जहाजावरच होते असे सिध्द होत नाही. किंवा तशा प्रकारचे प्रमाणपत्र त्यांचे अधिका-यांनी त्यांना दिले नाही. दरम्यान तक्रारदार एखाद्या बंदरावर पोहचले असतील तर त्याची नोंद वरील प्रमाणपत्रात नाही. 14. या प्रकरणी मंचास असे नमुद करावेसे वाटते की, बँकेने आपल्या ग्राहकाचे हितसंबंध जोपासायला हवे होते. त्यांनी स्वतःहून पोलीस तक्रार नोंदविली असती तर बरे झाले असते. त्यामुळे पोलीसांनी घडल्या गुन्हयाचा तपास करुन कदाचित सत्य उघडकीस येण्याची शक्यता होती. तसेच बँकेने तक्रारदारांनी खरेदी केलेल्या वस्तुंची खरेदी पावती त्या त्या दुकानदारांकडून मिळवून पोलीसांना किंवा तक्रारदारांना उपलब्ध करुन दिली असती तर गुन्हयाचा तपास करणे सोपे झाले असते. बँकेने ग्राहकांच्या/खातेदारांच्या तक्रारीबाबत अगदीच उदासिनता दाखविणे उचित नाही. 15. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा उपलब्ध करुन दिलेला नाही. हे कारण तक्रार खारीज करण्यास पुरेसे आहे असे मंचास वाटते. तसेच उभयपक्षी करारानुसार डेबीट/क्रेडीटकार्ड सुरक्षीत ठेवण्याची व त्याचा दुरुपयोग होणार नाही हयाची काळजी घेण्याची जबाबदारी तक्रारदारांवर होती. आदेश 1. तक्रार क्रमांक 171/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. <!--[if !supportLists]-->5 <!--[endif]-->आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य ठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |